वामन अवतार Avatar of Vamana 5

वामन अवतार  Vamana Avatar 5

श्री वामन हा विष्णूचा अवतार आहे आणि पराशर मुनींच्या मते बृहस्पति श्री वामनाशी संबंधित आहे. ऋग्वेद तीन अवस्थांमध्ये धर्माची स्थापना आणि रक्षण करणारा म्हणून त्याची पूजा करतो. वामन रूपात ते श्री त्रिविक्रम म्हणून ओळखले जातात: (वामन अवतार  Vamana Avatar 5)

त्रैणि पाद विमे चक्र विष्णुर्गोपा आदभ्यः ।बहुत धार्मिक धरायन.
त्रिणि पदा बनाम चक्रमे विष्णुगोप अदाभ्य अथो धर्माणी धरायण ||

भगवद् पुराणातील एक लोकप्रिय मंत्र 12 अक्षरांचा आहे:

ॐ नमो भगवते दधिवामनाय ।
ॐ नमो भगवते दधिवामनाय ।

वामन अवतार जन्म कथा Vamana Avatar Birth Story In Marathi

भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन जयंती साजरी केली जाते. भागवत पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूने ब्राह्मण बालकाच्या रुपात अवतार घेतला होता. वामन हा भगवान विष्णूच्या दशावताराचा पाचवा अवतार होता आणि त्रेतायुगात जन्मलेला पहिला अवतार होय.  भगवान वामन प्रल्हादांचा नातू राजा बळीचा अभिमान भंग करण्यासाठी तीन पावलांनी तिन्ही जग पार केला होता. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशीला अभिजित मुहूर्तावर श्रावण नक्षत्रात माता अदिती आणि ऋषी कश्यप यांचा पुत्र म्हणून वामन देव यांचा जन्म झाला.

माता आदिती यांनी पुत्र इंद्र याची दयनीय परिस्थिती बघून भगवान विष्णू यांना वारंवार विनंती केली होती. तसेच त्यांना आपला पुत्र म्हणून जन्म घेण्यासाठी अखंड तपश्चर्य केली होती. त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी त्यांना “मी पुत्र म्हणून जन्म घेईन असे वरदान दिले होते व तसेच इंद्राला त्याचे स्वर्ग पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.” वामन अवतार Vamana Avatar 5

 Vamana Avatar

वामन अवतार पौराणिक कथा Traditional Story Of Vamana Avatar In Marathi

राजा बळी याने संपूर्ण पृथ्वी तसेच स्वर्गलोकावर स्वतःचे अधिपत्य बलपूर्वक स्थापित केले होते.

एका पौराणिक कथा नुसार गुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली असुरांचा राजा महावीर बळी यांनी तिन्ही लोकात आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं.  तो खूप दानवीर व बलशाली होते. अशा परिस्थितीत  त्याला हरवणं किंवा थांबवणं इतकं सोपं नव्हतं. अभिमानाने पूर्ण झालेल्या राजा बळी याने इंद्राचे राज्य स्वर्गावर अधिपत्य स्थापित केले व ते अधिपथ्य स्थायी करण्यासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले होते. यज्ञा नंतर बळीराजा हे नेहमी दान पुण्य करत असत. ते वचनाचे एकदम पक्के होते.

एकदा बळीराजा यांच्या राजमहालात खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता . त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णू यांनी एका लहान मुलाचं रूप धारण केलं. या प्रभूंच्या अवतारलाच वामन अवतार असे म्हणतात. यज्ञ संपताच वामन भगवान यांनी बळीराजाला तीन पाय भूमी दान म्हणून मागितली. बळीराजाने लगेचच त्यांना वचन दिले. भगवंत स्वतःच्या मोठ्या स्वरूपात आले. एका पायाने पृथ्वी लोक र दुसर्‍या पायाने स्वर्गलोक व्यापले. आता तिसऱ्या पायाने  कुठे ठेवू हा प्रश्न त्यांनी बळीराजाला विचारला. बळीराजा देखील आपल्या वचनाचा पक्का होता. तो प्रभुं समोर वाकून म्हणाला तुम्ही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. प्रभूंनी आपला तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवताच राजा पाताळलोकात गेला.

भगवंतांनी पृथ्वीलोक व स्वर्गलोक बळीराजा कडून पुन्हा घेतले. पण त्याची दानशूरता बघून ते प्रसन्न झाले. व त्याला वरदान मागण्याची विनंती केली. भगवंतांच्या आशीर्वादाने तो पाताळ लोकांचा स्वामी झाला . त्याने वरदानात भगवंतांना त्याच्याबरोबर पाताळ लोक येथे राहण्याची विनंती केली. भगवंतांनी त्याला तसे वरदान देऊन त्याच्याबरोबर पाताळ लोक येथे निवास करण्यासाठी गेले.

मात्र देवी लक्ष्मी व सर्व देव यांना चिंता वाटू लागली. म्हणून देवी लक्ष्मी यांनी एका गरीब  मुलीचं रूप घेऊन बळीराजाला राखी बांधली. व त्याला  भगवंतांना सोडण्यासाठी विनंती केली. बळीराजाने भगवंतांना वचनातून मुक्त केले. पण भगवंत राजाला असे निराश बघून अस्वस्थ झाले. व त्यांनी  दरवर्षी चार महिने त्याच्या बरोबर येऊन पाताळ  लोक मध्ये राहतील असे वचन दिले. म्हणून असे म्हटले जाते चातुर्मासातील चार महिने भगवान श्रीहरी आपली जबाबदारी भगवान शिव यांना सोपवून पाताळ लोक  जातात.

अजून एका प्रचलित कथेनुसार श्रीहरी विष्णू व राक्षस मुरा यांच्यात घमासान युद्ध झाले होते. त्यामुळे थकून श्रीहरी विष्णू हे योगनिद्रा  मध्ये जातात. ही योगनिद्रा ची वेळ म्हणजेच चातुर्मास.  वामन अवतार Vamana Avatar 5

भगवान वामनाची पूजा केल्याने काय फायदे होतात? वामन अवतार Vamana Avatar 5

  • वामन होमम तुम्हाला पापी कृत्ये, विपरित दुःख यापासून मुक्त करतो. तसेच विजय प्राप्तीसाठी सहकार्य होतो.
  • ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात.
  • जीवनातील उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी, विशेषतः करिअरमध्ये, शिकण्याची, कौशल्ये वाढवण्याचा मार्ग मोकळा होतो.

धन्यवाद

वामन अवतार Vamana Avatar 5

Margashirsha Month

Matsya Avatar of Shri Vishnu –

5 quotes of Lord Krishna

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri