Shardiya Navratri 2023 शारदीय नवरात्र 2023

अनुक्रमणिका

शारदीय नवरात्र 2023 Shardiya Navratri 2023 in Marathi

|| या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता 

नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ||

|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके 

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय आहे शारदीय नवरात्र.

नवरात्र = नव (9)+ रात्र.

नऊ रात्रींचा समुदाय म्हणजेच नवरात्र .संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार हा उत्सव आहे. नवरात्री उत्सव 9 रात्र व दहा दिवसांचा असतो.

नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ व पवित्र मानले जातात. दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे आनंद, सुख, समृद्धी, समाधान, ज्ञान, शक्ती, मानसन्मान, धनधान्य प्राप्त होते.

नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा होते. अखंड दिवा, कलश पूजन, घटस्थापना, रंगीबिरंगी फुले, रंगीबिरंगी साड्या घालून फिरणाऱ्या बायका, जागरण, गोंधळ, कन्या पुजन, गरबा, भोंडला, महाअष्टमी, महानवमी, दसरा (विजयादशमी) इत्यादीने अलंकृत असलेला शारदीय नवरात्र स्त्रियांना विशेष प्रिय आहे.

Navratri images quotes - Shardiya Navratri 2022

नवरात्री 2023Navratri 2023 in Marathi

एका वर्षात एकूण चार नवरात्री येतात.

  • पहिली – चैत्र नवरात्री – गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते.
  • दुसरी – शारदीय नवरात्री – अश्विन शुद्ध  प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते
  • तिसरी – शाकंभरी नवरात्र – पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते.
  • चौथी – गुप्त नवरात्रि

चैत्र नवरात्री उत्तर भारतात खूप उत्साहात साजरी केली जाते. मात्र शारदीय नवरात्री संपूर्ण भारतात उत्साहात साजरी केली जाते.

शारदीय नवरात्री Shardiya Navratri in Marathi

“बुराई पर अच्छाई कि मात” या हिंदी म्हणीप्रमाणे म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय म्हणून ओळखली जाणारी शारदीय नवरात्री आहे. नऊ दिवस देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते.

ज्याप्रमाणे गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना होते. त्याच प्रमाणे अश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या  रंगांच्या साड्या घातल्या जातात. देवीचा संपूर्ण शृंगार केला जातो. सकाळ संध्याकाळ पूजा व आरती म्हटली जाते.

ज्याप्रमाणे गणेशोत्सवात अथर्वशीर्ष याचे विशेष महत्त्व आहे. त्याच प्रमाणे नवरात्रीत श्री सूक्त, दुर्गा अष्टक, जागरणात म्हटली जाणारी गाणी/भजन,होम हवन यांचे विशेष महत्त्व आहे.

नवरात्री मुख्यतः उत्तर भारतात, गुजरात, महाराष्ट्र  तसेच पश्चिम बंगाल या राज्यात खूप उत्साहात साजरी केली जाते.

देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त नऊ दिवसांचा उपवास करतात. या नऊ दिवसांच्या कालावधीत दारू,मांसाहार,कांदा,लसून इत्यादी वस्तूंचा त्याग केला जातो.

काहीजण चामडी वस्तू म्हणजे चप्पल,बेल्ट इत्यादी वस्तूंचा देखील त्याग करतात.

नवरात्री नंतर दहाव्या दिवशी विजयादशमी(दसरा) येते. मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाला मारून लंकेवर आधिपत्य स्थापित केले होते.

नवरात्री नृत्य Types of Dances Performed in Navratri in Marathi Shardiya Navratri

देवीला प्रसन्न करण्यासाठी व आनंद व्यक्त करण्यासाठी भारतातील विविध क्षेत्रात विविध प्रकारचे नृत्य केले जातात.

  • गुजरात मध्ये होणारा गरबा 
  • पश्चिम बंगालमध्ये होणारा छाऊ
  • महाराष्ट्र मध्ये  होणारा घागर फुंकणे, भोंडला, गोंधळ, जोगवा

ही सर्व प्रकारची नृत्ये समूहामध्ये केली जातात. मोठी मैदाने, प्रशस्त जागा घेऊन शेकडो लोक एकत्र नाचमध्ये रमून जातात.

मला वाटतं या प्रमाणे नाच केल्यामुळे रोजच्या धावपळीच्या जीवनातील  मानसिक ताण कमी होत असावा. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उसळून येत असतो.

Navratri images photos - Shardiya Navratri 2022

देवीची नऊ रूपे 9 forms of Devi in Marathi

Shardiya Navratri

देवीला आदिमाया किंवा जगदंबा असे देखील म्हणतात. नवरात्रीत पूजन होणाऱ्या देवीची उग्र व सौम्य असे दोन रुपे पाहायला मिळतात.

देवीचे सौम्य रूप

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा व भवानी

देवीचे उग्र रूप

दुर्गा, काली, भैरवी व चामुंडा

प्रथम शैलपुत्रीति, द्वितीय ब्रह्मचारिणी |

तृतीय चंद्रघंटाति, कुष्मांडा ती चतुर्थकम् ||

पंचम स्कंदमातेती षष्ठम कात्यायनीतिच |

सप्तम् कालरात्रीती महागौरीतिचअष्टम ||

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गा: प्रक्रिर्तिता: |

उक्तान्येतानि नामानि ब्राह्मणैव महात्माना ||

शारदीय नवरात्र 2023 तिथी वेळ Shardiya Navratri 2023 Tithi Time in Marathi

नवरात्री दरम्यान भक्त देवी शक्तीच्या 51 पिठांचे दर्शन करण्यासाठी जातात. हिंदू पंचांगाप्रमाणे अश्विन शुक्ल पक्ष ते नवमी तिथी पर्यंत नवरात्री साजरी केली जाते.

यावर्षी नवरात्रीचा महापर्व 15 ऑक्टोबर 2023 रविवार ते 23 ऑक्टोबर 2023 सोमवारपर्यंत साजरा केला जाईल. 

मान्यता नुसार देवीने न थांबता नऊ दिवस महिषासुर राक्षस सोबतअखंड युद्ध केले असल्याने ती दमून जाते. चार दिवस आराम करते.

म्हणून काही ठिकाणी दसरा ते चतुर्दशी तिथि पर्यंत देवीचे देऊळ बंद ठेवण्यात येतात. काही ठिकाणी विजयादशमीला देवीची मिरवणूक काढली जाते. तर काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला देवीची मिरवणूक काढली जाते.

  • अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा प्रारंभ -15 ऑक्टोबर 2023 रविवार ते 23, वेळ: पहाटे 03:24
  • अभिजित मुहूर्त- 15 ऑक्टोबर 2023 रविवार  सकाळी 11:54 ते दुपारी 12:42 पर्यंत
  • घटस्थापना मुहूर्त- 15 ऑक्टोबर 2023 , सकाळी 6:20 मिनिट सकाळी 10:19 मिनिट पर्यंत .

शारदीय नवरात्र 2023 देवी पूजा रंग Shardiya Navratri Devi Pooja and Colour in Marathi

दिवस दिनांक / वार देवी पूजा  रंग
पहिली माळ 15/10/2023

रविवार 

घटस्थापना,
शैलपुत्री पूजा

नारंगी         

(Orange)
दुसरी माळ 16/10/2023

सोमवार 

चंद्र दर्शन,
ब्रह्मचारिणी पूजा

पांढरा 

(White)

तिसरी माळ 17/10/2023
मंगळवार
सिंदूर तृतीया,
चंद्रघंटा पूजा

लाल

(Red)

चौथी माळ 18/10/2023

बुधवार 

विनायक चतुर्थी
कुष्मांडा पूजा

रॉयल ब्लू 

(Royal Blue)

पाचवी माळ 19/10/2023
गुरुवार
उपांग ललिता व्रत
स्कंद माता पुजा

पिवळा

(Yellow)

सहावी माळ 20/10/2023

शुक्रवार 

कात्यायानी पुजा

हिरवा

(Green)

सातवी माळ 21/10/2023
शनिवार
सरस्वती आवाहन, घागर फुंकणे
काल रात्री पूजा

करडा

(Gray)

आठवी माळ 22/10/2023

रविवार 

सरस्वती पुजा
दुर्गाष्टमी, महा – गौरी पूजा, संधी पुजा उपवास

जांभळा

(Purple)

नववी माळ 23/10/2023
सोमवार 
महानवमी, आयुध पूजा
नवमी होम, सिद्धिदात्री पूजा
मोरपंखी
(Peacock Green)
नवरात्र देवी पूजा रंग

नवरात्रीचे नऊ रंगांचे महत्त्व देवीचे रूप Importance of 9 colours and forms of Devi in Marathi

Shardiya Navratri

नवरात्रीमध्ये स्त्रियांची भारी मज्जा असते. नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रिया सकाळी उठून प्रत्येक माळेच्या रंगाप्रमाणे साड्या घालतात. रस्त्यावर दिसणाऱ्या ठराविक रंग घातलेल्या स्त्रिया बघायला खूप भारी वाटतं.

स्त्रीयांमधील उत्साह अवर्णनीय असतो. समजा एखाद्या रंगाची साडी नसली म्हणजे ती खरेदी करणे हा एक वेगळाच उत्साह. देवळात रांगेत उभ्या असलेल्या सगळ्या एकाच रंगात असलेल्या स्त्रिया पण विविध भाव  बघायला खूप छान वाटतं.

पहिली माळ 1st form Shailputri shardiya navratri

 

शैलपुत्रीनारंगी (Orange)

पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. आई दुर्गा पहिल्या स्वरूपात शैलपुत्री नावाने ओळखली जाते. हिमालय राजाची कन्या असल्याकारणाने तिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले होते.

शैलपुत्री देवीला दोन हात आहेत:

  • उजव्या हातात त्रिशूळ
  • डाव्या हातात कमळ
  1. घटस्थापनेपासून योगी योग साधनेचा प्रारंभ करतात.
  2. नारंगी रंग – बल व शक्ती यांचे प्रतीक आहे.

मंत्र – ॐ देवी शैलपुत्र्यै नमः

दुसरी माळ 2nd form Brahmacharini
shardiya navratri

देवी ब्रह्मचारिणीपांढरा (White)

दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते.आई दुर्गा आपल्या  दुसऱ्या स्वरूपात ब्रह्मचारिणी नावाने ओळखले जाते.

ब्रह्मचारिणी देवीला दोन हात आहेत:

  • उजव्या हातात जपमाळा
  • डाव्या हातात कमंडलु
  1. पांढरा रंग – शांती, ज्ञान तपस्या व शक्तीचे प्रतीक आहे

मंत्र – ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः

तिसरी माळ 3rd form Chandraghanta
shardiya navratri

देवी चंद्रघंटालाल (Red)

तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. आई दुर्गा आपल्या तिसऱ्या स्वरूपात चंद्रघंटा या नावाने ओळखली जाते.

आई चंद्रघंटा 10 हात असे प्रचंड रूप आहे:

  • दोन हातात त्रिशुल
  • एका हातात गदा
  • एका हातात धनुष्यबाण
  • एका हातात तलवार
  • एका हातात कमळ
  • एका हातात घंटा
  • एका हातात कमंडलु
  • एका हातात जपमाळ
  • एक हात अभय मुद्रा – आशीर्वाद देताना आहे.
  1. निळा रंग – बलिदान, साहस व असत्यावर सत्याचा विजयचा प्रतिक आहे.
  2. लाल रंग – पवित्रता व शांतीचे प्रतीक आहे.

मंत्र – ॐ देवी चंद्रघंटायै नमः

चौथी माळ 4th form Kushmanda
shardiya navratri

देवी कुष्मांडा रॉयल ब्लू  (Royal Blue)

चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. मा दुर्गा यांचे चौथी स्वरूप कुष्मांडा या नावाने ओळखले जाते.

कुष्मांडा देवीला आठ हात असल्यामुळे ती अष्टभुजा या नावाने सुद्धा ओळखले जाते.

  • एका हातात गदा
  • एका हातात त्रिशुल, 
  • एका हातात कमंडलु 
  • एका हातात धनुष्यबाण
  • एका हातात कमळ
  • एका हातात अमृत कलश
  • एका हातात चक्र
  • एका हातात जप माळा
  1. आई कुष्मांडा स्वास्थची देवी आहे.
  2. निळा रंग – बलिदान, साहस व असत्यावर सत्याचा विजयचा प्रतिक आहे.

मंत्र – ॐ देवी कूष्माण्डायै नम:

पाचवी माळ 5th form Skandadevi
shardiya navratri

स्कंददेवीपिवळा (Yellow)

पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते.दुर्गा देवी चे पाचवे स्वरूप स्कंद माता या नावाने ओळखले जाते.

या स्वरूपाला चार हात आहेत:

  • दोन हातात कमळ
  • एका हातात पुत्र स्कंद म्हणजेच कार्तिकेय
  • एक हात आशीर्वाद देताना
  1. स्कन्द मातेचे अस्त्र कमळ आहे.
  2. स्कंदमाता कमळावर बसत असल्याकारणाने पद्मसिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  3. या स्वरूपाची पूजा संतती सुखासाठी केली जाते.
  4. संतती सुख, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष प्राप्तीचे प्रतीक पिवळा रंग असतो.

मंत्र – ॐ देवी स्कंदमातायै नम:

सहावी माळ 6th form Katyayani
shardiya navratri

देवी कात्यायनी – हिरवा (Green)

सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते.दुर्गा माता यांच्या सहाव्या स्वरूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते . सिंहावर बसून महिषासुर चा नाश करणारा हा स्वरूप आहे.

या स्वरूपाला चार हात आहेत:

  • एका हातात मोठी तलवार
  • एका हातात कमळ
  • अभय मुद्रा
  • वरद मुद्रा
  1. हिरवा रंग – आनंद व प्रकाशाचे प्रतीक आहे.

मंत्र – ॐ देवी कात्यायन्यै नम:

सातवी माळ 7th form Kalratri
shardiya navratri

देवी कालरात्री – करडा (Gray)

 सातव्या दिवशी कालरात्रीची देवीची पूजा केली जाते. आई दुर्गा आहे च्या सातव्या स्वरूपाचे नाव काल रात्री आहे.

या स्वरूपाला चार हात आहेत:

  • एका हातात वज्र
  • एका हातात वक्र तलवार
  • अभय मुद्रा
  • वरद मुद्रा
  1. करडा रंग – विकास व नवीन कामाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

मंत्र – ॐ देवी कालरात्र्यै नम:

आठवी माळ 8th form Mahagauri
shardiya navratri

महागौरीजांभळा (Purple)

आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. आई दुर्गा हिच्या आठव्या स्वरूपाला महागौरी या नावाने ओळखले जाते.

देवीच्या स्वरूपाला चार हात आहेत:

  • एका हातात त्रिशूल
  • एका हातात डमरू
  • अभय मुद्रा
  • वरद मुद्रा

मंत्र – ॐ देवी महागौर्यै नम:

नववी माळ 9th form Siddhidatri
shardiya navratri

सिद्धिदात्री – मोरपंखी (Peacock Green)

नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते.आई दुर्गा हे च्या नव्या स्वरूपाला सिद्धिदात्री या नावाने ओळखले जाते.

देवीच्या या स्वरूपाला चार हात आहेत.

  • एका हातात गधा
  • एका हातात कमळ
  • एका हातात शंख
  • एका हातात चक्र
  1. स्वरूपाला अर्धनारेश्वर स्वरूप देखील म्हटले जाते. 
  2. भगवान शिव व आदिशक्ती यांच्या एकत्रित स्वरूप  म्हणजे सिद्धीदात्री
  3. मोरपंखी रंग – ऊर्जा, महत्वकांक्षा, दृढ विश्वास व समृद्धीचे प्रतीक आहे.
  4.  

मंत्र – ॐ देवी सिद्धिदात्र्यै नम:

शारदीय नवरात्री कथा Shardiya Navratri Story Importance in Marathi

  • ब्रह्मदेवाने महिषासुर नावाच्या राक्षसाला वरदान दिले. महिषासुर ने देवलोक पृथ्वी लोक पाताळलोक सगळीकडे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या त्रासाने चारी बाजूला हाहाकार झाला होता. मात्र त्याचा अत्याचार वाढतच चालला होता. महिषासुर ने स्वर्गलोक चा राजा इंद्र यांना युद्धात हरविले होते. त्यावेळेस इंद्र व इतर देव भगवान शिव माता पार्वती यांच्याकडे मदतीसाठी धावले . त्यावेळी सर्व देवतांची शक्ती एकत्रित करून जगत माता पार्वती युद्धासाठी युद्धभूमीवर अवतरल्या. नऊ दिवस- रात्र अखंड माता ने महिषासुर राक्षसाशी युद्ध केले. सिंहाची सवारी करून आई दुर्गा हिने महिषासुराचा वध केला. नऊ दिवसांचा कालावधी म्हणजेच नवरात्र. महिषासुर राक्षसाचा अंत केल्यामुळे देवी चे महिषासुरमर्दिनी हे नाव आहे.
  •  पौराणिक कथेप्रमाणे,रावण सर्वात मोठा शिवभक्त ओळखला जातो. रावण प्रचंड शक्तिशाली होता.प्रभू श्रीराम यांनी रावणाशी युद्ध करताना नऊ दिवस होम-हवन करून आदिशक्ती पार्वती त्यांची आराधना केली होती. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन विजयी होण्याचा आशीर्वाद प्रभू श्रीराम यांना दिला होता. 

निष्कर्ष Conclusion in Marathi

shardiya navratri

दररोजची तीच कामे, तेच कपडे यामुळे जीवनात कोरडेपणा भासू लागतो. सणासुदीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण होते. असे वेगवेगळ्या रंगाच्या कपडे घातल्यामुळे नवीन  तरंग निर्माण होतात. त्यामुळे जीवनातील रस पुन्हा भासू लागतो. जीवनाला एक नवी दिशा  मिळते. म्हणून शक्तीचे स्वरूप असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने सहभागी झालेच पाहिजे.

7 thoughts on “Shardiya Navratri 2023 शारदीय नवरात्र 2023”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri