Pola Bailpola festival बैल पोळा 2023

ॐ नमः शिवाय

बैलपोळा 2023 Bail Pola 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

माझ्या शेतकरी मित्रांनो ना तसेच तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

बैल पोळा Bail Pola श्रावणी अमावस्या. 

आजचा आपला विषय आहे बैल पोळा Bail Pola. 

बैल पोळा श्रावण महिन्याच्या अमावस्येला येतो. सरत्या श्रावणात हा सण साजरा केला जातो.  श्रावण महिना आला म्हणजे सणांची सुरवात झाली समजा. नागपंचमीरक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, स्वतंत्रता दिवसगोकुळाष्टमी, हरियाली तीज , श्रावणी सोमवार, श्रावणी मंगळवार, श्रावणी शुक्रवार, हे सगळे साजरे केल्यानंतर सरत्या श्रावणाला म्हणजेच श्रावण पिठोरी अमावस्येला बैलपोळा येतो.

बैलपोळा नावानेच आपल्याला कळून येते आहे. बैलपोळा हा सण बैलांना समर्पित आहे. बैलपोळा या सणाला कर्नाटक येथे “बिंदुर” या नावाने ओळखले जाते. भारत कृषिप्रधान देश आहे. कृषिप्रधान म्हणजेच सर्वात जास्त शेती / कृषी उत्पादन करणारा देश आहे. बैल हा शेतकरी चा खरा मित्र असतो.

”नांगरणी”, “पेरणी”, या सर्व प्रमुख कार्यात बैल शेतकऱ्याची मदत करत असतो. वर्षभर बैल शेतात शेतकऱ्यासमानच राबतो. आपल्याला जे काही अन्नधान्य उपलब्ध होते, ते उत्पादन करण्यात मोलाचा वाटा जो उचलतो तो बैल असतो.

बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा.

बैलपोळा 2023 कधी आहे?

हिंदी पंचांगानुसार प्रत्येक महिना पौर्णिमेपासून बदलतो. राखी पौर्णिमेनंतर भाद्रपद महिना सुरू होतो.

हिंदी पंचांगानुसार बैल पोळा ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ला येते. भाद्रपद अमावस्या असे म्हटले जाते.

मात्र, महाराष्ट्र व कर्नाटकात बैलपोळा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरा केला जातो. म्हणून ह्याला श्रावणी अमावस्या देखील म्हटले जाते.

बैल पोळा हा सण गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जाणार आहे.

शुक्रवार, १५ सप्तेंबर २०२३ हा दिवस श्रावणातील शेवटचा श्रावणी शुक्रवार असून जिवती पूजा उद्यापन केले जाईल.

  • अमावस्या प्रारंभ: गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ रोजी आहे.
  • अमावस्या समाप्ती: शुक्रवार, १५ सप्तेंबर २०२३ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी समाप्ती होत आहे.
  • नक्षत्र: पूर्वा
  • योग: साध्य

गुरुवार, १४ सप्तेंबर २०२३ यादिवशी मातृदिन साजरा केला जाणार आहे. पिठोरी अमावस्या, बृहस्पति पूजन देखिल आहे

Bail Pola images - Bail Pola

बैल पोळा कसा साजरा केला जातो? How to celebrate Bail Pola in Marathi

बैलपोळा हा सण बैलांना समर्पित असतो. बैलांप्रती शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा. बैलांचा आरामाचा दिवस असतो.  या दिवशी बैलांकडून कोणतेही काम काढून घेतले जात नाही. . 

  • सकाळी बैलांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांना चारा दिला जातो.
  • बैलांच्या अंगावर नक्षीकाम केलेली शाल टाकतात.
  • गळ्यात फुलांचा हार व घुंगरू टाकतात. पायाला सुद्धा घुंगरू बांधतात.
  • हळदीने \ पिवळ्या रंगाने बैलांना रंगविले जाते.
  • बैलांच्या शरीरावर नक्षीकाम देखील करतात.
  • बैलांच्या शिंगांना सुद्धा रंगीबिरंगी केले जाते.
  • शिंगांवर बाशिंग बांधले जातात.
  • शिंगांना गोंड्यांनी सजवतात.
  • घरातील स्त्रिया बैलांसाठी पुरणाचा नैवेद्य बनवतात.
  • बैलांची आरती ओवाळून त्यांना नैवेद्य दाखवला जातो.
  • पुरणपोळी, चणे, गुळ इत्यादी बैलांच्या आवडते च्या वस्तू त्यांना खायला दिल्या जातात.
  • शेजारील, गावातील बैलांना आमंत्रण देऊन त्यांनादेखील नैवेद्य दिला जातो. 
  • ढोल, ताशे इत्यादी वाजंत्री वाजवत गाजत, नाचत – गात बैलांची मिरवणूक काढली जाते.
  • गावातील सर्व बैल ठराविक ठिकाणी किंवा  गावातील मारुती मंदिराजवळ जमा होतात.
  • प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्टपणे सजवतो.

त्याठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

  1.  उत्कृष्ट सजवलेला बैलाला पारितोषिक दिले जाते.
  2.  कुस्ती स्पर्धा
  3.  धावणे
  4.  कबड्डी
  5.  खो-खो

इत्यादी स्पर्धा होतात. याप्रकारे पूर्ण दिवस आनंदात व्यतित केला जातो.

  • ज्यांच्याकडे स्वतःचे बैल नसतात. त्यांच्याकडे बैलाची मातीची प्रतिमा बनवून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे.
  • बैलांच्या काही प्रसिद्ध जोड्यांची नाव सर्जा – राजा, ढवळ्या – पवळ्या ही आहेत. म्हणून महाराष्ट्रातील काही ठिकाणी बैल पोळा या सणाला सर्जा – राजाचा सण देखील म्हणतात.

नंदीबैल

भगवान शिव शंकर शंभू यांच्या वाहन एक बैलच आहे. ”नंदीबैल” हे त्याचे नाव आहे. भगवान शिवशंकर शंभू यांच्या या प्रत्येक देवळात नंदीबैलाची प्रतिमा असते. देवळात गेल्यावर प्रथम नंदीबैलाचे दर्शन घेतो. 

Nandi images - Bail Pola

माझा आवडता प्राणी बैल निबंध My favorite animal Bail / Ox in Marathi

आपल्या देशामध्ये खूप प्राणी पाळले जातात. प्रमुख कुत्रा मांजर हे प्राणी आवडीने पाळले जातात. कोंबडी व अंड्यांचा व्यवसाय करणारे कोंबड्यांचे पालन करतात.

शेतकरी मात्र विशेष करून गाय, म्हैस व बैल पाळतो. गाय म्हशी पासून त्याला दूध मिळते. पण बैल हा त्याला शेतात मदत करतो. म्हणून बैला शेतकऱ्याचा मित्र असतो. बैल खूप कष्टाळू प्राणी आहे. बैलाचे लांब व मजबूत पायामुळे नांगरणी करण्यास मदत होते. बैलाला लाकडी गाडीने  जुंपवतात. म्हणजेच जोडून गाडी तयार केली जाते. या गाडीला बैलगाडी असे म्हणतात.

पूर्वीच्या काळी ज्या वेळी इंजिन / यंत्राच्या गाड्या नव्हत्या. त्यावेळेस बैलगाडी, घोडा गाडी यांचा वापर मालवाहतुकीसाठी केला जायचा. आजही शेतकरी शेतामध्ये उत्पन्न  होणारे उत्पादन बैलगाडी च्या मदतीने मालवाहतूक करतो.  महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे बैल आढळून येतात. इतर प्राण्यांच्या तुलनेने बैलांमध्ये अधिक कष्ट करण्याची क्षमता आहे. 

ग्रामीण भागात होणाऱ्या बैलगाडी स्पर्धा, दोन बैला मधील झुंज, बघण्यात विशेष आनंद येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. बैलपोळा बैलांना समर्पित असतो. म्हणून मला बैल हा प्राणी खुप आवडतो.

7 thoughts on “Pola Bailpola festival बैल पोळा 2023”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri