लक्ष्मीपूजन 2022 Laxmi Pujan 2022 in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
तुम्हा सगळ्यांना ही दीपावली आली सुखाची ,समृद्धीची आरोग्याची तसेच भरभराटीचे जावो ही शुभेच्छा.
लक्ष्मीपूजन 2022 Laxmi Pujan 2022 in Marathi
दीपावली हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांची ओळी असा आहे. अश्विन कृष्णपक्षातील अमावस्येला वर्षातील सर्वात मोठा सण दीपावली/ लक्ष्मीपूजन/ दिवाळी साजरा केला जातो.
हा सण ज्ञानाचा (प्रकाशाचा) अज्ञानावर (अंधकारवर) विजयाचे प्रतीक आहे.
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी नंतर तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो.
वर्षात पिठोरी अमावस्या, दीप अमावस्या, पितृ अमावस्या यांच्या बरोबरच लक्ष्मीपूजनाला असणारी अमावस्या आई सर्वात महत्वाची असते. अमावस्या असून देखील हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो.
या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वी तलावर ब्राह्मण करते. देवी भरभराट व समृद्धीच्या आशीर्वाद देण्यासाठी येते .अशी मान्यता आहे. म्हणून दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी व प्रथम पूज्य देव गणपती यांची पूजा केली जाते.
दिवाळी इतिहास History of Diwali in Marathi
14 वर्षाच्या वनवासाचा नंतर लंकापती रावणाचा वध करून भगवान श्रीराम देवी सीता व बंधू लक्ष्मण यांच्यासोबत आयोध्या ला परत आले होते. तो दिवस म्हणजेच दिवाळीचा दिवस होय. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रामाचा अंत केला होता.
जेव्हा प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्यावेळेस प्रत्येक घर, नगर त्यांच्या स्वागतासाठी सजवण्यात आले होते.
घरोघरी दीप मातीचे दिवे लावण्यात आले होते.
म्हणून आजही आपण प्रत्येक घरात, दारात, कार्यालयात इत्यादी ठिकाणी दिवे लावून असत्यावर सत्याचा विजयाचा आनंद साजरा करत असतो.
दीपावली या तिथीच्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्मा नी समाधी घेतली होती. व आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. या महान संतामध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीर यांचा समावेश आहे.
लक्ष्मीपूजन तिथी वेळ Laxmi Pujan 2022 Tithi Time in Marathi
यावर्षी लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर, 2022 सोमवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.
- लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त: संध्याकाळी 06;54 मिनिट ते संध्याकाळी 08:16 मिनिट पर्यंत
- पूजेची अवधी : एक तास 21 मिनिटे
- वृषभ काळ: 06:53 ते 08:48 मिनिट
- प्रदोष काळ: 05:43 मिनिटे ते 08:16 मिनिट

निष्कर्ष Conclusion in Marathi
आपणही क्रोध, मत्सर, भय यासारख्या नकारात्मक भावनांचा त्याग केला पाहिजे. फटाक्यांच्या स्फोटात अशा नकारात्मक भावनांना नष्ट केले पाहिजे. नातेसंबंध दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या लाडू प्रमाणे गोड केले पाहिजेत. जीवनात ज्ञानाचा कंदील लावला पाहिजे. मनात प्रेमाची पणती लावली पाहिजे. एकमेकांना स्वतःच्या वेळेचा आहेर दिला पाहिजे(time spend केलं पाहिजे).
सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी असल्यामुळे दिवाळी ,दिवाळी पूजा यांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाहीये.
सूर्यग्रहणा बद्दल अधिक माहिती साठी मी एक वेगळा ब्लॉक लिहिलेला आहे कृपया तो चेक करावा.
धन्यवाद

2 thoughts on “Laxmi Pujan 2022 लक्ष्मीपूजन 2022”