Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

समृद्धी निसर्गाची माया

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

काय शिकाल

सामाजिक आणि बौद्धिक हेतूसाठी कल्पना आणि माहिती आयोजित करण्यासाठी धोरणे वापरावीत.

साहित्याचे विविध प्रकार ओळखतात आणि त्यांचे कौतुक करतात

पाठवर्णन

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

लेखिकेला आठवणीत राहिलेला एक बंगला, ज्यामध्ये अप्रतिम झाडांची रचना केलेली आहे. त्यामुळे बंगल्याच्या मालकाला होणारे फायदे. निसर्ग म्हणजे काय? निसर्ग आपल्याला काय काय देतो? कशाप्रकारे देतो? त्याची कशी आपण देखभाल करायला हवी याचे वर्णन या पाठात केले गेले आहे.  झाड व वनस्पती यांना समृद्धी असे संबोधले आहे.

समृद्धी

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

निसर्ग हा आपल्या सजीवांचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे.  मानवी जीवनासाठी निसर्ग सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा निसर्गामुळे पूर्ण होतात. त्यामध्ये आपण श्वास घेत असलेली हवा असो, आपण शेती करत असलेली जमीन असो, आपण जे पाणी पितो किंवा आपण जे अन्न खातो. ते सर्व निसर्गाकडून आलेले असते.

Samruddhi

निसर्ग हे नैसर्गिक व भौतिक जग आहे. नैसर्गिक वस्तू म्हणजे वाहत्या नद्या, सुंदर दऱ्या,उंच पर्वत, निळे आकाश, वेगवेगळे ऋतू, पाऊस, सुंदर चांदणे इत्यादींमुळे नैसर्गिक सौंदर्य अतुलनीय होते. 

यामध्ये झाडे आणि झाडांपासूनआपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळतो. यामुळे आपली श्वसन प्रणाली निसर्गाद्वारे नियंत्रित केली जाते. 

झाडे आणि वनस्पतींना ‘हिरवे सोने’ म्हणून संबोधले जाते. कारण त्यांची तुलना ग्रहावरील इतर कोणते गोष्टीशी होऊ शकत नाही. 

कुडाळमधील माझ्या एका काकांच्या घराशेजारी ओवळा परिसरात एक आखिव बंगला होता. या बंगल्याचे नाव मी ‘आठवणीतील घर’ असे ठेवले होते. 

कारण त्या बंगल्यामध्ये मस्त मशागत करून फुलवलेली बाग होती. हा बंगला आजही या सिमेंटच्या गर्दीत उठून दिसत होता. या बंगल्याचे नाव होते ‘समृद्धी’. या बंगल्याचे मालक एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रदीप महाजन होते. 

प्रदीप रावांची बायको प्रीती देवाघरी गेल्यापासून ते आपलं मन बागेत रमवू लागले होते. त्यांनी बंगल्याच्या परसदारी केळी, अळू, कर्दळ अशी झाडे लावली होती. तेथेच एका ठिकाणी कंपोस्ट साठी खड्डा केला होता. त्यातून त्यांनी बंगल्याच्या पुढील बाजूस गुलाब, झेंडू, जाई- जुई, मधुमालती, कुंद, चाफा,पारिजात इत्यादी फुल झाडांसाठी वापरायला  खत मिळायचे. त्यांनी पुढच्या बाजूला कुंपणाच्या भोवताली नारळ व सुपारी लावली होती. याशिवाय आतल्या बाजूला लिंबू,डाळिंब,पेरू, चिकू अशी फळझाड पण लावली होती. त्या खतामुळे झाड छान तरारली होती. त्यांनी कुडाळसारख्या शहरात इतके सुंदर आणि टुमदार घर व बाग तयार केली होती.

Samruddhi

प्रदीप रावांच्या बागेला असंख्य फुलांच्या झाडांचा आशीर्वाद होता. ज्यामधून सुंदर, सुवासिक फुले येत होती. या फुलांचा वापर ते घरातील देव पूजेसाठी आणि सजावटीसाठी करत असत. याप्रमाणेच म्हातारपणी स्वतःच्या वेळेचा सदुपयोग उपयोग करत गुलाब, कंद, चंपा, जाई जुई, पारिजात या फुलांपासून अत्तर बनवून त्याची विक्री करत. लिंबू,कोरफड,डाळिंब या झाडांचा अर्क काढून विविध नैसर्गिक तेल व क्रीम बनवत असत. अत्तर, क्रीम,तेल या सर्व वस्तू नैसर्गिक असल्यामुळे लोकांना वापरताना याचा फायदा खूप होत असे. त्यामुळे त्यांचे ‘समृद्धी’ या नावाचे ब्रँड तयार झाले होते. समृद्धी ब्रँडच्या वस्तूंची विक्री अगदी विदेशापर्यंत होत होती.

Samruddhi

जवळजवळ सर्व झाडांची कोरडी पाने, फांद्या यांचे सरपण किंवा खत ते बनवत. झाडाला येणारी फळे तसेच भाज्या स्वतःच्या घरात व शेजारचे लोकांना देखील देत. थंडीच्या दिवसात प्रदीप काकांच्या घरी सुकलेल्या फांद्यांची शेकोटी लागत. तसेच फांद्यांपासून बनवलेल्या चुलीवरचे जेवण करायला आम्ही हमखास नाताळाच्या सुट्टीत कुडाळला जायचं असा ठरलेलाच बेत होता. या काही गोष्टींमुळे माझे बालपण अविस्मरणीय झाले आहे.

पण अलीकडे झाडे आणि वनस्पतींच्या कमतरतेमुळे मानव आणि वन्य जीवांच्या जीवनात हानी पोहोचत आहे. ते खरोखरच आव्हानात्मक बनत आहे. वृक्षतोडीमुळे सुपीक क्षेत्र आणि हिरवीगार ठिकाण वाळवंट होत आहेत.दैनंदिन वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील पाण्याची पातळी धोकादायक रीतीने हलवली आहे. हवामानाची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती आणि इतर घटकांचा मानवी जीवनावर लक्षणीय परिणाम होत आहे. 

निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अधिका- अधिक झाडे लावण्याची वैयक्तिक बांधिलकी बाळगली पाहिजे, यातूनच पृथ्वीचे हिरवे सौंदर्य जपले जाईल.

*****

शब्दार्थ

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

 • मूलभूत- मुख्य
 • आखिव- सुंदर

स्वाध्याय

प्र. . तीनचार वाक्यात उत्तरे लिहाSamruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया
 • मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत?
 • निसर्गात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश येतो?
 • झाडे आणि वनस्पतींना ‘हिरवे सोने’ म्हणून का संबोधले जाते?
 • पृथ्वीचे हिरवे सौंदर्य कसे जपले जाईल?
प्र. तुमच्या शब्दात उत्तरे लिहाSamruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया
 • लेखिकेच्या आठवणीतील घराचे वर्णन तुम्ही तुमच्या भाषेत लिहा.
 • तुम्हाला कोण कोणते फुले जास्त आवडतात?  ती का आवडतात?
 • या पाठात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वर्णन आलेले आहे. 

उदा., फळझाड, फुलझाड याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक झाडांचे वर्गीकरण करा.

प्र.  सजीवांच्या सृष्टीत झाड वनस्पती यांच्या भूमिकेबद्दल तुमच्या भाषेत आठ दहा ओळी लिहाSamruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया
प्र. ४. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल? ते लिहाSamruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया
कोणती घोषवाक्य बनवाल?
 • प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा
 • ________
 • ________
 • ________
कोणत्या समस्यांवर विचार कराल?
 • प्लास्टिक
 • ________
 • ________
 • ________
मुख्य अतिथी म्हणून कोणाला बोलवाल?
 • माळी काका
 • ________
 • ________
 • ________

हे करून पाहूया

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

() काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतातकाही फुलांची झाडे बियांपासून, तर काही खोडांपासून/ फांदींपासून तयार होतात.अशा फुल झाडांचे निरीक्षण करा पुढील तक्त्यात नोंद करा.
 • रात्री फुलणारी फुले – 
 • दिवसा फुलणारी फुले – 
 • बियांपासून तयार होणारी फुलझाडे –
 • फांदी/ खोडांपासून तयार होणारी फुलझाडे –
() तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही तीन झाडांची चित्रे काढा.
() प्रदीप रावांनी वेळेचा जसा सदुपयोग केला, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वेळेचा कसा सदुपयोग करताथोडक्यात लिहा.
() खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा.

झाड, फुले, नदी, वाट, पाऊस, डोंगर, धरण, पक्षी, प्राणी

() निसर्गाच्या रक्षणासाठी काय करावे लागेलत्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे प्रयत्न करणार आहात?

उपक्रम:

तुम्हाला आवडणारी फुल झाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या.

प्रकल्प:

(Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया)

काही फुलांचा उपयोग करून वस्तू पदार्थ बनवले जातात. ज्याप्रमाणे फुलांचा वापर करून प्रदीप रावांनी अत्तर बनवले. त्याप्रमाणे तुम्हाला माहित असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू, पदार्थ यांची माहिती घ्या. त्यांची यादी तयार करा. 

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

माहिती मिळवूया

फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्य असतात. हरितद्रव्य, कॅरोटीन यामुळे नारंगी, पिवळा, हिरवा हे रंगफुलांच्या पाकळ्यांना मिळतात. तर लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्य पाण्यात विरघळू शकतात. ज्यावेळी फुलांना जीवन रसाचा पुरवठा होतो, त्यावेळी त्यात ही रंगद्रव्य विरघळतात.

कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्य असावीत हे त्यातील सूत्रे ठरवतात.  गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, रंग बदलत नाही.

Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया

1 thought on “Samruddhi Nisargachi Maya समृद्धी निसर्गाची माया”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri