ॐ गण गणपतये नमः
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
चातुर्मासाची ओळख/चातुर्मास म्हणजे काय? Introduction of Chaturmas in Marathi
आजचा आपला विषय आहे चातुर्मास. चातुर्मास हा एक संस्कृत शब्द आहे. चातुर्मास या नावातच त्याचा अर्थ लपलाय. चातुर म्हणजे चार आणि मास म्हणजेच महिना म्हणून चातुर्मास म्हणजेच चार महिन्याचा कालावधी. हा कालावधी खूप पवित्र असतो.आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला जेव्हा सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरू होते. व कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला जेव्हा सूर्य तुला राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संपतो.या कालावधीत भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागर मध्ये झोपावयास जातात.
काही ठिकाणी लोक आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून ते कार्तिक महिन्यातील पौर्णिमेपर्यंत सुद्धा चातुर्मासाचे पालन करतात.
हे चार महिने खूप पवित्र मानले जातात.म्हणून या कालावधीत पूजा, यज्ञ, तप, तपश्चर्या, गंगा- स्नान, उपवास यांचे विशेष महत्त्व आहे. आपापल्या मान्यता नुसार खूप लोक मौन व्रताचे सुद्धा धारण करतात. काही ठिकाणी आपल्याला प्रिय असणारी वस्तू सुद्धा सोडण्याची प्रथा आहे. तर काहीजण दिवसातून केवळ एकदाच जेवण करतात. या कालावधीत पाऊस असल्यामुळे सुद्धा कदाचित माणसांची प्रतिकार शक्ती कमी होते म्हणून देखील ही प्रथा असू शकते.
चातुर्मास कोण कोण करू शकतो? Who can perform Chaturmas Vrat in Marathi
ज्या व्यक्तीमध्ये प्रबळ इच्छा असते ती प्रत्येक व्यक्ती चातुर्मासाचे व्रत करू शकते. ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य ,शूद्र असे कोणतीही वर्ण असलेली व्यक्ती हे व्रत करू शकते.
- ब्रह्मचारी असणारी व्यक्ती.
- गृहस्थ जीवन जगत असलेली व्यक्ती.
- वानप्रस्थ स्वीकारलेली व्यक्ती.
- संन्यास घेतलेली व्यक्ती.
चातुर्मासात येणारे चार महिने 4 Holy months in Chaturmas in Marathi
- श्रावण
- भाद्रपद
- अश्विन
- कार्तिक
श्रावण: (11th July 2022 to 8th August 2022)
चातुर्मासातील या व्रताला शाक व्रत असे म्हटले जाते. शाक म्हणजेच पालेभाज्या. पावसाळ्यामुळे पालेभाज्यांमध्ये खूप किटाणू आढळून येण्याची शक्यता असते. म्हणूनच चातुर्मासातील या पहिल्या महिन्यात पालेभाज्या वर्ज असतात.
मेथी, पालक, शेपू इत्यादी खात नाहीत.
भाद्रपद :(9th August 2022 to 7th September 2022)
चातुर्मासातील या दुसऱ्या व्रताला दही व्रत असेही म्हटले जाते. दही व्रताची सुरुवात श्रावण शुक्ला तील द्वादशी पासून होते. व भाद्रपद शुक्ला तील पक्ष एकादशीला शेवट होतो. सर्दी खोकला यांसारख्या विकारापासून लांब राहण्यासाठी कदाचित या महिन्यात दही खात नसावेत. पावसाच्या ओलाव्यामुळे किटाणू ची संख्या बरीच वाढलेली असते .दही मधील बॅक्टेरिया मुळे रोगराई वाढण्याची शक्यता असते. म्हणून दही वर्ज करत असावेत.
अश्विन:(8th September to 6th October)
चातुर्मासातील हा तिसरा महिना म्हणजेच तिसरा उपवास शिरा व्रत म्हणूनही ओळखले जाते. या महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ वापरत नाहीत. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला सुरू होते.
कार्तिक: (6th October,2022 to 4th November,2022)
चातुर्मासातील या चौथ्या व्रताला द्विदला व्रत असेही म्हटले जाते. या महिन्यात उडदाची डाळ वर्ज केली जाते. हा महिना अश्विन शुक्ल पक्षातील एकादशीला सुरू होऊन कार्तिक शुक्ल एकादशीला समजतो. कार्तिक शुक्ल एकादशी लाच देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात.
चातुर्मासाचे महत्त्व Importance of Chaturmas in Marathi
मानवी जीवन हे काही सोपं नसतं. जीवन जगण्यासाठी तो काही धारणा बांधतो. व त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्या हातून कळत नकळत काही पाप घडून येतात. या अशा पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चातुर्मास ही योग्य वेळ आहे. तपश्चर्या, यज्ञ, तप, दान या गोष्टींच या महिन्यात विशेष महत्त्व असते. म्हणून चातुर्मासाच प्रत्येक व्यक्तीने थोडाफार तरी पालन करावे. व मनुष्य रुपी या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. असं म्हणतात माणूस अध्यात्मिक कडे वाटचाल करून भक्तिभावाने पुण्य कमवून देवाला प्राप्त करू शकतो. म्हणजेच 84 कोटी योनी मधील फक्त मनुष्य याच योनि मार्फत आत्मा जीवन-मरणाच्या चक्रातून सुटू शकते.जीवनात झालेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चातुर्मास ही योग्य वेळ मनुष्यजवळ असते. या चार महिन्याच्या कालावधीत मानवाने केले पाहिजे.
सकाळची वेळ म्हणजेच ब्रह्म मुहूर्ततात केलेल्या जपाला विशेष महत्व असते. व चातुर्मासातील चार महिने सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्त तात जप्त करण्यात विशेष महत्त्व मानले जाते. यावेळी भगवंताचे नाव घेऊन मनुष्य मोक्षाच्या प्राप्ति ला पात्र बनवू शकतो.
वैज्ञानिक दृष्ट्या चातुर्मास Scientifically Importance of Chaturmas in Marathi
- पावसामुळे तापमानात जो बदल होतो तो तप ,यज्ञ केल्याने संतुलन होत असावा.
- वातावरणातील ओलाव्यामुळे जे किटाणू जन्म घेतात त्यांचाही नाश होत असावा.
- प्रतिकार शक्ती मध्ये येणाऱ्या बदलामुळे मौनव्रत तसेच एक वेळ जेवण व उपवास करत असावेत.
- ब्रह्मचर्य, मौनव्रत ,उपवास या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्य स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकतो.
- आहारातील काही घटकांना वर्ज करून तामसिक पदार्थांपासून दूर राहायला शिकतो.
- प्रवचन, व्याख्यान पुराणांचे वाचन हे करून व्यक्तीमध्ये भक्तीचा भाव येऊन अध्यात्मिक ते कडे वाटचाल सुरू होते.
- ज्ञानामध्ये भर पडून माफ करण्याची वृत्ती वाढते. त्यामुळे आपापसातली नाती घट्ट होऊन प्रेम वाढण्याची शक्यता असते.
विविध धर्मातील चातुर्मासाबद्दल असलेली प्रथा तसेच विचार.
चातुर्मासबद्दल हिंदूधर्मामध्ये असलेली प्रथा/Chaturmas in Hinduism in Marathi
चातुर्मासाच्या कालावधीत असे मानले जाते सर्वच हिंदू जातींचे देव झोपावयास अथवा विश्रांतीस जातात. म्हणून या काळात लग्न, वास्तु पुजा मुंज असे मोठे समारंभ करण्याची पद्धत नाही आहे. उलट् चार महिन्याच्या कालावधीत यात्रा, देवधर्म यज्ञ, पूजा अभिषेक इत्यादी करण्याची पद्धत आहे. विविध मंत्रांचा जप करणे. देवतांचे ध्यान करणे. यज्ञांमध्ये आहुती देणे. उपवास करून स्वतःवर नियंत्रण ठेवणे. असं सगळं करून सकारात्मक भावनांचा उदय होतो. बाहेर पडणाऱ्या पावसामुळे व्यक्तीला घरातच बसून राहावे लागते त्यामुळे निराशा येण्याची शक्यता असते म्हणूनच कदाचित देवधर्म जास्त केला जातो.
वर्ज असलेल्या वस्तू
- कांदा व लसुन खात नाहीत.
- वांगी खात नाहीत.
- अंडी तसेच मांसाहार खात नाहीत.
- कोणतेही व्यसन करत नाहीत.
- स्त्री पुरुष समागम करत नाहीत.
- काहीजण गादीवर न झोपता खाली फरशीवर झोपतात.
चातुर्मासात जैन धर्मामध्ये असलेली पद्धत Chaturmas in Jainism in Marathi
जैन धर्मामध्ये चातुर्मासाला विशेष महत्त्व असते. चातुर्मास हा सण वर्ष योग या नावाने ओळखला जातो. विशेषतः जैन धर्मातील साधू व तपस्वी बायका यांचा असा विश्वास असतो, पावसाळ्यात डोळ्यांना न दिसणारे लहान लहान किडे जन्म घेतात. म्हणून ते समूहात चार महिने एकत्र राहतात. या कालावधीत ते मौन व्रत धारण करतात. तपश्चर्या व उपवास करून सामान्य जनतेला जैन धर्मा बद्दल भाषण देतात.
जे साधू मठामध्ये राहून भिक्षुक जीवन व्यतीत करत असतात ते , पर्वतांमध्ये तपश्चर्या करून आपले जीवन जे व्यतीत करत असतात असे सर्व साधू चातुर्मासमध्ये एकत्रित समूहात एका ठिकाणी राहतात. अशा गुरुंना सामान्य जनता आपल्या घरी बोलावतात. अशा भाविकांचे घरी जाऊन हे साधू धर्माचे, कर्माचे, योग साधने बद्दल भाषण देतात. आपल्या अनुभवातून भाविकांना मार्गदर्शन करतात.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात जैन या समाजाचा पर्युषण नावाचा खूप महत्वाचा एक पर्व असतो. पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे विकारांचे शमन करणे. जैन संप्रदायातील उपासकान प्रमाणे ,मानवी स्वभावात असणाऱ्या काम, क्रोध, लोभ तसेच वैमनस्य या विकारांमुळे मनुष्य आपल्या कर्मामध्ये जे काही अयोग्य गोळा करतो त्यांना धुण्याचे म्हणजेच नष्ट करण्याचे काम चातुर्मास या कालावधीत होते.मनातील विकारांचे शमन होणे असे इथे अपेक्षित असते. या व्रतात अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ,अस्तेय या पाच नियमांचे पालन करावे लागते.पृथ्वी मनुष्य आपण केलेल्या पापांची क्षमा मागून पश्चाताप करतो.
यावर्षी पर्युषण 24 ऑगस्ट, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत आहे.
पौराणिक कथा Traditional story of Chaturmas in Marathi
एका पौराणिक कथा नुसार गुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली असुरांचा राजा महावीर बळी यांनी तिन्ही लोकात आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं. तो खूप दानवीर व बलशाली होते.अशांमध्ये त्याला हरवणं किंवा थांबवणं इतकं सोपं होतं. यज्ञा नंतर बळीराजा हे नेहमी दान पुण्य करत असत. ते वचनाचे एकदम पक्के होते.
एकदा बळीराजा यांच्या राजमहालात खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता . त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णू यांनी एका लहान मुलाचं रूप धारण केलं. या प्रभूंच्या अवतारलाच वामन अवतार असे म्हणतात. यज्ञ संपताच वामन भगवान यांनी बळीराजाला तीन पाय भूमी दान म्हणून मागितली. बळीराजाने लगेचच त्यांना वचन दिले. भगवंत स्वतःच्या मोठ्या स्वरूपात आले. एका पायाने पृथ्वी लोक र दुसर्या पायाने स्वर्गलोक व्यापले. आता तिसऱ्या पायाने कुठे ठेवू हा प्रश्न त्यांनी बळीराजाला विचारला. बळीराजा देखील आपल्या वचनाचा पक्का होता. तो प्रभुं समोर वाकून म्हणाला तुम्ही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. प्रभूंनी आपला तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवताच राजा पाताळलोकात गेला.
भगवंतांनी पृथ्वीलोक व स्वर्गलोक बळीराजा कडून पुन्हा घेतले. पण त्याची दानशूरता बघून ते प्रसन्न झाले. व त्याला वरदान मागण्याची विनंती केली. त्याने वरदानात भगवंतांना त्याच्याबरोबर पाताळ लोक येथे राहण्याची विनंती केली. भगवंतांनी त्याला तसे वरदान देऊन त्याच्याबरोबर पाताळ लोक येथे निवास करण्यासाठी गेले. मात्र देवी लक्ष्मी व सर्व देव यांना चिंता वाटू लागली. म्हणून देवी लक्ष्मी यांनी एका गरीब मुलीचं रूप घेऊन बळीराजाला राखी बांधली. व त्याला भगवंतांना सोडण्यासाठी विनंती केली. बळीराजाने भगवंतांना वचनातून मुक्त केले. पण भगवंत राजाला असे निराश बघून अस्वस्थ झाले. व त्यांनी दरवर्षी चार महिने त्याच्या बरोबर येऊन पाताळ लोक मध्ये राहतील असे वचन दिले. म्हणून असे म्हटले जाते चातुर्मासातील चार महिने भगवान श्रीहरी आपली जबाबदारी भगवान शिव यांना सोपवून पाताळ लोक आत जातात.
चातुर्मासात भगवान शिव यांचे रौद्ररूप पृथ्वी लोकावर नियंत्रण करत असतं. म्हणून श्रावण महिन्यात शिव अभिषेक, रुद्र पूजा यांचे विशेष महत्त्व असते.
अजून एका प्रचलित कथेनुसार श्रीहरी विष्णू व राक्षस मुरा यांच्यात घमासान युद्ध झाले होते. त्यामुळे थकून श्रीहरी विष्णू हे योगनिद्रा मध्ये जातात. ही योगनिद्रा ची वेळ म्हणजेच चातुर्मास.
सण जे चातुर्मासात येतात Festivals in Chaturmas in Marathi
- गुरुपौर्णिमा
- श्रावण अमावस्या
- हरियाली तीज
- नागपंचमी
- नारळी पौर्णिमा
- रक्षाबंधन
- हरतालिका
- गणेश उत्सव
- गोपाळ काला/ दहीहंडी
- नवरात्री उत्सव/घटस्थापना
- दसरा
- दिवाळी
- भाऊबीज
- पाडवा
चातुर्मासात येणार्या एकादशीची नावे Ekadashi names in Chaturmas in Marathi
- कामिका एकादशी
- श्रावण पुत्रदाएकादशी
- अजा एकादशी
- पार्श्व एकादशी
- वैष्णव एकादशी
- पपकुंषा एकादशी
- रमा एकादशी
- देव उठणी एकादशी
चातुर्मासात येणाऱ्या आठ एकादशीचे विशेष महत्व असते. या एकादशीचे पालन करण्याची पद्धत आहे. या एकादशी ना अन्नदान देण्याला विशेष महत्व आहे.
खूप छान माहिती ???
तुम्ही स्वतःचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Your zeal is contagious. It’s impossible not to feel captivated by the topics you cover.