श्री गुरुचरित्र अध्याय 2 Shree Gurucharitra Adhyay 2
तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार,
श्री गुरुचरित्र अध्याय 2 Shree Gurucharitra Adhyay 2
अध्याय दुसरा : संदीपकांची गुरुभक्ती
श्रीगणेशाय नमः ॥ हरिनाम घेणारे एक शिष्य श्रीगुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते. दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले. त्या निद्रेत भस्म, व्याघ्रचर्म आणि पीतांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले. त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. त्यांनी उठून भोवताली पाहिले, पण कोणीच दिसले नाही. ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, “हे योगीश्वर! हे भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामिराया! तुम्ही कोण आहात ? कुठून आलात? तुम्ही कुठे राहता ?”
योगी म्हणाले, “माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंहसरस्वती हे माझे गुरू. मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो.” नामधारक म्हणाले, “मी ही श्री गुरूंचे नित्य ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का ?” ते म्हणाले, “नामधारक! तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा. मग त्यांच्या कृपेची तुम्हांला साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता, तोच मी तुम्हांला सांगतो, ऐका. सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभीकमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले, चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापरयुगाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्माजींपुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, “हे विधी! मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात, त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार?” तेव्हा ते म्हणाले, “काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल, सज्जनही पापप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत, असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, तसेच माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरू, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधुजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे.” Shree Gurucharitra Adhyay 2
त्या वेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरूंचे स्वरूप व माहात्म्य विचारले असता ते म्हणाले, “गुरू हा शब्दच चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरू हेच ब्रह्मा-विष्णु- महेश आहेत. देव कोपले तर गुरू रक्षण करतील, पण गुरू कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते, भक्ति-वैराग्य-सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक- वाचिक-मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो, ऐक.
पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करवून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, “माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईन. मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्या वेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल, ते सांगा.” ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी – ‘गुरुदेव ! मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिलीत, तर तुमचे सर्व पापभोगही भोगीन’ – असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. Shree Gurucharitra Adhyay 2
काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. त्या समयी अनंत हालअपेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले. ही त्यांची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी – ‘माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो’- असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले- “शिष्योत्तम ! तुम्ही काशीक्षेत्री चिरकाल वास कराल. तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख-दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल.” वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकांसह काशीतच राहिले.” सिद्ध म्हणाले, “नामधारक! गुरूंचे माहात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढभावाने सेवाभक्ती करावी. Shree Gurucharitra Adhyay 2
गुरुभक्तांवर श्रीगुरुचरित्र शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात.”
धन्यवाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुचरित्र अध्याय 2 Shree Gurucharitra Adhyay 2
1 thought on “श्री गुरुचरित्र अध्याय 2 Shree Gurucharitra Adhyay 2”