Hartalika 2023 हरतालिका पूजा विधि

ॐ नमः शिवाय

हरतालिका 

हरतालिका 2023 Hartalika 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय हरतालिका Hartalika आहे. हरतालिका या शब्दाचा अर्थ हरवलेली किंवा अपहरण झालेले. हरतालिका या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे असा आहे, “ हर+ तालिका”.  हर म्हणजे भगवान शिवशंकर  आणि तालिका म्हणजे कुलपाची चावी. अर्थात भगवान शिवशंकर यांना जिंकण्याच्या मार्गाची चावी.

हरतालिका पूजन का करतात? Why do we celebrate Hartalika in Marathi

हरतालिका पूजन म्हणजे भगवान शिवशंकर शंभू व माता पार्वती यांची पूजन असते. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरतालिका पूजन असते. गणपती बाप्पा यांचे आगमन भूलोकात होण्याच्या एक दिवस आधी हरतालिका पूजन असते.माता पार्वती यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकर यांना प्रसन्न केले होते.  भगवान शिवशंकर यांच्यासारखा सर्व गुण संपन्न पती मिळावा म्हणून विवाहित कन्या हा व्रत करतात. तर लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी हा व्रत करतात.

When to celebrate Hartalika in Marathi हरतालिका पूजन केव्हा आहे?

हरतालिका पूजन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते. सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी हरतालिका चे पूजन आहे. या दिवशी सूर्य चित्रानक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे.

 • योग- ऐंन्द्र
 • नक्षत्र-चित्रा

या दिवशी स्वर्ण गौरी व्रत व वराह जयंती साजरी केली जाणार आहे.

Hartalika images - Hartalika

हरतालिका पूजा साहित्य Things needed while doing Hartalika Pooja in Marathi

आज कल सण- सुद आलं की बाजारात त्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू आरामात मिळतात. बाजारात आनंद जणू ओसंडून वाहतो.

 • शंकर – पार्वती चा फोटो 
 • चौरंग, पाट
 • हळदी ,कुंकू ,अक्षता, सुपारी
 • हार ,फुल, दूर्वा, बेलपत्र, विड्याची पानं
 • खारीक, खोबरं, गुळ, बदाम, सुपारी
 • हरतालिकेच्या 2 मूर्ती
 • सुहागा च  वाण
 • हरतालिकेची कथा पुस्तक
 • कापसाची माळ
 • बारीक वाळू
 • तुपाचा दिवा
 • नैवेद्य, प्रसाद 
 • लाल किंवा पिवळा  कापड
 • पत्री
पत्री मध्ये कोणकोणती पाने असतात?
 • अर्जुन
 • हातगा
 • आघाडा
 • कण्हेर
 • केवडा
 • जाई
 • डाळिंब
 • रानवांग
 • दूर्वा
 • देवदार
 • तुळस
 • धोतरा
 • पिंपळ
 • बेल
 • बोर
 • मारवा
 • माका
 • मोगरा
 • विष्णुकांत
 • रुई
 • शमी

हरतालिका पूजन विधि मांडणी Hartalika Pooja Method and arrangement in Marathi

सकाळी सर्व कार्य उरकून सर्वप्रथम पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्यावी.

 • मागच्या बाजूला चौरंग व पुढील बाजूला पाट  ठेवून घ्यावा.
 • चौरंगावर व पाटावर लाल  किंवा पिवळं कापड टाकावं.
 • चौरंगावर गौरीशंकर चा फोटो ठेवावा.
 • चौरंगावर पुढील बाजूला दोन्ही कोपऱ्यात तांदळाची रास काढावी.
 • त्यावर हळदीकुंकू टाकून हरतालिकेची दोन्ही मूर्ती ठेवावी.
 •  मध्यभागी वाळू ने शिवलिंग बनवून घ्यावे.
 • पाटावर मध्यभागी तांदुळाने रस काढून त्यावर गणेशाची मूर्ती किंवा सुपारी ठेवावे
 • पाटावर आपल्या डाव्या हाताला तांदूळाची रास काढून त्यावर तुपाचा दिवा ठेवावा.
 • पाच विड्याच्या पानावर खारीक, बदाम, खोबरं, गुळ, हळकुंड ठेवावं. 
Hartalika images - Hartalika

हरतालिका पूजन विधि Hartalika Pooja Process / Vidhi in Marathi

 • सर्वप्रथम दीप पूजन करून घ्यावे. दीप प्रज्वलित करावा.फुल अर्पण करावे
 • गणपती बाप्पांना पाच वेळा पाण्याने, पंचामृताने व शुद्ध जलाने पूजन करावे. फूल अर्पण करावे
 • वाळूच्या शिवलिंगावर पाच वेळा पाण्याने, पंचामृताने व शुद्ध जल वापरून पूजन करा.
 • शिव गौरी यांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षता अर्पण करावे.
 • फोटोला हार घालावा. फुल अर्पण करावे.
 • हरतालिकेच्या मूर्तीला हळदीकुंकू अक्षता , फुल अर्पण करावे.
 • कापसाची वस्त्रमाळ  गणपती, शिवलिंग, हरतालिकेच्या मूर्तींना अर्पण करा.
 • नैवेद्य दाखवा.
 • हरतालिकेची कथा वाचावी.
 • आरती करावी.

हरतालिका कथा Story in Marathi

शक्तीचे स्वरूप असणाऱ्या देवी सती यांनी राजा दक्ष यांच्याकडे जन्म घेतला. पिताच्या विरोधात जाऊन त्यांनी भगवान शिवशंकर शंभू यांच्याशी लग्न केले. मात्र प्रजापती दक्ष शंकराला देव मानत नसे. भगवंतांचा अपमान करण्याचा एकही संधी ते सोडत नसत.

तिन्ही लोकांच्या प्रतिष्ठित सर्व व्यक्तींना एका यज्ञामध्ये प्रजापती दक्ष यांनी आमंत्रित केले होते.मात्र देवी सती व तिचे पती भगवान शिवशंकर यांना आमंत्रण पाठवले नाही.पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची आवश्यकता  नसते. असे मानून  देवी सती यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या. मात्र  भर सभेत देवी सती यांचा अपमान प्रजापती दक्ष यांनी केला. तसेच भगवान शंकरासाठी सुद्धा अपमानास्पद शब्द उद्गारले. पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सती यांनी यज्ञामध्ये स्वतःला दहन करून घेतले.

देवी सती यांनी पुन्हा राजा हिमालय व राणी मैनावती यांच्या घरी जन्म पार्वती म्हणून जन्म घेतला. भगवान शिवशंकर यांना पुन्हा मिळवण्यासाठी देवी पार्वती यांनी बारा वर्ष अखंड तपश्चर्या केली. देवी सती नंतर शक्तीस्वरूप दुर्गा देवी यांनी 108 वेळा भगवान शिव शंकर शंभू यांना प्राप्त करण्यासाठी जन्म घेतले.

देवी पार्वती यांची अखंड तपश्चर्येमुळे भगवान शिवशंकर शंभू यांनी  देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले. हा दिवस भाद्रपद महिन्यातील तृतीयेचा असल्याकारणाने त्यादिवशी हरतालिका हे व्रत केले जाते.

निष्कर्ष Conclusion in Marathi

हरतालिका हे व्रत निर्जला किंवा फळ खाऊन उपवास केला जातो.पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी  हे व्रत करतात. भगवान शिवशंकर सारखा पती मिळावा म्हणून हे व्रत वयात आलेल्या मुली करतात.दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा व आरती करून जेवण करतात.

हरतालिका या पुजना बद्दल मला माहित असलेली माहिती मी इथे माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मला प्रामाणिकपणे असे वाटते.   श्रावण महिन्यात येणारे पूजा पाठ, व्रतवैकल्य यांच्यामागे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा नाही आहेत. हे व्रत करण्यामागे सेल्फ कंट्रोल हा उद्देश असावा.

 श्रावण महिना ज्याप्रकारे महिला या विविध व्रतांचे पूजन करतात. त्याप्रमाणे पुरुषांनीही करावे. पावसाळा सुरू होत असल्यामुळे कमकुवत होणाऱ्या आपल्या पाचनशक्ती ला यामुळे फायदाच मिळू शकतो. हे सर्व पूजन करताना पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, प्रसाद या घरांमध्ये येतात. त्यामुळे आपोआपच  या वस्तूंचा समावेश आपल्या आहारात होतो. उदाहरणार्थ बघायला गेलो तर श्रावण महिन्यातील बहुतेक  प्रसादामध्ये चेने गुळ यांचा समावेश असतो. चणे व गूळ एकत्र खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. आघाडा विड्याची पानं  यांचे सुद्धा विविध फायदे आहेत.पावसाळ्यात कमकुवत झालेली आपली प्रतिकार शक्ती ला  असे पदार्थ खाल्ल्यामुळे फायदा होतो. 

वातावरणातील दमटपणामुळे अंगामध्ये आळशीपणा येतो. पण जर एखादे व्रत करायचे झाले तर त्याच्या तयारी साठी होणाऱ्या हालचालींमुळे आपोआपच उत्साह निर्माण होतो. 

अन्नदान दिले जाते. ब्राह्मणांना दान दिले जाते. यामुळे आपल्या कर्मात थोडेफार पुण्य जुळतं.

हरतालिका उत्तर भारतात हरियाली तीज म्हणून १५ दिवस आधी साजरी केली जाते

एक छान कल्पना 

माझ्या एका मैत्रिणीच्या आईने केलेली पूजा. उतारवयात बऱ्याच जणांना ज्योतिर्लिंग दर्शन करण्यासाठी जाता येत नाही. म्हणून माझ्या मैत्रिणीच्या आईने घरातच बारीक वाळूने 108  शिवलिंग बनविले. भगवान शिवशंकर यांची भटजींकडूनपारंपरिक पद्धतीने पूजा विधी करून घेतली. त्याचा फोटो व्हिडिओ मी खाली शेअर करत आहे. खरंच किती छान कल्पना आहे ही. यामुळे घरामध्ये प्रसन्नता आली. घरातील सर्व लहान-मोठे तसेच शेजारील, नातेवाईक या सगळ्यांना शिव पूजेचा आनंद घेता आला. ब्राह्मणांना दान मिळाले. गरिबांना अन्नदान मिळाले. काकूंना आनंद तसेच पुण्य लाभले.

108 shivling - Hartalika
Hartalika images - Hartalika

9 thoughts on “Hartalika 2023 हरतालिका पूजा विधि”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri