नागपंचमी 2023 date Nag Panchami 2023 Date

ॐ नमः शिवाय 

नागपंचमी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आज मी नागपंचमी या विषयावर मला माहित असलेली माहिती लिहणार आहे. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येतो. श्रावणापासून सुरू होणाऱ्या सणामधील हा पहिला सण आहे. नागपंचमी का व कशी साजरी केली जाते हे आपण पुढे बघणार आहोत.

नागपंचमी 2023 Nag Panchami 2023 in Marathi

ह्या वर्षी नागपंचमी सोमवार दिनांक 21 ऑगस्ट, 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगाप्रमाणे चित्रा अहोरात्र हे नक्षत्र  आहे. पुढल्या दिवशी म्हणजेच 22 आँगस्ट 2023 मंगळवार असल्याकारणाने मंगळागौरी व्रत या दिवशी केला जाणार आहे. मंगळागौरी व्रत माता पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो.त्याप्रमाणे या योगामध्ये केलेल्या कार्याचे  योग्य ते फळ मिळतं.

नागपंचमी ची पूजा कशी करावी? How to perform Nag Panchami Pooja in Marathi

नागपंचमी ही तिथी नाग देवता ना समर्पित असल्यामुळे या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी जिवंत नागांची सुद्धा पूजा केली जात असे. पण कालांतराने यामध्ये बदल केला गेला.काहीजण देवळात जाऊन सुद्धा पूजा करतात.

चातुर्मासश्रावण हे आपसात संबंधित सण आहेत यांच्याबद्दल आपण मागील लेखात बघितले आहे.

श्रावणातील प्रत्येक दिवशी रुद्र अभिषेक केला जातो. परंतु नागपंचमीच्या दिवशी रुद्रभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी रुद्राभिषेक केल्याने ज्यांच्या कुंडलीत कालसर्प योग असतो तो दूर होतो.

पूजेची विधि Method of doing Nag Panchami Pooja

  • काही ठिकाणी नागपंचमीला उपवास केला जातो.
  • लाकडी पाट ठेवून त्यावर अष्टगंधने नागाची प्रतिमा काढतात.
  • चांदीचा  किंवा मातीची प्रतिमा बनवली जाते.
  • खीर, शेवई, मालपुवा,पुरणाचे दिंड असा नैवेद्य बनवला जातो.
  • कच्च दूध, दही,साखर,मध,तूप यांचं पंचामृत बनवून घेतात.
  •  महादेवांची सुद्धा फोटो किंवा प्रतिमा ठेवली जाते.
  •  पितळाच्या  तांब्या मध्ये दूध व तांब्याच्या(copper) तांब्या मध्ये पाणी घेतात.
  • महादेवाची व नागदेवता ची पंचामृत, दूध, व पाण्याने अभिषेक केला जातो.
  •  हळदी, कुंकू, चंदन अक्षता  अर्पण करावी.
  • फुल,पान,दूर्वा, बेलपत्र अर्पण करावे
  •  धूप दीप प्रज्वलित करावे.
  • पूजनीय 9 नागांची नावे घेऊन फूल व अक्षता वाहाव्यात.
  • नागपंचमी ची कथा वाचावी.
  • शंकराची व नागाची आरती  म्हणावे.
  • लाह्या, फुटाणे, हरभरा , गुळ, बतासे यांचाही वापर प्रसाद म्हणून करावा.
  •  नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा.
  • खालील मंत्राचा जप करावा.

||ॐ भुजंगेशाय विद्महे,

सर्पराजाय धिमहि  ,

  तन्नो नागः प्रचोदयात जाय||

 किंवा

|| ॐ कुरू कुल्ये हुं फट स्वाहा ||

Nag Panchami mantra - Nag Panchami

9 पूजनीय नागांची नावे 9 names of Worshipful Nagas

  • अनंत
  • वासुकि
  • पद्म
  • महापद्म
  • तक्षक
  • कुलिर
  • कर्कट
  • शंख
  • कालिया
  • पिंगल

नागपंचमी का साजरी करावी? Why do we celebrate Nag Panchami in Marathi

मराठी संस्कृतीत नागाला ही देवाचा मान दिला जातो. भगवान शिव शंकर शंभू  हे वासुकी नागाला आपल्या गळ्यात आभूषण सारखं घालतात. तर श्री विष्णू हरी यांनी शेषनागाची शय्या बनवली आहे. काही पौराणिक कथेप्रमाणे नागांना पाताळ लोकाचा स्वामी मानतात. आणि सापांना क्षेत्रपाल म्हटले जाते.

समुद्रमंथनाच्या वेळी  पृथ्वी लोकाचे रक्षण करण्यासाठी शिवशंभु शंकर यांनी हलाहल नावाचं विष  ग्रहण केलं होतं. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी अनंत, वासुकि,पद्म,महापद्म, तक्षक, कुलिर,कर्कट,शंख, कालिया आणि पिंगल  हे 9 नाग आले होते.आणि या नऊ नागांनी हलाहल  चा अंश  ग्रहण केला होता. त्यावेळी भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन वरदान दिले.

  •  नागदेवतांनी समस्त मानव जातीला वाचवण्यासाठी जी मदत केली आहे त्यासाठी मानव जातीने कृतज्ञ रहावे. व नागांची पूजा करावी असे वरदान दिले. म्हणून दरवर्षी श्रावणातील पंचमी तिथीला  वरील नऊ नागांची पूजा केली जाते.
  • नागपंचमी या तिथीला भगवान श्रीकृष्ण यांनी गोकुळ मधील यमुना नदी मध्ये कालिया नागाचं अहंकार जिरून त्याला समज दिला होता. 

पौराणिक कथा Traditional Story

पाच युगापूर्वी सत्येश्‍वरी व सत्येश्‍वर नावाचे भाऊ-बहिण होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं. नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला सत्येश्‍वराचा मृत्यु झाला. परंतु सत्येश्‍वरी ने आपल्या भावाला नागरूपात पाहिले. व तीने त्या नागाला भाऊ मानले. दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी तिला तो नाग दिसला नाही. ती धावत जंगलात पोहोचली. झाडावर चढून भावाला शोधू लागली. तिची आतुरता व प्रेम बघून नागदेवतालाही बहिणी चा मोह आवरला नाही. त्यांनी लगेचच सत्येश्‍वर च रूप धारण केलं. भावाला पुन्हा बघून सत्येश्‍वरी आनंदाने  त्या झाडावर झोका खेळू लागली.म्हणून या दिवशी झोका खेळण्याची प्रथा पडली. पूर्ण दिवस भावाला शोधण्यात सत्येश्‍वरीला जेवणाचं भान राहिलं नाही. म्हणून या दिवशी उपवास केला जातो.

या प्रसंगावरूनच नागपंचमीला भावाच्या नावाचा उपवास करण्याची  प्रथा झाली.

भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी हा उपवास करतात. तसेच ज्या प्रमाणे झोका वर जातो त्याप्रमाणे, भावाची प्रगती व्हावी. व ज्याप्रमाणे झोका खाली येतो,त्याप्रमाणे भावाच्या जीवनातील दुःख कमी व्हावे ही प्रार्थना बहिणी करतात.

नागपंचमी साजरी करण्यामागील खरा उद्देश्य Real Objective of doing this pooja in Marathi

मानव जात नाग व मुंगी यांचा नागपंचमी शी असलेला संबंध

  • हातावर मेहंदी काढण्याची पद्धत आहे
  • या दिवशी मातीत हात घालत नाही.
  • शेतकरी यादिवशी नांगरणी करत नाही.

यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून याचे कारण खालील प्रमाणे आहे.

  • पावसाळ्यात होणाऱ्या त्वचा विकारांना आळा घालण्यासाठी रासायनिक मेहंदी लावण्याची पद्धत आहे. 
  • नागपंचमी हा सण जुलै-ऑगस्ट या दरम्यान येतो. त्या वेळी पावसाळा सुरू झालेला असतो.
  • पावसामुळे जमिनीत राहणारे सर्प हे वर भूतलावर येतात. त्यांना शत्रु मानून मानव जातीने त्यांना मारू नये. म्हणून त्यांची पूजा केली जाते.
  • शेतात असणारे मुंग्यांचे वारूळ पावसामुळे नष्ट होतात. मातीने बनवलेल्या  सर्पाची प्रतिमा आपण वारुळा शेजारी ठेवून पूजा करतो. त्या सर्प रुपी प्रतिमेला दूध, दही ,लाह्या, बतासे, हरभरा, गुळ इत्यादी प्रसाद म्हणून ठेवतो. नाग मुळातच यापैकी काहीच खात नाही. पण या सर्व प्रसादाचा वापर लाखो मुंग्या पुढील  काही महिन्यांसाठी वापरतात. तसेच पावसामुळे तुटलेल्या आपले घराचे/ वारुळाचे सापाच्या प्रतिमेतील माती वापरून पुन्हा बनवतात.
  • सर्प आणि मुंगी हे शेतकऱ्याचे खूप मोठे मित्र असतात.कळत नकळत या दोन्ही जीवांना मानव जाती कडून प्राणदान मिळावे. व या दोन्ही जाती नष्ट होऊन अन्नसाखळी मध्ये अडथळा न यावा हे नागपंचमी साजरी करण्यामागचे  खरं उद्देश्य आहे.

म्हणूनच मला वाटते खरी नागपंचमी नागाची मातीची प्रतिमा बनवून ती एखाद्या वारुळा जवळ नेऊन ठेवावे. व तिकडे जाऊन विधिवत पूजा करावी. अशी नागपंचमी साजरी  करावी.जेणेकरून आपण लाखो मुंग्यांचे प्राण वाचू शकतो. खऱ्या अर्थाने असं करून कळत नकळत आपल्या हातून पुण्य घडत असतं. आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. त्यांचे वैचारिक दृष्टिकोन इकडे बघावयास मिळतो. 

Nag Panchami photos - Nag Panchami

11 thoughts on “नागपंचमी 2023 date Nag Panchami 2023 Date”

    • तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा ब्लॉग वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद

      Reply
  1. छान माहिती लिहिली आणि भरपूर नवीन गोष्टी कळल्या ???

    Reply
    • तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा ब्लॉग वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद

      Reply
  2. Pingback: Adhik Maas

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri