वाचन संस्कृती Vachan Sanskriti

वाचन संस्कृती Reading Habit Vachan Sanskriti 

 

पुस्तकांना मित्र मानले जाते. पुस्तक वाचल्याने तीळ तीळ ज्ञान वाढते. ‘पुस्तक म्हणजे जागृत देवता, त्याची सेवा केल्याने त्वरित वरदान मिळवता येतेअशी महती आहे. पुढील पाठ्य आपली नात मिताली हिलावाचनाचे महत्त्व’ सांगण्यासाठी आजोबांनी लिहिलेले एक पत्र आहे.

vachan sanskriti
reading habit

 

मिताली जोशी,

 गुरुकृपा सोसायटी,

 चारकोप कांदिवली,

 मुंबई४०००६७

 दिनांक१९ जून २००८

 

प्रिय मिताली,

आजकल कशी चालली पुण्याची हवा? काल तुझ्या वडिलांकडून तुला इयत्ता सहावी मध्ये कमी क्रमांक आल्याचे कळले. पण बेटा, तू निराश होऊ नयेमी आज तुला एक महत्त्वाची गुरुकिल्ली देणार आहेज्यामुळे आयुष्यातील कोणत्याही गोष्टीला तू ठामपणे लढा देऊ शकतेस. ती म्हणजेवाचन करणेही जीवनाची गुरुकिल्ली आहे. vachan sanskriti

 

पुस्तके म्हणजे ज्ञान भंडार. पुस्तकाच्या माध्यमातून आपण जीवनाचे धडे अवगत करून घेऊ शकतो. प्रेम, भीती, राग, द्वेष या सगळ्या भावनांमध्ये जगण्याची कला पुस्तक देऊन जातात

आपल्या स्वभावतालच्या जगाचे प्रवेशद्वार म्हणूनही आपण पुस्तकांकडे बघू शकतो. बाह्य जगाचे ज्ञान हे पुस्तकाच्या माध्यमातून घेतले जाऊ शकते. जीवनातील अपयशांवर मात करण्यास तसेच मनाला आकार देण्यास पुस्तक अविभाज्य घटकासारखे वापरू शकतो.

कुठलीही महान व्यक्ती ही वाचनामुळेच महान बनू शकते. आपण जर कुठल्याही महान व्यक्तीचे आत्मचरित्राचे अध्ययन केले, तर हे दिसून येते.लहान असल्यापासून आपल्याकडून अक्षर ओळखणे, लिहिणे,वाचणे, पाठांतर करणे या गोष्टी करून घेतल्या जात असतात. एकदा का वाचनाची आवड निर्माण झाली की आपोआपच पूर्ण आयुष्यभर वाचनाशी मैत्री होते

भारतातील शिक्षण क्षेत्र, सरकारी क्षेत्र, उद्योगी क्षेत्र अशी सर्वच क्षेत्रे हुशार व्यक्तींसाठी आहेत. त्यातील गूढ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वाचनाची गोडी आवश्यक आहे. चांगले भविष्य घडवण्यासाठी आणि उज्ज्वल कीर्ती मिळवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. vachan sanskriti

आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे आपल्याला वाचनातून कळते. आयुष्यातील वेगवेगळ्या दिशांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य वाचनातून प्राप्त होते. बुद्धीची आणि तर्कदृष्टीची धार वाढवण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीला पर्यायाने कुटुंबाला, समाजाला एक नवीन विकासाची दृष्टी प्राप्त होते

आज मोबाईल, तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याद्वारे ग्रंथालय तुमच्या हातातच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या माध्यमातून जगभरातील लेखक तुमच्या भेटीला येत असतात. त्यांचा उपयोग करून घ्या. तुमच्या सुप्त गुणांचा विकास होऊ द्या. एकदा का शब्द तुमच्या साथीला आले की मानवी गुण आणि व्यक्तिमत्त्व प्रकाशित होत असते.

दररोज वर्तमानपत्र जरी वाचायला सुरुवात केली तरी पूर्ण जगाची सफर तुम्ही एका दिवसात करून येऊ शकता. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चालले आहे हे तुम्हाला समजते. मानवी मूल्ये, अध्यात्मिक गुण, काव्यरचना, लेखन कौशल्ये, वक्तृत्व कौशल्य असे नानाविध गुण तुम्ही वाचनातून विकसित करू शकता. vachan sanskriti

 

बेटा, पण पुस्तक समजण्यासाठी काही वेळा ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात. मगच त्यामधील गुढ अर्थ आपणास समजतोया सगळ्या फायद्यांसाठी तसेच उज्वल भविष्यासाठी  वाचनामध्ये आवड निर्माण करून घेतली पाहिजे

आज निश्चितपणे तुला वाचनाचे महत्व कळले असणार. तू लवकरच एखादी कादंबरी वाचून त्याबद्दल मला पत्राद्वारे लवकरच कळवशील ही अपेक्षा. माझा आणि आजीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे

तुझा लाडका आजोबा,

पुरुषोत्तम 

vachan sanskriti

 

 Krishnas Ranchod Rai Story 

Chandrayaan

Katha Londonchya Ajjibaichi

श्री स्वामी समर्थ वीडियो

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri