Shakambhari Navratri Purnima
शाकंभरी नवरात्र Shakambhari Navratri Purnima in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आरोग्यदायी व प्राणदायिनी शाकंभरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता,
नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः ||
पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी जयंती साजरी केली जाते. शाकंभरी देवी ही देवी दुर्गा चेच स्वरूप आहे.
मानव कल्याणासाठी देवी दुर्गा हिने पौष महिन्यातील पूर्णिमेला शाकंभरी देवी चे रूप घेतले होते अशी मान्यता आहे.
आदिशक्ती देवी दुर्गा हिचे सौम्य मातृ रुपी स्वरूप म्हणजे शाकंभरी देवी होय.
पौष पौर्णिमेला माहूर गडाची देवी रेणुका हिची रथयात्रा काढली जाते.
शाकंभरी नवरात्र Shakambhari Navratri Purnima in Marathi
पौष महिन्यातील अष्टमीला शाकंभरी नवरात्रीची सुरुवात होते. वर्षभरात एकूण तीन नवरात्री साजरी केली जातात.
- चैत्र नवरात्र : गुढीपाडवा ते राम नवमी पर्यंत
- शारदीय नवरात्र: अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत
- शाकंभरी नवरात्र : पौष शुद्ध अष्टमीपासून ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत.
विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र तर जवळपास संपूर्ण भारतात शारदीय नवरात्र थाटामाटात साजरी केली जाते. मात्र शाकंभरी नवरात्री बद्दल बऱ्याच जणांकडे पुरेशी माहिती नसते.
शाकंभरी नवरात्री चे महत्व, वैशिष्ट्य यांची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या “ धर्म बोध” या ग्रंथातून जाणून घेऊयात.
शाकंभरी देवीचा मंत्र Shakambhari Mata Mantra in Marathi
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता,
नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः ||
शाकंभरी= शाक म्हणजे हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या उत्पन्न करणारी देवी म्हणजेच शाकंभरीदेवी होय. वरील मंत्रात क्षुधारुपेण या शब्दाचे उच्चारण आले आहे, याचा अर्थ आहे, कोणत्याही प्रकारची क्षुधा म्हणजेच भुकेचे निवारण करणारी माता.
शाकंभरी नवरात्रीची कथा Shakambhari Navratri Story in Marathi
शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा “देवी भागवत” मध्ये आहे.
एकदा आपल्या देशात दुष्काळ पडला. वर्षानुवर्ष पावसाने हजेरी लावली नाही. याचा परिणाम अन्नपाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे लोक तडफडून प्राण सोडू लागले. पृथ्वी लोकांची अशी दीन अवस्था बघून आदिमाता दुर्गा देवीला दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. मानव प्रजातीला खाऊ घालून त्यांचे प्राण वाचविले. म्हणूनच तिला “शाकंभरी” हे नाव प्राप्त झाले. क्षुधा शांत करणारी “शाकंभरी” देवी असे तिचे नाव प्रसिद्ध झाले.
महाभारतातील वनपर्वा मध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले होते, म्हणून तिला “ शाकंभरी” हे नाव मिळाले अशी देखील एक कथा प्रचलित आहे.
शाकंभरी देवीची पूजा विधि Shakambhari Mata Puja Vidhi in Marathi
पौष शुद्ध अष्टमीला शाकंभरी देवीची नवरात्री सुरू होते. या नवरात्रीचे पूजा विधि हे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्री सारखेच आहे.
अनेक देशस्थ ब्राह्मण कुटुंबांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिला “ बनशंकरी” या नावाने देखील ओळखले जाते. या बनशंकरी चे विजापूर राज्यातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो. तसेच वर्षभर प्रत्येक शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.
शाकंभरी देवीचा नैवेद्य Shakambhari Mata Naivedya in Marathi
पौषपौर्णिमेला देवीला कमीत कमी 60 किंवा 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
देवीला विविध रंगीबिरंगी फळ भाज्या, पालेभाज्या, फळ इत्यादींपासून बनविलेले अलंकार घातले जातात.
पौष पौर्णिमेला शाकंभरी देवी उत्पन्न होऊन तिने अनेक जीवांच्या प्राण्यांचे रक्षण केले होते. म्हणून ही पौर्णिमा प्राणशक्ती देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
शाकंभरी देवीची तीन शक्तीपीठे Shakambhari Mata 3 Shakti Peeth in Marathi
शाकंभरी देवीची तीन शक्तीपीठे आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
- पहिले शक्तिपीठ पहिले शक्तिपीठ राजस्थान जिल्ह्यातील सिकर उदयपूर वाटी जवळ “सकराय माता” या नावाने ओळखले जाते
महाभारत काळात युद्धानंतर पांडव आपल्या नातेवाईकांच्या हत्येचे पाप विमोचनासाठी अरावली पर्वत रांगेत जाऊन राहिले होते, अशी मान्यता आहे.
त्यावेळी तिथे युधिष्ठिराने माता शाकंभरी च्या मूर्तीची स्थापना व पूजा केली होती. मोठमोठ्या पर्वतरांगांमध्ये शेखावटी प्रदेश स्थित आहे.
तेथील सिकर नाव असलेल्या एका जिल्ह्यात हे मंदिर स्थापित आहे. तेथील अमराई, धबधबे, नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षून घेतात.
या शक्ती पिठावर नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसून येतो. तेथेही देवी खंडेलवाल वंशाची देवी म्हणूनही ओळखली जाते.
त्या ठिकाणी असलेल्या शिलालेखावर हे देऊळ सातव्या शतकात निर्माण झालेले आहे असे कळून येते.
नवरात्रीतील नऊ दिवस हा परिसर भाविकांनी गजबजलेला असतो.
- दुसरे शक्ती पीठ : दुसरे शक्ती पीठ राजस्थान राज्यांमधील सांभार या जिल्ह्यात आहे. हे तेथील प्रसिद्ध देवस्थान आहे. या जिल्ह्याचे नामकरण देवीच्या नावावरून झाले आहे असे म्हटले जाते. तिथे एक प्रसिद्ध धबधबा देखील आहे.
महाभारतानुसार हे क्षेत्र वृष पर्व नावाच्या एका असुर राजा चे होते. असुरां चे गुरु शुक्राचार्य हे देखील तिथे मुक्काम करीत असत. शुक्राचार्य यांची कन्या देवयानी व ययाती यांचा विवाह याच परिसरात झाला होता.
याच ठिकाणी शाकंभरी देवीची स्वयंभू मूर्ती सापडली होती. हेच आज देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त येथील एक सरोवर देखील प्रसिद्ध आहे.
- तिसरे शक्तीपीठ : शक्ती पीठ उत्तर प्रदेशातील मेरठ जवळ आहे. याठिकाणी शाकंबरी नावाची नदी आहे. तिचे पाणी, डोंगर पर्वत रांगा, धबधबा इत्यादी आकर्षक गोष्टी आहेत.
- शिवलिक पर्वत स्थित हे शक्तिपीठ आहे.
निष्कर्ष Conclusion in Marathi
थंडीमध्ये भूक खूप लागते, अर्थात जेवणही भरपूर खाल्ले जाते. आपल्याकडे अशी मान्यता आहे थंडीमध्ये आपण ताकदीच्या पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे तसेच व्यायाम देखील केला पाहिजे.
राजस्थानात पाण्याची कमतरता असल्याने उंट आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवतो. त्याप्रमाणे थंडीत गोळा केलेली ताकत वर्षभर कामी येते.
आपला समाज आरोग्याबद्दल सजग झाला आहे. आहार तज्ञ फळे, भाज्या, कोशिंबीर, विविध भाज्यांचे रस खाण्याचा सल्ला देतात. थंडीमध्ये विविध भाज्या बाजारात उपलब्ध देखील असतात.
प्रतिकार शक्ती मध्ये वाढ करण्यासाठी या भाज्या आहारात येणे गरजेचे असते. देवीचे नैवेद्याचे निमित्ताने आपण त्या घरांमध्ये आणतो व आहारात समावेश करतो/ केला पाहिजे. प्रसाद म्हणून शेजारच्या ना, नातेवाईकांना देखील खाऊ घातल्या पाहिजे. गरजू लोकांना पालेभाज्या फळं यांचे दान दिले पाहिजे. जेणेकरून आरोग्य उत्कृष्ट ठेवता येईल.
यावर्षी शाकंभरी नवरात्री 30 डिसेंबर 2022 रोजी प्रारंभ झाली. शांकभरी पौर्णिमा 6 जानेवारी 2023 रोजी साजरी करण्यात येईल.
धन्यवाद
Very informative ????