Tulsi Vivah Mantras, Significance, and the Bountiful Blessings

अनुक्रमणिका

Tulsi Vivah तुळशी विवाह 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

लक्ष्मीपूजनानंतर तुळशी विवाहाचे चाहूल लागते.  आजच्या आपल्या लेखात आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • भगवान विष्णू दगडरुपी शालिग्राम का झाले.
  • तुळशी विवाह का केला जातो.
  • तुळशी विवाह तिथी मुहूर्त
  • तुळशी चे प्रकार
  • तुळशीचे फायदे

तुळशी विवाह Tulsi Vivah In Marathi

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी असते. या दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून उठतात. म्हणून या एकादशीचे नाव देव उठणी एकादशी असे आहे. भगवान विष्णू यांच्या जागृतीचा उत्सव म्हणजेच तुळशी विवाह होय. 

या उत्सवात भगवान विष्णू व तुळशी यांचा विवाह केला जातो. 

महाराष्ट्रात तुळशी विवाह साजरा केला जातो. त्याच प्रमाणे उत्तर भारतात देव उठणी एकादशी/ ग्यारस साजरी केली जाते. हे दोन्ही सण साजरे करण्याची पद्धत सारखीच आहे.

विष्णुदेव पाषाण रूपे शालिग्राम का झाले Why did Vishnudev become a stone form of Shaligram in Marathi 

विष्णुदेव शालिग्राम का झाले आपण एका पौराणिक कथेद्वारे जाणून घेणार आहोत. ती कथा खालील प्रमाणे आहे.

तुळशी विवाह कथा Tulsi Vivah Story in Marathi

जालंदर खूप शक्तिशाली व पराक्रमी दैत्य होता. जालंदर ने ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. 

ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु अमरत्वाचे वरदान कोणालाही देता येत नाही. म्हणून ब्रह्मदेवांनी जालंदरला मथुरेच्या दैत्य राजाची मुलगी वृंदा हिच्याशी लग्न करण्याची सूचना दिली. 

वृंदाच्या  तप व पुजेचा फायदा तिच्या नवऱ्याला निश्चितच होईल. असे ब्रह्मदेवांनी जालंदरला सांगितले.

मथुरेच्या दैत्यराजाच्या मुलीचे नाव वृंदा होते. ती श्रीकृष्णाची परमभक्त होती. ब्रह्मदेवांच्या सूचनेप्रमाणे जालंदर ने वृंदा शी लग्नाची मागणी केली.  

वृंदा व जालंदर यांचा विवाह थाटामाटात झाला. दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला.

कालांतराने जालंदर क्रूर व घमंडी झाला. त्याने स्वर्ग, गंधर्व, पाताळ, पृथ्वी अशा प्रत्येक लोकात आपले अधिपत्य प्रस्थापित केले. त्याच्या त्रासाला कंटाळून प्रत्येक जण देवाचे स्मरण करू लागले.  

जालंदर ने इंद्र देव ,सूर्य देव आधी स्वर्गातील देवतांना बंदी केले. त्यांनी कसं बसं तिकडून पळ काढला. व सर्व देव भगवान विष्णू यांच्या कडे मदतीसाठी धावले.

भगवान विष्णू यांनी सर्व देवतांना भगवान शिव यांच्या त्रिशुळाने जालंदर चा मृत्यू होऊ शकतो असे सांगितले. 

सर्व देव भगवान शिव यांच्याजवळ मदतीसाठी गेले. 

त्याच वेळी जालंदर देवी पार्वती हिच्यावर मोहित झाला. व त्याला कैलास वर अधिपत्य गाजवण्याची लालसा उत्पन्न झाली. त्याने कैलाश वर आक्रमण केले. शिवगण व जालंदर यांच्यामध्ये घमासान युद्ध चालू झाले.

शालिग्राम About Shaligram in Marathi

tulsi vivah

पतिव्रता वृंदाच्या तप शक्तीमुळे जालंदरला मारणे शक्य नव्हतं.  हे जाणून भगवान विष्णू यांनी जालंदर च रूप धरून वृंदा जवळ गेले. व युद्धात विजय झाल्याचे तिला कळवले. 

हे ऐकून वृंदाने जालंदर रुपी विष्णूची आरती केली.  पतीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिने विष्णू देवांच्या पायाला हात लावला.

यामुळे तिचं सती त्व नाहीसं झालं. शंकर देवाने त्रिशुळाने जालंदर चा अंत केला.

जालंदर च्या मृत्यूची वार्ता ऐकून  वृंदाला भगवान विष्णू यांनी केलेल्या छळा बद्दल कळले. भगवान कृष्ण यांची परम भक्त असल्याकारणाने तिला अत्यंत दुःख झाले. 

 “ज्याप्रमाणे तुम्हाला माझी भक्ती दिसली नाही. ज्याप्रमाणे माझा छळ करताना स्वतःचे रुदय दगडाचे केले. त्याप्रमाणे तुम्ही पण दगड व्हाल”. 

पतीच्या विरहात वृंदाने असा श्राप भगवान विष्णू यांना दिला.

भगवंतांनी अविलंब आपल्या भक्ताचा श्राफ स्वीकार केला. व ते पाषाणाचे झाले.

परंतु  त्यांच्याविना सृष्टी चालेना.  दिवसेंदिवस पाषाण रुपी विष्णूंचा आकार वाढत चालला होता. 

यामुळे संपूर्ण सृष्टीला धोका निर्माण झाला होता. यामुळे सर्व देवतांनी वृंदाला विनवणी केली.  श्राप मागे घेण्यासाठी विनंती करू लागले.

कृष्णभक्त वृंदाने आपली चूक सुधारत श्राप मागे घेतला.  भगवान विष्णू यांनी वृंदाला मागे जन्माची आठवण करून दिली. भगवंतांना मिळवण्यासाठी तिने अनेक जन्म घेतले होते.  प्रत्येक जन्मात कृष्णाची भक्ती केली होती.

वृंदाला मागील जन्माची आठवण झाली.  तिने विष्णू देवांची माफी मागितली.  भगवंतांनी तिला माफ केले.

तुळशीचे रोप कसे उत्पन्न झाले How did the Tulsi plant originate in Marathi

त्यानंतर वृंदा जालंदर चे शीर मांडीवर घेऊन सती गेली.  तिच्या शरीराची राख झाली. त्या राखेतून एका रोपाचे जन्म झाले.  

भगवान विष्णू यांनी त्या रोपाला तुळस असे नाव दिले. आणि तुळशीला वरदान दिले.

“ सदैव तुळशी सोबत शालिग्राम असेल. प्रत्येक पूजा मध्ये तुळशीचा वापर केला जाईल. प्रत्येक घरात तुळशीचे झाड लावले जाईल. मला (भगवान विष्णूंना) नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान अर्पण केले जाईल.”

ही पूर्ण घटना कार्तिक महिन्यामध्ये झाली होती. म्हणून तुळशी विवाह कार्तिक महिन्यामध्ये करण्याची पद्धत आहे. 

तुळशी विवाह तिथी मुहूर्त Tulsi Vivah Tithi Muhurat in Marathi

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. एकंदरीत पाहायला गेलो तर तुळशी विवाह कार्तिक महिन्यात पौर्णिमेपर्यंत केला जातो. पण तुळशी विवाहाची सुरुवात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीपासून केली जाते.

द्वादशी तिथि 5 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी संध्याकाळी 06:08 मिनिटांनी सुरू होणार आहे. 

6 नोव्हेंबर ,शनिवार रोजी संध्याकाळी 05:06 मिनिटांनी संपणार आहे.

तुळशी चे प्रकार Types of Tulsi in Marathi

भारतात तीन प्रकारच्या तुळशी बघायला मिळतात. आयुर्वेदातही तुळशी चे तीन प्रकार आहेत.

आयुर्वेदानुसार तुळशीमधील घटकांमुळे आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात.  

  1. गडद हिरव्या रंगाची तुळशी अधिक तर रानावनात मिळते. म्हणून तिचे नाव रानतुळस आहे.
  2. हलकीशी लाल/ जांभळ्या रंगाची तुळस म्हणजेच कृष्ण तुळस होय.
  3. हिरव्या रंगाची पाने असलेली तुळस म्हणजेच राम तुळस होय.

तुळशीचे फायदे Benefits of Tulsi In Marathi 

साधारणता तुळशी प्रत्येक घरात आढळून येते.  तुळशीमुळे वातावरणात शुद्धीकरण होते. म्हणून पूर्वीपासूनच अंगणात तुळशीवृंदावन लावण्याची पद्धत आहे. 

रोज सकाळी देवपुजे बरोबर तुळशी पूजन करण्याची पद्धत आहे.

चला तर मग बघुयात तुळशी खाल्ल्यामुळे काय काय फायदे शरीराला होतात.

  • तुळशीमध्ये खूप प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात. विशेषतः आयरन, कॅल्शियम, विटामिन सी, झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर अँटीबॅक्टरियल गुणधर्म देखील खूप प्रमाणात असतात. 
  • तोंडात वारंवार अल्सर येणे, वास येणे, दात खराब होणे.  यासाठी  रोज सकाळी एक ग्रॅम वाळवलेल्या तुळशीची  पानांमध्ये हे ग्राम मोहरीचे तेल घालून  एकजीव करून दात  घासावे. यामुळे या तिन्ही समस्यांवर एका महिन्यातच फरक जाणून येतो. 
  • सकाळी अनशापोटी तुळशी ची पाने खाल्ली तर  ऍसिडिटी, आंबट ढेकर येणे या गोष्टींना आळा बसतो. लिव्हर मध्ये असलेली कमतरता ही तुळस भरून काढते.
  •  सध्याचे आपल्या राहणीमानामुळे तसेच खाद्य संस्कृती मुळे शरीरामध्ये खूप काही कचरा गोळा होतो. खाद्यपदार्थात असलेले प्रिझर्वेटिव्ह आपल्या शरीराला खूप नुकसान पोहोचवतात. त्यासाठी शरीराचे डिटॉक्स फिकेशन करणे गरजेचे होऊन जाते.  तुळशीमध्ये डिटॉक्स फिकेशन प्रक्रिया करण्याचे घटक आहेत.
  • यूरिक ॲसिड वाढणे, किडनी स्टोन होणे.  तुळशीमधील fluid minrals असतात. यामुळे वारंवार लघवीला जावे लागते.  म्हणून तुळस खाल्ल्याने किडनी स्टोन  लघवीद्वारे बाहेर काढला जाऊ शकतो.
  • रोज तुळशी खाल्ल्याने विसरण्याची समस्यावर मात होते.  मुलांना दिल्यास त्यांच्या अभ्यासात चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित होते.
  • तुळशीमध्ये असलेल्या युजेनॉल मुळे सर्दी खोकला यावर मात देण्यास मदत होते . तुळशीचा काढा करून पिल्याने आराम होतो.
  • तुळशीमध्ये असणाऱ्या अंतीबॅक्टरियल गुणधर्मांमुळे  प्रतिकार शक्ती वाढते.

तुळशी स्तुति मंत्र Tulsi Stuti Mantra in Marathi

tulsi vivah

देवी त्वं निर्मिता पूर्वमार्चितासि मुनीश्वरैः |

नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये ||

तुळशी मंगलाष्टक मंत्र Tulsi Mangal ashtak Mantra in Marathi

tulsi vivah

ॐ श्री मत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुमर्होन्द्रोSनल:

चन्द्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रताधिपदि ग्रहाः |

प्रदम्नो नलकुबरौ सुरगजः, चिंतामणीः कौस्तुभः,

स्वामी शक्तिधरच्य लांगलधरः, कुवर्न्तु मंगलम् || 1 ||

गंगा गोमतिगोपति गर्णपतिः, गोविन्दगोवधर्नो,

गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः |

गायत्री गरुडो गदाधरगया गम्भीर गोदावरी,

गन्धवर्ग्रहगोपगोकुलधरा:,  कुवर्न्तु व मंगलम् || 2 ||

नेत्राणां त्रितयं महत्पशुपते: अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम् । गंगावाहपथ त्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राहमणम्, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ३ ||

बाल्मीकि: सनकः सनन्दनमुनिः, त्यासोवसिष्ठो भृगुः, जाबालिजर्मदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः । मान्धाता भरतो नृपश्च  सगरो, धन्यो दिलीपो नलः, पुण्यो धमर्सुतो ययतिनहुषौ, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ४ ||

गौरी श्रीकुलदेवता च सुभागा, कद्रुसुपणार्शिवा:, सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती ।| 

स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी, वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ५ ||

गंगा सिन्धु सरस्वती च यमुना, गोदावरी, नमर्दा, कावेरी, सरयू महेन्द्रतनया, चमर्ण्वती वेदिका ।

शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गण्डकी, पूर्णाः पुण्यजलै: समुद्रसहिताः, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ६ ||

लक्ष्मीः कोस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा, गावः कामदुधाः सुरेश्वरग्जो, रम्भादिदेवांगनाः ।

अश्व: सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे, रतनानीति चतुदर्श प्रतिदिनं, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ७ ||

ब्रह्मा वेदपति: शिवः पशुपतिः, सूयोर् ग्रहाणां पतिः, शुक्रो देवपतिनर्लो नरपतिः, स्कन्दश्च सेनापतिः ।

विष्णुयर्ज्ञपतियर्म: पितृपति:, तारापतिश्चन्द्रमा, इत्येते पतयस्सुपणसहिता:, कुवर्न्तु वो मंगलम् ॥ ८ ||

॥ इति मंगलाष्टक समाप्त ॥

पूजेदरम्यान तुळशीजींच्या या मंत्रांचा जप करा Tulsi Pooja Mantra in Marathi

tulsi vivah

ॐ सुभद्राय नमः

ॐ सुप्रभाय नमः

तुळशीची दाल तोडण्याचा मंत्र Mantra for breaking tulsi dal in Marathi tulsi vivah

मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी

नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते ॥

उपचारासाठी मंत्र Cure Mantra of Tulsi in Marathi

महाप्रसाद जननी, सर्व सोभाग्यवर्धिनी

आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते ॥

तुळशी विवाहसामग्री Things Needed for Tulsi Vivah in Marathi

  • मुळी, आवळा, बोर, रताळ, सिताफळ, पेरू
  • मांडवा साठी ऊस
  • शालिग्राम/  भगवान विष्णू यांची प्रतिमा
  • तुळशीची झाड
  • चौरंग
  • धूप दीप, वस्त्र माळ,फुल सुहागा चे वाण, हळद
  • लाल चुनरी/ साडी
Tulsi Vivah

तुळशी विवाह विधी Procedure of Tulsi Vivah in Marathi

  • अंगणामध्ये मधोमध चौरंग ठेवावा
  • चौरंगाच्या चारी बाजूने उसाच्या मदतीने मांडव तयार करावा.
  • तुळशी वर लाल चुनरी टाकावी.
  • तुळशीच्या कुंडीमध्ये विष्णूदेव रुपी शालिग्राम ठेवावा.
  • तुळशीला व शालिग्राम ला हळदीचा लेप लावून पूजा करावी.
  • लग्नातील विधी करावे.  मंत्रपुष्पांजली म्हणावी.
  • पंचामृत व गोडाधोडाचे पदार्थ प्रसाद म्हणून वितरित करावे .

महत्व तुळशी विवाह चे Importance of Tulsi Vivah in Marathi

मान्यता नुसार तुळशी विवाह करणे म्हणजे कन्यादान करण्याचा पुण्य चे प्राप्त होते. तुळशी विवाह विधी विधानाने करावे. यामुळे सुख सौभाग्याची प्राप्ती होते.

tulsi vivah

thank you!!

other blogs

dev uthni gyaras

datta jayanti

3 thoughts on “Tulsi Vivah Mantras, Significance, and the Bountiful Blessings”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri