Vasu Baras वसुबारस

वसुबारस Vasu Baras in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी बद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना वसुबारस, दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

वसुबारस Vasu Baras in Marathi

प्रत्येक वर्षी आपण अनेक व्रत, उपवास, पूजा, सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी/ दीपोत्सव होय.

दिवाळी सहसा प्रत्येकाचाच आवडतीचा सण आहे. दिवाळीचे सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस होय.

महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या नावाने ओळखला जातो. तर गुजरात मध्ये वाघ बारस, तसेच उत्तर भारतातील काही भागात गोवन्स पूजा म्हणूनही ओळखले जाते.

नंदिनी व्रत, गुरुद्वादशी, गोवत्स द्वादशी अशी विविध नावे भारतातील विविध भागात देण्यात आलेली आहेत.

महाराष्ट्र, गुजरात, कन्नडा तसेच तेलगू कॅलेंडर प्रमाणे अश्विन कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस असते.

मात्र उत्तर भारतातील कॅलेंडर प्रमाणे कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशी म्हणजे वसुबारस होय.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. पशुधनाचे महत्त्व खूप मानले जाते. बहुतेक लोकांची उपजीविका पशुपालन करून  होत असते.

दूध व दुधाचे पदार्थ यांच्या विक्रीचा व्यवसाय असतो. गाय, म्हैस यांच्याकडून विक्रीसाठी दूध उपलब्ध होते. म्हणून अशा प्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सण साजरा केला जातो.

गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो अशी आपल्या सगळ्यांची मान्यता आहे. जणू आपण दिवाळीची सुरुवात 33 कोटी देवी-देवतांच्या पूजनानेच करत असतो.

वसुबारस चे महत्व Vasu Baras Importance in Marathi

आपल्या संस्कृतीमध्ये आपण गाईला गोमाता असे उद्देशून म्हणतो. म्हणजेच आपण गाईला आईचा दर्जा देतो. 

समुद्रमंथनातून कामधेनु या गाईची उत्पत्ती झाली. कामधेनु व तिची मुलगी नंदिनी हिला उद्देशून हा सण साजरा केला जातो. कामधेनू ही इंद्रलोकात गेली.

इंद्र लोकातील संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे दायित्व कामधेनु पूर्ण करतात.  तसेच गुरु वशिष्ठ यांच्या आश्रमात वास करणारी कामधेनु यांची मुलगी नंदिनी ही पृथ्वी वरील लोकांची इच्छा पूर्ण करते. जिवाच्या अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ही नंदिनी नावाच्या गाई मध्ये आहे. म्हणून वसुबारस हा सण कामधेनु व तिची मुलगी नंदिनी यांना उद्देशून आहे.

अशी मान्यता आहे, गाईच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गात वास करायला मिळावा. म्हणून वसुबारस ची पूजा केली जाते.

गोवत्स द्वादशी चे महत्व Gowatsa Dwadashi Importance in Marathi

भारतीय संस्कृतीत गाईला खूप महत्त्व असते. गोमाता हि पूजनीय आहे. रस्त्यावर कुठेही गाय दिसली तर आपण तिला स्पर्श करून तिचे आशीर्वाद नेहमीच घेत असतो. गोवत्स द्वादशी/ वसुबारस गाईला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

गाईचं सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे ती सात्विक आहे. तिचा हा गुण आपल्या मध्ये यावा म्हणून आपण तिची पूजा करावी.

सात्विक गुण म्हणजे “ स्वतःच्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे”.

  • गाईचे दूध व दुधाचे पदार्थ खाऊन पिऊनच माणसांमध्ये शक्ती येते.
  • तिच्या  शेणामुळे शेतीला, झाडांना खत मिळते. त्यामुळे खाद्यपदार्थात  पौष्टिकता येते.
  • शेतात सर्वात जास्त उपयोगात येणाऱ्या बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण बैल पोळा या बद्दल जाणून घेण्यासाठी बैलपोळा या शब्दावर क्लिक करा.

वसुबारस महाराष्ट्र मध्ये Maharashtra’s Vasu Baras in Marathi

वसुबारस या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे

वसु= धन( द्रव्य)+ बारस= द्वादशी 

या दिवशी अंगणामध्ये रांगोळी काढली जाते. महाराष्ट्रातील बहुतेक भागात वसुबारस च्या दिवशी संध्याकाळी गाय व वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना आंघोळ घातली जाते. हळदी कुंकू वाहिले जाते.हार फुल घालतात. मोड आलेले हिरवे मूग , चना डाळ, गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. निरांजनाने ओवाळले जाते.  प्रदक्षिणा घालतात. पाया पडून आशिर्वाद घेतात. या दिवशी गहू, दूध व दुधाचे पदार्थ  वर्ज केले जातात. ज्यांच्या जवळ स्वतःच्या गाई नसतात ती लोक मातीच्या मूर्तीची पूजा करतात.

भरपूर प्रमाणात कृषी उत्पादन व्हावे.  मुलाबाळांना आरोग्य लाभावे म्हणून बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात. भाकरी व गवारीची भाजी खाऊन या दिवशीचा उपवास सोडला जातो.

गुजरात मध्ये या दिवशी कृष्ण मंदिर सजवले जातात. तसेच वाघ  या शब्दाचा अर्थ आर्थिक वर्षाचा शेवट चा दिवस असतो. म्हणून या दिवशी पहिल्या पूर्ण वर्षाचा हिशोब पूर्ण केला जातो.

Vasu Baras Images quotes - Vasu Baras

वसुबारस मंत्र Vasu Baras Mantra in Marathi

पूजा करताना खालील मंत्राचा जप करावा

ततः सर्वमय देवी सर्वदेवैरलङकृते |

मातर्मामा भिलाषितं सफलं कुरू नन्दिनि ||

वसुबारस मंत्र अर्थ

हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर असा या मंत्राचा अर्थ आहे.

वसुबारस तिथी Vasu Baras Tithi in Marathi

  • तारीख: 9 नोव्हेंबर 2023
  • वार: गुरुवार
  • नक्षत्र: उत्तरा
  • तिथी: एकादशी/ द्वादशी

वसुबारस च्या शुभेच्छा Vasu Baras Greetings in Marathi

शुभेच्छा – 1

दिवाळीचा आज पहिला दिवस

वसुबारस

गाय  आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,  सात्विकता

प्रसन्नता, शांतता आपणास लाभो ही हार्दिक शुभेच्छा.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छा – 2

स्नेहाच्या दिव्यात तेवते  वात तेजाची

वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची

शुभेच्छा – 3

स्वदुग्धे सदा पोशिते ती जगाला

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया

नमस्कार माझा त्या दिव्य गो देवतेला

Vasu Baras images quotes - Vasu Baras

धन्यवाद

HAPPY VASUBARAS

5 thoughts on “Vasu Baras वसुबारस”

Leave a Comment

Shree Ram Ayodhya Ram Temple Panchmukhi Hanuman & Dandiwale Temple Lord Krishna’s 16,108 Wives and 80 Sons Shani Dev ABOUT OM PANCHAKASHARI MANTRA