Narak Chaturdashi नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी Narak Chaturdashi in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

तुम्हा सगळ्यांना छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आहे. दिवाळी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा/बलिप्रतिपदा व भाऊबीज अशा पाच दिवसात विभागलेला असतो. या पाच दिवसात आपण विविध देवी-देवतांच्या पूजा करतो. या पूजा विधीपूर्वक करण्याला महत्त्व असते. 

आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे कोणते ना कोणते ठोस कारण असते. पौराणिक कथा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. प्रत्येक सण साजरा करताना मनामध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न होतात. त्यामुळे जीवनाचा आनंद मिळतो.

दिवाळी या सणा मध्ये

 • फराळ बनवणे/खाणे,
 • रांगोळी काढणे,
 • घराची स्वच्छता करणे,
 • घराला उत्कृष्ट पणे सजवणे,
 • लाईटिंग करणे,
 • कंदील लावणे,
 • पणत्या लावणे,
 • अभ्यंग स्नान करणे

या सर्व गोष्टींमुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो.

नरक चतुर्दशी Narak Chaturdashi in Marathi

दिवाळीच्या सणामध्ये नरक चतुर्दशी या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. नरक चतुर्दशी हा दिवस रूप चौदस, काली चौदस तसेच छोटी दिवाळी या नावाने ओळखला जातो. 

अश्विन कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजेच नरक चतुर्दशी होय.

सूर्यदेव लवकरच अस्त होतात.  हिवाळा या ऋतु ची सुरुवात होते. अमावस्येचा पहिला दिवस असल्याकारणाने संध्याकाळी अंधार गडद होतो.

 • भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा अंत या दिवशी केला. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे संबोधले जाते.
 • पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे. अभ्यंगस्नान ना मुळे त्वचेमध्ये येणाऱ्या चमक मुळे त्वचा निखरते. म्हणून या दिवसाला रूप चौदस असे म्हणतात. ( रूप म्हणजे चेहऱ्यावर येणारे तेज+ चौदस म्हणजे चतुर्दशी)
 • या दिवशी काली मातेचा जन्म झाला होता. काली माता ची पूजा करण्यात येते. म्हणून या दिवसाला काली चौदस असे संबोधले जाते.
 • गडद अंधार असल्याकारणाने  या दिवशी खूप पणत्या लावण्याची प्रथा आहे.
 • या दिवशी पितरांसाठी, कुलदेवी साठी असे विविध पणत्या लावल्या जातात. वातावरणातील अंधाराला पणत्यांच्या प्रकाशाने  मात दिली जाते. म्हणून या दिवसाला छोटी दिवाळी असे संबोधले जाते.

अभ्यंगस्नाना चे महत्व Importance of Abhyanga Snan in Marathi

शरीराला तेलाने मालिश करणे. सुवासिक उटणं लावून घासणे. अशा अंघोळीला अभ्यंग स्नान असे म्हटले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी उजेड होण्यापूर्वी सकाळी लवकर उठून शरीरावर तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान/ आंघोळ करावी.

त्यावेळी खालील मंत्राचा जप करावा:

यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये ।

आंघोळ झाल्यावर घरातील सर्वांचे औक्षण करावे.

गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवून तिळाचे तेल  टाकावे. चारही दिशांना वात लावावी. पूर्व दिशेला तोंड करून अक्षता व फुलांनी पूजा करावी.

दिवा लावताना खालील मंत्राचा जप करावा:

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया ।।

चतुः वर्ती समायु सर्वपापानुत्तये ।।

अशी मान्यता आहे की असा दिवा लावल्याने पापांचा नायनाट होऊन मनुष्य नरक यातना पासून मुक्तता मिळवितो. पहाटे आंघोळ केल्याने अलक्ष्मीचे मर्दन होते.

साधारणता नरकचतुर्दशी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येते. यावेळी गुलाबी थंडीची सुरुवात झालेली असते. अशावेळी त्वचेमध्ये कोरडेपणा येतो. तेलाने मालिश केल्याने त्वचेचे रोग उद्भवत नाही. 

आयुर्वेदिक उटणे वापरल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. म्हणून कदाचित अभ्यंग स्नानाची प्रथा पडली असावी.

Narak Chaturdashi images quotes mantra

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे? What should one do on Narak Chaturdashi in Marathi

 • अभ्यंगस्नान झाल्यावर नवीन कपडे परिधान करून कृष्ण मंदिरात जावे.
 • नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाण्याची प्रथा आहे.
 • घरातील सर्व देवतांना स्वच्छ आंघोळ घालून पूजा करावी.
 • संध्याकाळी घर, कार्यालय इत्यादी ठिकाणी रांगोळी काढावी.
 • मातीच्या पणत्या लावून वातावरणातील अंधाराचा नाश करावा.

त्याच प्रमाणे मनातील/शरीरातील मळ काढून पुन्हा नव्याने जगावे. पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. सण साजरे करताना नवनवीन आठवणींना मनामध्ये जागा द्यावी.

मनातील जुन्या कडू आठवणींना काढून फेकून द्याव्यात. ताज्या व नव्या जीवनाला नवीन दिशा देणार्‍या आठवणीना जागा करून द्यावी.

मन प्रसन्न झाले की जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते. आपो आपच प्रगतीचे मार्ग खुले  होतात.

नरक चतुर्दशी पौराणिक कथा Narak Chaturdashi Pauranik Katha in Marathi

पुराणा अनुसार,

नरकासुर नावाचा एक अत्यंत दृष्ट  असुर होता. ज्यावेळी लंकापती रावणाचा वध झाला . त्यावेळी नरकासूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला.

विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्याचा विवाह झाला. 

बाणासुर हा नरकासुर चा मित्र होता. नरकासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तप केले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन नरकासूर ला कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असे वरदान दिले.

वरदान प्राप्त झाल्यामुळे नरकासुर अहंकारी झाला. क्रुर झाला. त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व राज्यातील स्त्रिया यांचे अपहरण केले.  नरकासुर ने एकूण 16100 स्त्रियांना पळवून नेले. त्यांना माणिक पर्वतावर बंदी बनवले. 

पृथ्वीलोकतील माणसांना नरकासुर नरक यातना देत होता. चारी दिशांना हाहाकार झाला होता.

नरकासुर चे अत्याचारांना त्रस्त होऊन होऊन सगळेजण कृष्णाची आराधना करत होते. 16100  बंदी स्त्रिया भगवान श्रीकृष्ण यांना आर्त भावनेने पुकारत होत्या. 

नरक चतुर्दशी

शेवटी श्रीकृष्ण यांनी भक्तांची आर्त हाकेला प्रतिसाद दिला.

भगवान श्रीकृष्ण यांनी गरुडावर स्वारी करून नरकासुराचा वध अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला केला.  मरताना नरकासुराने भगवान श्रीकृष्ण यांच्या कडून या तिथीला त्याचे नाव मिळावे अशी प्रार्थना केली.

म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते.

नरकासुराच्या बंदीवासातील स्त्रियांना त्यांची कुटुंबे आता स्वीकारणार नाहीत, हे जाणून श्रीकृष्ण यांनी त्या 16100 स्त्रियांशी लग्न केले. व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आपण नरकचतुर्दशी साजरी करतो.

अभ्यंग स्नान

नरकासुराचा वध करताना त्याच्या रक्ताचे शिंतोडे भगवान श्रीकृष्ण यांच्या शरीरावर  उडाले होते. हे रक्त साफ करण्यासाठी भगवंतांनी तेल लावून आंघोळ केली होती.

म्हणून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा या दिवशी सुरू करण्यात आली होती. अशी मान्यता आहे.

 नरकासुराच्या वधानंतर त्याची आई भुदेवी हिने या दिवशी कोणीही नरक यातना भोगू नये. नरकासुराच्या मृत्यूचा दिवस एखाद्या उत्सवा प्रमाणे आनंदाने साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.

म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदाने साजरा केला जातो. म्हणून आपण या दिवशी पणत्या लावतो.

निष्कर्ष Conclusion in Marathi

शरीर व मन नेहमी साफ करत रहावे. शरीराच्या आतून देखील अभ्यंगस्नान झालेच पाहिजे. म्हणजेच मळकट भावनांना काढून फेकले पाहिजे.  

संपूर्ण समाजाचा चांगलेपणा कुठल्याही व्यक्तीच्या स्वार्थ पेक्षा नेहमीच प्रबळ असतो असा संदेश नरक चतुर्दशी हा सण आपल्याला हा संदेश देतो.

4 thoughts on “Narak Chaturdashi नरक चतुर्दशी”

Leave a Comment

“Fukery 3 Review: Unveiling the Ultimate Gaming Sensation Mantra Pushpanjali: A Reverent Offering of Flowers and Prayers Dwarka Places Agrasen Maharaj pitrupaksh 2023