Margashirsha Month
ॐ महालक्ष्मी नमः I
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः I
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
पुढे सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा,
आजचा आपला विषय आहे मार्गशीर्ष महिना
पुणे जिल्ह्यातील संजीव वेलणकर लिहितात की, मार्गशीष महिन्याला माता लक्ष्मी यांचा महिना सुद्धा म्हटला जातो. चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करतो. अशी मान्यता ठेवून हिंदू पंचांगानुसार मराठी महिने ठरविले जातात. एकूण 27 नक्षत्रांची पैकी मृगशीर्ष नक्षत्र ज्यावेळी चंद्राच्या सानिध्यात येतं. अशा वेळी जो महिना सुरू असतो तो महिना मार्गशीर्ष महिना म्हणून ओळखला जातो.
केशव मास Keshav Mass in Marathi
संस्कृत भाषेमध्ये मार्गशीर्ष महिन्याला केशव मास देखील म्हटले जाते.
कार्तिक एकादशीला भगवान श्रीविष्णु योगनिद्रा यातून जागे होतात. चातुर्मास संपतो. (भगवान विष्णू चार महिने योगनिद्रा जातात त्याला चातुर्मास म्हणतात.) मार्गशीर्ष महिन्यापासून जगाचे पालकत्व पुन्हा भगवान श्रीविष्णु यांच्याकडे येत असल्याकारणाने या महिन्याला केशव मास म्हणून संबोधले जाते. माता लक्ष्मी यांच्यासोबत पितांबर धारी विष्णू हेमंतऋतूचे स्वागत करतात.
पूर्वीच्या काळी मार्गशीर्ष महिन्यात एकूण 90 प्रकारांची व्रत केली जात असे. मात्र कालांतराने काही व्रत मागे पडली आहेत, तर काही व्रतांचे पालन भाविक आजही पूर्ण समर्थनाने करतात. म्हणून या महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना असे देखील संबोधले जाते.
या महिन्यात आपल्या कर्मांमध्ये पुण्य वाढवण्यासाठी व्रत केले जातात.
मार्गशीर्ष महिना Margashirsha Month in Marathi
मार्गशीर्ष महिना देव-देवतांच्या आराधनेसाठी पवित्र व महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिना लक्ष्मीचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.
सगळीकडे प्रिय असलेला लक्ष्मी व्रत या महिन्यात केला जातो. लक्ष्मी व्रताची सुरुवात गुरुवारी केली जाते. लक्ष्मी व्रत करताना लक्ष्मी स्त्रोत वाचण्याची पद्धत आहे. लक्ष्मी स्त्रोतामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे उत्तम रित्या वर्णन केले आहे.
“पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात वसे लक्ष्मी अंश,
तोच योग्य लक्ष्मीव्रतास,प्रत्येक वषीर् सर्वदा…..”
असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगते.
अग्रहायण Agrahayan in Marathi
खरिपाचे पीक घरात आलेले असते, वाड्यांमध्ये भाजीपाला पिकलेला असतो. यामुळे “रांजणात धान्य व तिजोरीत लक्ष्मी” या म्हणीचा साक्षात्कार घडतो. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण असेही म्हणतात. या महिन्यात भाग्याची साथ लाभावी, लाभ व्हावा, संतती सुख मिळावे, अशा विविध गोष्टींसाठी व्रत केली जातात.
मार्गशीर्ष महिन्याचे महत्व Margashirsha Month Importance in Marathi
“बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं |
मासानां मार्गशिर्षोंsहं, ऋतुनाम कुसुमाकरः” ||
(सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजेच बृहत्साम होय. छंदमध्ये उत्कृष्ट असा गायत्री छंद,
तसेच सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतु सर्वश्रेष्ठ आहे.) असा अर्थ वरील पंक्तीचा होतो.
भगवद्गीतेमध्ये विभूतियोग हा दहावा अध्याय आहे. या अध्यायामध्ये वरील पंक्तीचा उल्लेख आहे.
भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला विश्वातील संपूर्ण गोष्टी कशा माझ्यातच समाहित आहे याचे वर्णन केले आहे.
याचे वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण यांनी मार्गशीष महिन्याला सर्वोत्तम मास असे संबोधले आहे.
मार्गशीष महिन्यातील प्रत्येक दिवसाचे एक वैशिष्ट्य आहे.
मार्गशीर्ष महिना सणवार, व्रत वैकल्य, केशव मास, लक्ष्मीचा महिना इत्यादी नावाने ओळखला जातो.
त्याचप्रमाणे या महिन्यातील जवळपास प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मार्गशीषच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी व्रत केले जाते.
यावर्षी मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबर 2022, गुरुवार लक्ष्मीच्या दिवसा पासूनच सुरू होत आहे.
चंपाषष्ठी Champa Shashti in Marathi
महिन्यातील पहिला दिवस प्रतिपदा नावाने ओळखला जातो. महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीच्या खंडोबा राया यांचे पूजन केले जाते. हे पूजन चंपाषष्ठी पर्यंत केले जाते.
सहा दिवसांचा कालावधी ‘खंडोबाचा नवरात्र’ म्हणून ओळखला जातो.
खंडोबाचे नवरात्र म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या युद्धातील विजयाचा सोहळा असतो.
त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध झाल्यामुळे देव दिवाळी साजरी केली जाते. त्याच प्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते.
देवीचे नवरात्री मध्ये आपण मातीचे घर बसवतो. त्याप्रमाणेच मार्गशीर्ष प्रतिपदेला कलश स्थापना केली जाते.
ताम्हण मध्ये तांदूळ ठेवून त्यावर पाणी भरून तांब्या / कलश स्थापना केली जाते. अखंड दिवा सुद्धा लावण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा यांचा उत्सव साजरा केला जातो. यालाच षडरात्रोत्सव किंवा खंडोबाची नवरात्र असे म्हणतात.
माणि मल्ल या दोन दैत्यांनी लोकांचा अपार छळ करत होते. त्यावेळी भगवान शिवशंकर यांनी मल्हार रुपी योद्धाचेअवतार धारण केले. हे घनघोर युद्ध सहा दिवस चालले. या युद्धामध्ये दोन्ही दैत्य मरण पावले. तो दिवस म्हणजेच चंपाषष्ठी चा होता.
- चंपाषष्ठी च्या दिवशी खंडोबा रायाला मशाल ओवाळले जाते.
- पुरण वांग्याचे भरीत ,कांदापात असे खंडोबारायाच्या आवडती चे पदार्थ म्हणून दाखवले जाते.
- कुत्रा ,गाय घोडा या प्राण्यांना नैवेद्य दिला जातो.
- जेजुरीच्या तळावर भंडार करून त्यातलं खोबरं आणि भंडारा खंडोबा राया उधळून उत्सव साजरा केला जातो.
- खंडोबा वर चंपक म्हणजेच फळांच्या फुलांची वृष्टी केली जाते. म्हणून या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे संबोधले जाते.
आजही मल्हार भक्त चंपाषष्ठीला खूप मोठा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात व कर्नाटकात खंडोबारायाची एकूण बारा देऊळ आहेत. पण त्यापैकी महाराष्ट्र स्थित जेजुरीचे भाविकांमध्ये विशेष स्थान आहे.
प्रतिपदा Pratipada in Marathi
प्रतिपदेला शिव गौरी यांची मानस पूजा केली जाते. धनधान्य सुख संपत्ती भरभराटी यासाठी प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला मानस पूजा करतात. मानस पूजा म्हणजे मनामध्ये भगवंतांचे प्रतिमा गृहीत करून नामस्मरण करणे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते.
द्वितीया Dwitiya in Marathi
द्वितीयेला पितृ पूजन करतात. पितृ देवतांना स्मरण केले जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना नैवेद्य दाखविला जातो. (पितृपंधरवडा)
तृतीया Tritiya in Marathi
तृतीयेला फल त्याग नावाचे एक व्रत केले जाते. यामध्ये कोणत्याही एका फळाचा वर्षभरासाठी त्याग केला जातो. म्हणजेच वर्षभर ते फळ खात नाही. कोणत्याही वस्तूचा त्याग करणे यामागे मनावरील नियंत्रण ही भावना असते.
चतुर्थी Chaturthi in Marathi
चतुर्थी ही तिथी आपल्या सगळ्यांचे प्रिय गणपती बाप्पांना समर्पित आहे. प्रथम पूज्य गणेश यांनाच मार्गशीष महिन्यातील चतुर्थी समर्पित आहे.
पंचमी Panchami in Marathi
मल्हार हे भगवान शिव शंकर यांचे रूप आहे. भगवान शिव वासुकी नाग याला आभूषण म्हणून आपल्या गळ्यात धारण करतात. खंडोबाच्या नवरात्रीत म्हणून पंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते.
मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला श्रावणातील नागपंचमी प्रमाणे नागांची पूजा केली जाते. घरातील पुरुषांच्या दिर्घआयुष्यासाठी गोरगरिबांना अन्नदान करण्याची पद्धत आहे. शिव गौरी पुत्र कार्तिकेय ने या तिथीला तारकासुराचा वध केला होता म्हणून ही तिथी महा तिथी म्हणूनही ओळखली जाते.
षष्ठी Shashti in Marathi
मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी या चंपाषष्ठी या नावाने ओळखली जाते.
या दिवशी ब्रह्म देवांसाठी कमळ पुष्पाचे दान दिले जाते.
त्याच प्रमाणे वस्त्र दान करण्याची देखील पद्धत आहे. मार्गशीर्ष महिन्यात गारठा खूप असतो. म्हणून कपड्यांन अभावी थंडीने थरथरणारे लोकांना शाल, ब्लॅंकेट, स्वेटर इत्यादी कपड्यांचे दान दिले जाते. आज कल देवांना देखील चंपाषष्ठीला लोकरीचे कपडे घातले जातात.
सप्तमी Saptami in Marathi
सप्तमी तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. म्हणून या दिवशी सूर्य पूजा केली जाते.
अष्टमी Ashtami in Marathi
अष्टमी ही तिथी दुर्गाष्टमी म्हणूनही ओळखली जाते. तसेच मार्गशीर्ष अष्टमीला दत्त दिगंबर यांच्या नवरात्रीचा उत्सव सुरू होतो.
या उत्सवाची समाप्ती पौर्णिमेला होते.
नवमी Navmi in Marathi
मार्गशीष नवमी तिथीला माता चंडिका चे पूजा केली जाते. म्हणून या तिथीला नंदिनी नवमी असे म्हणतात.
दशमी Dashmi in Marathi
इंद्र, कुबेर यांच्यासह दहा दिशांच्या या देवतांची पूजा केली जाते.
एकादशी Ekadashi in Marathi
मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते. ही एकादशी मोक्ष मिळवण्यासाठी केली जाते.
भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला याच दिवशी भगवद्गीता म्हणजेच कर्म व धर्म यांविषयी ज्ञान दिले होते. म्हणून या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते.
पौर्णिमा दत्तजयंती Poornima Datt Jayanti in Marathi
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी भगवान श्री दत्तगुरु यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.
अष्टमी या तिथी पासून पौर्णिमेपर्यंत भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. म्हणून या संपूर्ण सप्ताहाला गुरु गुरुचरित्राचे पारायण सप्ताह असे देखील संबोधले जाते.
निष्कर्ष Conclusion of Margashirsha Month in Marathi
वरील सर्व घडामोडी लक्षात घेता मार्गशीर्ष महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ का आहे याचे कारण कळते.
थंडगार वातावरण, तुळशी पूजनापासून सुरू झालेली लग्नसराई, प्रतिपदेपासून सुरू झालेले खंडोबा नवरात्र, महालक्ष्मीचे व्रत, देव दिवाळी, गीता जयंती, दत्त जयंती एकूणच हर्ष उल्हासित वातावरण असते.
Khup mast
chaan महिती व्रत कशी करावी ते पण सांगा