Khara Mitra – An Ally for Life
नमस्कार मित्रांनो,
आपण मराठी लिहिण्याची आवड असल्यामुळे मी आजपासून काही मराठीतील छान मोटिवेशनल स्टोरीज व त्याच्या संदर्भातील मराठी ग्रामर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे आवडल्यास नक्की सांगा
आपला ब्लॉग हा दोन मित्रांविषयी त्यांच्या मैत्रीविषयी तसेच लहान मुलांना खऱ्या आणि खोट्या मधील फरक समजवण्यासाठी देण्यात आला आहे. Khara Mitra
काय शिकाल? Khara Mitra
पाठवर्णन Khara Mitra: जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला दुसऱ्या व्यक्तीसोबत परिपूर्ण मानते, त्याच्याबरोबर असलेल्या त्रासांना स्वतःचे समजते तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे दुःख वाटू शकते. जरी रक्ताचे नाते, जातीय संबंध नसले तरीही भावनिकरित्या दुसऱ्याशी जुडणे म्हणजेच मैत्री होय. या पाठात मैत्रीचा खरा अर्थ एका काल्पनिक कथेद्वारा बघूयात.
- मैत्रीचा खरा उद्देश्य काय?
- भविष्यासाठी केल्या जाणाऱ्या अभ्यासावर चर्चा करणे.
- शब्दांच्या चार जाती व त्याच्या उपजाती योग्य उदाहरणांद्वारे समजून घेऊया.
- नामांचे तीन प्रकार व त्याचे वर्गीकरण करूया.
मित्र बनवणे ही एक कला आहे. मित्र बनविणे हे एक विज्ञान आहे. मैत्री शेवटपर्यंत सांभाळणे ही देखील एक कला आहे. जेव्हा दोन मित्र एकमेकांबद्दल दयाळू आणि सहनशील नसतात तेव्हा ती मैत्री लवकरच संपते.
मैत्रीचा उद्देश सेवा घेण्यापेक्षा सेवा देणे असावा. खरा मित्र व खोटा मित्र यांच्यातील फरक माहित असणे आवश्यक आहे. खोटा मित्र नेहमीच आपल्या स्वार्थासाठी मैत्री करतो. पण अशी मैत्री जास्त काळ टिकत नाही. खऱ्या मैत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी आता आपण एक छोटीशी कथा बघणार आहोत.
सिद्धांत आणि साहिल हे दोघं आठ वर्षांचे होते. दोघांची घर एकमेकांच्या शेजारीच होती. त्यांच्या शाळेचे नाव ‘जिजामाता’ होते.
दोघेजण इयत्ता तिसरी वर्ग ‘क’ मध्ये होते. पण सिद्धांत साहिलवर खार खाऊन असायचा. तो कधीच त्याच्याशी बोलायचा नाही. उलट नेहमीच काहीतरी खोड करायचा. पण साहिल कधीच या गोष्टींचा वाईट वाटून घेत नव्हता. सिद्धांत अतिशय बुद्धिमान, चपळ होता. मैदानी खेळात तर तो अव्वलच यायचा. साहिल शांत, मनमिळाऊ होता.
एके दिवशी वर्गामध्ये गणिताचा तास होता. वर्गशिक्षिका पाढ्यांची पुनरावृत्ती करून घेत होत्या. मुलं बे एक बे, बे दुने चार… असं मोठमोठ्याने ओरडून म्हणत होते.पाढे म्हणता म्हणता सातच्या पाढ्यावर मुलं पोहोचली. साहिलला सात चा पाढा येत नव्हता.
साहिल सात चा पाढा बोलताना चुकला. सिद्धांत ने इतर मित्रांबरोबर साहिलला खूप चिडवलं. साहिलला वाईट वाटलं. तो रडू लागला.
दुसऱ्या दिवशी शाळेत सर्व वर्गांमध्ये धावण्याची शर्यत लागणार होती. वर्ग ‘क’ मधून सिद्धांतची निवड झाली होती. सिद्धांत खूप खुश होता. तोच ही प्रतिस्पर्धा जिंकेल असा विश्वास त्याला होता. स्पर्धेसाठी त्याने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी त्याने नवीन शूज खरेदी केले होते. स्पर्धेचा दिवस उगवला. नवीन शूज घालून सिद्धांत शाळेत गेला. मात्र शूज नवीन असल्यामुळे ते त्याला चावत होते. सिद्धांत रडकुंडीला आला. त्याला कळत नव्हते आता काय करावे.
तेवढ्यात साहिल ने पुढे येऊन स्वतःच्या पायातील शूज काढून सिद्धांत ला दिले. सिद्धांत ने साहिल चे शूज घालून स्पर्धेत भाग घेतला. सहजपणे सिद्धांत स्पर्धा जिंकला. सिद्धांत मुळे त्यांच्या वर्गाला ट्रॉफी मिळाली. ट्रॉफी घ्यायला जाताना सिद्धांत ने साहिलला बरोबर नेले. अशी साहिल व सिद्धांत यांच्यात घट्ट मैत्री झाली.
सिद्धांत आणि साहिल या दोघांचे सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. मोठे होऊन दोघेही त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि सैन्यात सामील होतात.
लवकरच त्या दोघांना देशसेवेची संधी मिळते. युद्धभूमीवर त्या दोघांना लढायला पाठवण्यात आले. युद्धभूमीवर दोघांनीही शत्रूचा धैर्याने सामना केला.
मात्र या युद्धात सिद्धांत गंभीर जखमी झाला. हा प्रकार साहिलला कळताच क्षणी तो सिद्धांतच्या दिशेने धावू लागला. मात्र कमांडर ने त्याला थांबवले आणि म्हणाले, “आता तिकडे जाण्यात वेळ वाया घालवू नकोस, तुझा देखील जीव धोक्यात येईल.”
मात्र साहिलने कमांडरची सूचना फेटाळली आणि जखमी मित्राला घेण्यासाठी गेला. तो परत आला त्यावेळेस सिद्धांत त्याच्या खांद्यावर होता. हे पाहून कमांडर म्हणाले, “मी तुला आधीच चेतावणी दिली होती, तिकडे जाऊन काही उपयोग नाही. उगाचच तुम्ही वेळेचा अपव्यय आणि जिवाचा धोका मोल घेतला.”
यावर साहिल म्हणाला, “नाही सर, मी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो आनंदाने माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला- मित्रा, मला खात्री होती, तू येशील. त्याच्या डोळ्यातील आनंद आणि मैत्रीवरील विश्वासमुळे त्याने स्वतःचे प्राण त्यागले नाही. आता मीही त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”
अत्यंत प्रयत्न अखेर सिद्धांतचे प्राण वाचवण्यात साहिल यशस्वी होतो. अशी त्यांची मैत्री दिवसेंदिवस गाढ होत जाते. ते जीवनाचा आस्वाद घेत संपूर्ण जीवन एकत्र राहतात.
मैत्री हे परस्पर विश्वास,आपुलकी आणि सामान्य हित संबंधावर आधारित एक संबंध आहे. इतर नात्यांमध्ये माणूस सौजन्याने वागतो. पण मैत्रीत मुक्त मनाने आयुष्य जगतो. खरा मित्र हा नेहमीच एक हितचिंतक असतो.
शब्दार्थ Khara Mitra:
- जय्यत – संपूर्ण, पूर्ण
- पुनरावृत्ती – उजळणी, सराव
- शाळा – विद्यालय
- ट्रॉफी – पारितोषिक, विजय चिन्ह
- शिक्षिका – गुरु
- स्पर्धा – चढाओढ
- अव्वल – प्रथम
- खेळाचे मैदान – क्रीडांगण
- फेटाळणे – आदेश पाळण्यास नकार देणे, धुडकवणे
स्वाध्याय
प्र. १. रिकाम्या जागा भरा Khara Mitra
- सिद्धांत व साहिल दोघं ______ वर्षाचे होते.
- साहिल ______ चा पाढा विसरला.
- सिद्धांत ने स्पर्धेसाठी ______ तयारी केली होती.
- सिद्धांत मुळे त्यांच्या वर्गाला ______ मिळाली.
- साहिल ______ व ______ स्वभावाचा होता.
- सिद्धांत व साहिलची मैत्री ______ झाली.
- युद्धभूमीवर दोघांनीही शत्रूचा ______ सामना केला.
- खरा मित्र नेहमीच ______ असतो.
प्र. २. जोड्या जुळवा Khara Mitra
अ |
आ |
४ |
सोळा |
८ |
बारा |
१२ |
एकोणीस |
१६ |
चार |
१९ |
आठ |
प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा. Khara Mitra
- सिद्धांतचा स्वभाव कसा होता?
- वर्गांमध्ये कशाची स्पर्धा होती?
- सिद्धांत ने काय खरेदी केले? व का?
- सिद्धांत व साहिल यांच्या शाळेचे नाव काय होते?
- गणिताच्या तासात काय शिकवत होते?
- साहिलला कोणता पाढा येत नव्हता?
- सिद्धांत ला काय चावत होते?
- मैत्री म्हणजे काय?
- मोठे होऊन दोघांना काय बनायचे होते?
प्र. ४. खऱ्या मैत्रीचा उद्देश काय असावा? Khara Mitra
चर्चा करा, सांगा
- मोठे झाल्यावर तुम्हाला काय बनायचं आहे याबाबत विचार करा.
खेळूया शब्दांशी
-
समानार्थी शब्द लिहा.
- घर –
- शाळा –
- मैत्री –
- प्राण –
- स्वप्न –
-
खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
- शांत 🇽
- रडणे 🇽
- जिंकणे 🇽
- शत्रु 🇽
- अमान्य 🇽
अशांत, हारणे, मित्र, मान्य, हसणे |
-
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
- सिद्धांत, साहिल, त्यांनी, सुजाता
- मी, गुप्ता, तिला, त्याने
- सुंदर, शाळा, प्रसन्न, भव्य
- लिहणे, वाचणे, गाणे, तुम्ही
आपण समजून घ्यावे
संपूर्ण वाक्य हे शब्दांनी बनलेली असतात. त्यांच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात येतात. त्यांना शब्दाच्या जाती असे म्हटले जाते. काही शब्दांच्या रूपात बदल होतो, तर काही शब्द बदलतच नाही. ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते ‘विकारी किंवा सव्यय’ शब्द असतात. तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते ‘अविकारी किंवा अव्यय शब्द’ असतात.
-
खालील वाक्य वाचा
रवी आणि राजेंद्र रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले. वरील वाक्यात सहा नामे आली आहेत. ती नामे लिहा.
- _______
- _______
- _______
- _______
- _______
- _______
तुम्ही वर लिहिलेली नावे एकाच प्रकारची नाहीत. त्यामध्ये व्यक्तींची नावे, वस्तूंची नावे व मनातील भाव दर्शवणारे शब्द आलेले आहेत. अशा विविध प्रकारच्या नामांवरून नामांचे तीन प्रकार पडतात.
नामांचे प्रकार khara Mitra
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचक नाम
2 thoughts on “Khara Mitra – An Ally for Life”