Gokulashtami 2023 गोकुळाष्टमी कशी साजरी करावी

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ||

गोकुळाष्टमी Gokulashtami

|| हाती घोडा पालखी

 जय कन्हैया लाल की ||

गोकुळाष्टमी Gokulashtami 2023 in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

गोकुळ अष्टमीच्या तुम्हां सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा🙏🏻

आजचा आपला विषय आहे गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी म्हणजेच जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव म्हणून गोकुळाष्टमी हा सण खूप जोरात साजरा केला जातो.भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता.जन्माची वेळ रात्री बारा वाजताची होती. म्हणून गोकुळाष्टमी हा सण अष्टमी व नवमी असा दोन दिवस साजरा केला जातो. 

गोकुळअष्टमी म्हणजे काय?

गोकुळ+ अष्ट( आठवी तिथी)+ मी

गोकुळ: गो चा अर्थ इंद्रिय असतं . कुळ चा अर्थ घर असतं . आपलं शरिर हे इंद्रियांचं घर आहे . सृष्टीचं/ शरिराचं चलन करणारा, पालन करणारा म्हणजेच गोपालकृष्ण

अष्टमी: अष्ट म्हणजे अष्टमी तिथि . मनुष्य अहंकार रूपी ‘ मि’ मि’ करत असतो . परंतू तो स्वतः काहीच नसतो . मनुष्य मोकळ्या हाताने सृष्टीत जन्म घेतो . मोकळ्या हातानेच मरण पावतो . मि म्हणजेच प्रत्येक मनुष्याच्या रुपात वावरत असणारा परमेश्वर .

गोपाळ : गो चा अर्थ इंद्रिय तसेच पाळ म्हणजेच पालन करणारा

मनुष्य योनी हि एकमेव योनी अशी आहे ज्यामध्ये परमेश्वराचे नाव व पूजन करता येते . सत्कर्माने मोक्षप्राप्ती होवू शकते . म्हणूनच गोकूळरूपी आपल्या शरिराचं महत्व समजून घ्यावे . अष्टरूपी परमेश्वराच्या स्वरूपाला समजून घ्यावे . त्याचे स्मरण करावे . हिच खरी गोकुळाष्टमी .

गोकुळ अष्टमी च्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो .

Krishna image - Gokulashtami 2022

भगवान श्रीकृष्ण यांचा जन्ममाहिती Information about Shri Krishna’s Birth in Marathi

वेळ: मध्यरात्री बारा वाजता

तिथी: अष्टमी

नक्षत्र: रोहिणी

काळ: निशिता

नक्षत्र तसेच काळ हे दोन्ही एकत्र येणं ही एक खूप सौभाग्य पूर्ण गोष्ट आहे. यंदाच्या वर्षी भरणी नक्षत्र आल आहे. मात्र निशिता काळ व जन्माष्टमी दुर्लभ योग जुळून आला आहे. तसेच या वर्षी वृद्धि योग व ध्रुव योग ही आले आहेत.. म्हणून यावर्षीची जन्माष्टमी विशेष आहे. 

गोकुळाष्टमी  यावर्षी बुधवार, दिनांक 6 सप्टेम्बर 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. गोपाळकाला दहिहंडी हा उत्सव गुरुवार दिनांक 7 सप्टेम्बर 2023 रोजी साजरा केला जाईल .

गोकुळाष्टमी 2023 केव्हा साजरी करावी? When to celebrate Gokulashtami 2023 in Marathi

उपवास कधी करावा? When to keep a fast on Gokulashtami 2023 in Marathi

भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अष्टमी तिथीला रात्री बारा वाजता झाला होता.

उपवास कसा करावा? How to keep a fast on Gokulashtami 2022 in Marathi

गोकुळाष्टमीचा उपवास निर्जला,  फल हरी म्हणजेच फळ खाऊन किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन केला जातो. उपवास रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव, पूजा विधि झाल्यानंतरच सोडला जातो. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार व शरीरा नुसार हा उपवास करावा.

अष्टमी तिथि 7 सप्टेम्बर 2023  गुरुवार रोजी आहे . ज्यांच्याकडे पाळणा पूजन किंवा बाळकृष्णा यांचे पूजन होते त्यांनी 6 सप्टेम्बर 2023 रोजी उपवास करावा. सूर्योदयतील तिथी प्रमाणे

गोकुळाष्टमी पूजेची वेळ (निशिता काळ) When to perform Pooja on Gokulashtami 2023 in Marathi

दुर्लभ असा जयंती योग व गोकुळाष्टमी असा दुहेरी योग आहे. हर्षण योग आणि कृतिका नक्षत्र आहे

गुरुवार, दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12.03 मिनिट ते रात्री 12.47 मिनिटे निशिता काळ आहे

गोकुळाष्टमी पूजा साहित्य विधी How to perform Pooja on Gokulashtami 2023 in Marathi

आपण सर्व भगवान श्रीकृष्ण यांची पूजा त्यांचे बाल रूप “बाळकृष्ण” या रुपातच करतो. म्हणून महाराष्ट्र व इतर ठिकाणी गोकुळाष्टमी खूप उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.

 1. सकाळी नित्य नियमाने उठून प्रारंभिक  कार्य उरकून घ्यावी.
 2.  देवघरातील सर्व देवांचे पूजन करावे.
 3.  बाळकृष्ण यांच्या मूर्तीला जलाभिषेक  करावे.
 4.  खोबऱ्याची वडी किंवा बर्फी नैवेद्याला बनवावी.
 5.  पंचामृत बनवावे. पंचामृत मध्ये तुळशी अवश्य ठेवावी.
 6.  नैवेद्य दाखवून पूजा व आरती करावी.
 7.  पूर्ण दिवस जमेल तसा उपवास करावा.
 8.  संध्याकाळी घरातील एखाद्या स्वच्छ ठिकाणी पाट मांडवा.
 9. पाटावर पिवळे वस्त्र टाकावे.
 10. बाळ कृष्णाचा पाळणा सजवून ठेवावा.
 11. काही ठिकाणी 56 भोग सुद्धा दाखवतात.
 12. रात्री कृष्ण जन्माच्या वेळी भगवान श्रीकृष्ण यांचा अभिषेक करावा.
 13. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः|| या मंत्राचा जप करावा.
 14.  आरती पूजन करून मगच आहार ग्रहण करावा.
56 भोग - Gokulashtami 2022

गोकुळाष्टमी चे महत्व Importance / Significance of Gokulashtami 2023 in Marathi

पौराणिक कथेनुसार भगवान  विष्णू यांचा आठवा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण.देवकी व वासुदेव यांची आठवी संतान. कंस हा मथुरेचा राजा होता. त्याला त्याच्या शक्तीचा खूप गर्व होता. देवकी ही त्याची बहीण. देवकी च्या लग्नात एक आकाशवाणी झाली. आकाशवाणीत देवकीचा आठवा पुत्र कंस याला ठार मारेल अशी घोषणा झाली. 

आकाशवाणी ऐकताच राजा कंस याने आपली बहीण देवकी  व तिच्या नवऱ्याला कारागृहात टाकले.एवढेच नाही तर त्याने देवकी व वासुदेव यांच्या सात नवजात शिशु चे कारागृहातच वध केले.

 पुराणांनुसार माता देवकी व वासुदेव यांच्या पूर्वीच्या जीवनात भगवान विष्णु यांना प्रसन्न केले होते. भगवान विष्णू यांनी दिलेल्या वरदान नुसार भगवंतांनी माता देवकी व वासुदेव यांचा पुत्र म्हणुन जन्म घेतला होता.रोहिणी नक्षत्र, निशिता काळ ,श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी, मुसळधार पाऊस अशा वातावरणात माता देवकी यांनी आपल्या आठव्या बाळाला जन्म दिला. अशा बिकट परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य नव्हते.पण सृष्टीच्या रचेताला कोण अडवू शकतं.जन्म घेण्या अगोदरच भगवंतांनी मार्ग काढला होता. म्हणूनच बिकट परिस्थितीतून मार्ग काढून वासुदेव यांनी नवजात शिशु ला सुखरूप पणे गोकुळ येथे घेऊन गेले. बालपणीचा मित्र नंदलाल व त्यांची पत्नी यशोदा यांच्याकडे आपल्या मुलाला सोडले. 

4 thoughts on “Gokulashtami 2023 गोकुळाष्टमी कशी साजरी करावी”

 1. Pingback: Bhadrapad Mass

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri