Hanuman Chalisa
हनुमान चालीसा Hanuman Chalisa in Marathi
हनुमान चालीसा एक कविता आहे.
चालीसा म्हणजे 40 चौपाई पासून बनलेली कविता होय. ही कविता बजरंग बली हनुमान यांना समर्पित आहे. हनुमान चालीसा मध्ये हनुमान जी च्या गुणांचे तसेच त्यांच्याद्वारा केलेल्या कठीण कार्यांची नोंद उत्तम प्रकारे या कवितेद्वारा रचना केली आहे.
भगवान श्रीराम यांना अति प्रिय असणारे हनुमान एक भक्त आहे. पण साक्षात देवाधिदेव महादेव यांचा अवतार आहे. रामायण मध्ये आपण देव आणि भक्त यांचे सुंदर नातं बघतो/ वाचतो.
हनुमान चालीसाचे पठण केल्याने भक्तांचे संकट दूर होतात म्हणून भक्त या रचनेला संकट मोचन हनुमान चालीसा असे देखील उल्लेख करतात.
प्रसिद्ध कवी व संत गोस्वामी तुलसीदास यांनी “हनुमान चालीसा” व “रामचरित मानस” या दोन प्रसिद्ध कवितांची रचना केली आहे. या दोन्ही ग्रंथांना हिंदू धर्मात खूप मान्यता दिली जाते.
Hanuman Chalisa Lyrics श्री हनुमान चालीसा
|| ॐ श्री गणेशाय नमः ||
लाल देह लाली लसे, अरु धरी लाल लंगूर |
वज्र देह दानव दलन, जय जय जय कपी सूर ||
|| दोहा ||
श्री गुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी |
बरनऊँ रघुबर बिमल जसू, जो दायकू फलचारि ||
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन कुमार |
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ||
|| चौपाई ||
जय हनुमान ज्ञान गुण सागर | जय कपीस तिहु लोक उजागर ||
राम दूत अतुलित बल धामा | अंजनी पुत्र पवनसुत नामा || 1 ||
महाविर विक्रम बजरंगी | कुमती निवार सुमती के संगी ||
कंचन बरन बिराज सुबेसा | कानन कुंडल कुंचित केसा || 2||
हाथ बज्र और ध्वजा बिराजे | कांधे मुंज जनेऊ साजै ||
शंकर सुवन केसरी वंदन | तेज प्रताप महा जगवंदन || 3 ||
विद्यावान गुणी अति चातुर |राम काज करिबे को आतुर ||
प्रभू चरित्र सुनीबे को रसिया | राम लखन सिता मन बसिया || 4 ||
सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा | विकट रूप धरी लंका जरावा ||
भीमरूपी धरी असुर संहारे | रामचंद्र के काज संवारे || 5 ||
लाय संजीवन लखन जियाये |श्री रघुवीर हरिषि उर लाये ||
रघुपति किन्हि बहुत बढाई | तुम मम प्रिय भरतही सम भाई || 6 ||
सहस्त्र बदन तुम्हरो जस गावैं |अस कही श्रीपदी कंठ लगावैं ||
सनकादिक ब्रह्मादि मनीसा | नारद सारद सहित अहिसा || 7 ||
जम कुबेर दिगपाल जहां ते | कबि कोबिद कहिं सके कहां ते ||
तुम उपकार सुग्रीवहिं किन्हा | राम मिलाय राजपद दिन्हा || 8 ||
तुम्हारो मंत्र बिभीषण माना | लंकेश्वर भए सब जग जाना ||
जुग सहस्त्र जोजन पर भानू | लिल्यो ताही मधुर फल जानू || 9 ||
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही | जलधि लांघे गये अचरज नाही ||
दुर्गम काज जगत के जेते | सुगम अनुग्रह तुमरे तेते || 10 ||
राम दुआरे तुम रखवारे | होत न आज्ञा बिनु पैसारे ||
सब सुख लहै तुम्हारी सरना | तुम रक्षक काहू को डरना || 11 ||
आपन तेज सम्हारो आपै | तीनों लोंक हांक तैं कापें ||
भूत पिशाच निकट नहिं आवैं | महावीर जब नाम सुनावैं || 12 ||
नासैं रोग हरे सब पिरा | जपत निरंतर हनुमंत बीरा ||
संकट ते हनुमान छुड़ावै |मन क्रम वचन ध्यान जो लावै || 13 ||
सब पर राम तपस्वी राजा | तीन के काज सकल तुम साजा ||
और मनोरथ जो कोई लावै | सोइ अमित जीवन फल पावै || 14 ||
चारो जुग परताप तुम्हारा | हे परसिद्ध जगत उजियारा ||
साधू संत के तुम रखवारे | असुर निकंदन राम दुलारे || 15 ||
अष्टसिद्धी नौ निधि के दाता | असबर दिन जानकी माता ||
राम रसायन तुम्हरे पासा | सदा रहू रघुपति के दासा || 16 ||
तुम्हरे भजन राम को पावै | जनम जनम के दुख बिसरावै ||
अंतकाल रघुबर पूर जाई | जहां जन्म हरि-भक्त कहाई || 17 ||
और देवता चित्त न धरई | हनुमंत सेइ सर्व सुख करई ||
संकट कटै मिटै सब पीरा | जो सुमिरै हनुमत बलबिरा || 18 ||
जै जै जै हनुमान गोसाईं | कृपा करो गुरुदेव की नाईं ||
जो सत बार पाठ कर कोई | छूटहिं बंदि महा सुख होई || 19 ||
जो यह पढै हनुमान चालीसा | होय सिद्धी साखी गोरीसा ||
तुलसीदास सदा हरि चेरा | कीजै नाथ हृदय मह डेरा || 20 ||
|| दोहा ||
पवन तनय संकट हरन, मंगलमूर्ती रूप |
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ||
सियावर रामचंद्र की जय महावीर हनुमान की जय
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
जय श्रीराम जय हनुमान
श्री हनुमान चालीसा पाठ मंत्र Hanuman Chalisa Mantra in Marathi
लाल देह लाली लसे, अरु धरी लाल लंगूर |
वज्र देह दानव दलन, जय जय जय कपी सूर ||
म्हणजेच
- ज्यांचे शरीर लाल आहे, जे आपल्या शरीरावर लाल रंगाचा सिंदूर लावतात.
- व ज्यांची शेपूट लांब आहे,
- वज्र समान ज्यांचे शरीर आहे, जे दानवांचा संहार करतात.
- अशा श्री कपि म्हणजेच श्री हनुमान यांना आमचा वारंवार नमस्कार
श्री हनुमान चालीसा पाठ व अर्थ Hanuman Chalisa Lyrics and Meaning in Marathi
ॐ श्री गणेशाय नमः
|| दोहा ||
श्री गुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी |
बरनऊँ रघुबर बिमल जसू, जो दायकू फलचारि ||
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन कुमार |
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ||
मराठी अर्थ
- हे पवन कुमार मी तुमचा ध्यान करत आहे. तुम्हाला माहीतच आहे हे की मी बुद्धीने तसेच शरीराने निर्मल आहे. तरी तुम्ही माझ्यावर कृपा करावी, मला बल, बुद्धी, विद्या आणि ज्ञान द्या. माझ्या दुःखांचा तसेच विकारांचा नाश करा.
- मी श्री गुरु महाराजांच्या चरणाच्या धुळीचं स्मरण आपल्या मनात करत आहे. आणि प्रभू श्रीराम यांच्या किर्तीचा वर्णन करीत आहे. यामुळे धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार फळांची प्राप्ती अवश्य होईल.
|| चौपाई ||
जय हनुमान ज्ञान गुण सागर | जय कपीस तिहु लोक उजागर ||
राम दूत अतुलित बल धामा | अंजनी पुत्र पवनसुत नामा ||
महाविर विक्रम बजरंगी | कुमती निवार सुमती के संगी ||
कंचन बरन बिराज सुबेसा | कानन कुंडल कुंचित केसा ||
हाथ बज्र और ध्वजा बिराजे | कांधे मुंज जनेऊ साजै ||
मराठी अर्थ
- हे हनुमंता तुमची सदैव जय असो. समुद्राच्या अथांग व्याप्तीप्रमाणे तुमचं ज्ञान व गुण आहेत. हे कपीश्वर तुमची जय असो. स्वर्गलोक, भूलोक पाताल लोक या तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती पसरलेली आहे .
- हे श्रीरामाचे दूत ,देवीअंजनी चे पुत्र, पवन पुत्र तुमचे बल अतुलनीय आहे.
- हे महावीर बजरंगी तुमचा पराक्रम विशेष आहे. तुम्ही कुमती ला दूर करतात. ज्यांची बुद्धी निर्मळ आहे त्यांच्या सोबत असतात,
- तुमचं शरीर स्वर्णा सारखं तेज आहे ,तुम्ही सुंदर वस्त्र, कानात कुंडल तसेच तुमची केस कुरळे आहेत. तुमच्या हातात वज्र व ध्वज आहे. मुंजी मध्ये घातलेले जनेऊ तुमच्या खांद्यावर सुशोभित आहे.
शंकर सुवन केसरी वंदन | तेज प्रताप महा जगवंदन ||
विद्यावान गुणी अति चातुर |राम काज करिबे को आतुर ||
प्रभू चरित्र सुनीबे को रसिया | राम लखन सिता मन बसिया ||
सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा | विकट रूप धरी लंका जरावा ||
भीमरूपी धरी असुर संहारे | रामचंद्र के काज संवारे ||
मराठी अर्थ
- हे केसरी नंदन तुम्ही भगवान शिव शंकर यांचे अवतार आहे. तुमच्या पराक्रमाची व यशाची कीर्ती संपूर्ण जगात आहे. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या विद्या मध्ये गुणी व चतुर आहात. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कार्यासाठी तुम्ही सदैव आतुर आहात. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कथा तुम्ही नेहमी ऐकता ; राम, लक्ष्मण, सीता तुमच्या मनात निवास करतात.
- माता सीता यांच्या भेटीसाठी तुम्ही सूक्ष्म रूप धारण केला, तर बिकट रूप धरून लंका ला जाळले, विशाल रूप धारण करून तुम्ही असुरां चा संहार केला, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कार्याला सफल करण्यासाठी हात भार लावला.
लाय संजीवन लखन जियाये |श्री रघुवीर हरिषि उर लाये ||
रघुपति किन्हि बहुत बढाई | तुम मम प्रिय भरतही सम भाई ||
सहस्त्र बदन तुम्हरो जस गावैं |अस कही श्रीपदी कंठ लगावैं ||
सनकादिक ब्रह्मादि मनीसा | नारद सारद सहित अहिसा ||
जम कुबेर दिगपाल जहां ते | कबि कोबिद कहिं सके कहां ते ||
मराठी अर्थ
- संजीवनी नावाची बुटी आणून तुम्ही लक्ष्मण चे प्राण वाचविले, आनंदाने प्रभू श्रीराम यांनी तुम्हाला मिठी मारली, तुमची खूप प्रशंसा केली. व तुम्हाला आपला प्रिय भाऊ भरत या समान मानले .
- तुमचे यश सहस्त्र तोंडाने गाण्यासारखे आहे आहे असे म्हणत प्रभू श्रीराम त्यांनी तुम्हाला पुन्हा मिठी मारली.
- श्री सनक आदि ऋषी, ब्रह्मदेव, इतर ऋषी, नारद मुनी ,देवी सरस्वती,शेषनाग हे सगळे तुमचे गुणगान करतात.
- यमराज, कुबेर, दिग्पाल ,कवी, विद्वान हे सगळे पूर्णपणे तुमचे गुण गाण करण्यासाठी असमर्थ आहेत .
तुम उपकार सुग्रीवहिं किन्हा | राम मिलाय राजपद दिन्हा ||
तुम्हारो मंत्र बिभीषण माना | लंकेश्वर भए सब जग जाना ||
जुग सहस्त्र जोजन पर भानू | लिल्यो ताही मधुर फल जानू ||
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही | जलधि लांघे गये अचरज नाही ||
दुर्गम काज जगत के जेते | सुगम अनुग्रह तुमरे तेते ||
मराठी अर्थ
- तुम्ही सुग्रीव यांना राजा श्रीराम यांच्याशी भेट करून दिली. या तुमच्या उपकारा मुळे सुग्रीव यांना राजपदाची प्राप्ती झाली.
- तुम्ही दिलेल्या युक्तीचे बिभिषन यांनी पालन केले, यामुळे त्यांना राजपद मिळाले ही गोष्ट जग जाहिर आहे.
- जो सूर्य हजार योजना इतका अंतरावर आहे की त्याला पोहोचायला युगे लागतात. तू तो सूर्य गोड फळ समजुन गिळलास.
- प्रभू श्रीरामचंद्र यांनी दिलेली अंगठी तोंडात धरून तुम्ही अथांग असा समुद्र ओलांडला ,
- जगामध्ये असणारे कठीण आती कठीण काम तुमच्या कृपा दृष्टीने सहज होऊन जातात.
राम दुआरे तुम रखवारे | होत न आज्ञा बिनु पैसारे ||
सब सुख लहै तुम्हारी सरना | तुम रक्षक काहू को डरना ||
आपन तेज सम्हारो आपै | तीनों लोंक हांक तैं कापें ||
भूत पिशाच निकट नहिं आवैं | महावीर जब नाम सुनावैं ||
नासैं रोग हरे सब पिरा | जपत निरंतर हनुमंत बीरा ||
मराठी अर्थ
- प्रभू श्रीरामचंद्र यांचे तुम्ही द्वारपाल आहात, तुमच्या आज्ञेशिवाय कोणीही प्रभू श्रीराम पर्यंत प्रवेश करू शकत नाही.
- जे कोणी तुमची शरणागती घेतो त्याला कसलीच भीती राहत नाही, जेव्हा तुम्ही रक्षण करता आहात तर तो सदैव आनंदी राहतो.
- तुमच्या तेज ला तुमच्या शिवाय कोणी दुसरं थांबू शकत नाही, तुमच्या हुंकाराने तिन्ही लोकात हाहाकार होतो.
- जिकडे महावीर हनुमान तुमचे नाव घेतात, तिकडे भूत पिशाच जवळ येऊच शकत नाहीत .
- हे हनुमंता ! तुमचा जप निरंतर केल्याने सगळे रोग दूर होतात, दुःख- दर्द तुम्ही हरून घेतात..
संकट ते हनुमान छुड़ावै |मन क्रम वचन ध्यान जो लावै ||
सब पर राम तपस्वी राजा | तीन के काज सकल तुम साजा ||
और मनोरथ जो कोई लावै | सोइ अमित जीवन फल पावै ||
चारो जुग परताप तुम्हारा | हे परसिद्ध जगत उजियारा ||
साधू संत के तुम रखवारे | असुर निकंदन राम दुलारे ||
मराठी अर्थ
- हे हनुमंता ! जो कोणी मन, कर्म, वचनाने तुमचं ध्यान करतो, त्यांचे पूर्ण संकट तुम्ही दूर करता.
- सगळ्यात तपस्वी व श्रेष्ठ राजा श्रीराम यांचे सर्व काम तुम्ही सहजच करून टाकले.
- तुमच्याजवळ जर कोणी मनोरथ/ इच्छा प्रकट केली, तर तुम्ही त्याचे निश्चितच योग्य फळ देतात.
- चारी युगात म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग मध्ये तुमची प्रतापाची चर्चा आहे ,सगळ्या जगात तुमची कीर्ती पूजा घर आहे.
- तुम्ही साधुसंतांचे रक्षणकर्ता आहात,असुरांचा विनाश करता, प्रभू श्रीराम यांचे तुम्ही लाडके आहात.
अष्टसिद्धी नौ निधि के दाता | असबर दिन जानकी माता ||
राम रसायन तुम्हरे पासा | सदा रहू रघुपति के दासा ||
तुम्हरे भजन राम को पावै | जनम जनम के दुख बिसरावै ||
अंतकाल रघुबर पूर जाई | जहां जन्म हरि-भक्त कहाई ||
और देवता चित्त न धरई | हनुमंत सेइ सर्व सुख करई ||
मराठी अर्थ
- तुम्ही अष्ट सिद्धी व नऊ निधी चे दाता आहात, या वरदानाची प्राप्ती तुम्हाला जानकीमाता कडून मिळाली आहे.
- तुमच्याकडे सगळ्या दुःखांना नाश करणाऱ्या या राम नावाची औषधी आहे, तुम्ही सदैव रघुपति राम यांचे सेवक आहात.
- तुमचे भजन केल्याने भक्त श्रीराम यांना देखील प्राप्त करू शकतात, भक्तांचे जन्म- जन्मांचे दुःख दूर होऊ शकतात.
- तुमची भक्ती केल्याने अंतिम काळी भक्त श्रीराम यांच्या वैकुंठधामला जातो, या जन्मात तो हरिभक्त म्हणून जाणला जातो.
- हे हनुमंता ! तुमची भक्ती केल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही देवाची भक्ती करण्याची आवश्यकता नाही,केवळ तुमच्या भक्तीनेच सर्व सुखांची अनुभूती होते.
संकट कटै मिटै सब पीरा | जो सुमिरै हनुमत बलबिरा ||
जै जै जै हनुमान गोसाईं | कृपा करो गुरुदेव की नाईं ||
जो सत बार पाठ कर कोई | छूटहिं बंदि महा सुख होई ||
जो यह पढै हनुमान चालीसा | होय सिद्धी साखी गोरीसा ||
तुलसीदास सदा हरि चेरा | कीजै नाथ हृदय मह डेरा ||
मराठी अर्थ
- जे भक्त सदैव बलवीर हनुमान यांचे गुणगाण करतात, त्यांचे आयुष्यातील संकट- पीडा मिटून जातात.
- हे हनुमान गोसाई ! तुमचा सदैव जय जयकार होवो, जयकार होवो, जयकार होवो ! श्री गुरुदेव यांच्याप्रमाणे तुमचीही कृपादृष्टी सदैव माझ्यावर असुद्यात.
- जो भक्त शंभर वेळा हनुमान चालीसा चे पठण करेल , त्याची सर्व बंधनातून मुक्तता होईल व त्याला महा सुखाची प्राप्ती होईल.
- जे कोणी हनुमान चालीसा वाचेल त्याला सिद्धी प्राप्त होईल, या गोष्टीचे साक्षी स्वयम् महादेव आहेत.
- श्री तुलसीदास म्हणतात की, “ मी नेहमीच श्रीहरीचा चेला आहे, हे नाथ ! तुम्ही माझ्या हृदयात नेहमीच निवास करा.
|| दोहा ||
पवन तनय संकट हरन, मंगलमूर्ती रूप |
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ||
मराठी अर्थ
हे पवन पुत्र, संकट मोचन, मंगलमूर्ती हनुमान, तुम्ही राम लक्ष्मण सीता यांच्या सोबत माझ्या हृदयात निवास करा.
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
जय श्रीराम जय हनुमान
|| धन्यवाद ||
Very nice and good information