Pithori Amavasya in Marathi पिठोरी अमावस्या

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

तुम्हा सर्वांना पिठोरी अमावस्या 2023 हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या. पिठोरी अमावस्या श्रावणातील अमावस्याच्या दिवशी साजरी केली जाते. सरत्या श्रावणातील शेवटची पूजा म्हणजेच पिठोरी अमावस्या. श्रावण चालू झाला म्हणजे पूजापाठ, व्रतवैकल्य उपवास यांची  रेल चेल चालू होते. अमावस्या झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायांचे आगमन होते.

काही कारणास्तव जरी पूजा करू शकलो नाही. तर गौरी पूजनाच्या दिवशी सुद्धा करू शकतात. 

पिठोरी अमावस्या 2023 कधी आहे? When is Pithori Amavasya in Marathi?

हिंदी पंचांगानुसार प्रत्येक महिना पौर्णिमेपासून बदलतो.राखी पौर्णिमेनंतर भाद्रपद महिना सुरू होतो. म्हणून हिंदी पंचांगानुसार  पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ला येते. म्हणून हिला भाद्रपद अमावस्या असे म्हटले जाते. 

पिठोरी अमावस्या हा सण गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जाणार आहे.

शुक्रवार, १५ सप्तेंबर २०२३ हा दिवस श्रावणातील शेवटचा श्रावणी शुक्रवार असून जिवती पूजा उद्यापन केले जाईल.

 • अमावस्या प्रारंभ: गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ रोजी आहे.
 • अमावस्या समाप्ती: शुक्रवार, १५ सप्तेंबर २०२३ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी समाप्ती होत आहे.
 • नक्षत्र: पूर्वा
 • योग: साध्य

गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ यादिवशी मातृदिन साजरा केला जाणार आहे. पिठोरी अमावस्या, बृहस्पति पूजन देखिल आहे

शेतकऱ्यांचा प्रिय बैलपोळा सण देखील याच दिवशी येतो.

पिठोरी अमावस्या 2023 Pithori Amavasya in Marathi

श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. माता दुर्गा  यांची मनोभावे पूजा केली जाते. 64 योगिनी यांचे आव्हान केले जाते. आपल्या मुलांचा आयुष्य मोठा व्हावा अशी प्रार्थना केली जाते. संतती सुख ज्यांना नसते ते देखील ही पूजा करतात. देवीला संतती प्रदान करण्यासाठी प्रार्थना करतात.

पिठोरी अमावस्या पूजा विधी साहित्य Pithori Amavasya Pooja, Vidhi, Sahitya in Marathi

पूजा साहित्य Things needed in Pooja in Marathi

 •  हळदी, कुंकू, अक्षता
 • तांदूळ, पीठ
 •  पान, फूल, आघाडा, दुर्वा, हार
 •  वाळू
 •  काकडी
 •  काकडी चे पान किंवा कोणत्याही वेलीचे  पान
 •  तेरड्याची अखंड पाने
 • पुरणपोळीचा स्वयंपाक
64 yogini - Pithori Amavasya

पूजा कशी करतात? How to perform Pithori Amavasya Pooja in Marathi

पद्धत 1: Method 1

 • पूजेची जागा स्वच्छ करून तेथे  पाट ठेवला जातो. 
 • पाटावर तांदुळाने राशी काढली जाते.
 • त्यावर 64 योगिनी यांना आव्हान देऊन पीठाने मूर्ती तयार केली जाते.
 • अथवा बाजारातुन चौसष्ट योगिनींच्या फोटो/ पेपर आणला जातो.
 • हळदी ,कुंकू, अक्षता, हार, फुल, आघाडा, 108 मण्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करतात.
 • वाळूने आठ छोटे डोंगर बनवतात व त्यांची पूजा केली जाते.
 • या डोंगरान पुढे काकडी चे पान ठेवतात.
 • काकडी च्या पानावर काकडीचा काप ठेवतात.
 • आठ छोट्या पुरणपोळ्या/ स्वयंपाक बनवून त्यादेखील काकडी च्या पानावर ठेवतात.
 • पिठोरी अमावस्या ची कथा म्हटली व ऐकली जाते. 
 • गणपती देवीची आरती म्हटली जाते.
 • पिठाने मूर्ती तयार करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे संबोधले जाते.
 • माठाची भाजी, वालाच बिरड, वडे या पदार्थांचा विशेष करून नैवेद्य दाखवला जातो.
Pooja image - Pithori Amavasya

पद्धत 2: Method 2

 • एक खुर्ची घेतात.
 • खुर्चीला व्यवस्थित साडी घालून घेतात.
 • घराबाहेर  तेरड्याचे पानांची पूजा केली जाते.
 • मुख्य दरवाजा ते पूजेचे ठिकाणापर्यंत लक्ष्मीची पावले काढली जातात.
 • शरीराच्या जागी तेरड्याची अखंड पान ठेवली जातात. 
 • खुर्चीला उत्कृष्टपणे सजविले जाते.
 • यालाच देवी म्हणून 64 योगिनी असे आव्हान केले जाते.
 • काकडी, पुरणपोळी असा नैवेद्य दाखवला जातो.
 • पिठोरी अमावस्या ची कथा ऐकली बोलली जाते.
 • गणपती व देवीची आरती गायली जाते.
 • ब्राह्मण भोज, सवाष्ण भोज  होतो.

पूजा झाल्यानंतर आई एका ताटात पुरणपोळी घेऊन बसते. तिच्या मागे तिची मुलं बसतात.

आई प्रश्न विचारते ‘अतिथी’ कोण? 

मुलं आईच्या हातातील पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आपापली नाव सांगतात. असं केल्याने 64 योगिनी मुलांना सुखी व दीर्घायुष्याचे वरदान देतात. अशी मान्यता आहे.

ही पूजा केल्याने पुत्रांना दीर्घायुष्य लागते अशी मान्यता आहे. या दिवशी गंगा स्नान, तीर्थ स्नान व पितृतर्पण  करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे.

पिठोरी अमावस्या उत्तर पूजा Uttar Pooja Pithori Amavasya in marathi

त्याच दिवशी संध्याकाळी वाळू, प्रसाद यांना पाण्यात अर्पण करावे. असे केल्याने मुलांना पाण्यापासून भीती राहात नाही अशी मान्यता आहे.

प्रसाद नैवेद्य अशा वस्तू पाण्यात टाकतो. त्यामुळे जल प्रदूषणाचाप्रश्न उभा राहतो. आपल्याला मला असे वाटते पाण्यात आपण प्रसाद नैवेद्य अर्पण करतो. पूर्वीच्या काळी पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना वेळोवेळी अन्न मिळावे. म्हणून नैवेद्य प्रसाद पाण्यात टाकण्याची पद्धत असावी असे मला वाटते.

पिठोरी अमावस्या चे महत्व कथा Pithori Amavasya Importance / Significance & Story in Marathi

आटपाट नगर होतं.  तेथे एक ब्राह्मण आपल्या परिवारासोबत राहत होता. श्रावणी अमावस्याच्या दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. पुढच्या वर्षी श्राद्धाच्या दिवशी त्याच्या बायकोच्या पोटात दुखू लागते. ती एका मुलाला जन्म देते. जन्म घेतात नवजात शिशु मरण पावतो. मात्र कोणताही ब्राम्हण श्रद्धाच जेवण जेवत नाही.

असेच लागोपाठ सात वर्ष घडत जाते. सात वर्षे वडिलांना जेवण न घालू शकल्याने ब्राह्मण देव चिडून जातात. बायकोला घरातून हाकलून देतात. तिला जीवन मृत्यू समान वाटू लागतो. लागेल त्या मार्गाला ती चालू लागते. ती एका जंगलात पोहोचते.

जंगलात ब्राह्मण पत्नींना एक स्त्री भेटते. ब्राह्मण पत्नी त्या स्त्रीला आपली सर्व कहाणी सांगते. आता मला जगायचं नाही असं म्हणते. त्यावर ती स्त्री ब्राह्मण पत्नींना एक उपाय सांगते.

अप्सरा

जंगलातील स्त्री ब्राह्मणांच्या पत्नीला सांगते, की “पुढे एक बेलपत्राचा झाड दिसेल. त्या झाडाजवळ एक शिवलिंग असेल. ज्यावेळेस रात्र होईल त्यावेळेस तिकडे  शिव पूजन साठी सात अप्सरा येतील .पूजन झाल्यावर तू त्यांच्या समोर जा. स्वतःची सत्य परिस्थिती देवकन्या, नागकन्या अशा 7अप्सरांना सांग. त्यावर त्या तुला नक्कीच उपाय देतील.”

सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण देव यांची पत्नी जवळील एका झाडावर लपून बसते. रात्र झाल्यावर साथी अप्सरांचे रथ तेथे पूजन साठी येतात. त्यांची पूजा झाल्यावर त्याआधीची कोण असा प्रश्न विचारतात? ब्राह्मण पत्नी “मी” म्हणून त्यांना उत्तर देते. मदतीसाठी ब्राह्मण पत्नी अप्सरां जवळ येते. अप्सरा तिची विचारपूस करतात. ब्राह्मण पत्नी त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगते.

अप्सरा ब्राह्मण पत्नींच्या 7 मुलांना जीवनदान देतात.  ब्राह्मण पत्नीला 64 योगिनींची आव्हान करून पूजन करायला सांगतात. त्यावर ब्राह्मण पत्नी अप्सरांना विचारते ही पूजा केल्याने काय होईल? त्यावर अप्सरा ब्राह्मण पत्नींना सांगतात.हे पूजन केल्याने तुझ्या मुलांचं आयुष्य दीर्घ व सुखी होईल. ब्राह्मण पत्नीला शक्ती स्वरूप असणाऱ्या मा दुर्गा यांच्या 64 योगिनी यांचे पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य लाभेल. हे व्रत सांगतात.

ब्राह्मण पत्नी पीठाने मूर्ती बनवते. 64 योगिनी यांना आव्हान देते. त्यांची पूजा करते. हा दिवस श्रावणातील अमावस्येचा होता. ब्राह्मण पत्नी आपल्या7 मुलांना घेऊन पुन्हा आपल्या घरी येते.ब्राह्मण देव पत्नीचे व मुलांचे स्वागत करतो.आनंदाने नांदू लागते. पुढच्या श्रावणातील अमावस्येला सरांचं श्राद्ध व ब्राह्मण भोज करते. गावातील सर्वांना तिने केलेल्या व्रताबद्दल सांगते. 

त्या नगराचा राजा देखील आश्चर्यचकित होतो. तो गावांमध्ये  हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करावे अशी घोषणा करतो. अशी ही पाच उत्तराची कहाणी साठा उत्तर सफळसंपूर्ण व्हावी.

पिठोरी अमावस्या मंत्र Mantra Pithori Amavasya in marathi

|| शुभम करोति कल्याणम

आरोग्यम् धनसंपदा

शत्रू बुद्धी विनाशाय

दिपक ज्योती नमोस्तुते ||

म्हणजेच याचा अर्थ असा आहे. 

 नेहमीच आपल्या घरात परिवारात सगळ्यांचा कल्याण हो कामधंद्यात  शुभदा यावी. सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे. घरदार धनाने भरलेला असावा.  शत्रुत्वाची बुद्धी नष्ट व्हावी. ज्योती नुसार चमकणाऱ्या दिव्याला/ दीपक ला माझा नमस्कार

पिठोरी अमावस्या च्या पूर्वीची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. त्या दिवशी आपण  दिव्याची पूजा करतो. त्यावेळेस वरील मंत्र म्हणतो. पण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तसेच विशेषतः अमावस्याच्या दिवशी हा मंत्र  घरातील पूजनात म्हणावा.

3 thoughts on “Pithori Amavasya in Marathi पिठोरी अमावस्या”

 1. Pingback: Bail Pola बैल पोळा 2022

 2. Pingback: Laxmi Pujan 2022 लक्ष्मीपूजन 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top