Shiv Tandav Stotram With Meaning शिव तांडव स्तोत्र व अर्थ

Shiv Tandav Stotram

ॐ नमः शिवाय

नमस्कार मित्र – मैत्रिणींनो,

आज आपण शिव तांडव स्तोत्राबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

शिव तांडव स्तोत्र Shiv Tandav Stotram in Marathi

रावण दशानन या नावाने देखील ओळखला जातो. त्याने आपल्या जीवनात अनेक पापकर्म केले होते . पण त्याने आपल्या दश मुखाने भगवान शिव यांची आजन्म आराधना केली . म्हणूनच कदाचित रावणाला मारण्यासाठी भगवंत नारायण यांना प्रभु श्रीराम यांच्या रुपात धरतीवर जन्म घ्यावा लागला.

शिव तांडव या स्तोत्राची रचना रावणाने आपले आराध्य भगवान शिव यांची स्तुती करण्यासाठी केली होती .

  1. शिव तांडव स्तोत्र मध्ये एकूण १७ अध्याय समावित आहेत . ज्यापैकी १५ अध्यायांची रचना स्वयं शिवभक्त रावण याने केली होती . नंतर त्यामध्ये अजून २ अध्याय जोडण्यात आले.
  2. रावणाच्या हातातील ड्रम च्या तालावर रावणाने १००८ छंदाची रचना केली . हे काव्य शिव तांडव या नावाने प्रचलित झाले .
  3. शिव तांडव हा एक नृत्य प्रकार म्हणूनही प्रचलित आहे . भगवान शिव २ परिस्थितीत नृत्य करतात.
  • ज्यावेळेस शिव क्रोधात असतात त्यावेळेस ते तांडव नृत्य करतात . क्रोधामध्ये नृत्य करताना ज्यावेळेस ते स्वतः चा तिसरा डोळा उघडतात, त्यावेळी समोरील व्यक्ती भस्म होते .
  • जेव्हा भगवान शिव आनंदित असतात व नृत्य करतात त्यावेळी हे नृत्य डमरू वाजवत करतात .त्यावेळेस भूतलावर आनंदाची वर्षा होऊ लागते .भगवान शिव आपल्या परम आनंदात असतात .भगवंतांचे हे स्वरूप नटराज या नावाने सुद्धा ओळखले जाते
  1. शंकर देव यांच्याबरोबर माता पार्वती काली रूपात तांडव करते ,हे नृत्य काली तांडव या नावाने ओळखले जाते .
  2. पौराणिक मान्यता अनुसार,भगवान शिव यांनी पृथ्वीचा विनाश करण्यासाठी केलेले नृत्य शिव तांडव या नावाने ओळखले जाते.
  3. शास्त्राप्रमाणे शंकर देवालाच तांडव नृत्याचे प्रवर्तक मानले जाते. परंतु काही काव्यग्रंथानुसार गणेश,श्रीराम,माता दुर्गा,भैरव यांच्याही तांडवांचा उल्लेख आढळतो .

‘शिव तांडव स्तोत्राची’ रचना रावण याने केली होती.

गणेश तांडव Ganesh Tandav in Marathi

गजमुखाच्या पराभवानंतर भगवान गणेश यांनी केलेले नृत्य गणेश तांडव नावाने प्रचलित झाले .

श्रीराम तांडव Shri Ram Tandav in Marathi

रावणाचा अंत केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी जे नृत्य केले होते ते तांडव या नावाने प्रचलित झाले .

दुर्गा तांडव Durga Tandav in Marathi

महिषासुर सावध केल्यानंतर माता पार्वती हिने दुर्गा स्वरूपात केलेले नृत्य म्हणजे दुर्गा तांडव

भैरव तांडव Bhairav Tandav in Marathi

ब्रह्माजींच्या पाचव्या मुखाचे छेदन केल्यानंतर शंकराने भैरव स्वरूपात केलेले तांडव म्हणजे भैरव तांडव

शिव तांडव स्तोत्र Shiv Tandav Stotram

जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव

लम्ब्यलम्बिता भुजंगतंग मालिकाम्

डमड्डमड्डमड्डमन्निनाद वङ्डमर्वयं

चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥१॥

जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी

विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके

किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥२॥

धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर

स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे ।

कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि

क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि ॥३॥

जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा

कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्व धूमुखे ।

मदांधसिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे

मनोविनोद्दभुतं बिंभर्तुभूत भर्तरि ॥४॥

सहस्त्रलोचन प्रभृत्यशेषलेखशेखर

प्रसूनधूलिधोरणी विधूसरां घ्रिपीठभूः ।

भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः

श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः ॥५॥

ललाटचत्वरज्वल ध्दनंजयस्फुलिंगभा

निपीतपंच सायकंनम न्निलिंपनायकम् ।

सुधामयूखलेखया विराजमानशेखरं

महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः ॥६॥

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल

द्धनंजया धरीकृतप्रचंड पंचसायके ।

धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्र

कप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचनेरतिर्मम ॥७॥

नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर

तकुहुनिशीथनीतमः प्रबद्धबद्धकन्धर: ।

निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः

कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥८॥

प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा

विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम् ।

स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं

गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥९॥

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी

रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्

स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं

गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥१०॥

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध

गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट् ।

धिमिध्दिमिद्धि मिध्वनन्मृदंग

तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तितः प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥११॥

द्दषद्विचित्रतल्पयो भुजंगमौक्तिकमस्त्र

जोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयो: ।

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयो: समं

प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥१२॥

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्

विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन् ।

विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः

शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् ॥१३॥

निलिम्प नाथनागरी कदम्ब

मौलमल्लिकानिगुम्फनिभक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं

परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥१४॥

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी

महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।

विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः

शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम् ॥१५॥

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम

स्तवं पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम् ।

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं

विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥१६॥

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं यः

शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्षमी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१७॥

शिव तांडव स्तोत्र Shiv Tandav Stotram With Meaning In Marathi

जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव

लम्ब्यलम्बिता भुजंगतंग मालिकाम्

डमड्डमड्डमड्डमन्निनाद वङ्डमर्वयं

चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥१॥

अर्थ ॥१॥ Shiv Tandav Stotram Shlok 1 Meaning

जटांमधून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ज्यांचा कंठपवित्र आहे, फुलाच्या हाराप्रमाणे ज्यांचा गळा नाग सर्पाने सुशोभित आहे .

डमरू मधून डमट् डमट् डमट् चा ध्वनी निघत आहे,. असे भगवान शंकर शुभ असे तांडव नृत्य करत आहेत .

ते आपल्या सगळ्यांना सुख संपन्नता देवो .

जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी

विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके

किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥२॥

अर्थ ॥२॥ Shiv Tandav Stotram Shlok 2 Meaning

मला भगवान शिव शंकर यांच्यामध्ये अधिक रूची आहे. त्यांच्या जटांमधून अलौकिक अशी गंगा नदी प्रवाहित होत आहे . यामुळे त्यांच्या जटांमधील विशालता आपल्या लक्षात येते .

त्यांच्या मस्तकावर चमकदार अग्नी प्रज्वलित आहे . आणि जे अर्ध चंद्राचे आभूषण म्हणून मस्तकावर धारण करतात.

धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर

स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे ।

कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि

क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि ॥३॥

अर्थ ॥३॥ Shiv Tandav Stotram Shlok 3 Meaning

माझ्या मनाला शंकराच्या आराधनेने आनंद मिळतो . संपूर्ण ब्रह्मांड मधील प्राणी त्यांच्या मनात समाहित आहे.

ज्यांची अर्धांगिनी पर्वतराजाची पुत्री पार्वती आहे . करुणामय दृष्टीने असाधारण अशा प्रत्येक विपदांचे नियंत्रण करण्याचे कार्य करू शकतात .

सर्व ठिकाणी ज्यांची व्याप्तता आहे .आणि जे दिव्य लोकांना आपला पोशाख म्हणून धारण करतात .

जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा

कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्व धूमुखे ।

मदांधसिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे

मनोविनोद्दभुतं बिंभर्तुभूत भर्तरि ॥४॥

अर्थ ॥४॥ Shiv Tandav Stotram Shlok 4 Meaning

देवाधिदेव शिवशंकर यांच्या आराधनेने मला अद्भुत सुख लाभो . सर्व जीवांच्या हिताचे रक्षण करणारा आहे .

ज्यांच्या अंगावर लाल भुऱ्या रंगाचा सर्प फण काढून रेंगत आहे . ज्याच्या माथ्यावर मणी चमकत आहे

.चारही दिशांच्या देवींच्या सुंदर चेहऱ्यावर विविध रंग पसरवत आहे .जो विशाल मदमस्त हत्तीच्या कातडी पासून बनवलेल्या शालिनी झाकला गेला आहे .

सहस्त्रलोचन प्रभृत्यशेषलेखशेखर

प्रसूनधूलिधोरणी विधूसरां घ्रिपीठभूः ।

भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः

श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः ॥५॥

अर्थ ॥५॥ Shiv Tandav Stotram Shlok 5 Meaning

भगवान शिव आपल्याला सुख समृद्धी देवो ,ज्याने अर्ध चंद्राचे मुकुट म्हणून धारण केले आहे .

लाल नागाच्या माळेने ज्याचे केस बांधले गेले आहेत.

इंद्र विष्णू आणि इतर देवतांच्या शिरावरून जी फुले पडलेली आहेत ज्यामुळे शंकराची पावले धुळीने गडद रंगाची झाली आहेत .

ललाटचत्वरज्वल ध्दनंजयस्फुलिंगभा

निपीतपंच सायकंनम न्निलिंपनायकम् ।

सुधामयूखलेखया विराजमानशेखरं

महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः ॥६॥

अर्थ ॥६॥ Shiv Tandav Stotram Shlok 6 Meaning

शंकरांच्या गुंतलेल्या जटांमधून आपल्याला सिद्धीची समृद्धी प्राप्त व्हावी .

मस्तकावर जळणाऱ्या अग्नीच्या ठिणगीने ज्यांनी काम देवाला भस्म केले आहे .

जे सर्व देव लोकांचे स्वामी आहे, जे अर्धचंद्र धारण करून सुशोभित आहे .

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल

द्धनंजया धरीकृतप्रचंड पंचसायके ।

धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्र

कप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचनेरतिर्मम ॥७॥

अर्थ ॥७॥ Shiv Tandav Stotram Shlok 7 Meaning

माझी आवड शंकरा प्रति आहे,ज्याला त्रीनेत्र आहेत, ज्यांनी शक्तिशाली कामदेव यांना अग्नी ला समर्पित केले,

त्यांचे भीषण मस्तक धगद धगद या ध्वनीने प्रज्वलित आहे .

पर्वतराजाची कन्या पार्वती हिच्या स्तनाच्या टोकावर सजावट करणारा एकमेव निपूण कलाकार आहे .

नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर

तकुहुनिशीथनीतमः प्रबद्धबद्धकन्धर: ।

निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः

कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥८॥

अर्थ ॥८॥ Shiv Tandav Stotram Shlok 8 Meaning

भगवान शिव शंकर यांनी आपल्याला समृद्धि प्रदान करावी. जो समस्त संसाराचा भार उचलतो, जो चंद्रामुळे मनमोहक दिसतो, ज्याच्याकडे अलोकिक गंगा नदी आहे, अमावस्येच्या रात्री ढगांनी व्यापलेल्या गडद रंगा प्रमाणे ज्याचा कंठ आहे

प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा

विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम् ।

स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं

गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥९॥

अर्थ ॥९॥ Shiv Tandav Stotram Shlok 9 Meaning

मी भगवान शिवशंकर ची प्रार्थना करतो,

ज्यांचा कंठ मंदिराचा चकाकी प्रमाणे आहे, पूर्ण उमललेल्या निळकमळाच्या फुलांच्या तेजाप्रमाणे लटकत असलेला . जे विश्वाच्या गडद रंगाप्रमाणे असलेला, ज्यांनी काम देवाला ठार केले आहे,त्रिपुरासुराचा अंत केला आहे .

त्यांनी संसारिक जीवनाच्या बंधनांना नष्ट केले, ज्यांनी बलिचा अंत केला, ज्यांनी अंधक नावाच्या दैत्यासुर चा विनाश केला आहे .ज्याने हत्तींचा नाश केला आहे, ज्याने मृत्यूचा देवता यमराज याला पराजित केले आहे .

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी

रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्

स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं

गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥१०॥

अर्थ ॥१०॥ Shiv Tandav Stotram Shlok 10 Meaning

मी भगवान शिव यांची प्रार्थना करतो . शुभ कंदबच्या फुलांच्या गुच्छ मधून येणाऱ्या मधुर मधाच्या सुवासामुळे मधमाशा ज्यांच्या चारही दिशांना उडत असतात .

ज्याने मन्मथाचा वध केला .जाने त्रिपुर नष्ट केले, ज्याने अंधक राक्षसाचा वध केला.

ज्याने हत्तींचा नाश केला. ज्याने मृत्यूचा देवता यमाला पराजित केले .

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध

गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट् ।

धिमिध्दिमिद्धि मिध्वनन्मृदंग

तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तितः प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥११॥

अर्थ ॥११॥ Shiv Tandav Stotram Shlok 11 Meaning

शिव, ज्यांचे हे तांडव नृत्य , ढोल ताशाच्या ढिमिड ढिमिड या ध्वनीच्या तालावर सुसंगत आहे,

ज्यांच्या मस्तकावर अग्नी आहे जो नागाच्या श्वासोच्छवासा मुळे आहे, संपूर्ण आकाशात गोल गोल घुमत आहे .

द्दषद्विचित्रतल्पयो भुजंगमौक्तिकमस्त्र

जोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयो: ।

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयो: समं

प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥१२॥

॥१२॥ अर्थ Shiv Tandav Stotram Shlok 12 Meaning

मी भगवान सदाशिव यांची पूजा करण्यास कधी सक्षम होईल?

गळ्यातील सर्प माला किंवा मोत्यांची माळा, श्रेष्ठ रत्न किंवा मातीचे ढीग,मित्र किंवा शत्रू ,गवत किंवा कमळासारखे नेत्र ,राजा किंवा प्रजा या सर्वांना एक समान समजणाऱ्या भगवान शिव शंकर यांचे पूजन करण्यास मी केव्हा समर्थ होईल? ||12||

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्

विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन् ।

विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः

शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् ॥१३॥

अर्थ ॥१३॥ Shlok 13 Meaning

पवित्र अशा गंगा नदी जवळील गुफेत राहुन,

दोन्ही हातांनी नमस्कार करून,

मनातील सर्व दूषित विचारांना धुवून ,चंचल नेत्रापासून मुक्तता मिळवून, भगवान शिवशंकर यांच्या कपाळाच्या तेजाला केव्हा बांधून जाईल, 

शिव शिव चा जप करत मी केव्हा सुखी होईल? ||13||

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम

स्तवं पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम् ।

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं

विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥१६॥

॥१६॥ अर्थ Shlok 16 Meaning

याप्रमाणे सांगितल्या जाणाऱ्या अतिउत्तम स्तवनाचे जो स्मरण करतो, वाचन करतो ,उच्चारण करतो तो कायमचा पवित्र होतो. अन्य कोणताही मार्गाने न जाता तो श्रेष्ठ शिवशंकराचा भक्त होतो.  शिवनामाने, स्मरणाने जीवाला मुक्तता प्राप्त होते. ||14|| 

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं यः

शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्षमी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१७॥

अर्थ ॥१७ ॥ Shiv Tandav Stotram Shlok 17 Meaning

जो हे रावण रचित काव्य/ तांडव स्तोत्र चे वाचन संध्याकाळी पूजेत करतो .महादेव त्याला रथ, हत्ती, घोडे ,या व्यतिरिक्त स्थायी लक्ष्मी यांचे दान करतात. ||17||

ॐ नमः शिवाय

||इति श्री तांडव स्तोत्रं संपूर्णम ||

8 thoughts on “Shiv Tandav Stotram With Meaning शिव तांडव स्तोत्र व अर्थ”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri