Surya Grahan 2022 in India सर्यग्रहण

25 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या सूर्यग्रहणा बद्दल माहिती घेऊयात.

सुर्यग्रहणाचे प्रकार Types of Surya Grahan in Marathi

 सूर्यग्रहण तीन प्रकारची असते . 25 ऑक्टोबर रोजी वर्षातील सर्वात शेवटचा सूर्यग्रहण आहे. हा सूर्यग्रहण अंशिक आहे. 

 • पूर्ण सूर्यग्रहण :सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे  लपतो
 • वलयकार सूर्यग्रहण: पृथ्वीवरून सूर्य फक्त बांगडी सारखा दिसतो.
 • अंशिक सूर्यग्रहण: सूर्याचा थोडाच भाग चंद्र मागे लपतो.

भारतात कुठे दिसणार आहे सूर्यग्रहण? Where can one see Surya Grahan in Marathi

सूर्यग्रहण नेहमी अमावास्या या तिथीला लागतो. यावर्षी अश्विनी कृष्णपक्षातील अमावस्येला सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी आहे. हे सूर्यग्रहण अंशिक सूर्यग्रहण आहे. तसेच तुला राशि मध्ये लागणार आहे.

हे सूर्यग्रहण युरोप, उत्तर पूर्व आफ्रिका, मध्य आणि पश्चिम आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व प्रशांत महासागर येथे दिसणार आहे.

8 नोव्हेंबर रोजी पूर्ण चंद्रग्रहण देखील लागणार आहे.

 • भारतात ग्रहणाची सुरुवात 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजेनंतर होणार आहे. 
 • खगोल शास्त्र नुसार हे सूर्यग्रहण उत्तर आणि पश्चिम भागात दिसणार आहे.
 •  पूर्व भागात सूर्यास्त लवकर असल्याकारणाने पूर्वेकडील भागात सूर्यग्रहण दिसणार नाही.

देशात कुठे दिसेल सूर्य ग्रहण Surya Grahan 2022 in India in Marathi

दिल्ली, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, श्रीनगर लेह व लद्दाख

 खालील काही प्रभागात थोड्यावेळासाठी सूर्यग्रहण दिसेल States Surya Grahan 2022 will be visible in India in Marathi

 दक्षिण भारतातील काही भाग म्हणजेच तमिळनाडू आणि कर्नाटक

 आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि बंगाल

खालील भागात सूर्यग्रहण दिसणार नाही

 आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड

भारतात किती वाजता सुरू होईल सूर्यग्रहण Time of Surya Grahan 2022 In India In Marathi

 • सूर्यग्रहण तारीख- 25 ऑक्टोबर 2022
 • सूर्यग्रहण तिथी -अमावस्या
 • नक्षत्र- स्वाती
 • योग- प्रीती
 • सूर्यग्रहणाची वेळ- 04:22 मिनिट पासून ते 05:42 मिनिट पर्यंत
 • सूर्य ग्रहणाची एकूण अवधी-  1 तास 19 मिनिट 

सूर्यग्रहण राशींप्रमाणे/ ज्योतिष शास्त्रानुसार Surya Grahan as per Jyotish in Marathi

दिवाळीनंतर सूर्यग्रहण लागणे हा योग साधारणता 1300 वर्षानंतर आला आहे. ग्रहणाच्या वेळी यंदा बुध, गुरु, शनि आणि शुक्र आपापल्या राशीमध्ये हे आहेत. म्हणजेच शनि मकर राशीमध्ये, गुरू मीन राशी मध्ये, बुध कन्या राशि मध्ये ये व शुक्र तुला राशि मध्ये आहे.

सूर्य ग्रहण सुतक काळ Surya Grahan 2022 Sutak Kaal

भारतामध्ये अंशिक सूर्यग्रहण असल्या मुळे सुतक काळ मानावे.

 • धार्मिक दृष्ट्या सुतक काळ शुभ नसतो.
 • सुतक काळाची सुरुवात साधारण बारा तास आधी केली जाते.
 •  सूर्यग्रहण साधारणतः दीड तास आहे.
 • सूर्य ग्रहणात कोणते शुभ काम करू नये. देवी-देवता यांची पूजा करू नये’
 •  स्वयंपाक करू नये. काहीही खाऊ नये.
 •  गरोदर स्त्रियांनी सूर्यग्रहण बघू नये. ग्रहण काळात घराबाहेर पडू नये.
 • आधी पासून तोडून ठेवलेले तुळशीपत्र घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू  मध्ये टाकून झाकून ठेवावे.
 • ग्रहणाच्या वेळी  महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
 •  ग्रहण झाल्यानंतर गंगाजल टाकून ऊन आंघोळ करावी.
 •  संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे.

ग्रहणाच्या वेळी खाण्यापिण्याच्या वस्तू तुळशीपत्र का टाकावे?

 • सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहणाच्या वेळी खाण्यापिण्याच्या वस्तू मध्ये तुळशीपत्र टाकण्याची पद्धत आहे. अशी मान्यता आहे की ग्रहण काळात विविध प्रकारची नकारात्मक किरणे पडतात. ही किरणे खाण्यापिण्याच्या वस्तूंवर पडू नयेत म्हणून तुळशीपत्र टाकण्याची पद्धत आहे.
 • ग्रहण काळात पडलेली नकारात्मक किरणे आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात. आयुर्वेदामध्ये तुळशी पत्राला खूप महत्त्व आहे.  तुळशीपत्र संजीवनी चे काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तुळशीमध्ये बॅक्टेरिया व आयरन तत्व असतात.  त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते.
 • अमावस्या, रविवार व ग्रहण काळात तुळशीपत्र तोडू नयेत.

यंदाच्या वर्षी सूर्यग्रहण लक्ष्मीपूजनाच्या पुढल्या दिवशी येत असल्याकारणाने लक्ष्मीपूजन आवर याचा काहीही परिणाम होत नाही.

धन्यवाद

2 thoughts on “Surya Grahan 2022 in India सर्यग्रहण”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri