Dhantrayodashi 2023 धनत्रयोदशी

धनत्रयोदशी Dhantrayodashi in Marathi

Dhantrayodashi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

धन्वंतरी देवाच्या कृपेने तुम्हाला आरोग्य लाभो

कुबेराच्या धना प्रमाणे तुमच्या घरात नेहमी धनाचे कुंड भरलेले असोत

देवी लक्ष्मी च्या कृपेने धनधान्याने नेहमी घर भरलेले असावे ही प्रार्थना 

धनत्रयोदशी Dhantrayodashi in Marathi

जीवनात आपल्याला आरोग्य, धनधान्य, संपत्ती या गोष्टी असल्या की जीवन सुखमय होते. या गोष्टींसाठीच माणूस जीवनात झटत असतो. प्रयत्न करत असतो. कष्ट करत असतो.

याच प्रमाणे मानत असलेल्या देवी-देवता यांना मागणी करत असतो. पूजा- अर्चना करत असतो. पूजा प्रार्थना केल्याने मनाला शांती मिळते.

मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यावेळी देव सुद्धा मदतीला धावून येतात.

धनत्रयोदशी दिवशी आरोग्याचे देवता धनवंतरी, धनधान्याची देवी लक्ष्मी व संपत्तीचे देव कुबेर यांची पूजा केली जाते. तसेच यम दीप दान केले जाते.

धन+ त्रयोदशी = धनत्रयोदशी.

म्हणजेच आश्विन कृष्ण पक्षाच्या तेराव्या तिथीला केली जाणारी धनाची पूजा होय. हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही पूजा करताना त्यामागे पौराणिक कथा असतात.

ज्यावेळी समुद्रमंथन झाले होते.

त्यावेळी अश्विन कृष्ण पक्षाच्या तेराव्या तिथीला समुद्रातून देवी लक्ष्मी, धनवंतरी, व सोन्या-चांदी ची कळशी घेऊन कुबेर देव उत्पन्न झाले होते.

म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी, धन्वंतरी व कुबेरदेव  यांची पूजा केली जाते.

धनवंतरी Dhanvantari in Marathi 

Dhantrayodashi

“आरोग्यम् धनसंपदा” म्हणजेच आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. ही मान्यता आपल्या संस्कृतीत आहे. आरोग्य म्हणजे निरोगी शरीर.

जर माणसाकडे आरोग्यच नसेल तर धनधान्याची आनंद तू घेऊ शकत नाही. म्हणून प्रथम मनुष्याचे आरोग्य उत्कृष्ट असावे लागते.

धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची जन्मतिथी म्हणूनही ओळखला जातो. म्हणून आपण आरोग्याच्या दैवताची पूजा करून स्वतःच्या आरोग्यासाठी मागणी करत असतो.

  • धनवंतरी देव हे भगवान विष्णू यांचे अवतार मानले जाते.
  • धनवंतरी देव देवलोकात वैद्याचे काम करतात म्हणून त्यांना आरोग्याचे देवता म्हणून संबोधले जाते.
  • धनवंतरी देव समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन आलेले असल्यामुळे त्यांना आरोग्याचे देवता मानले जाते.

धनवंतरी देवाची पूजा करताना खालील मंत्राचा जप करावा.

ॐ नमो भगवते वासुदेवाय

धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय

सर्वामयविनशाय त्रैलोक्यनाथाय

श्री महाविष्णवे स्वाहा ।

Dhantrayodashi images quotes mantra

धनधान्याची देवी लक्ष्मी Devi Laxmi in Marathi Dhantrayodashi

समुद्रमंथनातून धनतेरस/ धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर आल्या होत्या. म्हणून धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा प्रार्थना केली जाते. आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास  सदैव रहावा अशी प्रार्थना आपण करतो. सदैव आपल्या घरात धन तसेच धान्य भरून राहावे. मुलाबाळांचे आयुष्य भरभराटीचे व्हावे. मनातील पूर्ण इच्छांचे पूर्ती व्हावी ही अपेक्षा प्रत्येकाचीच असते.  धनत्रयोदशी दिवशी देवीला प्रार्थना केल्याने ती भक्तांची प्रार्थना ऐकते. अशी मान्यता आहे. भगवान विष्णू व देवी लक्ष्मी याकाळात पृथ्वी लोकात वावरत असतात. देवी लक्ष्मीची पूजा करताना खालील मंत्राचा जप करावा.

ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः ।।

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः ।।

Dhantrayodashi images quotes mantra

संपत्तीचे देव कुबेर Dev Kuber in Marathi 

Dhantrayodashi

धनत्रयोदशीच्या दिवशी संपत्तीचे देव कुबेर यांची पुजा प्रार्थना केली जाते. 

धनप्राप्तीसाठी  कुबेर देवता ची पूजा केली जाते. पूजा करताना खालील मंत्रांचा जप करावा.

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः ।।

ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय

अष्ट – लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः ।।

ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये ।।

धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा ।।

Dhantrayodashi images quotes mantra

यमदीपदान Yam Deep Daan in Dhantrayodashi in Marathi 

Dhantrayodashi

धनत्रयोदशी या दिवशी यमदीपदान करण्याची पद्धत आहे. यमदीप दान म्हणजे मातीची पणती संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून लावावी. असं केल्याने आपल्या घरात अल्प मृत्यूची संभावना टळते. मृत्यूचा भय ज्यांना असतो त्यांनी सुद्धा यम दीपदान करण्याची पद्धत आपल्या पद्मापुराणात लिहिलेली आहे. पणतीच्या उजेडाने अंधाराला मात मिळते. आपल्या पितरांना आनंद मिळतो. व घरात सुख समाधान लाभते. म्हणून धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी दक्षिण  दिशेला वात करून मातीचा दिवा लावावा. हा दिवा आपल्या इतर पणत्या पेक्षा थोडासा मोठा आकाराचा असावा. शक्यतो हा दिवा रात्रभर प्रज्वलित राहील असा असावा.

दिवा लावताना खालील मंत्राचा जप करावा.

कार्तिकस्यासिते पक्षे त्रयोदश्यां तु पावके ।

यमदीपं बहिर्दद्यादपमृत्युर्विनश्यति

असा हा धनत्रयोदशीचा सण आरोग्य, धनधान्य, संपत्ती, सुख समाधान देणारे आहे.

Dhantrayodashi images quotes mantra

धनत्रयोदशी पौराणिक कथा Dhantrayodashi Pauranik story in Marathi

एकदा यमराजाने यमदूतांना प्रश्न केला- प्राण्यांचे प्राण हरताना तुम्हाला कोणावर दया येत नाही का? यमदूत म्हणाले, “नाही महाराज! हे आमचे काम आहे याच्या मध्ये जर आम्ही दयाभाव दाखवला तर काय उपयोग?”

यमराज म्हणाले, “तरीपण एखादी अशी घटना सांगा ज्याच्यामुळे तुमच्या हृदय मधे कंपन झाले असेल.”

यमदूत म्हणाले,

“हंस नावाचा एक राजा शिकार करायला जंगलात गेला. तो रस्ता भटकला. दुसऱ्या राज्याच्या सीमेवर गेला. तिकडे नावाच्या राजाने हंस  राजाचे खूप सत्कार केले.

राजा हेमा यांच्या पत्नीला एक पुत्र झाला. ज्योतिषांनी नक्षत्राची गणना केली. त्यानुसार राजपुत्र लग्नाच्या चार दिवसानंतर मृत्यूला प्राप्त होईल. अशी भविष्यवाणी केली. राजाने पुत्राला एका गुफे मध्ये लपवून ठेवले. म्हणजे तो ब्रह्मचारी राहील अशी कल्पना केली.

परंतु विधीचे विधान तर निश्चितच असते. त्यानुसार राजा हंस यांची कन्या यमुना तट वर आली. तिकडे तिने राजपुत्राला बघितले. त्या दोघांनी गंधर्व विवाह केला. त्यांची जोडी कामदेव रती यांच्या प्रमाणे सुरेख होती. मात्र चौथ्या दिवशी  राजपुत्राचा मृत्यू झाला.  राजकुमारीने करून विलाप केला. तिच्या विलापाने आमचे (यमदूतां) चे हृदय कापले.”

यमराजाला देखील वाईट वाटले. पण यमराज म्हणाले, “आपण करू काय शकतो. विधीच्या विधानामुळे आपल्यालाही काही मर्यादा आहेत. काही वेळेस आपल्याला पण असे अप्रिय कार्य करावे लागतात.”

त्यावेळेस यमदूत यांनी यमराजांना प्रश्न केला, “अकाल मृत्यु पासुन वाचण्यासाठी काहीतरी उपाय असेल तो तुम्ही आम्हाला सांगावा”

त्यावेळेस यमराज म्हणाले,

 “धनतेरस च्या दिवशी धन्वंतरी पूजन आणि दीपदान विधीपूर्वक केल्याने अकाल मृत्यु पासुन  मुक्तता मिळते. ज्या घरात हे पूजन केले जाईन त्या घरातील लोकांना अकाली मृत्यूचे भय राहणार नाही.”

म्हणून धनतेरस ला धन्वंतरी पूजे सहित दीप दान करण्याची प्रथा सुरू झाली.

धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे What to buy on Dhantrayodashi in Marathi

काही मान्यता अनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी कराव्या व काही वस्तू खरेदी नाही कराव्यात.

धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू, चाकू, काचेच्या वस्तू खरेदी करू नयेत.

  • धने: धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी केल्याने सौभाग्य व संपन्नता प्राप्त होते. हे धने दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये ठेवावे. नंतर त्याचा मसाला बनवावा. किंवा या बिया कुंडीमध्ये टाकून रोप लावावे.
  • कपडे किंवा औषध: महिलांनी लाल साडी किंवा शृंगार चा सामान खरेदी केल्याने  त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते व त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी मान्यता आहे. तसेच धनवंतरी हे आरोग्याची देवता असल्याकारणाने औषध खरेदी करून त्यांचे दान  केल्याने घरात सगळ्यांना आरोग्य ला होते अशी मान्यता आहे.
  • पितळी वस्तू:  देव धन्वंतरी यांना पितळी वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्यांच्या हातात पितळाचा अमृत कलश होता म्हणून  पितळी वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आज महत्त्व आहे.
  • मातीच्या वस्तू: बऱ्याच ठिकाणी आज मातीच्या पणत्या, लक्ष्मी गणेश यांची मूर्ती, हटरी इत्यादी वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे.  मातीच्या भांड्यामुळे सकारात्मकता येते.
Dhantrayodashi

माती मध्ये असलेले पंचतत्व मातीच्या पणत्या मध्ये येतात म्हणून प्रत्येकाने दिवाळी या सणाला  मातीच्या पणत्या लावाव्या ही नम्र विनंती.

करवा चौथ in Hindi

वसुबारस in Marathi

धन्यवाद

5 thoughts on “Dhantrayodashi 2023 धनत्रयोदशी”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri