श्रीगुरुचरित्र कथा सारासहित Shri Guru Charitra Katha Sar

श्रीगुरुचरित्र कथा सारासहित Shri Guru Charitra Katha Sar

नमस्कार मंडळींनो,

 आज पासून आपण श्री गुरुचरित्रचा Shri Guru Charitra पाठ सुरू करतोय तो सुद्धा कथा सारासहित. आणि आपल्या दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक होतो तरी श्रद्धा भावे करणे हे महत्त्वाचे. म्हणून आज पासून आपण रोज एक अध्याय बघूयात.

Shree Guru Charitra

श्रीगुरुचरित्रा विषयी थोडक्यात माहिती Introduction Of Shree Guru Charitra In Marathi

  • श्रीसरस्वती गंगाधर विरचित ‘श्रीगुरुचरित्र’ Shri Guru Charitra हा अत्यंत प्रासादिक व रसाळ ग्रंथ आहे.
  • गुरुसंस्थेचे माहात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे.
  • नामधारकांच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रेयांची अवतार कथा, अंबरीष राजांची कथा, धौम्य ऋषींची कथा, इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले, तरी श्रीगुरुचरित्राचा मुख्य विषय श्रीनृसिंहसरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे.
  • या अपूर्व चरित्रग्रंथात श्रीदत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे.
  • याच्या पहिल्या नऊ अध्यायांत श्रीपादश्रीवल्लभांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे.
  • दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून शेवटपर्यंत श्रीनृसिंहसरस्वतींचे अवतारकार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे.

खरे सांगायचे, तर अकराव्या अध्यायापासूनच या अद्वितीय श्रीगुरुचरित्राला प्रारंभ होतो. हा दत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा, एक अजोड ग्रंथ आहे. दत्तसंप्रदायात ‘श्रीगुरुचरित्र’ Shri Guru Charitra वेद म्हणून मान्यता पावले आहे. या चरित्रग्रंथाने पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत.

‘श्रीगुरुचरित्र’ Shri Guru Charitra या ग्रंथाचे कर्ते श्रीसरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते. ते श्रीनृसिंहसरस्वतींचे पट्टशिष्य सायंदेव यांचे पाचवे वंशज होते. श्रीनृसिंहसरस्वतींच्या अवतारकार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके १४५० (इ. स. १५२८) दरम्यान ‘श्रीगुरुचरित्र’ Shri Guru Charitra प्रकट झाले. या ग्रंथाच्या आरंभी श्रीसरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्वपरंपरा सांगितली आहे, त्यावरून श्रीसरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्यगोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईंचे नाव चंपा. त्या आश्वलायन शाखेच्या काश्यपगोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधुपुरुषांच्या कन्या होत्या. 

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, Shri Guru Charitra

दत्त बसे औदुंबरी । त्रिशूळ डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान। उभे शोभती समान।।

गोदातीरी नित्य वस्ती। अंगी चर्चिली विभूती ।। काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ।।

श्रीदत्तात्रेयांचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. तशी दत्तभक्तांची श्रद्धाच आहे. म्हणून सर्व दत्तभक्त औदुंबरतळी बसून शुद्ध भावनेने श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत, त्या श्रीदत्तात्रेयांना अंतः नःकरणापासून सांगून श्रीगुरुचरित्राचे नित्य पारायण केले आणि दर गुरुवारी पूजा करून श्रीगुरुचरित्राच्या सप्ताहाला श्रद्धेने सुरुवात केली, तर सप्ताहसमाप्तीच्या वेळी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाला दत्तसंप्रदायात गुरुमाहात्म्य सांगणारा, उपासनामार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा आणि मानवी आचारधर्मांचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाणग्रंथ म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा आहे. हा श्रीदत्तात्रेयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे. श्रीगुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्तसंप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. श्रीगुरुचरित्राच्या शेवटी एक ओबी आहे –

अंतःकरण असता पवित्र। सदाकाळ वाचावे गुरुचरित्र । सौख्य होय इहपरत्र। दुसरा प्रकार सांगेन।।५३:८४।। 

सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगों यथास्थिति । शुचिर्भूत होवोनि शास्त्ररिती। सप्ताह करितां बहुपुण्य ।।५३:८५।। 

याचा सोपा अर्थ असा आहे की, पवित्र अंत:करणाने श्रीगुरुचरित्राचा सप्ताह केला, तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. पारायणकर्त्याने सप्ताहकाळात मौन ठेवून, एकाच जागेवर बसून, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथवाचन करावे. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते, प्रसन्न होते आणि समाधान पावते. श्रीगुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे –

ऐसें सप्ताह अनुष्ठान । करितां होय श्रीगुरुदर्शन । भूतप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ।।५३ः९५।। 

‘श्रीगुरुचरित्र’ हा एक सिद्ध ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करत याचे पारायण केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचावा.

श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? How to recite Sri Guru Charitra? In Marathi

  1. अंतःकरण पवित्र ठेवून श्रीगुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले, तरीसुद्धा श्रीगुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. 
  2. ज्या लोकांना ७ दिवसांत पारायण करायचे असेल, त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्रीगुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. श्रीदत्तजयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे श्रीदत्तजयंतीला समाप्तीचा दिवस येतो.
  3. सकाळी शक्यतो लवकर उठावे.
  4. आपली रोजची स्नानसंध्यादी कर्मे प्रथम करावीत.
  5. हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे, तो आपला हेतू सांगून – ‘तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे’- असे म्हणून पाणी सोडणे, याला संकल्प करणे असे म्हणतात.

अशा प्रकारे संकल्प करून श्रीगणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी.

  1. पुस्तकरूपी श्रीगुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी.
  2. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा.
  3. हे सर्व झाल्यानंतर श्रीगुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी.

गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे नियम Rules To Follow During Gurucharitra Week In Marathi

  1. पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी.
  2.  पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.
  3. रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये.
  4. रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये.
  5. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा.
  6. रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे.
  7. सात दिवस ब्रह्मचर्यव्रत पाळावे.
  8. पारायणसमाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणांना भोजन व दक्षिणा देऊन नंतरच उपवास सोडावा.अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत-प्रेत-पिशाच यांची बाधा होत नाही, सर्व प्रकारची सुखसमृद्धी लाभते.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||

Shree Guru Charitra

 धन्यवाद.

 ब्लॉग मध्ये काहीही राहिल्यास कृपया आपला दृष्टिकोन मेसेज मार्फत कळवावा.  मनाने ,  श्रद्धेने,  संयमतेने  तसेच भक्ती भावाने केलेल्या प्रत्येक गोष्टींचे फळ निश्चित रुपी प्राप्त होते.  परंतु ते केव्हा व कसे हे सर्व देवाच्या  व कर्माच्या हाती असते.  म्हणून श्रद्धा भाव आणि भक्ती भाव असणे गरजेचे आहे. 

1 thought on “श्रीगुरुचरित्र कथा सारासहित Shri Guru Charitra Katha Sar”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri