अधिक मास / अधिक महिना Adhik Maas In Marathi

Adhik Maas

अधिक मास / अधिक महिना Adhik Maas / Adhik Mahina In Marathi

अधिक म्हणजेच एकंदरीत जास्तीचा महिना. एकंदरीतच आपण पाहत आलोय की एकूण 365/ 366 दिवस एका वर्षात येतात.  म्हणजेच प्रत्येक महिन्यात तीस दिवस येतात.  मग हा अधिक महिना येतो कुठून?

दर तीन वर्षांनी अधिक महिना का येतो? Why Is Adhik Maas In 3 Years In Marathi

भारतातील मराठी कॅलेंडर शुक्लपक्ष व कृष्णपक्ष या गणनेनुसार चालतो. अधिक मास चंद्र वर्षातील एक अतिरिक्त भाग आहे,  जे दर 32  महिने, 16 दिवस व 8 घडी अंतराने येतो.

अधिक मास सूर्य वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यामधील अंतराचे संतुलन करण्यासाठी असतो. 

भारतीय गणना पद्धतीनुसार प्रत्येक सूर्य वर्ष 365 दिवस आणि जवळपास 6 तासाचा असतो. तर चंद्र वर्ष 354  दिवसांचा असतो. 

या दोन वर्षांच्या मध्ये जवळपास 11 दिवसांचा अंतर होतो.  जो दर तीन वर्षांनी (11*3=33) जवळपास एक महिना भरतो. याच अंतराला भरण्यासाठी तीन वर्षांनी एक चंद्र मास/ महिना अधिक भरतो.

अतिरिक्त किंवा जास्तीचा महिना असल्याकारणाने याला अधिक मास हे नाव दिले गेले आहे.

अधिक मासाला अजून काय म्हणतात? Other Names for Adhik Maas In Marathi

हिंदी कॅलेंडर मध्ये दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो त्याला अधिक मास,  मलमास,  निजमास किंवा पुरुषोत्तम मास या नावाने ओळखले जाते. 

 संपूर्ण भारतात हिंदू धर्मात अधिक मासाचे विशेष महत्त्व मानले जाते.

या पूर्ण महिन्यात पूजा पाठ, भगवत भक्ती, व्रत- उपवास,जप आणि योग इत्यादी धार्मिक कार्य केली जातात.

असे मानले जाते की अधिक मास मध्ये केले गेलेले धार्मिक कार्य हे इतर कोणत्याही महिन्यात केल्या गेलेल्या पूजा पाठ पेक्षा 10 पटीने अधिक फळ प्राप्त होते. 

याच कारणास्तव भक्त या महिन्यांमध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध धार्मिक स्थळांवर भेट देतात. 

तसेच आपला इहलोक आणि परलोक सुधारण्यासाठी प्रयत्न करू लागतात.  असा हा अधिक मास अत्यंत पवित्र आहे.

अधिक महिन्याला मलमास का संबोधले जाते ? Why is Adhik Maas Known As Malmaas In Marathi

असे मानले जाते की अतिरिक्त महिना असला कारणाने हा महिना मलीन असतो. अधिक महिन्यात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

या महिन्यात नामकरण, यज्ञ,  विवाह, धार्मिक संस्कार,  गृहप्रवेश, नवीन वस्तूंची खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जात नाही. 

मलीन महिना मानत असल्याकारणाने या महिन्याचे नाव मलमास असे पडले.

अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास का म्हणतात? Why is Adhik Maas Known As Purushottam Maas In Marathi

अधिकमासाचे अधिपती भगवान श्रीविष्णू आहेत. ‘पुरुषोत्तम’ भगवान विष्णू यांचे नाव आहे. म्हणून अधिक मासला पुरुषोत्तम  मास या नावाने सुद्धा ओळखले जाते. या विषयावर एक अत्यंत रोचक अशी पौराणिक कथा आहे.

मराठी  महिन्यांची नावे ही देवी देवतांच्या नावावरून ठेवली गेली आहेत.

भारतीय गणनेप्रमाणे प्रत्येक महिन्यासाठी एक देवता निर्धारित आहेत. पण अधिक मास सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये संतुलन बनवण्यासाठी असलेला एक महिना आहे.

मग या अतिरिक्त महिन्याचा अधिपती बनण्यासाठी कोणताही देवता तयार होत नव्हता. 

अशा परिस्थितीत ऋषीमुनियांनी भगवान श्रीविष्णू यांना आग्रह केला, “ हे देव तुम्हीच या अतिरिक्त महिन्याचा भार तुमच्यावर घ्यावे” अशी ऋषीमुनी यांनी विनंती केली.

भगवान विष्णू यांनी आग्रह स्वीकार केला. 

भगवान विष्णू पुरुषोत्तम रूपात मलमासाचे अधिपती झाले.अधिक मास पुरुषोत्तम मास झाला.

अधिक मास पौराणिक कथा Adhik Maas Traditional Story In Marathi

पुराणांमध्ये अधिकमासाची एक सुंदर कथा ऐकायला मिळते. ही कथा दैत्यराज हिरण्यकश्यप च्या वधाशी निगडित आहे.

पुराणानुसार दैद्यराज हिरण्यकश्यप नी ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली.

जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्याने त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमृत्वाचे वरदान देणे निषिद्ध असल्यामुळे त्याला दुसरा वरदान मागण्याचा आग्रह केला. 

त्यावेळेस हिरण्यकश्यप  ने वरदान मागितले की त्याला संपूर्ण सृष्टीत कोणताही नर, नारी, पशु, देवता, असुर ठार मारू शकणार नाहीत. 

त्याची मृत्यू वर्षातील बारा महिन्यात कधीच नको,  जेव्हा तो मरेल त्यावेळेस दिवस किंवा रात्र नसो, तो कोणाच्याही शस्त्र किंवा अस्त्राने मरू शकणार नाही,  त्याला कोणी घरात किंवा घराबाहेर मारू शकणार नाही. 

नाईलाज मुळे ब्रह्माजींनी हिरण्यकश्यप ला असा वरदान दिला. 

अशा वरदानामुळे हिरण्यकश्यप स्वतःला अमर समजू लागला.  त्याने स्वतःला देव घोषित केले.

त्याच्या मृत्यूचा घडा ज्यावेळेस भरला त्यावेळेस भगवान श्रीविष्णू यांनी अधिक मासामध्ये , नरसिंह अवतार म्हणजेच अर्ध पुरुष व अर्ध सिंह या रूप मध्ये प्रकट होऊन, संध्याकाळी, घराच्या उंबरठ्यावर आपल्या नखांनी हिरण्यकश्यप ची छाती फाडून त्याला  मृत्यू दिला.

अधिक मासाचे महत्त्व Adhik Maas Importance In Marathi

 हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव पंचमहाभूतांनी बनलेले आहे.  या पंचमहाभूतांमध्ये  जल, अग्नी, आकाश, वायू, आणि पृथ्वी सम्मिलित आहे. 

अधिक मासामध्ये समस्त धार्मिक कृत्य,  चिंतन, मनन, ध्यान, योग इत्यादी मार्गाने श्रद्धाळू आपल्या शरीरात समाहित  पाचही तत्त्वांमध्ये संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

या पूर्ण महिन्यात व्यक्ती आपल्या भौतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी  प्रयत्नशील असतो. 

याप्रमाणे अधिक मासा दरम्यान  केले गेलेल्या प्रयत्नांमुळे व्यक्ती स्वतःला बाहेरून स्वच्छ  करतो. 

निर्मळ मनाने त्याचे जीवनऊर्जा ने भरून जाते. 

असे मानले जाते की अधिक मासा दरम्यान केलेले प्रयत्नामुळे कुंडली मधील असलेले समस्त दोषांचे निवारण होते.

अधिक मासा मध्ये काय केले पाहिजे? What Should One Do In Adhik Maas In Marathi

अधिक महिन्यात श्रद्धाळू  व्रत- उपवास,  पूजा पाठ, ध्यान, भजन, कीर्तन, मनन  करतात. 

पौराणिक सिद्धांत अनुसार या महिन्यात केलेले  यज्ञ हवन या व्यतिरिक्त  श्रीमद देवी भागवत,  श्री भागवत पुराण,  श्रीविष्णु पुराण,  भविष्यत्तर पुराण,  आदी ग्रंथांचे श्रवण, पठण, म्हणून विशेष लाभदायी ठरते.

अधिक महिन्याचे अधिपती भगवान विष्णू आहेत,  म्हणून या पूर्ण महिन्यात भगवान विष्णूंचे मंत्र जप करण्याचे विशेष फायदे होतात. 

अधिक मासा मध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्याने भगवान विष्णू स्वतः आशीर्वाद देतात,

साधकाच्या समस्त पापांचे शमन करतात. त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतात.

Other Blogs of Bhaktiwel,

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri