श्री गुरुचरित्र अध्याय 1 Shree Gurucharitra Adhyay 1

तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार,

श्री गुरुचरित्र अध्याय पहिला Shree Gurucharitra Adhyay 1

अध्याय पहिला : मंगलाचरण, शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ Shree Gurucharitra Adhyay 1

श्रीगणेशाय नमः।। हे गजानना! तुम्हांला नमस्कार असो. तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. जे तुमची भक्ती करतात, त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तुम्ही चौदा विद्या व चौसष्ट कलांचे स्वामी आहात. तुमचे माहात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात. हे गौरीसुता! गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुम्ही बुद्धिदाते आहात, म्हणून तुम्हांला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की, हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या. मला आशीर्वाद द्या, स्फूर्ती द्या. Shree Gurucharitra Adhyay 1

आई सरस्वती! मी तुम्हांला नमस्कार करतो. श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरू आहेत. त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा.

सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वपालक श्रीविष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मीकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या, अशी विनम्र प्रार्थना करतो.

मातापित्यांना नमस्कार. आपस्तंभ शाखेचे, कौंडिण्य गोत्रात जन्मलेले सायंदेव हे आमचे मूळ पुरुष (खापर पणजोबा). साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे, काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने ‘सरस्वती-गंगाधर’ असे नाम धारण केले आहे. Shree Gurucharitra Adhyay 1

आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांची मला श्रीगुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल, अशी माझी श्रद्धा आहे. श्रीगुरू नृसिंहसरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्र-पौत्रादिकांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी याचे नित्य प्रेमाने श्रवण-पठण केले जाईल; त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, त्यांच्या घरी इष्टकार्यसिद्धी होईल, सुख-शांति-समाधान नांदेल, त्यांच्या दुःख- संकटे-चिंता-पिडा-व्याधी यांचे निवारण होईल. श्रीगुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गाणगापुरास जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होते. श्रीगुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक (नामधारक) अन्य ग्रामी राहत असत.

एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्रीगुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते- ‘गुरुदेव! मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही, तर तुमच्या माहात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकूळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही, तर मी कुठे जाणार? वेद म्हणतात गुरू हेच त्रैमूती आहेत, भक्तांसाठी कृपासिंधू आहेत. कलियुगात ते ‘नृसिंहसरस्वती’ नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील.

गुरुदेव! त्या वेदवचनांना माझ्याबाबतीत खरे करून दाखवा. तुमच्याठायी तीनही देवांचे गुण एकवटलेले आहेत. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हांला अशी विनंती आहे की, जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझे चित्तही स्थिर राहत नसले; तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तुम्ह आहात. गुरुदेव! तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. मग माझ्या मनीचे दुःख तुम्हांला कळत कसे नाही? …आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही, अशी तुमची रीतच असेल, तर मी तुम्हांला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी घेऊन मग देणे, हा तर व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य? Shree Gurucharitra Adhyay 1

देवा नरहरी! माझ्यावर कृपा करणे तुम्हांला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता? मी बालक तुमचा सेवक आहे. म्हणून माझ्याबाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हांला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागावला आहात काय ? मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का?’

तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे – तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्या शिष्यांची तळमळ एकदम

शांत झाली.त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्रीगुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती! 

Shree Gurucharitra Adhyay 1

श्रीगुरुचरित्र कथा सारासहित Shri Guru Charitra Katha Sa

धन्यवाद Shree Gurucharitra Adhyay 1

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

1 thought on “श्री गुरुचरित्र अध्याय 1 Shree Gurucharitra Adhyay 1”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri