5 Mananche Ganapati of Pune पुण्याचे 5 मानाचे गणपती

5 Mananche Ganapati

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ 

निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा

पुण्याचे 5 मानाचे गणपती 5 Mananche Ganapati

नमस्कार मित्र / मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय आहे पुण्यातील सुप्रसिद्ध पुण्याचे 5 मानाचे गणपती व विसर्जन मिरवणूक.

“पुणे तिथे काय उणे” या म्हणीप्रमाणे याच पुण्यात कोणत्या गोष्टीची कमतरता नाही हे कळून चुकते. तसेच पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याच प्रमाणे पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण गणेशोत्सव हा अगदी महत्वाचा असतो. पुणे येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव आहे.  प्रत्येक चौकात, सोसायटीमध्ये हे जवळपास प्रत्येक घरातच गजाननाची स्थापना होते.

पुणे तिथे काय उणे

 पुणे विद्येचे माहेरघर

मानाचे पाच गणपती 5 Mananche Ganapati

चला तर मग बघुयात पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत? त्याच्या मागे इतिहास काय आहे? सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मानाचे पाच गणपती कोणते आहेत? 5 5 Mananche Ganapati in Marathi

 • कसबा गणपती
 • तांबडी जोगेश्वरी
 • गुरुजी तालीम
 • तुळशीबाग
 • केसरी वाडा

हे मानाचे पाच गणपती आहेत. विसर्जन सोहळ्यात पहिला मान कसबा गणपती ला असतो. दुसरा मान तांबडी जोगेश्वरी, तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग व पाचवा मान केसरी वाडा यांना दिला जातो. या पाठोपाठ पुण्यातील इतर मिरवणूक सोहळ्यात समाविष्ट झालेल्या सार्वजनिक मंडळाने दिला जातो.

मानाचे पाच गणपती मागील इतिहास History of 5 Manache Ganapati in Marathi

 • गणपती बाप्पा ने महर्षी व्यास यांच्या आव्हानांना स्वीकार केला.
 • गणराया यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली.
 • अविरक्त महाभारत लिहिण्याचे कार्य दहा दिवस चालू होते . तेव्हापासूनच गणपती दहा दिवस बसवण्याची प्रथा सुरू झाली . (साधारणता 16th-17th) शतकापासून ).

पण त्यावेळी फक्त राजा- महाराजा यांच्या राजमहल मध्येच  गणपतीची स्थापना होत असे.

मात्र लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी गणेश स्थापनेचे रूपांतरण  “सार्वजनिक गणेशोत्सवात” केले. 

kasba - 5 Mananche Ganapati

कसबा गणपती Kasba Ganapati

 • कसबा गणपती पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे.
 • विसर्जन मिरवणुकीतही याला पहिला मान असतो.
 • कसबा गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
 • या मूर्तीची स्थापना 1693 वर्षी झाली.
 • पुणे शहरातील मध्यभागी कसबा पेठेत कसबा गणपती आहे.
 • शेजारील लाल महालात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले.
 • माता जिजाऊ यांनी कसबा गणपती साठी पारंपारिक दगडी देऊळ बनवून घेतले होते.
 • मंदिरा शेजारीच सभामंडप देखील बांधण्यात आला होता.
 • सुरुवातीला गणपतीची मूर्ती खूप लहान होते. त्यानंतर मूर्तीवर शेंदूराचा लेप लावला गेला.
 • आता कसबा गणपतीची मूर्ती साधारणता 3.5 फुटाची आहे .
 • पुण्यातील सर्वात जुनी मूर्ती ही कसबा गणपती ची असल्यामुळे  त्याला मानाचा पहिला गणपती असे संबोधले जाते.
 • पुण्याचा ग्रामदेवता पण कसबा गणपतीच आहे.
Tambdijogeshwari - 5 Mananche Ganapati

तांबडी जोगेश्वरी गणपती Tambdi Jogeshwari Ganapati

 • तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा माता चे एक देऊळ आहे.
 • पुण्याची ग्रामदेवी म्हणून तांबडी जोगेश्वरी ओळखले जाते.
 • सोळाव्या शतकांमध्ये बांधलेले हे देऊळ आहे.
 • साधारणता1693 मध्ये हे देऊळ बांधण्यात आले होते. येथे असलेली देवीची मूर्ती स्वयंभू आहे.
 • त्याचा देव्हारा पितळाचा असून छत्र चांदीचे आहे.
 • सुरुवातीला या मंदिरातच मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी याची स्थापना होत असे. म्हणून देखील या गणपतीला तांबडी जोगेश्वरी या नावाने ओळखले जाते.
 • तांबडी जोगेश्वरी चे देऊळ पुण्याच्या मध्यभागी बुधवार पेठेत आहे.
 • 2000 यावर्षी देवीच्या देवळाच्या शेजारीच गणपतीचे वेगळे देऊळ बांधण्यात आले होते.
 • तांबडी जोगेश्वरी या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी गणरायाची ही मूर्ती विसर्जित केली जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी नवीन मूर्तीची स्थापना होते. 
Gurujitalim - 5 Mananche Ganapati

गुरुजी तालीम गणपती Guruji Talim Ganapati

 • सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या पाच वर्ष अगोदर गुरुजी तालीम या गणपतीची स्थापना करण्यात आली होती.
 • 1887 यावर्षी गुरुजी तालीम या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती.
 • हे गणपतीचे देऊळ पुण्यातील सुप्रसिद्ध लक्ष्मी रोड वर स्थित आहे. 
 • भिगु शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख कासम यांनी या गणपतीची बाप्पाची स्थापना केली होती. म्हणूनच गुरुजी तालीम हा गणपती हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो.
 •  सर्वप्रथम गुरुजी तालीम या गणपतीची स्थापना पुण्यातील एकमेव तालीम मध्ये झाली होती. म्हणून या गणपतीचे नाव गुरुजी तालीम असे पडले. सध्याच्या काळात तालीम हा प्रकार उपलब्ध नाही आहे. 
 • या मंडळाचे हे 132 वे वर्ष आहे.
 • शताब्दी नंतर येथील कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करण्याचे बंद केले आहे. स्व खर्चावर गणेश उत्सव साजरा केला जातो हे येथील वैशिष्ट्य आहे.
 • 1972 यावर्षी या मुर्तीचे रूपांतरण शाडूच्या मातीत केले गेले होते. गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती आहे.
tulsibaug Ganapati

तुळशीबाग गणपती TulsiBaug Ganapati

 • तुळशीबाग का मानाचा चौथा गणपती आहे.
 • दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1901 यावर्षी या गणपतीची स्थापना केली होती. त्यांच्या नावावरून याला तुळशीबाग गणपती म्हणून ओळखले जाते.
 • उंच आणि भव्य देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
 • 1975 यावर्षी ग्लास फायबरची मूर्ती बनविण्यात आली होती.
 • 13ft उंच अशी भव्य दिव्य गणरायाची मूर्ती आपणास बघावयास मिळते. या मूर्तीचे वजन 80 किलो पेक्षा जास्त आहे. 
kesariwada ganapati

केसरीवाडा गणपती Kesariwada Ganapati

 • 1894 यावर्षी प्रथम या गणपतीची स्थापना विंचूरकर वाड्यात करण्यात आली होती
 • 1905 यावर्षी लोकमान्य टिळक यांनी केसरीवाडा या गणपतीची स्थापना टिळक वाड्यात केली..
 • लोकमान्य टिळक येथेच व्याख्याने देत असत.
 • केसरी वाडा या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे याची पालखी.
 • आजही या गणपतीची मिरवणूक पालखी मध्येच काढली जाते.
 • संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे 1998 यावर्षी केसरी वाडा गणरायांच्या मूर्ती ची रचना करण्यात आली.
 • या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळ देखाव्यांवर खर्च करत नाही.
 • त्याऐवजी विविध स्पर्धा आयोजित करून पारितोषिक का ठेवतात. त्यामुळे लोकमान्य टिळक यांचा उद्दिष्ट “लोकांना एकत्रित करणे” हा पूर्ण होत असताना दिसतो

लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता.त्यामागे लोकांना एकत्रित करून स्वातंत्र्याचा लढा द्यायचा हा त्यांचा हेतू होता. लोकांचा आत्मविश्वास वाढवणे व त्यांचे मनोबल उभे करणे हा होता.

पुण्याचे गणपती विसर्जन मिरवणूक Information On Visarjan Procession of Pune In Marathi

प्रत्येक चौकात मांडव घातले जातात. त्यामध्ये वर्षानुवर्षे स्थापना करत आलेल्या  गणेश मूर्तीची स्थापना होते. प्रत्येक चौकातील मंडळाला एक विशेष नाव असते. साधारणतः 3,223 गणपती मंडळांची नोंद पुण्यामध्ये आहे .गणपती बसवणे हेच वैशिष्ट्य नसून उत्कृष्ट देखावे हे देखील पुण्याचे एक वैशिष्ट्य आहे. वैज्ञानिक, सांस्कृतिक, पौराणिक, लाइटिंग( हलते किंवा स्थिर) इत्यादी या देखाव्यांचे विषय असतात.  देखाव्या मधून वेगवेगळे संदेश लोकांना दिले जातात. 

संध्याकाळी शहरात रस्त्यांवर गाड्यांची गर्दी असते. मात्र गणेश उत्सवात  पुण्यात संध्याकाळी रस्त्यांवर माणसांची गर्दी असते.  परिवारासोबत खूप उत्साहाने लहान-मोठे माणसं गणपतींचे दर्शन तसेच देखावे बघण्यासाठी घरातून बाहेर निघतात.

 नेहमीच हॉटेलिंग पेक्षा हे करण्यात जाम मजा येते. हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

 

दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. इथेच गोष्ट संपत नाही तर, पुण्याची विसर्जन मिरवणूक याचे वैशिष्ट्य एक वेगळेच आहे. विसर्जनाच्या एक दिवस अगोदरच प्रत्येक मंडळे पोलीस परवाना काढतात. मिरवणूक साठी लाईन मध्ये थांबतात. विसर्जन मिरवणुकीच्या गाड्यावर ही उत्कृष्ट देखावे केलेले असतात.

विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य Visarjan Procession’s features in Marathi

पूर्वीच्या काळी विसर्जन मिरवणूक मध्ये घोडे हत्ती यांचा समावेश असायचा. त्यांच्यावर पारंपरिक वेशभूषेत स्त्रिया बसायच्या. अप्रतिम होता तो अनुभव घेण्यासाठी. विसर्जन मिरवणुकीत भयंकर गर्दी असते. न चालताच माणूस एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपर्‍यापर्यंत पोहोचतो. पण तरीही विसर्जन मिरवणुकीत जाऊन तो अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. 

गणेश चतुर्थी पासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा गणेश अनंत चतुर्दशीला शेवट होतो.

 • लांब लचक अप्रतिम रस्त्यांवर काढलेल्या विविध रांगोळ्या
 • दिवसाच्या प्रकाशापेक्षा अधिक रात्री चमकणारे प्रकाशमयी रस्ते
 • ढोल ताशे, लेझीम असे विविध पथक
 • दिवस-रात्र वाजणारे वाद्य, गाणी
 • एका दिवसात एकामागून एक जाणाऱ्या गणरायांच्या सहस्त्र उत्कृष्ट मूर्ती
 • “मोरया” “मोरया” चा नाद घोष
 • गणरायांना ठेवण्यात येणार्‍या गाड्या वर केलेले विविध देखावे.
 • प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
 • पारंपारिक वेशभूषेत असलेल्या स्त्रिया , पुरुष मंडळी, लहान मुलं
 • गरम गरम उकडलेल्या शेंगा, कणीस खाण्यात येणारी मजा

लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, केळकर रोड या रस्त्यांवर गणपतीचे मिरवणुकीसाठी मोठमोठ्या रांगा लागतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा वाजता विसर्जन सोहळ्याला सुरुवात होते. सर्वप्रथम मानाचे पाच  गणपतींची मिरवणूक सोहळा एकापाठोपाठ जातो. त्यानंतरच पुण्यातील इतर गणपतींची विसर्जन सोहळा सुरू होतो. जवळपास या मिरवणूक पुढच्या दिवशी दुपारपर्यंत चालू असतात. 

13 thoughts on “5 Mananche Ganapati of Pune पुण्याचे 5 मानाचे गणपती”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri