Ganesh Chaturthi Muhurat Vidhi Importance गणेश चतुर्थी मुहूर्त विधी प्राणप्रतिष्ठा

अनुक्रमणिका

ॐ गं गणपतये नमः

गणेश चतुर्थी/उत्सव 2022 Ganesh Chaturthi/Utsav 2022 in Marathi

तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या Ganesh Chaturthi हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय आहे गणेश चतुर्थी/उत्सव. Ganesh Chaturthi/Utsav

चातुर्मास चालू झाला म्हणजे सणांची रेलचेल चालू झाली. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात शिव शंभो शंकर यांचे पूजन केले जाते. त्याच प्रमाणे भाद्रपद लागताच  गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते. लहानांपासून तर वृध्दांपर्यंत सर्वांना प्रिय असलेला उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी/उत्सव होय.

भाद्रपद लागताच गणेश उत्सवाच्या तयारीची सुरुवात होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह वाहत असतो. सजावटीचे सामान, विविध प्रकारची  देऊळ, विविध प्रदर्शने, रंगीबिरंगी वस्तू इत्यादींनी बाजार एकदम फुलून जाते. हार-फुल वाल्यांकडे विविध  रंगसंगतीची फुले, विविध प्रकारची पाने दिसू लागतात .  उत्सवाच्या तयारीसाठी माणसांमध्ये उत्साह निर्माण होतो. त्यामुळे बाजारात गर्दी भासू लागते.

करोना मुळे दोन वर्षानंतर यावर्षी सगळीकडे उत्सवाची जय्यत तयारी चालू आहे. बाजारात पाय ठेवायला जागा नाही आहे. एका ठिकाणी उभा राहिलो म्हणजे आपोआपच दुसऱ्या टोकापर्यंत माणूस पोहोचत आहे.

Ganesh Chaturthi images - Ganesh Chaturthi

गणेश चतुर्थी/उत्सव 2022 Ganesh Chaturthi/Utsav 2022 in Marathi

दर महिन्यात शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षात अशा दोन चतुर्थी येतात.

कृष्ण पक्षातील चतुर्थी ला विनायकी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.

 • भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात होते.
 • संपूर्ण भारतात गणेश उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो.
 • गणरायाच्या मूर्तीला मंडळात, घरात, सोसायटीमध्ये ढोल ताशाच्या आवाजात वाजत गाजत बसविले जाते.
 • गणरायाचे मूर्तीला 1.5, 5, 7 किंवा 10 दिवसासाठी आपापल्या परंपरेनुसार बसवण्याची पद्धत आहे.

गणेश चतुर्थी/उत्सव 2022 पूजा मुहूर्त Ganesh Chaturthi/Utsav 2022 Pooja Muhurat in Marathi

भाद्रपद गणेश चतुर्थी Bhadrapad Ganesh Chaturthi या वर्षी:

 • प्रारंभ: मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी 03:34 यांनी सुरू होत आहे.
 • समाप्ती: बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी 03:23 मिनिटांनी समाप्त होत आहे.

गणपती बसवण्याचा शुभमुहूर्त 2022 The Auspicious Time in Marathi

गणेश उत्सवाची सुरुवात 31 ऑगस्ट 2022 बुधवार रोजी सुरू होत असून 9 सप्टेंबर 2022 शुक्रवारअनंत चतुर्दशीच्या दिवशी समाप्त होत आहे. म्हणून  गणरायाची मूर्ती बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी बसविण्यात येणार आहे.

 • सकाळी 06:25 मिनिट ते 09:33 मिनिटे आहे.
 • सकाळी 11:07  मिनिट ते 12:41 मिनिटे आहे.
 • नंतर 1:30 मिनिटापर्यंत राहू काल असल्याने या वेळेत गणरायांचे मूर्तींचे पूजन करू नये.

गणेश मूर्ती बसवण्याची पद्धत का रूढ झाली? Reason behind celebrating Ganesh Utsav in Marathi

महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिण्याचा प्रयत्न केला. मात्र महाभारतसारख्या महान ग्रंथाची रचना करणे महर्षी व्यास यांना शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी  बुद्धीचे देवता गणेश यांचे आव्हान केले. गणरायाने महाभारत हा ग्रंथ लिहिण्याचे मान्य केले. मात्र  गणरायाने महर्षी व्यास यांना अविरत/ न थांबता रचना करेल असे वचन दिले.

गणरायांच्या शरीराचे तापमान वाढू नये , म्हणून महर्षी व्यास यांनी गणरायांच्या संपूर्ण शरीराला माती लावली. म्हणून मातीचा गणपती बसवण्याची पद्धत सुरू झाली.

गणरायांनी महाभारत ग्रंथ लिहिण्याचे काम भाद्रपद चतुर्थीला सुरू केले. अविरतपणे  महाभारताची रचना दहा दिवसात लिहून पूर्ण केली. म्हणून भाद्रपद चतुर्थीपासून ते पुढील दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थी पर्यंत गणपती बसवायची पद्धत रूढ झाली.

यादरम्यान गणरायांच्या आवडीचे पदार्थ महर्षी व्यास खायावयास दिले. म्हणून आपणही गोडाधोडाचे  गणपतीला प्रिय असलेली नैवेद्य दाखवतो.

 महाभारताची रचना करताना शेवटी शेवटी गणरायांचे अंगाची माती सुकून गेली होती. म्हणून महर्षी व्यास यांनी गणराया यांचा जल अभिषेक केला होता. म्हणून  मातीचा गणपती विसर्जन करण्याची पद्धत आहे.

मूर्ती कशी असावी? How Ganesh Murti should be in Marathi

 • मूर्ती मध्यम आकाराची असावी.
 • विश्राम अवस्थेतील मूर्ती सर्वोत्तम असते.
 • गणरायांचे मागील हातामध्ये शस्त्र असावेत.
 • एक हात आशीर्वाद देताना, तर दुसरा हात मोदक घेताना असावा.
 • जोपर्यंत गणरायांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत  मूर्तीमध्ये देवत्व येत नाही.
 • गणरायाच्या पायाजवळ त्यांचे वाहन मूषक असावे. 
 • विविध प्राण्यांवर बसलेली, राक्षसाला मारत असणारी शक्यतो अशा मूर्ती निवडू नये. 
 • गणरायांची कान सुपासारखे मोठे असावे.
 • गणरायाची सुंड डाव्या बाजूला असावी.

घरात मूर्ती कशी आणावी? How to bring Bappa home in Marathi

 • मूर्ती घ्यायला जाताना लाकडी पाट,पितळ/ चांदीचे ताम्हण, हळदी कुंकू अष्टगंध, घंटा/ वाद्य घेऊन जावी.
 • गणराया च्या नावाचा जयघोष करत ,वाद्य वाजवत मूर्ती घरात घेऊन यावी.
 •  मुख्य दरवाजा तसेच गणपती बसवण्याची जागा स्वच्छ करून घ्यावी
 •  दारात रांगोळी काढावी.
 •  दारा मध्ये घास उतरून टाकून मूर्ती  घरात घ्यावी.

गणेश पूजेसाठी लागणारे साहित्य Things needed while doing Ganesh Pooja in Marathi

 • हळदी, कुंकू ,अक्षता, अष्टगंध, गुलाल, सुपारी
 • कलश पूजनासाठी नारळ
 • धूप -दिप,(निरांजन/  समई), अगरबत्ती
 • नैवेद्यासाठी गूळ- खोबरं
 • बदाम, खारीक, खोबरं,सुपारी प्रत्येकी पाच सुट्टे पैसे
 • हार- फुल, विड्याची पानं, दुर्वा ,आघाडा, आंब्याची पानं
 • कापसाची माळ, जनेऊ
 • घंटा/ शंख 
 • लाकडी पाट/ चौरंग
 • लाल/ पिवळ/ गुलाबी कापड
 • पंचामृत/ कच्चा दूध
 • नैवेद्यासाठी मोदक/ लाडू
 • दही+ भात+ साखर

गणरायांचे प्रिय फूल जास्वंद, कमळ, केवडा आहे.

गणरायांच्या प्रिय नैवेद्य मोदक व लाडू आहे.

गणरायाची पूजा विधि/ प्राणप्रतिष्ठा How to do Ganapati Bappa’s Pooja in Marathi

देव भक्तीचा भुकेला असतो. म्हणून देवाची प्राणप्रतिष्ठा करताना/ पूजा करताना मनामध्ये प्रामाणिक श्रद्धा असावी.  मनोभावे केलेली पूजा निश्चितपणे देवाला प्रसन्न करते. पूजाविधी किंवा पद्धती ह्या सगळ्या औपचारिकता आहेत. मनामध्ये श्रद्धा असणे सर्वात महत्त्वाचे असते.

मला जी माहिती आहे ती मी इथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये  मी कोणत्याही प्रकारच्या मंत्राचा वापर न करता पूजा करण्याची विधी सांगत आहे.

गणरायाच्या पूजेची मांडणी Step by step process of Ganapati Pooja’s Arrangement in Marathi

 • पाटावर कापड टाकून घ्यावे. 
 • कलश आणि नारळावर स्वस्तिक काढून घ्यावे.
 • पाटावर मध्यभागी स्वस्तिक काढून घ्यावे.
 • कलश पाण्याने भरून त्यामध्ये हळदीकुंकू,अक्षता, नाणं ,एक सुपारी टाकावी.
 • विड्याची /आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवावा.
 • तांदळाची रास (गणरायाच्या मूर्तीच्या )उजव्या बाजूला काढून त्यावर कलश ठेवावा.
 • तांदळाची रास काढून त्यावर दिवा ठेवून घ्यावा.
 • पाटावर पुढील बाजूला विड्याची 2 पाने पाच ठिकाणी  ठेवावी.देठ देवा जवळ करावे.
 • प्रत्येक पानांवर खारीक, खोबऱ्याचं तुकडा, बदाम ,सुपारी व नाणं ठेवून घ्यावं. 

गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्याची विधी Step by step process of Ganapati Pooja in Marathi

 • सर्वप्रथम हातात तीन वेळा पाणी घेऊन ते प्यावे.
 • चौथ्या वेळा हातात पाणी घेऊन हात धुवावा.( हे आचमन झाले)
 • दिव्याला हळदीकुंकू अक्षता फूल वाहून दिव्याची पूजा करावी.
 • ताम्हण मध्ये एक सुपारी घ्यावी. त्यावर शुद्ध जल पाचवेळा अर्पण करावे. त्यानंतर पंचामृत पाच वेळा अर्पण करावे.
 • एकाचे आमच्यात हळदीकुंकू व  पाणी घेऊन सुपारी वर अर्पण करावे.
 • परत शुद्ध जल अर्पण करून शुद्ध कापडाने पुसून घ्यावे.
 • ही सुपारी गणरायांच्या मूर्तीच्या डाव्या हाताला पाटावर तांदळाची रास काढून त्यावर ठेवावी.
 • त्यावर( सुपारीवर) हळद कुंकू अक्षता दूर्वा फुल अर्पण करावे.
 • अथर्वशीर्ष येत असल्यास ते म्हणावे किंवा “ऊँ गं गणपतये नमः” चा जप करावा.
 • कलश गणरायांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला ठेवावा. त्यावर हळद कुंकू  अक्षता फूल अर्पण करावे. 
 • एकवीस दुर्वांची जुडी तुपामध्ये  भिजवून घ्यावी. त्याने गणरायांच्या मूर्ती ला( अवयवांना) स्पर्श करावा.
 • एका फुलाला हळद-कुंकू अक्षता लावून गणरायांच्या पायाजवळ ठेवावे.
 • डोक्याला तिलक करावा.
 • डाव्या खांद्यावरून उजव्या मांडीवर असे  जनेऊ घालून घ्यावे. कापसाची माळ घालावी.
 • फुलांचा हार घालावा.आपल्या इच्छेनुसार गणरायांना सजवावे.
 • गणरायांच्या पायाजवळ मूषकची  हळदीकुंकू अक्षता वाहून पूजा करावी.
 • गुळ- खोबरं, पंच मेवा, पाच फळ, नैवेद्य असं संपूर्ण देवासमोर ठेवून देवाला मनोभावे प्रार्थना करावी.
 • गणरायाची आरती म्हणावी. साष्टांग नमस्कार घालावा.
 • नैवेद्यावरून तीन वेळा पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवावा.

सर्वप्रथम शिवाजी महाराज यांनी गणेश स्थापना केली होती. मात्र त्यानंतर आपला देश ब्रिटिशांच्या तंत्रात होता.देश पारतंत्र्यात असल्यामुळे कोणताही उत्सव साजरा केला जात नसे. मात्र लोकमान्य टिळक यांनी पुन्हा गणेश उत्सवाची सुरुवात केली.  भारतातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी एकमेकांना भेटणे आवश्यक होते.ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे होते. गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोक एकमेकांना भेटत असत. “ एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ” .या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्याचा लढा देण्याचा लोकमान्य टिळक यांचा उद्देश होता.

निष्कर्ष Determination of Ganesh Festival in Marathi

याच प्रमाणे आपण देखील मॉडन गणेश उत्सव साजरा करावा

पारंपरिक मान्यतेनुसार  गणराया भू लोकांवर दहा दिवस वावरत असतात.

 • गणरायाचे स्वागत व निरोप वाद्य वाजवून करावे.
 • D.J नाईट, गाण्याच्या स्पर्धा, नृत्याच्या स्पर्धा, वाद्य वाजवण्याच्या स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे.
 •  यामुळे  सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होतात.
 •  लोक घराबाहेर पडून उत्सवात सामील होतात.
 •  एकमेकांना भेटून विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे.
 • जेणेकरून एकमेकांना पुढे कसं जाता येईल याचा विचार होईल.
 • आपसातील संबंध दृढ होतील. 
 • नवीन कलांना वाव मिळेल.

ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा उद्देश गणेश उत्सवात होता त्याप्रमाणे देशाला पुढे नेण्याचा उद्देश गणेश उत्सवात आपला असला पाहिजे. 

कविता Poem on Ganesh Chaturthi in Marathi

|| माता-पिता ला विश्व मानणारा,

प्रथम पूज्य तू ,

बुद्धीचा देवता तू, 

सुख देणारा तू,

दुःख हरणारा तू,

भक्तांसाठी धावून येणारा तू,

दहा दिवस भक्तां जवळ येऊन राहतोस तू, 

 पण 365 दिवस त्यांच्या मनात राहतोस तू ,

लहानांचा गणू तू, मोठ्यांचा गणराया तू, 

तरुणांसाठी बाप्पा तू, वृद्धांचा लाडका तू, 

अशा आपल्या गणरायाचे स्वागत

करूया वाजत-गाजत ||

Ganesh Chaturthi images - Ganesh Chaturthi

13 thoughts on “Ganesh Chaturthi Muhurat Vidhi Importance गणेश चतुर्थी मुहूर्त विधी प्राणप्रतिष्ठा”

Leave a Comment

Hartalika atharvashiraha falshruti its meaning Deep / Gatari Amavasya Raksha Bandhan Jivati Pooja 2022