ॐ नमः शिवाय
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
आजचा आपला विषय आहे श्रावण. चला मग जाणून घेऊ यात काही गोष्टी श्रावणा बद्दल.श्रावण महिना व्रतवैकल्य उपवास,तप, जप व दान याकरिता मानला जातो. श्रावण महिन्यात शिव पूजन करण्याची प्रथा आहे. देवाधिदेव महादेव यांना प्रसन्न करायचे असेल तर श्रावण हा महिना योग्य आहे. भगवान शिव शंभू यांना श्रावण हा महिना अतिशय प्रिय आहे. असे का हा प्रश्न पडलाच असेल ना? चला तर मग वाचू यात भगवान शिव शंभू यांच्या काही महिमा.
श्रावणाच्या आधी येणाऱ्या शरद ऋतू मुळे हवामानात रिक्त पण आलेला असतो. आपल्याला हे निसर्गात सुद्धा दिसून येते. सुकलेल्या वेली, बिन पानांच्या फांद्या, वाळलेलं रान, बिन फुलाची व फळांची झाडं जणूकाही चारही दिशां, निसर्ग कशाची तरी वाट बघत असतात. आणि निसर्गच का आपण माणसं ही पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. पाऊस सुरु झाला म्हणजे समजायचं श्रावण आलाच.चारही दिशांना आनंद पसरतो. निसर्ग पुन्हा हसायला फुलायला लागतो. सगळी ठिकाण मनमोहक व आनंदमय दिसू लागतात. पुन्हा फिरण्याचा निसर्गाचा आनंद घेण्याचा हुरूप येतो. आशा या आनंदमयी हवामानात आणखी एक भर पडते ती म्हणजे श्रावणाची. श्रावणात येणाऱ्या सणांची. मनाने केलेल्या पूजेच्या तयारीची. नवीन संकल्पांची.
श्रावण महिन्याचे महत्व. Importance/Significance of Shravan /Sawan in Marathi
श्रावण महिना आला की उपवास आलेच. जणू काही हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. हवामानात व शरीरात होणाऱ्या बदलांचं आपसात ताळमेळ बसावं म्हणूनच उपवास करतात. अचानक बदललेल्या हवामानामुळे शरीरात वाढणाऱ्या वातूळ प्रवृत्तीला थांबवण्यासाठी सर्वांनीच व्रत केले पाहिजे. उपवास केल्याने शरीरात वाढणाऱ्या विकारांना आळा बसतो. मनुष्य स्वस्थ जीवन जगू शकतो. आजच्या युगात आपण बघतच आहोत विविध प्रकारचे सकस आहार घेऊन व्यक्ती स्वतःला स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करते. पण पूर्वीच्या युगात स्वतःला स्वस्थ ठेवण्याचा प्रकार म्हणजे उपवास. हिंदी भाषेमध्ये या महिन्याला ‘सावन’ असे म्हटले जाते.
श्रावणी सोमवार चा उपवास मुली, बायका चांगला नवरा मिळण्यासाठी करतात.अशी मान्यता आहे मनोभावे सोमवारचा उपवास केल्याने भगवान शिवशंकर सारखा भोळा नवरा मिळतो.नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ,मुग, जवस, सातू यांची शिवमूठ म्हणून शिवपिंडी ला वाहतात. |
श्रावणी मंगळवार लग्न झालेल्या मुली माता पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी करतात याच व्रताला मंगळागौरी व्रत सुद्धा म्हटले जाते. या व्रताचे उद्यापन खूप मोठ्याने साजरे केले जाते. मैत्रिणींना नातेवाईक यांना बोलवून पारंपारिक रित्या तयार होतात. सुरेख अशी सजावट केली जाते. तसेच विविध प्रकारच्या फुगड्या, आगोटा पागोटा,झिम्मा , टिपऱ्या, गोफ, सासु सुन भांडण अशी अनेक मजेशीर खेळ खेळले जातात. |
श्रावणी शुक्रवार संतोषीमाता ला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. या दिवशी आंबट पदार्थ खात नाहीत. तसेच फुटाणे (चणे) यांना प्राधान्य दिले जाते. काही ठिकाणी प्रसाद म्हणूनही फुटाणे याचा वापर केला जातो. |
श्रावण कसा पाळावा
- काही ठिकाणी श्रावण पूर्ण महिना उपवास करून केला जातो.
- काहीजण फक्त एका वेळी जेवतात.
- काहीजण पूर्ण महिना फळ खाऊन राहतात.
- काहीजण कांदा-लसूण खात नाहीत.
- काही ठिकाणी वांगी खात नाहीत.
- काहीजण फक्त उपवासाची वस्तू खातात.
- काहीजण शेंदे मीठ वापरतात.
- पालेभाज्या खात नाहीत.
- अंडी ,मांसाहार, दारू तसेच इतर व्यसन यांचा त्याग केला जातो.
श्रावण हे नाव कसे पडले? How did the name Shravan come about in Marathi
श्रावण महिना प्रभू शिवशंभु यांना समर्पित असतो. मराठी कालनिर्णय प्रमाणे हा 4th महिना असतो. तसेच इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जुलै-ऑगस्ट या दरम्यान श्रावण महिना येतो. यावेळी सूर्य श्रवण नक्षत्रात प्रवेश करतो. म्हणूनच नक्षत्राच्या नावानुसार या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे.
श्रावणी सोमवार 2022. Shravan Somwar 2022
श्रावण पश्चिम भारत व दक्षिण भारतात. Shravan in west and south parts of India in Marathi
पश्चिम भारतात व दक्षिण भारतात कोणत्याही महिन्याची सुरुवात ही पोर्णिमेपासून केली जाते.त्यानुसार खाली दिलेल्या तारखा आहेत.
- शुक्रवार, दिनांक 29 जुलै 2022 पासून श्रावणाला सुरुवात होत आहे.
- पहिला श्रावणी सोमवार दिनांक 1 ऑगस्ट, 2022 ला येत आहे
- दुसरा श्रावणी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट, 2022 ला येत आहे.
- तिसरा श्रावणी सोमवार दिनांक 15 ऑगस्ट ,2022 येत आहे.
- चौथा श्रावणी सोमवार दिनांक 22 ऑगस्ट, 2022 ला येत आहे.
या वर्षी श्रावण शनिवार दिनांक 27 ऑगस्ट, 2022 ला संपत आहे.
श्रावण उत्तर भारतात. Shravan in North parts of India in Marathi
भारतामधील पश्चिमेकडील महिन्यापेक्षा पंधरा दिवस अगोदर म्हणजेच अमावस्या पासून उत्तरेकडील महिन्याला सुरुवात होते. म्हणून उत्तरेकडील तारखा वेगळ्या असतात.
- उत्तर भारतात श्रावण गुरुवार दिनांक 14 जुलै, 2022 ला सुरू झाला आहे.
- पहिला श्रावणी सोमवार दिनांक 18 जुलै, 2022
- दुसरा श्रावणी सोमवार दिनांक 25 जुलै, 2022
- तिसरा श्रावणी सोमवार दिनांक 1 ऑगस्ट, 2022
- चौथा श्रावणी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट, 2022
- उत्तर भारतात श्रावण शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला संपत आहे.
यावर्षी श्रावणात 4 सोमवार येत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड ,बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थान या उत्तर भारतातील जिल्ह्यांमध्ये महिना पौर्णिमेपासून सुरू होतो.
श्रावण महिन्यात नागपंचमी, पोळा, नारळी पौर्णिमा ,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी व दहीहंडी ही सण मोठ्याने साजरी केली जातात.
पौराणिक कथा. Traditional Story of Shravan in Marathi.
एका पौराणिक कथे प्रमाणे इंद्रदेव यांना आपल्या संपत्तीचा, स्वर्गाचा, स्वर्गातील वस्तूंचा गर्व झाला होता. अहंकार मध्ये येऊन इंद्रदेव यांनी ऋषि दुर्वासा यांचा अपमान केला. ऋषी दुर्वास आहे स्वभावाने रागीष्ट. त्यांना इंद्र देवाचा राग आला त्यांनी समस्त देवांना लक्ष्मी रहित राहण्याचं श्राप दिलं. श्राप दिल्या दिल्या स्वर्गातून सर्व संपत्ती नाहीशी झाली. संपत्ती नाही म्हणजेच मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण न होणे. अन्न न मिळाल्याने सर्व देवांची दशा झाली होती. सर्व देव अगदी अशक्त झाले होते. माता लक्ष्मी सुद्धा समुद्रामध्ये विहिन झाल्या होत्या.माता लक्ष्मी नसल्यामुळे भगवान श्री विष्णू हरी यांची अवस्था सुद्धा चांगली नव्हती. चारी दिशांना हाहाकार झाला होता. सर्व देवांनी भगवान श्रीहरी विष्णू यांना यावर उपाय काढायला सांगितला. भगवंतांनी विचार करून समुद्रमंथनाचा प्रस्ताव मांडला.
समुद्रमंथनाची प्रसिद्ध कथा
साईच रवीने मंथन केल्यावरच श्रीकृष्ण यांना प्रिय असलेलं लोणी बाहेर निघतो. त्याप्रमाणेच समुद्राचे मंथन करून त्यातून देवी लक्ष्मी यांना व अमृत बाहेर काढण्याचं निर्णय झाला. मंदारा पर्वत यांना रवीच काम करण्याचं कार्य सोपवलं गेलं. भगवान श्रीहरी विष्णू यांनी कासवाच्या कुर्मा अवतार घेतला. त्यांच्या पाठीवरच मंदारा पर्वताच्या सहाय्याने मंथन करण्याचं ठरलं. पर्वताला हलवण्यासाठी भगवान शिवशंकर यांनी आपल्या गळ्यातील वासुकी नागाला दोर म्हणून दिलं. नागाच्या तोंडाकडील भागावर सर्व असुर व शेपटीकडील भागावर सर्व देवता मंथन करण्यासाठी उभे राहिले. जसजसे देव व असुर दोर ओढत होते तसं समुद्रातून चंद्र, पारिजात, ऐरावत, कामधेनु, कल्पवृक्ष, मदिरा, अप्सरा ,रत्न इत्यादी वस्तू एकेक करून येत गेल्या. व त्या देव तसेच असुर यांमध्ये वाटल्या गेल्या. आता माता लक्ष्मी व अमृताची आतुरतेने वाट बघत होते. मात्र समुद्रातून विष बाहेर पडलं. विष देव व असुर पैकी कोणालाच नको होते. ते सृष्टीत पसरू लागले. व सृष्टीचा विनाश होऊ लागला.
भगवान शिवशंकर यांनी हे विष पिऊन आपल्या गळ्यात साठवून ठेवले. माता पार्वती यांनी ते विष शरीरात पसरू नये म्हणून शंकराच्या गळ्याला हात लावून तिथेच थांबून दिले. भगवंतांचा गळा निळा पडला. म्हणूनच देवाधिदेव शंकर यांना निळकंठेश्वर हे नाव पडले. समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले होते. सृष्टीला वाचवण्यासाठी महादेवाने विष पिले. त्यामुळे भगवंतांच्या शरीराची आग होत होती. म्हणून या महिन्यात शिव व रुद्र अभिषेक यांना विशेष मान्यता आहे.
अभिषेक Pooja, Rituals and Abhishek in Marathi
अभिषेक मध्ये आपण देवाला पाणी, दूध, पंचामृत वाहतो. ज्यामुळे देवाची शरीराची आग कमी होते. पृथ्वी लोकांवरील मनुष्य भगवंतांनी केलेल्या कार्याचे आभार मानतात. 108 बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. काहीजण पूर्ण महिना शिव अभिषेक करून 108 बेल पत्र, धतुरा देवाला वाहतात.
एका कथेनुसार भगवान शिवशंकर हे भक्तांना लवकर पावणारे . मनाप्रमाणे फळ देणारे देव आहे. श्रावण हा महिना भगवंतांना अतिशय प्रिय असा महिना आहे. या महिन्यात त्यांना प्रसन्न करणे सोपे आहे. म्हणून जर कोणालाही मनोवांचीत फळाची अपेक्षा असेल तर त्यांनी श्रावण महिन्यात भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी अभिषेक पूजा करावी.
देवाधिदेव महादेव यांना श्रावण का प्रिय आहे? Why does Mahadev like Shravan month in Marathi
राजा दक्ष यांची पुत्री सती ही भगवान शिव यांची पत्नी. सती व शिव यांच्या लग्नाला राजा दक्ष यांची संमती नव्हती. दक्ष हे भगवंत शिव यांना मानत नव्हते. ते सातत्याने भगवान शिव यांचा अपमान करण्याचं एकही वेळ सोडत नव्हते. देवी सती यांच्या खूप प्रयत्नानंतर ही राजा दक्ष यांनी भगवान शिव यांना जावई नाही मानले. म्हणून आपल्या राज्यात होणाऱ्या एका मोठ्या समारंभाला त्यांनी सती व भगवान शिव यांना आमंत्रित नाही केले. मात्र पिताच्या प्रेमापोटी देवी सती समारंभासाठी उपस्थित झाल्या. राजा दक्ष यांच्याकडून आपल्या पतीविरुद्ध झालेला अपमान माता सती सहन करू शकल्या नाही. त्यांनी अग्नी मध्ये प्रवेश करून स्वतःचं जीवन संपवलं.
मात्र याचा परिणाम भगवान शिव यांच्यावर झाला. त्यांना वैराग्य आलं. ते योग साधने मध्ये गेले. माता सती यांनी पर्वत राजा हिमालय व राणी मैना यांची कन्या म्हणून पुन्हा जन्म घेतला. या मुलीचं नाव पार्वती. माता पार्वती यांनी शंकर देवाला योगसाधने मधून बाहेर काढण्यासाठी शिव पिंडी ची स्थापना केली. अखंड तप केलं. पूजा, अभिषेक केलं. भगवान शिव शंकर शंभू यांना प्रसन्न केलं. हाच तो श्रावणाचा पवित्र महिना. म्हणून देवाधिदेव महादेव यांना श्रावण हा महिना अतिशय प्रिय आहे\
श्रावण महिन्यात नागपंचमी, पोळा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,गोकुळाष्टमी व दहीहंडी ही सण मोठ्याने साजरी केली जातात..
अभिषेक करताना म्हटले जाणारे मंत्र. Shravan Mantra in Marathi
||ॐ नमः शिवाय||
||ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्||
- श्रावणाची सुरुवात म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात असते
- भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रा मध्ये जातात.
- सृष्टी सांभाळण्याच्या आपल्या कार्याची जबाबदारी ते शिवशंकर यांच्यावर सोपवून जातात.
- महादेव यांचं रौद्ररूप अवतार सृष्टीचं चलन करत असतं.
- म्हणून देखील भगवान शिवशंकर शंभू यांचं श्रावण महिन्यात पूजन केलं जातं.
Wow amazing your blogs r interesting and the language is engaging
तुम्ही हा लेख वाचून तुमचा अमूल्य वेळ दिला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Very informative and depicted in a simple language to understand by anyone..I read your all of the blogs untill now..I also share this information to my near onces from this blog.
Keep this good work doing.
Thanks,
Archana
तुम्ही हा लेख वाचून तुमचा अमूल्य वेळ दिला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Very Informative blog… Everyone needs to know the basic of our Indian tradition and Culture…. It’s time that our sanskriti should be retained and must be spread world wide…
तुम्ही हा लेख वाचून तुमचा अमूल्य वेळ दिला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Om namah shiva? It’s very informative. We should try to give knowledge to our next generation about our culture n this blog is very helpful n useful for youth
तुम्ही हा लेख वाचून तुमचा अमूल्य वेळ दिला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Very informative ??
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल तुमचा धन्यवाद.