Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची

नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,

आज आपण एका आजीबाईंची कथा वाचणार आहोत. (Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

कथेमध्ये शिकण्यासारखे भरपूर काही आहे तुम्हाला कथा कशी वाटली?  हे नक्की कळवा.

ही कथा एक सत्य घटना आहे 

काय शिकाल- Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची

विविध ग्रंथ वाचून स्वतःचे निर्णय आणि निवडी यांचे आणि मूल्यांकन करा. 

विचार लिहिण्यासाठी कल्पना आणि माहिती आयोजित करण्यासाठी धोरणे  वापरावीत 

(पाठवर्णन:  सहजरीत्या निराशाच्या गर्तेत जाणाऱ्या आजच्या तरुणाईला, स्वबळावर, कष्टाच्या जोरावर शून्यातून कसं जग निर्माण करता येतं याचं उदाहरण आजीबाईंच्या या कथेमधून मिळेल हे नक्की! प्रसिद्ध लेखिका सरोजिनी वैद्य यांच्या कादंबरीतून घेतलेला हा लेख अतिशय प्रशंसनीय आहे.

विदर्भातील चोंडी या छोट्याशा खेडेगावात १९१० यावर्षी राधाबाईंचा जन्म झाला. पाच भावंडांमध्ये त्या दुसऱ्या. दहा वर्षाच्या असतानाच प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. आत्या आणि दोन वर्ष मोठा असलेल्या भावाच्या मदतीने राधाबाईंनी इतक्या लहान वयातच एखाद्या मोठ्या बाई सारखी घराची जबाबदारी सांभाळली. काळानुसार, वयाच्या १३ -१४ यावर्षी त्यांचं यवतमाळच्या तीस वर्षे वयाच्या आणि चौथ लग्न असलेल्या तुळशीराम डेहणेकरांशी लग्न झालं. कष्टाने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. उलट त्यात सासूच्या त्रासाची भर पडली. पाच मुली झाल्यामुळे होणारी अवहेलना, त्यातच नवऱ्याच्या आजारामुळे मृत्यु झाला. राधाबाई आणि त्यांच्या मुलींना खायलाही मिळत नव्हतं. हक्काचं घर नाही, अशी बिकट अवस्था झाली. कसंतरी कष्ट करून त्यांनी या परिस्थितीत सुद्धा तीन मुलींची लग्न लावून दिली. छोटी छोटी काम करत दोन मुली सोबत त्या घर चालवत होत्या. पण परिस्थितीमुळे पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी राधाबाईंनी मूळच्या अमरावतीच्या व वारकरी असलेल्या आबाजी बनारसे यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न करावे लागले. त्यावेळी त्या ३५ वर्षाच्या होत्या.

याच आबाजी बनारसे सोबत राधाबाई लंडनला गेल्या. इथेही त्यांची फसवणूकच झाली आणि कष्टाने पाठ सोडलेलीच नव्हती. मुलांसोबत परदेशात स्थायिक झालेले आबाजी पंढरपूरचे दर्शन करायला म्हणून भारत भेटीवर आले होते. पण त्यांचा खरा उद्देश्य दुसरे लग्न करण्याचा होता. त्यांचं मन मुलांच्या संसारात रमत नव्हतं. आयुष्याच्या शेवटी काळजी घ्यायला त्यांना बायको हवी होती. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलांना न कळवता राधाबाई सोबत लग्न केलं. (Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

या आबाजींना तीन मुले होती. नातवंड देखील होती. ती राधाबाईंना आजी म्हणत असल्यामुळे लंडनला सगळे लहान थोर त्यांना ‘आजीबाई’ म्हणूनच ओळखायला लागले. तेच नाव त्यांचे कायम झाले. 

आबाजींनी राधाबाईंशी केलेले लग्न त्यांच्या मुलांना मान्य नव्हतेच पण घर कामाला मदत होईल म्हणून त्यांनी राधाबाईंना ठेवून घेतले. त्या पुढची चार वर्षे आपल्या सावत्र मुलांकडे त्या सारख्याच राहिल्या. आबाजींच्या सुनांनी देखील भारतातून येणाऱ्या लोकांसाठी जेवण्या- राहण्याची सोय करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या मेस मध्ये आजीबाई पडेल ते काम करू लागल्या. 

लंडनला पोहचल्यावर तीन वर्षातच आबाजींचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलांनी आजीबाईंना फसवून आबाजींची सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. खरंतर बाबाजींच्या संपत्तीवर आजीबाईंना स्वतःचा हक्क वाटत नव्हता. पण इथेच राहून मुलींची व आपली प्रगती होऊ शकते हे त्यांना उमगलेलं. म्हणून त्यांनी आपल्या सुनांना अर्ज करून आपल्या मुलींना लंडनला आणण्याची विनंती केली.

आजीबाईंच्या दोन मुली लंडनला आल्यावर आजीबाई ठामपणे स्वतःच्या बळावर स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. त्यातूनच ‘२५ हुप लेन’ नावाचे जेवण राहण्याची सोय असणाऱ्या लॉजिंग बोर्डिंगच्या व्यवसायाची सुरुवात केली. (Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

आजीबाईंचा कष्टावर फार विश्वास होता. त्या त्यांच्या मुलींना नेहमीच सांगायच्या की, ‘कष्टाने कुणी मरत नसतं ! माणसाने खूप कष्ट करून, खूप सोसून, स्वतःला गरिबीतून सोडविले पाहिजे.’

आजीबाईंच्या वृत्तीने आणि व्यक्तिमत्वाने त्यांच्या व्यवसायाला वेगळं रूप दिलं. आपल्याला लिहिता वाचता येत नाही, आपण निरक्षर आहोत त्यामुळे अनेकदा आपली जवळची लोकच आपला गैरफायदा घेतात, फसवतात याची आजीबाईंना नेहमीच खंत वाटत राहिली. आजीबाईंना फक्त 1 ते 10 आकडे मोजता यायचे. तेवढ्यावरच दोन हातांची बोटं, गव्हाचे दहा दाणे, पेन्सिलीने ओढलेल्या आणि खोडलेल्या रेघा अशा रीती वापरून हजारो पौंडांच्या इस्टेटचा हिशोब त्यांनी नेमकेपणाने बसवलेला असायचा.

आजीबाईंच्या लंडन मधल्या घरी किती तरी मोठमोठ्या लोकांनी, लेखकांनी, गायकांनी, चित्रपट कलाकारांनी, राजकारण्यांनी, साधू पुरुषांनी, भारत व लंडन मधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रेमाने, कौतुकाने भेट दिली. लंडनच्या स्टेशनवर उतरल्यावर कोणीही ‘आजीबाई बनारसे’ एवढ्याच पत्त्या बरोबर आजीबाईंच्या घरी पोहोचायचे. 

त्याकाळी परदेशात येऊन आजीबाईंनी जे घडवलं ते कदाचित कोणत्याच श्रीमंत व्यक्तीने केलं नसेल. लंडन सारख्या महागड्या ठिकाणी भारतीयांसाठी आजीबाईंनी सांस्कृतिक व शैक्षणिक सहाय्य केलं. 

Katha Londonchya Ajjibaichi

katha londonchya ajibayanchi

फक्त लंडन मधलंच नाही तर युरोप मधलं पहिलं देऊळ आजीबाईंनी स्थापन केलं. साईबाबांच्या या मंदिराला आणि आजीबाईंच्या घरातील गणेश उत्सवाला भेट द्यायला भारत व लंडन मधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आवर्जून हजेरी लावायचे. त्या लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’ च्या काही काळ अध्यक्ष होत्या. त्यांनी इतक्या उत्साहाने कार्यक्रम साजरे केले की भारतातील व लंडनमधील वर्तमानपत्रातही त्यांचे नाव कौतुकाने लिहिलं जायचं. काही काळाने तर ‘जिथे आजी तिथे मंडळ,’ असं लोक बोलायला लागले.

आजीबाई अशाच अनेकांची मदर, आई, मावशी, बहीण आणि आज्जी झाल्या. रात्री अपरात्री देखील कोणी पाहुणा थंडीने कुडकुडत, बॅगांचे वजन घेऊन त्यांच्या दरवाज्यावर आला, तर थकून झोपलेल्या आजीबाई तितक्या अवेळी सुद्धा त्याला घरात घेत, गरम जेवण बनवून देत,आस्थेने चौकशी करत. पोटासाठी, शिक्षणासाठी पहिल्यांदाच घरापासून, माय देशापासून दूर आलेल्या अनेकांसाठी आजीबाई आणि त्यांचं घर एक हक्काचं, मायेचं ठिकाण व्हायचं आणि त्या परक्या शहरात पुढची झेप घ्यायला सक्षम करायचं.

निरक्षर असूनही स्वतःच्या कष्टाच्या जोरावर शून्यातून जग निर्माण करणाऱ्या, स्वबळावर परदेशात अनेक घर घेणाऱ्या, तेथील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाची व्यक्ती होणाऱ्या, परदेशात आपल्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या, कित्येकांचे संसार बसवणाऱ्या, अनेकांची आई -आजी होणाऱ्या, लंडनच्या मराठमोळ्या आजीबाईंची ही कहाणी प्रचंड प्रेरणादायी आणि अचंबित करणारी आहे. (Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

katha londonchya ajibayanchi

शब्दार्थ (Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

  • बिकट: दयनीय ;
  • वारकरी: भगवान विठ्ठल यांच भक्ती संप्रदाय;
  • उमगलेलं- कळून चुकणे, कळणे;
  • प्रशासकीय- सरकारी; निरक्षर- ज्याला अक्षराची ओळख नाही असा, न शिकलेला

स्वाध्याय 

(Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

प्र. . तीनचार वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) आजींच्या आई वडिलांचा मृत्यू कसा,कोठे व कधी झाला?

(आ) आबाजी बनारसी भारत भेटीला का आले होते? 

(इ) हजारो पौंडांच्या इस्टेटचा हिशोब आजीबाई कशा ठेवत असत?

(ई) ‘जिथे आजी तिथे मंडळ,’ असं लोक का बोलायला लागले?

(उ) आजीबाईंना कोणत्या गोष्टीची खंत वाटायची? 

(ए) आजीबाईंनी कोणत्या नावाने कशाचा व्यवसाय सुरू केला?

(ऐ) हजारो पौंडांच्या इस्टेटचा हिशोब आजीबाईंनी कशाप्रकारे ठेवला होता? 

प्र. . तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

(Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

(अ) तुमच्या मते आजीबाईंनी समाजाला कोणता अनमोल संदेश दिला आहे?

(आ) आजीबाईंचे वर्णन तुमच्या भाषेत करा व लिहा.

(इ) आजीबाईंच्या लंडनच्या घरी कौतुकाने कोणी कोणी व का भेट दिली होती?

प्र. . आजीबाईंचं कौतुक तुम्ही तुमच्या शब्दात आठ ते दहा ओळीत लिहा.

खेळूया शब्दांशी

(Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची)

() खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(अ) उमगणे –               (आ) सहवास – 

(इ)  महागड्या –            (ई) संस्कृती – 

() खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) निरक्षर X             (आ) मायेचं X

(इ) परदेश X              (ई) विनंती X 

 () खालील शब्दालादा’  प्रत्यय लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा.

 उदा., दुसऱ्या – दुसऱ्यांदा, एक – एकदा

  • (अ) दहा-                    
  • (आ) हजार-                    
  • (इ) शंभर-

() खबरखबरदार यांसारखेदारप्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा.

() खालील शब्द पहा.

वास – वास्तव्य, वास – गंध

उच्चार एकच असलेले, पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहित करून घ्या. त्यांचे अर्थ समजून घ्या.

धन्यवाद ! Katha Londonchya Ajjibaichi

2 thoughts on “Katha Londonchya Ajjibaichi कथा लंडनच्या आजीबाईंची”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri