Khare Kon खरे कोण Who Is Real? k2

अनुक्रमणिका

खरे कोण Who Is Real? Khare Kon

सामाजिक अनुभव समालोचनात्मकपणे ऐकते आणि बद्दल चौकशी करणारे प्रश्न उपस्थित करायला आले पाहिजे.

खरे कोणी एक मराठी कथा असून यामध्ये राजा व सेवक यांच्यामधील नात्याला दर्शवले आहे.

वर्णन: Khare Kon

प्रत्येकाने आपल्या परिस्थितीचा वैचारिक दृष्टिकोनातून विचार करावा. नको त्या भ्रमात राहू नये.आयुष्यात येणारी वादळ किंवा भविष्य हे आपल्या निर्णयावर ठरतात. परिस्थितीचा योग्य विचार करूनच निर्णय घेणे किती आवश्यक आहे. हे पुढील पाठावरून आपणास शिकावयास मिळेल.

कथा Khare Kon

एका देशात एक राजकुमार राज्य करीत होता. लहानपणीच त्याचे आई वडील वारले असल्याने त्याच्यावरच राज्याचा सारा भार होता. रोज तो भिकाऱ्यांना अन्नदान करीत असे. सर्व लोक राजाला आशीर्वाद देत असेत्यांच्या आशीर्वादाने तो भारावून जात. स्मित हास्य करून त्यांच्या आशीर्वाद ग्रहण करीत असे. त्याचे लग्न झाले नसल्यामुळे त्याला पुढे मागे काहीच व्याप नव्हता. त्यामुळे त्याला कसली चिंता देखील नव्हती. प्रजेलाच आपले कुटुंब समजून तो रहात असे.

khare kon

एकदा एक तरुण मनुष्य राजकुमार कडे आला

तरुण: (राजाला म्हणाला) महाराज, आपण फार दानी असे मी ऐकले आहेम्हणून मी आपणाकडे थोडी मदत मागण्यासाठी आलो आहेमी एक हतभागी मनुष्य आहे. माझे आईवडील लहानपणीच मला सोडून देव घरी निघून गेलेपुढे मी फार कष्टात आयुष्य काढले. तशातच थोड्या दिवसांपूर्वी मी लग्न केलेपण माझी  साडेसाती काही संपली नाहीअजून लग्नाला दोन महिने देखील झाले नाही तर तोच माझी बायको वारली. तिच्या क्रियाकर्मासाठी सुद्धा माझ्याजवळ पैसे नाहीतत्यासाठी मी आपल्याजवळ दहा मोहरा मागण्यास आलो आहेकृपा करून तेवढी मदत करा. मी आपला आजन्म सेवक राहीलत्यासाठी मी मोबदला देखील मागणार नाही.” 

राजकुमार:एवढेच नामी तुला शंभर मोहरा देतोजा, आपल्या बायकोचे क्रिया कर्म उरक आणि गरिबांना दानधर्म देखील करतू परत आल्यावर मी तुला नोकर म्हणून काम देईन आणि पगार पण देईन. Khare Kon

(दोन दिवस झाल्यावर तो तरुण आला राजाकडे नोकरीला लागलाकाही दिवस गेल्यावर राजकुमार त्याला पगार देऊ लागला.)

तरुण: महाराजआपल्याकडे मला कशाची उणीव आहेजर कधी गरज लागली तर मी मागेन तुमच्याजवळ.

(तरुणाने पगार घेतला नाही. राजकुमार ने देखील काही विशेष अग्रह केला नाहीदिवसा मागून दिवस गेले. हळूहळू राजकुमार ने संपूर्ण भार त्या तरुणावरच टाकला. त्या तरुणाच्या कारकिर्दीला काही दिवस गेले. एक दिवस तरुण राजकुमाराकडे आला.)

तरुण: महाराजआपण विनाकारण पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहातखर्च थोडा कमी केल्यास बरे पडेल, असा खर्च केल्यास किती दिवस पुरेलनंतर आपला खर्च कसा भागणार

महाराज: त्याची कशाला काळजीमला बायको नाही, मुलं नाहीकसला देखील व्याप नाही. समजा झाला सर्व खजिना रिकामा तर काय माझी प्रजा मला मदत करणार नाही

तरुण: तसं नाही महाराज पण आपण विचाराने खर्च केला पाहिजे.

khare kon

Khare Kon

महाराज: अरे! भिक्षुक रोज दान घेतल्यावर मला आशीर्वाद देऊन जातात. त्यांच्या त्या आशीर्वादाचे मोल काहीच नाही कामाझ्यावर जर प्रसंग आलाच तर ते धावून येणार नाहीत का? आज मी त्यांना जेवू घातले तर उद्या ते मला घालतीलच ना?

तरुण: असल्या आशीर्वादांवर विश्वास ठेवून काही होते का महाराज?

(दुसऱ्या दिवशी भटभिक्षुकांची जेवणे चालली असता राजाने विषय काढला.)

महाराज:  आपण सर्व दररोज माझ्याविषयी आदर दाखवून माझ्यासाठी वेळ पडल्यास वाटेल तो तयार करण्यास तयार असल्याचे सांगता, यावर आमचा हा नोकर मुळीच विश्वास करीत नाहीमी त्याला पुष्कळ सांगून पाहिले. मग आता तुम्हीच बोला हेच सर्व खरे की खोटे?

हुशार भटभिक्षुक: त्याच्या बोलण्यावर किंवा सांगण्यावर आपण काय विश्वास ठेवतातो नोकर एक नंबरचा चोर आहेतो आपल्याकडे रोज रोज चोरी करतो. त्याच्यावर तुम्हीच चांगली नजर ठेवा.

(इतर सर्व भट भिक्षुकांनी या गोष्टीला दुजोरा दिला. महाराजांनी तरुणाला बोलवले.)

महाराज: या सर्व भटभिक्षुकां प्रमाणे तुम्ही दररोज चोरी करतायाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

तरुण: होय महाराज, त्या लोकांचे म्हणणे अगदी खरे आहे. मी आपल्या खजिन्यातील बरेच धन चोरले आहे

महाराज: पगार घेण्याचे सोंग दाखवून पाठीमागे पापकृत्य केलेस काय? जा, तुझे काळे तोंड यापुढे मला दाखवू नकोस

(असा शाब्दिक संघर्ष होताच नोकर राजवाड्यातून बाहेर पडलातो थेट नदी पार करून गेला. तेथे त्याने चोरीच्या द्रव्याने एक मोठा वाडा बांधला. राजकुमारचा दानधर्म पूर्ववत चालूच होता. तो तरुण गेल्यानंतर सुमारे एक वर्ष झाले असेल.)

महाराज: (भटभिक्षुक जेवत आहेत) मित्र हो! हे माझ्याकडील शेवटचे जेवणआता माझ्याजवळ एक पैसाही शिल्लक नाही. आतापर्यंत तुम्ही मला आशीर्वाद दिलेत वचने दिलीत. खरोखरच उद्यापासून माझा सर्व भार आपणावर येऊन पडला आहे. तुम्ही आपले वचन पाळाल याची मला पूर्ण खात्री आहे

हुशार भटभिक्षुक: महाराजआपण दान धर्मातच विनाकारण जास्त द्रव्य खर्च केले आहे. तेव्हा ते दानाचे पुण्य आपल्या जास्त उपयोगी पडेल. ते भिकारीच आपली जास्त सहायता करू शकतील.

(त्याला दुजोरा देत जेवण करून ढेकरा देत सर्व मित्र निघून गेलेराजकुमाराकडे त्यांनी वळून सुद्धा पाहिले नाही.) 

महाराज: (भिकाऱ्यांना) तुम्ही माझ्यासाठी काय वाटेल ते करण्यास तयार आहात नामाझ्याजवळ आता काही नाही म्हणून तुम्ही माझा भार आपल्यावर घ्या.

भिकारी: भटभिक्षूकांना बोलावून जेवणे दिली तर धन संपणारच, आम्ही बोलून चालून भिकारी  आमच्याजवळ काय असणारते काम मोठे लोक करतील. त्यांच्याजवळ धन असणारच आणि समजा ते जर तुम्हाला पोसु शकले नाहीत, तर या आमच्याबरोबर भीक मागायला

(राजकुमार निराश झालाआता त्याला त्या नोकऱ्याची आठवण झालीत्याने त्यावेळेसच सूचना दिली होती इतक्यातच घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला.) Khare Kon

khare kon

तरुण: महाराज! मी तेव्हा जे म्हटले होते तसेच झाले ना! कोण आले का आता आपल्या मदतीलामला हे भविष्य दिसत होते आणि म्हणूनच मी आपले पुष्कळचे धन चोरून नेलेआपण काळजी करू नकात्या धनानेच मी आपल्यासाठी एक वाडा नदीपलीकडे बांधला आहे. तेथे आपण सुखाने आणि आनंदाने राहू.

(असे सांगून तो नोकर राजाला नव्या महलात घेऊन गेला तेथे ते दोघे सुखाने राहू लागले.) 

उपकाराची परतफेड, इमानदारी, जाणीव या सर्व गोष्टी एकमेकांना धरून चालतात व्यक्ती जर इमानदार असेल तर निश्चितच प्रगती करतो.Khare Kon

तुम्हीच सांगा यामध्ये खरे कोण?
धन्यवाद

शब्दार्थ:

  • भटभिक्षुक- मित्रपरिवार;
  • ग्रहण- (येथे) स्वीकार करणे;
  • शाब्दिक संघर्ष- भांडणे

Other Blogs

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri