पितृपक्ष Pitru Paksha in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आज आपण पित्र पक्षा बद्दल जाणून घेणार आहोत.
गणेश चतुर्थी नंतर गणेश अनंत चतुर्दशी साजरी केल्यानंतर पुढच्या दिवशी पितृपक्ष ला सुरुवात होते.
पितृपक्ष = पित्र+ पक्ष. Pitru Paksha
पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा समूह. तर पित्र म्हणजे आपले पूर्वज. पूर्वजांना समर्पित असलेला पंधरवडा (पंधरा दिवसांची वेळ) म्हणजेच पितृपक्ष Pitru Paksha
आता आपल्याला प्रश्न पडत असेल की पितृपक्ष का करतात? पितृपक्ष म्हणजे काय? या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.
|| ज्यांच्या पुण्य कर्माने आपणास घडविले
दुर्लभ असे मनुष्य जीवन मिळाले
अशा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ
करूया वंदन आणि पूजन ||
मनुष्य जीवन खरच खूप दुर्लभ असतो. आपल्या माता-पिता मुळेच आत्मा मनुष्य योनीत जन्म घेते. मनुष्य योनी ही एकमेव योनी अशी असते, ज्यामध्ये आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते.
आत्म्याला मनुष्याची योनी प्राप्त होणे यामध्ये मोलाचा वाटा हा प्रत्येकाच्या स्वतःच्या माता-पित्याचा असतो.
आत्मा मनुष्याचा शरीर सोडते, म्हणजेच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
पितृपक्ष 2023 Pitru Paksha 2023 in Marathi
मान्यता नुसार स्वर्ग लोकाच्या खालोखाल पितृलोक असतं. पितृ लोकाचा स्वामी यमराज आहे. मनुष्य जेव्हा आपले शरीर सोडतो त्यावेळेस त्याची आत्मा पितृलोक येथे जाते. तीन पिढी आत्मा पितृलोक मध्ये निवास करते.
असे मानले जाते की इथेच मनुष्याच्या कर्माचा हिशोब होतो.
आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्तीसाठी पितृपंधरवड्यात त्यांच्या नावाने पूजा केली जाते. यामुळे पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती मिळवून देण्यासाठी पिंडदान व पितृपूजा यांचे महत्त्व आहे.
पितृपक्षात हयात नसलेल्या मातापित्यांचे श्राद्ध त्यांचा मुलगा करतो.
सर्वपीत्री अमावस्येच्या दिवशी घराण्यातील सर्व पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करण्याची प्रथा आहे.
श्राद्ध केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरादारात सुख शांती व समृद्धी येते.
- पित्रपक्षा ची सुरुवात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होते.
- भाद्रपद महिन्यातील अमावास्येला म्हणजेच पंधरा दिवसांनी समाप्त होते.
- हिंदू धर्मात पितरांची पूजा सर्वात मोठी पूजा मानली जाते.
- जन्मदात्या आई-वडिलांच्या प्रति आजन्म कृतघ्न रहावे. त्यांना कधीही विसरू नये.
- मृत्यूनंतरही त्यांची आठवण म्हणून श्राद्ध केले जाते.
मान्यता नुसार मातापित्यांचे श्राद्ध केल्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होते.
पितृ पक्ष का करतात? Why do we do Pitru Paksha in Marathi
महादानी कर्ण याला महाभारताच्या युद्धात मृत्यू आला. परंतु दानी असल्यामुळे तो स्वर्गलोकात गेला. मात्र ज्यावेळी तो जेवणासाठी बसायचा त्याला सोने-चांदी अश्या वस्तू ताटात वाढल्या जायच्या.
परंतु त्याला तर अन्नाची गरज होती. पण प्रत्येक वेळी वारंवार कर्ण याला जेवणात सोने चांदी ताटात वाढले जात असे. एके दिवशी कर्ण यांनी इंद्र देवाला अन्ना ऐवजी सोने-चांदी का देतात असे विचारले.
त्यावेळी इंद्रदेव म्हणाले, “ तू आजीवन सोने चांदी हिरे यांचेच दान केले आहे म्हणून तुला स्वर्गलोकात तेच प्राप्त होईल.” अर्थात तू जे देशील ते तुला प्राप्त होईल. तू कधीच पितरांना अन्न दान दिले नाहीस. तर तुला स्वर्गलोकात अन्न कसे मिळेल?
कर्ण इंद्र देवांना म्हणाला मला माझ्या पितरां बद्दल कल्पना नसल्यामुळे मी त्यांना अन्न दान देऊ शकलो नाही. तरी मला माझी चूक मान्य आहे. ती सुधारण्याची संधी मला मिळावी.
इंद्रदेवाने महादानी कर्ण याला पंधरा दिवस पृथ्वीलोक वर येऊन अन्न दान देण्याची संधी दिली.
दानवीर कर्ण यांनी पृथ्वीवर 15 दिवस येऊन आपल्या पूर्वजांना अन्नदान दिले. आपल्या पूर्वजांची आठवण करून श्राद्ध व नैवेद्य अर्पण केले.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील 15 दिवस होते. तेव्हापासून हे पंधरा दिवस पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो.
ईश्वर पण प्रत्येकाच्या कर्मा नुसारच त्याला त्याची परतफेड करत असतो. म्हणून आपण जे दान देऊ तेच आपल्याला मिळते.
ते म्हणतात ना “जैसी करनी वैसी भरनी”.
“जे पेराल, तेच उगवेल”
पितृपक्ष तिथी 2023 Pitru Paksha Tithi 2023 in Marathi
पितृपक्षात पितरांचे श्राद्ध अर्पण करताना तिथी, नाव व कुळ बरोबर असले पाहिजे. त्यामुळे आपण अर्पण केलेले नैवेद्य पितरांना प्राप्त होतो. म्हणून श्राद्ध करताना कुळाचे उच्चारण बरोबर असले पाहिजे.
तारीख | वार | श्राद्ध तिथी |
29.09.23 | शुक्रवार | पौर्णिमा |
29.09.23 | शुक्रवार | प्रतिपदा |
30.09.23 | शनिवार | द्वितीया |
1.10.23 | रविवार | तृतीया |
2.10.23 | सोमवार | चतुर्थी |
3.10.23 | मंगळवार | पंचमी |
4.10.23 | बुधवार | षष्ठी |
5.10.23 | गुरुवार | सप्तमी |
6.10.23 | शुक्रवार | अष्टमी |
7.10.23 | शनिवार | नवमी |
8.10.23 | रविवार | दशमी |
9.10.23 | सोमवार | एकादशी |
11.10.23 | बुधवार | द्वादशी |
12.10.23 | गुरुवार | त्रयोदशी |
13.10.23 | शुक्रवार | चतुर्दशी |
14.10.23 | शनिवार | सर्वपित्री अमावस्या |
धर्मशास्त्रानुसार पितरांचे श्राद्ध व नैवेद्य काढताना गरुड पुराणात दिलेले पितृस्तोत्र किंवा ऋग्वेदात दिलेले पितृसूक्त म्हणण्याची पद्धत आहे.
आई वडिलांचे श्राद्ध नैवेद्य तिथीच्या दिवशी काढावे. इतर पूर्वजांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करावे.
परंपरेनुसार घरातील जेष्ठ मुलाने हे श्राद्ध करावे. ब्राह्मण भोज व दान देण्याची पद्धत पितृपक्षात आहे.
पितरांचे आत्म्याच्या शांतीसाठी अन्नदान व पिंडदान यांचे विशेष महत्त्व असते.
पितृपक्षात श्राद्ध करताना कावळा, वटवृक्ष, ब्राह्मण, गाय, कुत्रा यांचे घास का काढले जातात?
वाल्मिकी रामायणात राजा दशरथ यांनी माता सीता यांच्याद्वारे केलेले पिंडदान स्वीकार केले होते. त्यांना मोक्षाची प्राप्ती झाल्याचे नमूद आहे.
पितृपक्षात श्राद्ध करताना कावळा, वटवृक्ष, ब्राह्मण, गाय, कुत्रा यांचे घास का काढले जातात? याचे स्पष्टीकरण खाली दिलेल्या कथेमध्ये होईल.
पिंडदानाचे महत्व व कथा Importance and Story of Pind daan in Marathi
प्रभू श्रीराम माता सीता व लक्ष्मण यांच्यासोबत वनवासात गेले होते. पिता दशरथ यांचे श्राद्ध करण्यासाठी “गया” या तीर्थक्षेत्रात गेले होते. तेथे ब्राह्मणांनी त्यांना श्रद्धा साठी लागणाऱ्या सामग्रीची सूची दिली होती.
सामग्री गोळा करण्यासाठी प्रभू श्रीराम व लक्ष्मण जवळील नगरा मध्ये गेले.
खूप वेळ झाला तरीही ते पुन्हा आले नव्हते. परंतु पिंड दानाची वेळ व तिथी निघून जात आहे असे ब्राह्मण देवाने माता सीता यांना सूचित केले. हे ऐकून माता सीता व्यथित झाल्या.
थोड्यावेळाने दशरथ यांच्या आत्म्याने माता सीता यांना पिंडदान ची वेळ निघून चालली आहे असा आभास करून दिला.
माता सीता खूप काळजीत पडल्या कारण प्रभू राम आणि लक्ष्मण अजून परतले नव्हते.
वेळेचं भान तसेच काळाची गरज जाणून थोडावेळ वाट बघून माता सीता यांनी स्वतः सासरे दशरथ यांचे पिंडदान करण्याचे निश्चित केले.
माता सीता यांनी समोरच दिसत असलेल्या फागु नदीचे, वटवृक्षाचे, गाईचे आकाशात उडणाऱ्या कावळ्याला, सूर्यदेवाला साक्षी मानून ब्राह्मणांच्या मदतीने विधीवत दशरथ यांचे पिंडदान केले.
पिता दशरथ यांनी स्वीकार केले. दशरथ यांना मोक्षाची प्राप्ती झाली. या गोष्टीचा आवासून माता सीता प्रफुल्लित झाल्या होत्या. याचे वर्णन वाल्मीकी रामायणामध्ये लिहिले आहे.
माता सीता यांना कल्पना होती की पिंडदान पुत्र करतो. सर्व सामग्री गोळा करून श्रीराम व लक्ष्मण नदीच्या जवळ आले. तेव्हा माता सीता यांनी प्रभू श्रीराम यांना वेळेअभावी स्वतः दान केल्याचे सर्व सत्य सांगितले.
तेव्हा प्रभू श्रीराम म्हणाले की, मुलाशिवाय व सामग्री शिवाय पिंडदान कसे केले?
यावर माता सीता यांनी सर्व सत्यकथा प्रभूंना सांगितली.
तेव्हा प्रभू श्रीराम यांनी सर्वांना पिंडदान केल्याची कथा सत्य असल्याचे विचारले.
त्यावेळेस फाल्गुन नदी, कावळा, गाय, कुत्रा या सर्वांनी प्रभू श्रीराम यांच्या क्रोधाला घाबरून माता सीता यांच्या कथेला अस्वीकार केले.
फक्त वटवृक्ष याने सत्याची बाजू घेत संपूर्ण कथा प्रभू श्रीराम यांना सांगितली.
प्रभू श्रीराम यांनादेखील पिता दशरथ यांना मोक्ष प्राप्त झाल्याचा आभास झाला.
श्राप
मानलेल्या साक्षीने खोटं बोलल्यामुळे माता सिता यांनी क्रोधाने त्यांना श्राप दिला.
- असत्य बोलल्यामुळे फागु नदीला आजीवन कोरडी होण्याचा श्राप दिला. आजही फागु नदी फक्त नावाची नदी आहे. त्यामध्ये पाणी नाही आहे.
- गाय पूजनीय असूनही तिच्या फक्त मागच्या बाजूची पूजा होईल. आणि तिला अन्नासाठी दारोदारी फिरावे लागेल असा शाप दिला.
- ब्राह्मण कधीही संतुष्ट होणार नाही. व त्याची दरिद्रता कायम राहिल असा श्राप दिला.
- कावळ्याला अन्नासाठी नेहमी भांडण करावं लागेल असा श्राप दिला .
- वटवृक्षा ने सत्य सांगितले म्हणून त्याला उदंड आयुष्य मिळेल असा आशीर्वाद दिला. तसेच तो लोकांना सावली देईल. व विवाहित स्त्रिया त्याची पूजा करतील असे वरदान दिले.
कावळा, नदी ,गाय, सूर्य आणि वटवृक्ष यांच्या साक्षीने दिलेल्या पिंडदान स्वीकारून राजा दशरथ यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे आजही पितृपूजा पिंडदान करताना कावळा, नदी ,गाय, सूर्य आणि वटवृक्ष यांना साक्षी मानून नैवेद्य दाखविला जातो.
धन्यवाद
Very useful information
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Very nice information
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Useful information
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Useful information
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Very informative information ? ? ?
आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Very nice information
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.
Informative 👍👌