Margashirsha Guruvar मार्गशीर्ष गुरुवार

Margashirsha Guruvar मार्गशीर्ष गुरुवार

श्री महालक्ष्मी महात्म्य

गुरुवारची कहाणी

|| ॐ ह्रीं महालक्ष्मीदेव्यै नमः ||

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण मार्गशीष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी जय महालक्ष्मी व्रता बद्दल जाणून घेणार आहोत.  हा लेख मी श्री केळकर गुरुजी यांच्या पुस्तकातून बघून लिहीत आहे. या लेखासाठी मी केळकर गुरुजी यांना धन्यवाद देते.

मार्गशीर्ष गुरुवार Margashirsha Guruvar in Marathi

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात.  आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत रहावे या इच्छेने भाविक हे व्रत करतात.  हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो.

शक्यतो हे व्रत मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी प्रारंभ करतात. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. पण काही कारणामुळे जर हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करायला जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतो.  व त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.  काही भाविक वर्षभर या व्रताचे पालन करतात.

लक्ष्मी व्रतात पूजा विधि, नियम, कहानी व आरती इत्यादींचा समावेश आहे. त्यावर श्रद्धा ठेवून मनोभावे पूजा केल्याने श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात.

पद्मपुराणात मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचा उल्लेख आढळतो.  त्यानुसार श्री लक्ष्मीदेवी ने असे कथन केले आहे की, “माझे हे व्रत जो नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे.”

मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम Margashirsha Guruvar Vrat Niyam in Marathi

  • गुरुवारी सकाळी लवकर उठावे. आंघोळ करावे.  शुद्ध अंतःकरणाने व  सश्रद्ध भावनेने पूजा विधी करावा.
  • दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे.
  • कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते. अशावेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा-आरती करून घ्यावी.
  • सायंकाळी गाईची पूजा करावी.तिला नैवेद्य खाऊ घालावा.
  • उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी. कहाणी वाचावी. सात सुहासणी अथवा कुमारिका यांना हळदीकुंकू द्यावे.  एक फळ द्यावे.
  • शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा, वस्त्र व दक्षिणा द्यावी.
  • दर गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी व सर्वांना प्रसाद वाटावा.

मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी Margashirsha Guruvar Puja Mandni in Marathi

  • घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी.
  • पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा.
  • चौरंगावर नवीन लाल किंवा गुलाबी कापड अंथरावे.
  • कापडावर गहू किंवा तांदळाची रास घालावी.
  • त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलश मध्ये दूर्वा, पैसा, व सुपारी घालावी.
  • विड्याची पाने किंवा आंब्याची पाने कलशावर ठेवून त्यावर नारळ ठेवावा.
  • चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा मूर्ती असल्यास ती ठेवावी.
  • मूर्तीपुढे वीडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा  गुळ ठेवावा.
  • त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.

अशी पूजेची मांडणी करावी.  मांडणी पूर्णपणे करून झाल्यावर यथासांग पूजा करावी.  पूजेनंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा.

संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करावी.  कलशातील पाणी तुळशीला घालावे.

श्री महालक्ष्मी देवी मंत्र Mahalaxmi Devi Mantra

श्री गणेशाय नमः | श्री महालक्ष्मी देवी नमः| ॐ श्रीं क्लृं ॐ धनद धनं देहिमाम | ॐधनदाय  नमस्तुभ्यम्  निधीपद्माधीपायच | भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यदि संपदः ||

महालक्ष्मी देवीची कहाणी Story of Margashirsha Guruvar in Marathi

श्री गणेशाय नमः | श्री महालक्ष्मी देवी नमः| ॐ श्रीं क्लृं ॐ धनद धनं देहिमाम | ॐधनदाय  नमस्तुभ्यम्  निधीपद्माधीपायच | भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यदि संपदः ||

मन लावून ऐकावी. ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी.

द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी, श्री महालक्ष्मी देवी

आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. भद्रश्रवा दयाळू, शूर, व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधुसंतांना सुखवीत होता. आनंद देत होता.

 राजाच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होत. नाव चांगलं होतं पण स्वभावात अहंकार होता. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणंन वैतागली. रागारागात घराबाहेर पडली.  अनवाणी पायाने रानातून जात होती. तिथे तिला सुहासिनी लक्ष्मीचं व्रत करत असताना दिसल्या.  त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला. पण या जन्मात भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळलो लागली. गर्वाने फुगली. गरिबांना विसरली. दास- दासी वर राघू लागली.

 एकदा काय झालं. देवीच्या ही मनात आल. आपण राणीला भेटावं. मागच्या जन्माची आठवण करून द्यावी. ती ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचं खूप कौतुक करी. तिचे सर्व लाड पूर्ण करी. त्या दोघांना सात पुत्र व एक कन्या झाली. कन्येचे नाव होतं शामबाला.

देवीचे म्हातारी रूप

एके दिवशी देवीने म्हातारीचे रूप घेतल. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. व आरोळी दिली- “ अरे, आहे का कोणी घरात ? कोणी घास देईल का?”.

एकदाची बाहेर आली. तिला म्हातारी दिसली. तिनं विचारलं, “ कोण ग तू?  आलीस  कुठून? काय काम काढल आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय?”  मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “ माझं नाव कमला. मी द्वारकेहुन आले ग!  राणीला भेटायचय ! कुठे आहे ग राणी ?”. दासी म्हणाली, “ राणीसाहेब महालात आहेत !   मैत्रिणीं शी गप्पा मारत आहेत ! त्यांना सांगितलं,  तर माझ्यावर रागावतील.  तुला ग त्या कशा भेटणार ! काय हा तुझा अवतार ! तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उणं-दुणं बोलतील. त्यांच्या मैत्रिणी देखील तुला  हसतील. तू जरा आडोशाला बस.  मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना !

”म्हातारी रागवली. मनोमन संतापली.  “ तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली.  दरिद्री मेली ! आज झाली राणी,  पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना ! मीच तिला देवीचे व्रत सांगितलं.  तिनं ते केलं ! आता राणी पदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा ! पैशाची धुंदी आली ! गोरगरिबांची पर्वा नाही.  थोरामोठ्यांच्या मुली, त्या झाल्या मैत्रिणी ! म्हातारी गरीब अन भिकारीन ! तिला कोण विचारतंय ! पण, याचा फळ तिला भोगावाच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी.

दासीचा उद्धार

दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, “ ते व्रत मला सांगाल ! मी ते नेमानं करीन ! उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.  दिलेला शब्द मोडणार नाही. “ त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली.

काठी टेकीत निघाली, तोच माडीवरून राणी चि कन्या शामबाला धावत आली.  ती कळवळून म्हणाली, “ आजी, रागवू नका.  चुकली माझी आई ! तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा.  दिलेला शाप मागे घ्या.  पाया पडते तुमच्या !  म्हातारीला मुलीची दया आली. तिने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं.  आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच माडीवरून राणी आली.  दाराशी येते, तर म्हातारी दिसली !

राणी ओरडली, “ ए थेरडे ! कशाला ग आलीस?  जा इथून ! उठ म्हणते ना ! जातेस की नाही?  दुसरी घरं नाही दिसली का तुला?

म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले.  कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली.  दासीनं लक्ष्मीव्रत केलं.  तिची स्थिती सुधारली ! दासी पण गेलं.  संसार सुखाचा झाला.  मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी लक्ष्मी व्रताची सुरुवात केली.  सगळे नेमधर्म पाळले.  चार गुरुवार तीन लक्ष्मीव्रत केलं.  शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.

श्यामबाले चा विवाह

सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर शी श्यामबाले चा विवाह झाला. राज वैभवतील शामबालेला राजवैभव मिळालं. हा होता,  लक्ष्मी व्रताचा प्रभाव.  सुखा-समाधानानं संसार चालू होता. 

भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे भाग्य मात्र फिरले.  शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवा राज्य लुबाडलं.  सुरतचंद्रिका च राणी पद गेल.  भद्रश्रवाला वाईट वाटलं.  पूर्वीचे दिवस आठवले.  रानावनात फिरुन राजा-राणी कष्टाने दिवस काढत होते.

म्हातारीचा शाप

भद्रश्रवाला कन्येला भेटावसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीन भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला.  शामबाला वडिलांची काळजी घेत होती.  काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं.  तसं त्यांना सांगितलं.  मुलीचा निरोप घेतला. जावयांना मोहरा भरलेला हंडा नोकरकडे देऊन राजासोबत पाठवलं.  राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला.  हंडा पाहून ती आनंदली. झाकण काढलं.  बघते तर काय, तिला दिसले.

गर्वाचे घर खाली

सुरतचंद्रीकेन कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला.  दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकत होता.  सुरत चंद्रिके चा एक एक दिवस दुःखाचा जात होता. 

एके दिवशी तिला मुलीला भेटावसं वाटलं. डोळे भरुन पहाव वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सुरतचंद्रिका घरुन निघाली.  मुलीच्या सासरी पोचली.  तो दिवस गुरुवारचा होता.  नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती.  त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं.  घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. “ तुमची आई आली आहे. नदीकिनारी बसली आहे. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा”.

श्यामबालेने  सारथी सोबत रथ नदीकडे पाठवला.  आईला घेऊन यायला सांगितलं.  आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्याम बालेने आनंदाने मिठी मारली.  मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना.  आईनं स्नान केलं.  मुलींना तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले.  आईचे रूप अधिकच खुललं.

लक्ष्मीची पूजा

दुपारची वेळ झाली. श्याम बालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली.  आरती झाली. धूप दीपांच्या वास दरवळला.  श्याम वालेचा कडकडीत उपवास होता.  भोजनाची तयारी झाली.  तिनं आईला जेवायला बोलावलं.  सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती.  तिला मागचा जन्म आठवला.  लक्ष्मी देवीच्या कृपेने ह्या जन्मी ती राणी झाली होती.  ती म्हणाली, “ श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन !”  शामात म्हणाली,  “ठीक आहे.” मार्गशीर्ष महिना होता.  मुलींना चारही गुरुवार व्रत केलं. ते आईने पाहिलं. तीही उपवास करू लागली.  देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती.  महिना संपला.  घरी जायचा विचार ठरला.  पोहोचवायला श्याम बाला सोबत गेली. 

चार दिवसांनी शामबाला निघाली.  मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला.  त्यामध्ये मीठ भरलं.  तो नोकरीला जवळ घेऊन ती पुन्हा सासरी आली.  गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता. याचे भान नव्हते.  मालाधरानं विचारलं, “ माहेरहून काय आणलं ?”. श्याम बालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं.  त्यात त्याला काय दिसलं ? मिठाचे खडे !

गुरुवार व्रताचे माहात्म्य कळले

“अगं वेडे,  मिठाचे खडे कशाला आणलेस?  इथे मिळत नाही मीठ?” . “ मीठ मिळतं ना ! पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे.  वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं.  त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ ! समुद्र तीरांवर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज……”.    श्याम बाले च्या शब्दातील खोच राजांना हेरली.  विचारात गुंगला.

शामबाला म्हणाली, “ हे मीठ जीवनाचं अमृत आहे. !  अन्नाला चव येते ती मीठानच ! मीठ नसलेला पदार्थ- अळणी ज्याची मीठ खावे त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं.  कामात कसूर झाला तर प्रसंगी प्राणही द्यावे.” मालाधर राजा निश्चयाने उठला.  ्याने आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले.  त्यांना बोलावून घेतले.

गुरुवार व्रतामुळे पुन्हा चांगले दिवस आले

भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. तो ताबडतोब जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला.  भद्रश्रवा ने अनुमती दिली.  मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलाविले. सेनापती आले.  त्यांनी मला धरायला वंदन केले, “ आज्ञा अकरावी महाराज”  ते म्हणाले, “ भद्रश्रवा चं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हांड्यामधील मिठाचा एकेक खडा ठेवा.  शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा.”  राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले.  मालाधरचे सैन्य बेभान लढत होते.  शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते.  सूर्य पश्चिमेकडे जात होता.  अंधार हळूहळू पसरत होता.  शेवटी मालाधरच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला.  अपूर्व विजय मिळविला. भद्रश्रवा च राज्य पुन्हा मिळविलं

 मालाधरला व श्याम बालेला  ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली.  सैनिकांनी शत्रु राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधरकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती  आणि शस्त्रांचा साठा ही होता. मालाधरानं  भद्रश्रवास् सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं.  ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं.  तो होता गुरुवार !  श्याम बाला हिन लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीप यांचा सुगंध दरवळला.  तिनं व तिच्या आईनं उपवास केला.  रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानचं जेवण केलं. 

मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस.  मालाधरानं  भद्रश्रवा चं राज्य त्याच्या स्वाधीन केलं.  त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले.  सुरत चंद्रिके ना पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले.  त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला.

 या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.  सर्वांनी देवीला वंदन करावे.  त्यांचं घर सदैव आनंदित रहावे अशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करावी.

लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र

प्रथमं भारती नाम | द्वितीयं तू सरस्वती | तृतीयं शारदा देवी | चतुर्थ हंसवाहिनी | पंचमं जगती ख्याता | षष्ठमं माहेश्वरी तथा | सप्तमं तत्तु कौमारी | अष्टमं ब्रह्मचारिणी | नवमं विद्याधात्री ती | दशमं वरदायिनी | एकादशं रुद्रघंटा | द्वादशं भुवनेश्वरी |  एतानी द्वादशो नामानि | यः पठेच्छृणुयादपि | नचो विघ्न भयं तस्य | सर्व सिद्धीकरं तथा |

लक्ष्मी आरती Laxmi Aarti

लक्ष्मी अष्टक Laxmi Ashtak In Marathi

Margashirsha Guruvar

महालक्ष्मी आरती Mahalaxmi Aarti In Marathi

Margashirsha Guruvar

धन्यवाद

1 thought on “Margashirsha Guruvar मार्गशीर्ष गुरुवार”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri