Datta Jayanti
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा: |
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ||
दत्त जयंती Datta Jayanti in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
आज आपण दत्त जयंती datta jayanti बद्दल जाणून घेणार आहोत.
दत्त देवाची पूजा गुरु म्हणून केली जाते. ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचे एकत्रीत स्वरूप दर्शन म्हणजेच दत्तात्रय देव होय. मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच दत्त जन्माची तिथी असते. म्हणून दत्तजयंती datta jayanti मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.
दत्तजयंतीच्या दिवशी काही ठिकाणी होमहवन पूजा केली जाते. साधक दत्तजयंतीच्या आठ दिवस आधी गुरुचरित्र या पारायणाचे आरंभ करतात
दत्तात्रेय शब्दाचा अर्थ-
दत्त= आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत आशा निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे तो.
अत्रेय = अत्री ऋषींचा मुलगा
दत्त जयंती Datta Jayanti in Marathi
भारतात शिव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. या पंथातील साधक सुमारे 1000-1200 वर्षापासून दत्तांची आराधना करत आहेत.
महाराष्ट्र मध्ये दत्त आराधनेचे परंपरा उज्वल आहे. महानुभव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, साई संप्रदाय, नाथ संप्रदाय व दत्त संप्रदाय अशा विविध संप्रदायामध्ये दत्त दिगंबराची आराधना गुरु म्हणून केली जाते.
दत्त संप्रदायातील साधक “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त” असा जयघोष तसेच अभिवादन करत असतात. अवधूतचिंतन म्हणजे नेहमी आनंदात असणारा. वर्तमानाचा विचार करणारा होय.
- दत्ताच्या पाठीमागे असणारा औदुंबर हे वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्त्व असते.
- गाय म्हणजे पृथ्वी
- चार श्वान म्हणजे चार वेद
गाय शिंग मारून तर कुत्रा चाऊन शत्रूंपासून रक्षण करतात. म्हणून गाय व श्वान ही दत्त दिगंबर यांची अस्त्रे आहेत.
- झोळी : दत्त दारोदारी फिरून भिक्षा अर्जित करत असत. भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो. म्हणून दत्तात्रेयाच्या खांद्याला असणारी झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे.
- कमंडलू : संन्यासी उदासीन अनासक्त असतो. त्याच्या हातात कमंडलू असते. कमंडलू त्यागाचे प्रतीक आहे.
- त्रिशूळ : सत्व, रज व तम या त्रिगुणांची प्रतीक त्रिशूळला मानले जाते.
- सहा हात : नियंत्रण, नियम, समानता, शक्ती, दया व यम यांचे प्रतिनिधित्व करतात.
दिगंबर दत्त यांचा श्लोक Datta Shlok in Marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा: |
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ||
दिगंबर दत्त यांचा जयघोष Datta Jayghosh in Marathi
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन
दिगंबर दत्त यांचा गायत्री मंत्र Datta Gayatri Mantra in Marathi
ॐ दत्तात्रय विद्महे.
अवधूताय धीमही.
तन्नौ दत्त: प्रचोदयात्.
दिगंबर दत्त यांचा बीजमंत्र Datta Beejmantra in Marathi
दं
दिगंबर दत्त यांचा जप Datta Jap in Marathi
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबर दत्त यांचा तारक नाम जप datta tarak naam jaap
श्री गुरुदेव दत्त
दिगंबर दत्त यांच्या 24 गुरूंची नावे 24 Guru of Datta in Marathi (दत्त जयंती)
- पृथ्वी
- पाणी
- वायु
- अग्नि
- आकाश
- सूर्य
- चंद्र
- समुद्र
- अजगर
- कपोत
- पतंग
- मधमाशी
- हत्ती
- भ्रमर
- मृग
- मत्स्य
- पिंगळा वैश्य
- टिटवी
- बालक
- कंकण
- शरकर्ता
- सर्प
- कोळी
- पेशकार
श्रीदत्तात्रेयांची 5 प्रसिद्ध स्थान Famous Places of Datta in Marathi
- पिठापूर
- कुरवपुर
- कडगंची
- गाणगापूर
- अक्कलकोट
- औदुंबर
- नृसिंह वाडी
श्रीदत्तात्रेयांची ही ठिकाणे अतिशय पवित्र व जागृत आहेत. याची कित्येक भक्तांना अनुभूती झालेली आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमा / श्री दत्त जयंती 2022 केव्हा आहे? When is the Datta Jayanti 2022 in Marathi
- मार्गशीर्ष पौर्णिमा/ दत्त जयंती- 7 डिसेंबर 2022सकाळी 08:02 सुरु होणार आहे.
- पौर्णिमा 8 डिसेंबर सकाळी 09:38 समाप्त होणार आहे.
मार्ग शीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त दिगंबर यांचा जन्मदिवस असल्यामुळे दत्त जयंती 7 डिसेंबर 2022 बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे.
श्री दत्त दिगंबर यांची आरती Shree Datta Aarti in Marathi
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा |
नेति नेति शब्द न ये अनुमाना |
सुरुवर- मुनिजन- योगी- समाधी न ये ध्याना ||1||
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता |
आरती ओवाळी ता हरली भव चिंता || धृ ||
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त |
अभाग्यासी कैंची कळेल ही मात |
पराही परतली तेथे कैंचा हेत |
जन्म-मरणाचा पुरलासे अंत || 2 ||
दत्त येऊनिया उभा ठाकला |
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला |
जन्म-मरणाचा फेरा चुकविला || 3 ||
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान |
हरपले मन झाले उन्मन |
मी तू पणाची झाली बोळवन |
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान || 4 ||
दत्त जयंती पौराणिक कथा Traditional Story of Datta Jayanti दत्त जन्म कथा Story of Datta Janma in Marathi
देवी अनुसूया व अत्रि मुनी यांच्या पुत्राचे नाव दत्तात्रय होय.
एका पौराणिक कथेनुसार, देवी अनुसया अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ऋषी अत्रि यांच्या सानिध्यात आश्रम मध्ये राहू न त्या पतीची उत्तम प्रकारे सेवा करत होत्या. आश्रम मध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत उत्तम प्रकारे करत होत्या. त्यांच्या आश्रमातून कधीही कोणी उपाशी पोटी जात नसे.
पतीबद्दल असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंत आदर यामुळे देवी अनुसया यांचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून प्रचलित झाले होते.देवी अनुसया आचाराने प्रत्यक्ष सूर्यदेव भिऊन वागत असे. अग्निदेव शितल होत असे. पवन देव विनम्र होत असे. सारी पंचभूते देवी अनुसया यांच्या पुढे थरथर कापत असत. एवढा पतिव्रतेचा प्रभाव होता !
देवी अनुसया यांचे आचरण बघून तसेच चर्चा ऐकून देवी सरस्वती, देवी पार्वती, व देवी लक्ष्मी प्रभावित झाल्या. त्यामध्ये ऋषी नारद यांनी देवी अनुसया यांचे खूप कौतुक केले. ते ऐकून 3 देवींना अनुसुया बद्दल मत्सर भावना उत्पन्न झाली.
देवींची उत्सुकता बघून त्रिदेव देवी अनुसयाहिच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी भूतलावर अवतरीत झाले. 3 देवांनी शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरण, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा ब्राम्हण वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. देवी अनुसूया यांनी ब्राह्मण वेशातील l3 देवांना बसण्यासाठी आसन दिले. जेवण वाढले.
परंतु देवांनी इच्छा भोजनाचे मागणी केली. देवी अनुसुया यांच्यासमोर “नग्न अवस्थेत भोजन वाढ नाहीतर आम्ही उपाशी पोटी जाऊ” . अशी इच्छा प्रकट केली. अतिथी निराश मनाने जातील तर हानी होईल. या विचाराने देवी हो म्हणून आत घरात जातात.
(गुरुचरित्र पारायण ) gurucharitra parayan shlok 38-40
ऐकुनी द्विजांचे वचन | अनुसुया करी चिंतन |
आले विप्र पहावया मन | कार निक पुरुष होतील || 38 ||
पतिव्रता शिरोमणी | विचारकरी अंत करणी |
अतिथी वीमुख तर हानी | निरोप केवी उल्लंघू ||39 ||
माझे मन असे निर्मळ | काय करील मन्मथ खळ |
पतीचे असे तप फळ | तारिल मज म्हणतसे || 40 ||
आत मध्ये त्यांचे प्रति ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांना घडलेला प्रकार सांगतात. ऋषीमुनी आपल्या अंतर्ज्ञानाने आलेले ब्राह्मण त्रिदेव असल्याचे ओळखतात. ते आपल्या कमंडलू मधलं पाणी देवी अनुसया यांना देऊन अतिथीवर उडविण्यास सांगतात. पतीच्या आज्ञेप्रमाणे देवी गंगाजल त्री देवांवर शिंपडतात. पाण्याची थेंब अंगावर पडतात 3 देव बाल रूपात येतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे देवी अनुसुया त्या बालकांना दुग्ध प्राशन करतात.
आईप्रमाणे त्री- देवांचे पालन-पोषण देवी अनुसूया करू लागतात. मात्र श्री देवांचे अनुपस्थिती ने पृथ्वीचे संचालन व्यवस्थित होत नसते. म्हणून त्रीदेविया ऋषी अत्रि व देवी अनुसया यांच्याकडे विनवणी करतात. तेव्हा ऋषी अत्रि पुन्हा एकदा कमंडलूतील जल बालकांवर शिंपडतात. त्रिदेव आपल्या पूर्व स्वरूपात येतात.
त्रिदेव देवी अनुसया वर प्रसन्न होऊन वरदान देतात. तेव्हा देवी अनुसुया म्हणाल्या, “ हे देव श्रेष्ठ, तुम्ही बाल रूपात माझ्या आश्रमात आलात, तर आपण एक तत्व होऊन पुत्ररूपाने येथेच राहावे.” तेव्हा त्रिदेव “ तथास्तु” म्हणून स्वस्थानी गेले.
तेव्हा ती तिन्ही बालके तेथेच आश्रमात राहिली. ब्रह्मदेव “चंद्र”, श्री विष्णुदेव “दत्त” आणि महेश “दुर्वास” झाले. कालांतराने ब्रह्मदेव व महेश देव तप साठी जाण्यासाठी गेले. विष्णुदेव दत्त म्हणून तेथेच राहिले .
ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि- अनुसुया यांचा पुत्र, श्री विष्णूचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले.
दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे.
दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
|| धन्यवाद ||
Perfect information 👌 👏 👍