भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व, कथा, व ते कुठे स्थित आहेत. Places of 12 jyotirling, importance, story in Marath

अनुक्रमणिका

Jyotirling

देवाधिदेव महादेव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व, कथा, व ते कुठे स्थित आहेत.

भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अध्यात्मावर आस्था ठेवणारी लोक आहेत. भारतात असंख्य देऊळ आहेत.

विशिष्ट असे धाम आहेत ज्यांच्या मागील पौराणिक कथा ऐकायला मिळतात. या सगळ्या देवळात वर्षाच्या बारा महिने गर्दी असते.

आज आपण भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व आणि विशेषता जाणून घेणार आहोत.

भारताच्या पवित्र भूमीवर असे अनेक पवित्र स्थळ आहेत.  या प्रमुख तीर्थांमध्ये भारतातील चार धाम  याबरोबरच बारा ज्योतिर्लिंग पण समाहित आहेत. भगवान शिव यांचे उत्तराखंडातील केदारनाथ ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा चा प्रमुख केंद्र आहे.

मान्यतेनुसार जी व्यक्ती आपल्या जीवनात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करते ती व्यक्ती सर्व दोषांनी मुक्त होऊन त्याच्या आत्म्याला  मोक्षाची प्राप्तता होते. 

जी व्यक्ती जीवन काळात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेते ती खूप सौभाग्यशाली आत्मा आहे.

ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती, ज्योतिर्लिंग म्हणजे काय? Origin of 12 Jyotirling Meaning Of Jyotirling In Marathi

ज्योती + लिंग = ज्योतिर्लिंग

ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे भगवान शिव यांचे लिंग स्वरूप. अर्थात, प्रत्येक ज्योतिर्लिंगात भगवान शिव प्रकाशमान ज्योतीच्या रूपात प्रकट झाले आहेत.

धार्मिक मान्यता व ग्रंथा प्रमाणे भगवान शिव साक्षात रूपात दिव्य ज्योतीच्या स्वरूपात साक्षात प्रकट झाले होते.

पृथ्वीवरील बारा वेगवेगळ्या ठिकाणी भगवान शिव विभिन्न रूपात साक्षात विराजमान झाले होते.

ज्योतिर्लिंगाचा अर्थ प्रकाश स्तंभ असा आहे. अशी मान्यता आहे की एकदा भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये कोण सर्वोच्च देवता असा वाद झाला.

त्यावेळेस भगवान शिव प्रकाश स्तंभाच्या रूपामध्ये प्रकट झाले. त्या दोघांना या प्रकाश स्तंभाच्या शेवट शोधण्यासाठी सांगितले.

भगवान विष्णू वरील दिशेलातर भगवान ब्रह्म खालील दिशेला त्या ज्योतिर्लिंग चा अंत शोधू लागले. पण अत्यंत प्रयत्न करून देखील त्या दोघांना अंत भेटला नाही. 

त्यानंतर भगवान शिव यांनी त्या प्रकाश स्तंभाला पृथ्वीवर टाकले. या प्रकाश स्तंभालाच आज आपण ज्योतिर्लिंग या नावाने ओळखतो.

सोमनाथ ज्योतिर्लिंग – गुजरात Somnath Jyotirling Gujarat

सोमनाथ ज्योतिर्लिंग भारतातील गुजरात या राज्यात स्थित आहे.  गुजरात मधील सौराष्ट्र नावाच्या क्षेत्रात हे ज्योतिर्लिंग आहे.

पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ होय. या ठिकाणी एक कुंड आढळून येते. हे कुंड देवतांनी बनविले आहे.

या पवित्र कुंडाला सोमनाथ कुंड या नावाने ओळखले जाते. या कुंडमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात.

जन्म मृत्यूच्या चक्रातून आत्म्याला मुक्ती मिळवून मोक्षप्राप्तता होते.

सोमनाथ  ज्योतिर्लिंगाचा उल्लेख ऋग्वेद, शिवपुराण, स्कंद पुराण, श्रीमद् भगवद्गीता यांच्यामध्ये आढळतो.  या वरून आपण निश्चितच याचा अंदाज लावू शकतो की हेच देऊ किती पुरातन आहे.

धार्मिक मान्यतेप्रमाणे चंद्र देव यांनी या देवळाची रचना केली आहे.  चंद्रदेव यांना सोमदेव या नावाने देखील ओळखले जाते.  पुराणांप्रमाणे या मंदिरातील सोनेरी भागाचे निर्माण चंद्रदेव यांनी,

तर चांदीच्या भागाचे निर्माण सूर्यदेव यांनी केले आहे. 

चंदनाच्या भागाचे निर्माण भगवान श्रीकृष्ण यांनी केले तर दगडांची रचना भीमदेव नावाच्या राजाने केली आहे.

या देवळावर मोहम्मद गजनबी याने सोळा वेळा आक्रमण करून खंडित केले आहे.

पण पुन्हा 16 वेळा या देवळाची उभारणी केली गेली आहे.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगआंध्र प्रदेश Mallikaarjun Jyotirling Andhra Pradesh

कृष्णा नदीच्या तटावर स्थित श्रीशैल नावाच्या पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश या राज्यात स्थित आहे.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा रक्षण करण्यासाठी खूप राजांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. पण इतिहास बघितला तर पहिले नाव सतवाहन राज्याचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या ज्योतिर्लिंगाच्या जवळच एक शक्तीपीठ आहे.  भारतात एकूण 51 शक्तीपीठ आहेत.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – उज्जैन, मध्य प्रदेश Mahakaleshwar Jyotirling Madhya Pradesh

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मधील उज्जैन या शहरात स्थित आहे. बारा ज्योतिर्लिंग मधील हे एक मात्र असे ज्योतिर्लिंग आहे. ज्याचे मुख दक्षिण दिशेला आहे.

या तीर्थाला दररोज  पाच ते सहा हजार पेक्षा जास्त भक्त पूजा करण्यासाठी येतात. श्रावण महिन्यात सणासुदीला तर ही संख्या  20000 – 30000 पर्यंत जाते.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.  जे आपल्याआप प्रकट झाले होते.

पूर्वीच्या काळी  महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथील भस्म आरती मेलेल्या व्यक्तीच्या चितेच्या  राखाने केली जात असे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – मंधाता, मध्य प्रदेश Omkareshwar Jyotirling Mandhata Madhya Pradesh

हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथील खंडवा जिल्ह्यात शिवपुरी द्वीपवर स्थित आहे.

या क्षेत्राला मंधाता पर्वत या नावाने पण ओळखले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या जवळूनच नर्मदा नदी वाहते. 

इंदौर शहरापासून जवळपास 75 किलोमीटर लांबीवर हे ज्योतिर्लिंग स्थित आहे.

या ज्योतिर्लिंगाच्या चारी बाजूने पर्वत, व पर्वताच्या चारही बाजूंनी नदी वाहते, या अशा संरचनेमुळे “ॐ” या आकाराचे ज्योतिर्लिंग तयार होत असल्यामुळे याचे नाव ओंकारेश्वर असे पडले आहे.

केदारनाथ ज्योतिर्लिंग – उत्तराखंड Kedarnath Jyotirling Uttrakhand

उत्तराखंडातील हे ज्योतिर्लिंग जवळपास सगळ्यांनाच माहित आहे.  केदारनाथ हे संपूर्ण विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असं ज्योतिर्लिंग आहे.  येथे दर्शनासाठी भाविक संपूर्ण विश्वातून येतात.

फक्त हिंदू धर्मातील भाविकच नाही तर ख्रिश्चन, यहूदि धर्मातील लोक पण येथे दिसतात. 

समुद्र तळावरून 3584 मीटर उंच केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे. 

उत्तराखंड मधील चार धामचे केंद्रस्थान केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे.

 मान्यतेप्रमाणे केदारनाथ ज्योतिर्लिंगा चा शोध पांडवांनी लावला आहे. 

आपल्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पाच पांडव केदारनाथ धामला पोहोचले होते. या देवळाचे निर्माण पांडवांनी केले आहे. 

त्यानंतर या देवळाचे पुननिर्माण आदी शंकराचार्य यांनी केले आहे.

 प्रतिवर्षी लाखो करोडो लोक चारधामच्या यात्रेसाठी निघतात.  या यात्रेदरम्यान भाविक केदारनाथ  या देवळात येऊन भगवान शिव यांच्या या प्रकाश स्तंभाचे दर्शन घेतात. 

केदारनाथ हे धाम प्राकृतिक सुंदरतेसाठी ओळखला जातो.  बर्फानी झाकलेल्या केदारनाथची शोभा अद्भुत आहे, ज्याचा अनुभव घेण्यासाठी विश्वातील लोक भारतात येतात.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग – पुणे, महाराष्ट्र Bhimashankar Jyotirling Pune Maharashtra

महाराष्ट्रातील सह्याद्री  पर्वतरांगा अतिशय प्रचलित आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थित आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची एक कथा रामायणाशी जूडीत आहे. भगवान राम यांनी कुंभकरण याचा वध केला होता. त्याच्या कर्कटी नामक पत्नी पासून भीम नावाचा एक पुत्र होता.

ज्यावेळेस भीम ला कळले,  देवांनी मिळून त्याच्या पिताचे वध केले आहे. त्यावेळेस बदला घेण्यासाठी भीम ने ब्रह्मदेवाची तपस्या केली.

महान बलशाली होण्याचा वरदान प्राप्त केला. त्याने शिवभक्त कामरुपेक्ष नावाच्या राजाला बंदी करून काल कोठारीत टाकले.

भीम ने कामरुपेक्ष ला शिव भक्ती सोडून त्याची पूजा करण्यास सांगितले.  मात्र राजाने असे करण्यास नकार दिला.  रागारागात भीम ने कामरुपेक्ष राजाला ठार मारण्याचे प्रयत्न केला.

त्यावेळेस भगवान शिव यांनी स्वयं प्रकट होऊन भीम चा वध केला.

त्यावेळेस सर्व देवतांनी भगवान शिवला तेथेच ज्योतिर्लिंग स्वरूपात निवास करण्याची प्रार्थना केली.  म्हणून या ज्योतिर्लिंगाचे नाव भीमाशंकर असे पडले.

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – वाराणसी उत्तर प्रदेश Kashi Vishwanath Jyotirling Varanasi Uttar Pradesh

उत्तर प्रदेश मधील वाराणसी शहरात विश्वनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे.  वाराणसी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी आहे.

विश्वनाथ ज्योतिर्लिंग याला काशी विश्वनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते.

ज्यावेळेस पृथ्वीचे निर्माण झाले त्यावेळेस सूर्याची पहिली किरण काशीवर पडली होती.

या देवळाला औरंगजेब याने बऱ्याचदा तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला यश आले नाही.  जवळच त्याने एका मज्जिदचे निर्माण केले. आज ही मज्जिद ज्ञान वापी या नावाने ओळखली जाते.

दरवर्षी मुख्यतः श्रावण महिन्यात असंख्य भाविक काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी येतात. भगवान शिव स्वयम काशीमध्ये निवास करतात अशी मान्यता आहे.  हे देऊळ संपूर्ण विश्वाचे आकर्षण केंद्र आहे.

दशाश्वमेध  घाटाच्या किनारी या मंदिराचा भव्य नजारा पाहून स्वर्गप्राप्तीचा आनंद होतो

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – नाशिक, महाराष्ट्र Triyambakeshwar Jyotirling Nashik Maharashtra

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे.  ब्रह्मगिरी नावाच्या एका पर्वतावर  भगवान शिव त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावाने स्थित आहे. 

हे गोदावरी नदीचे उगम स्थान आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे हे तीन छोटे छोटे लिंग आहेत, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतीक म्हणून जाणले जाते.  हे ज्योतिर्लिंग गौतमी नदीच्या तटावर स्थित आहे.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – देवघर,  झारखंड Baidyanath Jyotirling Devghar Jharkhand

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंड या राज्यातील संथाल परगणा या ठिकाणी स्थित आहे.

शिवपुराण मध्ये असलेल्या वर्णनानुसार भगवान शिव यांच्या या पवित्र भूमीला चिता भूमी या नावाने देखील ओळखले जाते.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे रावणाच्या भक्तीचे प्रतीक आहे.  हे ज्योतिर्लिंग  भाविकांच्या इच्छापूर्ती व रोगमुक्ती साठी प्रसिद्ध आहे.

एकदा रावण भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग घेऊन या मार्गाने जात होता.  त्यावेळी वाटेमध्ये याच ठिकाणी त्याला लघुशंखा आली.  यासाठी त्याने शिवलिंग एका गवळीच्या हातात दिले.  शिवलिंगाचे वजन तो सामान्य गवळी पेलू शकला नाही.  म्हणून त्याने ते शिवलिंग जमिनीवर ठेवले.  याप्रमाणे भगवान शिव तेथे स्थापित झाले.

असे म्हटले जाते की बैजू नावाच्या एका गवळीची गाय रोज चारा चारायला आली की भगवान शिव यांना आपले दूध समर्पित करायची. म्हणून त्या गवळीच्या नावाने या ज्योतिर्लिंगाचे नाव  बैजू नाथ धाम असे पडले.

नागेश्वर ज्योतिर्लिंग – द्वारका, गुजरात Nageshwar Jyotirling Dwarka Gujarat

गुजरात मधील बडोदा शहरातील गोमतीद्वार या ठिकाणी नागेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे.

साधारणता हे ठिकाण द्वारकापुरी पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.  

नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे भगवान शिव यांची  80 फूट उंच एक मूर्ती आहे. 

या मंदिराची निर्मिती दारूका आणि तिचा पती दारूक यांची कथा आहे.

रामेश्वरम ज्योतिर्लिंग- कन्याकुमारी, तमिळनाडू Rameshwaram Jyotirling Kanyakumari Tamil Nadu

तामिळनाडू येथील या ठिकाणी रामेश्वरम ज्योतिर्लिंग स्थित आहे.  याच ठिकाणी रामसेतू सुद्धा आहे.

 रामायण काळातील हे देऊळ अत्यंत पुरातन आहे.  या देवळात 24 पाण्याचे तलाव आहेत.  हे तलाव भगवान श्रीराम यांनी स्वतः आपल्या बाणांनी वानरांची तहान भिजवण्यासाठी बनवले होते.

रामेश्वर मंदिराजवळ भगवान राम आणि विभीषण यांची पहिली  भेट झाली होती.

मान्यतेप्रमाणे,  रावणाला मारल्यामुळे प्रभू श्री राम यांना ब्रह्म हत्याचे पाप लागले होते. दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीराम यांनी रामेश्वरम या ठिकाणी भगवान शिव यांची आराधना केली होती.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग-  औरंगाबाद, महाराष्ट्र Grishneshwar Jyotirling Aurangabad Maharashtra

औरंगाबाद मधील संभाजीनगर च्या जवळ दौलताबाद या ठिकाणी घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे.

हे ज्योतिर्लिंग शेवटचे असल्यामुळे याला शिवालय असे देखील संबोधले जाते. 

 हे ज्योतिर्लिंग घुश्माच्या मृत पुत्राला जीवित करण्यासाठी भगवान शिव यांच्या समर्पणात बनवले आहे. त्यानंतरच या ज्योतिर्लिंगाचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग नाव प्रसिद्ध झाले.

ज्योतिर्लिंग व शिवलिंग यामधील फरक Difference between Jyotirling And Shivling In Marathi

भगवान शिव यांचे बारा ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत. अर्थात ते ज्योती स्वरूपात स्वयं प्रकट झाले आहेत. भगवान शिव यांच्या आरधनेसाठी मानव द्वारा लिंग स्थापित करण्यात येतात. ते शिवलिंग असतात.

पण ज्योतिर्लिंग व्यतिरिक्त बरेचसे शिवलिंग देखील स्वयंभू आहेत. त्यांची स्थापना देवळामध्ये केली जाते किंवा स्वयंभू लिंग जवळील परिसरामध्ये मंदिर ची स्थापना करण्यात येते. 

शिवलिंग मानवनिर्मित व स्वयंभू दोन्ही असतात.

भगवान शिव यांची कृपा स्वयम ज्योती स्वरूपात उत्पन्न होते.  शिवलिंगांची संख्या पृथ्वीवर अनेक आहेत. पण ,

ज्योतिर्लिंग केवळ बाराच आहेत. 

More Blogs of Bhaktiwel Related to Lord Shiv,

5 thoughts on “भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व, कथा, व ते कुठे स्थित आहेत. Places of 12 jyotirling, importance, story in Marath”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri