Story Behind Shiv Tandav Stotram
ॐ नमः शिवाय
शिव तांडव स्तोत्र पौराणिक कथा Story Behind Shiv Tandav Stotram in Marathi
देवाधिदेव महादेव यांची आराधना करण्यासाठी अनेक स्तोत्रांची रचना केली गेलेली आहे. परंतु या सर्वांमध्ये भगवान शिव यांना तांडव स्तोत्र अधिक प्रिय आहे. शिवतांडव स्तोत्र म्हणजे स्वयम भगवंत शिव यांची स्तुती आहे.धार्मिक मान्यतेनुसार, जो भक्त शिव तांडव स्तोत्राची पठण भक्ती भावाने तसेच पूर्ण मनाने करेल, त्याच्याकडे कधीही धनसंपत्तीची कमी होत नाही. शिव तांडव स्तोत्र ची पाठ केल्याने भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते. या स्त्रोत्राची रचना दशानन रावण यांनी केली आहे. दशाननला रावण हे नाव भगवान शिव यांनी दिलेले आहे.
शिव तांडव स्तोत्र पौराणिक कथेमार्फत जाणून घेऊयात.
- तांडव स्तोत्राची रचना कशी झाली?
- भगवान शिवने दशानन याला रावण हे नाव का दिले?
शिव तांडव स्तोत्र पौराणिक कथा Story Behind Shiv Tandav Stotram in Marathi
विश्श्रवा नामक ऋषीचे दोन पुत्र होते. दशानन आणि कुबेर हे दोघे सावत्र भाऊ होते.
प्रथम सोन्याची लंका चे राज्य ऋषी विश्श्रवा यांनी कुबेर याला दिले. परंतु काही कारणास्तव पित्याच्या आज्ञेनुसार लंकाचा त्याग करून कुबेर हिमाचल मध्ये निघून गेले. कुबेर गेल्यानंतर सोन्याच्या लंकेचे अधिपती दशानन झाला.
वैभव, ऐश्वर्या,सत्ता, अतुलनीय शक्ती या गोष्टींमुळे दशानन अहंकाराने भरला. गोरगरिबांवर साधुसंतांवर अत्याचार करू लागला.
दशनांच्या अत्याचाराची वार्ता कुबेर यांना मिळाली.
मोठ्या भावाच्या नात्याने त्यांनी दशानन कडे संदेश वाहक पाठविला. “सत्याच्या मार्गावर चालावे.” असा कुबेर चा निरोप संदेश वाहकाने दशानन याला दिला. मात्र दशाननला कुबेर चा सल्ला ऐकून राग आला.
त्याने ताबडतोब संदेश वाहकाला अटक केली. रागाच्या आहारी जाऊन दशानं तलवारीने संदेश वाहकाची हत्या केली.
मात्र संदेश वाहकाची हत्या करून देखील दशानन चा राग शांत झाला नाही. म्हणून त्याने कुबेर ची नगरी अलकापुरी वर आक्रमण केले. संपूर्ण अल्कानगरी उध्वस्त केली. नंतर दशानन याने आपला भाऊ कुबेर याच्यावर गधा ने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये कुबेर जखमी झाले.
कुबेर याच्या सेनापतीने कुबेर ला नंदनवन येथे पोहोचवले. तिथे वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले व ते स्वस्थ झाले.
अशी झाली शिव तांडव स्तोत्र पौराणिक कथा
दशानन याने अलकापुरी व कुबेर चे वाहन पुष्पक विमान यांच्यावर अधिपथ्य स्थापित केले.
पुष्पक विमान हे चालकाच्या मर्जीनुसार भ्रमण करत असे हे त्याचे वैशिष्ट्य होते. मनाच्या गतीपेक्षाही अतिगतिवन असे हे पुष्पक विमान दशानन याने कुबेर कडून हिसकावून घेतले.
एके दिवशी दशानन पुष्पक विमानात स्वार होऊन शारवनच्या दिशेने जाऊ लागला. परंतु एका पर्वताच्या जवळ जातात पुष्पक विमानाची गती हळू झाली. अचानक गती कमी झाल्याने दशानन याला आश्चर्य वाटले.
त्या क्षणी त्याची नजर समोर असलेल्या विशालकाय नंदेश्वर वर गेली. नंदेश्वर ने दशानन याला परतून जाण्याची चेतावणी दिली.
मात्र कुबेर वर सहजतेने मिळालेला विजयामुळे दशानन याचा अहंकार खूप वाढला होता.
“ज्या पर्वतामुळे माझ्या विमानाची गती कमी झाली, मी त्या पर्वताचे संपूर्ण नाश करेल.” असे उत्तर अहंकारी दशानन याने नंदेश्वर यांना दिले.
क्षणाचाही विलंब न करता त्याने आपले दोन्ही हात पर्वताच्या पायाखाली टाकून दिले. जेव्हा दशानन याने पर्वताचा पाया हलवण्याचा प्रयत्न केला.
भगवान शिव यांनी पर्वतावरूनच फक्त पायाचा अंगठा खाली ठेवून पर्वताला स्थिर केले. भगवान शिव मुळे दशानन याचे दोन्ही हात पर्वताखाली दबले गेले. ज्यामुळे त्याला अत्यंत पिडा चा आभास होऊ लागला.
क्रोध आणि अत्यंत वेदनेमुळे दशानन भयानक जोरात गर्जना करू लागला. त्याची गर्जना इतकी प्रचंड होती की प्रलय येईल !
त्या क्षणी दशानन याच्या मंत्री ने दशाननाला शिवस्तुती करण्याची सुचविले. अविलंब दशाननाने सामवेद मध्ये उल्लेख असणाऱ्या शिव च्या सर्व स्त्रोतांचे गान सुरू केले.
त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी दशानंद याला क्षमादान दिले. आणि त्याचे हात मोकळे केले.
साम वेदांमध्ये उल्लेख असलेल्या, मात्र दशानं याने शिवस्तुतीसाठी ज्या श्लोकांचे गायन केले होते, ते श्लोक शिवतांडव स्तोत्र म्हणून ओळखले जातात.
दशाननाचे रावण नाव का पडले Story Behind Dashanan Being Called Ravan in Marathi
अत्यंत वेदनेमध्ये भयंकर कर्णकर्कश्य आवाजात रावणाने शिवस्तुती शिवतांडव स्तोत्र स्वरूपात केली होती.
संस्कृत भाषेमध्ये अशा कर्णकर्कश्य आवाजाला रावः सशुरणः म्हटले जाते. जेव्हा भगवान शिव रावणाच्या स्तुतीने प्रसन्न झाले व त्याचे हात मुक्त केले, त्यावेळी त्यांनी दशांणाचे रावण म्हणजेच “भीषण चित्कार करायला विवश् शत्रू” असे ठेवले.
देवाधिदेव महादेव यांनी अहंकारी रावण याला भीषण चित्कार करण्यासाठी मजबूर केले होते. तेव्हापासूनच दशानन रावण या नावाने ओळखला जाऊ लागला.
महामृत्युंजय मंत्र
ॐ जूं सः भूर्भुवः स्वः
ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्
भूर्भुवः स्वः रों जूं सः हौं ॐ ।
धन्यवाद
Nicely explain
didn’t know about this story…
very clearly explained!! ???? keep going!! ????