श्री गुरुचरित्र अध्याय 3  Shri Guru Charitra Chapter 3

नमस्कार मंडळींनो,

श्री गुरुचरित्र अध्याय 3  Shri Guru Charitra Chapter 3

अध्याय तिसरा : अंबरीषांची कथा Adhyay 3 – Story of Ambarish Shri Guru Charitra Chapter 3

श्रीगणेशाय नमः।। सिद्धयोग्यांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले. ते म्हणाले, “मुनिवर्य! माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आहे. आता स्वतःविषयी काही सांगा. मी तुमचा दास होऊ इच्छितो.” तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, “ज्या-ज्या स्थानी माझे गुरू राहत होते, तिथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे.” मग त्यांनी नामधारकांना ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथ दाखवला व म्हणाले, “या ग्रंथात श्रीगुरूंचे अगाध माहात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते, संततिहीनाला संतती प्राप्त होते, ग्रहपीडा-रोगपीडा-ब्रह्महत्यादी महापातकांचे निवारण होते, बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य-आरोग्य- सद्बुद्धी लाभते.”

ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले, “मुनिवर्य! तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरूच भेटले आहेत ! श्रीगुरुचरित्राचे श्रवण घडावे, अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा.” तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्यासमवेत भीमा-अमरजा संगमावर नेले. तिथे दोघे एका अश्वत्थाखाली बसले. मग सिद्धयोगी म्हणाले, “वत्स! श्रीगुरूंचे दास्य कसे करावे, हे तुम्हांला माहीत नव्हते. म्हणूनच तुम्हांला चिंता व कष्ट भोगावे लागले.” नामधारक म्हणाले, “मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या.” तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली. ते म्हणाले, “वत्स! ज्यांच्या मनात दृढ भाव नाही, ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषणे देतात. म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या. श्रीगुरू म्हणजे कृपेचे सागर! ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. म्हणून तुम्ही नि:संदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आणि सर्वभावे गुरुचरणांना शरण जा.” तेव्हा नामधारकांनी हात जोडले व म्हणाले, “स्वामी! तुम्ही धन्य आहात. तुम्ही माझा संशय घालवलात. आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा.’ सिद्ध म्हणाले,“वत्स! अंत:करणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा-श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथांच्या श्रवणाने तुम्हांला चारही पुरुषार्थ साध्य होतील, असा माझा आशीर्वाद आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 3  Shri Guru Charitra Chapter 3

कलियुगात त्रिदेव एकच मनुष्यरूपाने अवतार घेऊन आले. तेच श्रीगुरू होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या – ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टिनिर्मिती करतात, विष्णू सत्त्वगुणाला अनुसरून तिचे पालनपोषण करतात, तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतात. ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले, तरी भिन्न नाहीत. सृष्टिचक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे, तिला ते साह्य करतात. हे तीनही देव कारणपरत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी दहा अवतार घेतले. ती कथा अशी आहे-

एकादशीचे व्रत करणारे अंबरीष नावाचे ब्राह्मण सर्वकाळ हरिचिंतन करत असत. त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्या वेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे, असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीषांनी दुर्वासांचे स्वागत केले. त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान-देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले, तेव्हा अंबरीषांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली. पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले.

त्यानंतर दुर्वासांसाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. त्यांनी अंबरीषांकडे रागाने पाहिले व म्हणाले, “तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केलेत? या माझ्या अपमानाबद्दल तुम्हांला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील!” ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले. तेव्हा आपल्या भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, “ऋषिवर्य ! तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला, तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. म्हणून यांचा शाप मी भोगीन!” दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात- · दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे – म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो, हे लक्षात घेऊन ते म्हणाले, “प्रभू! परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनींत एकूण दहा अवतार घ्या.” त्यानंतर विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले. पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे. आता तुम्हांला श्रीगुरुचरित्र दत्तावताराची कथा सांगतो, ऐका.

श्री गुरुचरित्र अध्याय 3  Shri Guru Charitra Chapter 3

श्री गुरुचरित्र अध्याय 2  Shri Guru Charitra Chapter 2

Healthy Frying Revolution: 

श्रीगुरू दत्तात्रेयांची जन्मकथा पुढील ब्लॉगमध्ये बघूयात.

धन्यवाद 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

1 thought on “श्री गुरुचरित्र अध्याय 3  Shri Guru Charitra Chapter 3”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri