Children’s Day बाल दिन बाल दिवस

Children’s Day बाल दिवस

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय आहे बाल दिवस.

बाल दिन / बाल दिवस Children’s Day in Marathi

“आजची मुले उद्याच्या भारत घडवतील आम्ही त्यांना ज्या पद्धतीने संस्काराने मोठे करू त्यावरूनच देशाचे भवितव्य निश्चित होईल.”

-पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरूंचे किती सुंदर विचार होते. हे वरील एका वाक्यावरून आपल्या लक्षात येतात. खरंच मुलांचे संगोपण, शिक्षण, संस्कार हे आपल्या घरा-दारापासून देशापर्यंत भविष्य निश्चित करतात. 

बाल दिवस हा 14 नोव्हेंबर रोजी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती असते. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889, रोजी अलाहाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. 

त्यांना लहान मुले फार आवडत होते. त्यांचे मुलांवर अपार प्रेम होते. त्यामुळेच 14 नोव्हेंबर ही तारीख बाल दिवस म्हणजेच चिल्ड्रन्स डे म्हणून ओळखू जाऊ लागली.

बालदिन  मुलांबद्दल प्रेम आपुलकी चा वर्षाव करण्यासाठी साजरा केला जातो.

बाल दिवस कधी साजरा केला जातो 14 नोव्हेंबर 2022 When is Children’s Day celebrated in Marathi

यावर्षी बाल दिवस 14 नोव्हेंबर, 2022 सोमवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. बाल दिवस हा दिवस मुख्यत्वे मुलांसाठी समर्पित आहे.  

म्हणून शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी आयोजित केले जातात.  तसेच चित्रकला स्पर्धा, भाषण, निबंध लेखन, वाद विवाद स्पर्धा संमत (debate), सामान्य ज्ञान स्पर्धा (g.k) इत्यादी आयोजित केल्या जातात.

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रथम पंतप्रधान होते. त्यांना लहान मुले खूप आवडत असत. 14 नोव्हेंबर, 1889 वर्षी त्यांचा जन्म झाला होता.  

प्रेमाने नेहरू यांना “ चाचा जी” म्हंटले जात असे. लहानपणापासूनच त्यांना मुलांबद्दल विशिष्ट प्रेम होते. म्हणून त्यांनी 1955 यावर्षी लहान मुलांसाठी स्वदेशी सिनेमा तयार करण्यासाठी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली होती.

बाल दिवस का साजरा करतात Why is Children’s Day Celebrated in Marathi

बालकांच्या हक्का साठी संयुक्त राष्ट्रसंघाने बाल दिवस साजरा करण्याचे निश्चित केले होते. 

भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, 14 नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. त्यांना मुलांना प्रति खूप प्रेम होते. लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखत होते. बाल दिवस लहान मुलांना समर्पित एक राष्ट्रीय सण आहे.

ज्याप्रमाणे लहान मुले आपल्या वाढदिवसाची वाट बघतात त्याचप्रमाणे वाढदिवसाची सुद्धा वाट बघतात. 

आपल्यासाठी सुद्धा एक दिवस समर्पित आहे या कल्पनेनेच लहान मुलांचा आनंद द्विगुणित होतो.

बाल दिवसाचा इतिहास Children’s Day History in Marathi

जागतिक बाल दिन World Children’s Day in Marathi

संपूर्ण जगभरात बालदिन साजरा केला जातो. 1925 यावर्षीपासून बाल दिवस साजरा करण्याची पद्धत संपूर्ण जगभरात सुरू झाली. संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1954 यावर्षी बालदिन साजरा करण्याची घोषणा केली होती.  म्हणून जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 

सुरुवातीला भारतात देखील 20 नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा करत होते.

परंतु भारतात 1964 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा केला जाऊ लागला. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच आदरांजली म्हणून भारतामध्ये बाल दिन 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जाऊ लागला.

जगाच्या पाठीवर सगळीकडे बालदिन साजरा केला जातो. बाल दिनाची सुरुवात 1857 मध्ये Reverend Dr. Charles Leonard यांनी Chelsea, US  येथे केली होती.

भारतामध्ये बालदिन साजरा करण्याची पद्धत How is Children’s Day celebrated in India in Marathi

शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेहमीच्या अभ्यासातून मुले तसेच शिक्षक थोडासा वेळ काढतात. 

शाळेमध्ये विविध प्रश्नमंजुषा, वाद-विवाद, नृत्य, संगीत, नाटक, निबंध लेखन, भाषण असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या विविध स्पर्धांमध्ये मुलांची जडणघडण योग्यरीत्या होते.  विविध प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांना स्वतःमधील व्यक्ती /प्रतिभा याची जाणीव होते. स्वतःमधील असणारी कौशल्यता तसेच कमतरता जाणल्याने त्यांचे भविष्य निश्चितच प्रगतीपथावर लागते.

अनेक शाळांमध्ये कार्निवल चे आयोजन केले जाते. तर काही शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या विविध स्पर्धांना जज करण्यासाठी क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक तसेच मनोरंजन क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्ती येतात.  या व्यक्तींच्या भाषणातून मुलांना प्रेरणा मिळते. 

मुलांना त्यांच्या शिक्षण आरोग्य व कल्याण यासाठी सरकारने काही मोहीम राबविलेला असतात. त्याबद्दल माहिती दिली जाते. तसेच जनजागृती सत्रांचे आयोजन केले जाते.

 दूरचित्रवाणीवर काही विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.

 मुलांनी केलेल्या कलागुणांचे दर्शन वृत्तपत्रे प्रसारित करतात 

 या दिवशी शिक्षक आणि पालक मुलांना भेटवस्तू, चॉकलेट, खेळणी, खाद्यपदार्थ इत्यादींचे वाटप करून आपुलकीचा वर्षाव करतात.

बालदिन विशेष मुलांचे हक्क काय आहेत Rights for Children in Marathi

मुलांना त्यांच्या शिक्षण आरोग्य व कल्याण यासाठी सरकारने काही मोहीम राबविलेला असतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक पातळीवर जगण्यासाठी विविध अधिकार देण्यात येतात. यालाच बाल हक्क असे संबोधले जाते.

1992 मध्ये भारतामध्ये बाल हक्क मान्य केले गेले.  2000  यावर्षी केंद्र सरकारने बाल हक्क संरक्षण कायदा मंजूर केला.  0 ते 18 वर्ष वयोगटातील मुले बाल समजली जातात.

  • उत्तम आरोग्य, उत्तम पोषण, उदर भरण ,स्वतःची ओळख तसेच नागरिकत्व  यांची जपवणूक
  • उत्तम पद्धतीने जगण्याची मुभा
  • कला क्रीडा विकास, मनोरंजन यांच्या योजनांमार्फत मुलांचे आयुष्य घडवण्याचा अधिकार
  • विविध कारणांसाठी होणारी मुलांची पिळवणूक, छळ, दुर्लक्ष इत्यादींपासून संरक्षण
  • माहिती मिळवण्याचा अधिकार, वैचारिक तसेच धार्मिक स्वातंत्र्य 
  • बाल रोजगारी ची संमती नाही. 
  • 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षण असते. यालाच प्राथमिक शिक्षणाचा अधिकार असेसुद्धा म्हटले जाते.
  • धोकादायक रोजगारापासून संरक्षित करण्याचा अधिकार
  • लिंग, धर्म, जात कोणतीही असो, सर्व मुलांच्या हक्काचे रक्षण करण्याची हमी

बाल दिन निबंध Children’s Day Essay in Marathi

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा प्रत्येक जण आपल्याला एकच प्रश्न विचारतो. तुला मोठे होऊन काय व्हायचं आहे? पण या प्रश्नाचे उत्तर लहानपणी कधीच कळले नाही.

मात्र आता मोठा झाल्यावर नक्कीच हे कळून चुकतं, की मला माझं बालपण पुन्हा हवं आहे.

हे वाक्य मी खूप जणांकडून ऐकले आहे.

खरच बालपण पुन्हा जगता येणं हे किती मजेशीर आहे.

(पंडित जवाहरलाल नेहरू )

 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस असतो.  पंडितजींना लहान मुले व गुलाबाचे फुल खूप आवडत होते.

“मुलं हे फुलाप्रमाणे निरागस असतात परंतु राष्ट्राचे भविष्य आणि उद्याचे नागरिक ही मुले असतात”.,  “ म्हणून त्यांचे संगोपन काळजीने व खूप प्रेमाने केले पाहिजे.” असे जवाहरलाल नेहरू यांचे ठाम मत होते

मुले देशाचा सामाजिक पाया मजबूत करतात. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे दायित्व मुलांच्या हातात असतं. 

 आयआयटी सारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची पायाभरणी नेहरू जींच्या काळात झाली होती. पंडित नेहरूजींनी भारतातील तरुणांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी खूप कठोर परिश्रम घेतले होते. 

त्यासाठी त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सर्विसेस (AIIMS),  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(IIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट(IIM)  यांसारख्या शैक्षणिक संस्थांची स्थापना केली होती.

मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कायद्यांमध्ये बदल केले होते.  मुलांचे आरोग्य तसेच आरोग्य विषयी विविध कार्यक्रम राबवले होते. 

मुलांना शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच दूध व जेवण मोफत मध्ये उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. यामुळे मुलांचे कुपोषण होत नाही. तसेच उपासमारीच्या त्रासांपासून मुलांचा बचाव होतो.

नेहरूजींनी आधुनिक भारताचे स्वप्न बघितले होते ते आज पूर्ण झाले आहे. 

भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच आदरांजली साठी बाल दिवस 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर जागतिक बाल दिवस 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 

बालदिन स्कूल

भारतामध्ये बालदिन शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था तसेच स्वयं सेवी संस्था यांमध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमआयोजित केले जातात.

बाल दिवस मुलांना आपल्या वाढदिवसाला सारखा साजरा करता यावा. म्हणून शाळांमध्ये रंगीबिरंगी कपडे काढण्याची सूट दिली जाते.

विविध स्पर्धा  नाटक,  डान्स, वादविवाद, चित्रकला, क्रीडा इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांना सामाजिक क्षेत्रातील उच्च पदावरील लोकांना आमंत्रित केले जाते.  त्यांच्यामार्फत प्रेरणादायी भाषणे केली जातात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. 

विविध खेळांमुळे मुलांमध्ये आनंदाची भावना निर्माण होतात. तसेच भाषणांमध्ये मुलांचे हक्क, अधिकार,  याबद्दल माहिती दिली जाते.

मुलांना त्यांचे भविष्य बद्दल मार्गदर्शन केले जाते. शाळेमध्ये चॉकलेट, बिस्किट मिठाई, खेळणी  इत्यादींचे वाटप केले जाते. यशस्वी मुलांना पारितोषिक दिले जातात.

 पालक मुलांना वॉटर पार्क, एडवेंचर पार्क,  गार्डन, ऐतिहासिक जागा, म्युझियम अशा ठिकाणी फिरायला घेऊन जातात.

दूरदर्शन वर विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात. चित्रपटगृहात मुलांना विनामूल्य तिकीट दिले जातात. वृत्तपत्रात यशस्वी मुलांच्या कलागुणांची आवर्तने प्रसारित होतात. 

या सर्व कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये आनंद तसेच आत्मविश्वास वाढतो. यामुळे निश्चितच ते उद्याचं भविष्य निर्माण करण्यासाठी स्वतःला तयार करू शकतात.  आपल्यासाठी एक दिवस समर्पित आहे ही भावना मुलांमध्ये रुजू होते. 

बाल दिवस हा मुलांना विविध गोष्टींचे ज्ञान मिळावे, विविध स्पर्धा करण्यासाठी स्प्रेरणा तसेच उत्साह मिळावा, स्वतःमधील कौशल्याचे ज्ञान व्हावे.  प्रगतीपथावर नेहमीच अग्रेसर व्हावे यासाठी साजरा केला जातो. 

कविता बाल दिन Children’s Day Poem in Marathi

मुलांचे बालपण किती सुंदर 
बस मध्ये बसुनी शाळेत जाऊया
मित्रांसोबत डबा खाऊया
रंगीबिरंगी खडूने फळा रंगवूया
दिवसभर खेळ खेळूया
 मुलांचे बालपण किती सुंदर ||1||
जन्माष्टमी ला कृष्ण बनुया
सँताकडून चॉकलेट घेऊया 
फिरायला जाऊ दिवाळीला 
बोरणाहान होईल संक्रांतीला
 मुलांचे बालपण किती सुंदर ||2||
झुक झुक गाडीत बाबा नेतात
 खमंग  स्वयंपाक आईचा खातात
 आजीकडून गोष्टी ऐकतात
आजोबां सोबत फिरायला जातात
 मुलांचे बालपण किती सुंदर  ||3||

-DIVYA
Children's Day

बाल दिन अवतरण Children’s Day Quotes in Marathi

कागदाची नाव होती
 पाण्याचा किनारा होता
 मित्रांचा सहारा होता
खेळण्याची मस्ती होती
मन हे वेडे होते
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो
कोठे आलो या समजुतदारीच्या जगात
यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एका ठराविक वयानंतर शाळेमध्ये आपल्या हातात
 पेन्सिल ऐवजी पेन देतात
 याचे याचे कारण  आज लक्षात येते
 जसजसं बालपण जातं व मोठेपणा येतो 
आपल्या चुका खोडल्या जाऊ शकत नाहीत.
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चाचा जी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी
आम्ही तत्पर उभे राहू
उचित मार्गावर चालून
देशाचे भवितव्य घडवू.
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बालपण हे श्रीमंतीचे
 नको धडे व्यवहाराचे
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काल पण
आज पण
 उद्या पण
 जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते
 बालपण
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुलाब हेच नेहरूंचे आवडते फूल
रंगीबिरंगी फुलां प्रमाणे आम्ही आमचे जीवन करू कूल
जीवनात कितीही अडचणी आल्या
 तरीही हरवून देणार नाही स्वतःमधील मुल
हीच नेहरूंना आदरांजली त्यांच्या जन्मदिनी
 बाल दिन  व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

2 thoughts on “Children’s Day बाल दिन <strong>बाल दिवस</strong>”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri