|| उत्सव तीन रंगांचा….
आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला ||
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आजचा आपला लेख राष्ट्रीय सण “स्वातंत्र्यदिन” /independence day बद्दल आहे. मी माझ्या शब्दात हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
स्वातंत्र्य दिवस कसा साजरा केला जातो? How is Independence Day celebrated in Marathi?
15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा, सन्मानाचा, आनंदाचा, जल्लोषाचा दिवस आहे. म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या / Independence Day च्या मी तुम्हा सर्वांना खूप खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते.
15 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, लहान मोठी कामाच्या जागा, सोसायटी, चौक अशा प्रत्येक लहान मोठ्या जागी ध्वजारोहण केले जाते. राष्ट्रगान( जनगणमन) आदरपूर्वक म्हंटले जाते. देशभक्तीच्या गीतांची ,चित्रकला, देशभक्ती वरचे भाषण अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. लहान-मोठी सर्व व्यक्ती यामध्ये सहभागी होतात. काही ठिकाणी दिवसभर लाऊड स्पीकर वर देशावरील गाणी लावली जातात. शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर मुलांना बिस्किटांचे पुडे, शक्तिवर्धक पेये आदींचे वाटप होते.मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
सुट्टीचा दिवस असला तरिहि प्रत्येकाने ध्वजारोहण व ध्वजवंदना साठी जवळील ठिकाणी आवर्जुन जायलाच पाहिजे . लाखो देशवासियांच्या बलिदानामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याला आपण साजरा केलाच पाहिजे .
आजादी का अमृत महोत्सव 75th anniversary of Independence Day in Marathi
‘हर घर तिरंगा’ मोहिम Har ghar Tiranga campaign
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य Independence मिळाले. तसेच 2022 वर्षी 75 वर्ष पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी आपले पंतप्रधान माननीय मोदी यांनी “हर घर तिरंगा”(Har ghar Tiranga campaign) ही” मोहीम राबवली आहे.
(Har ghar Tiranga campaign) ‘ हर घर तिरंगा’ या मोहिमची सुरुवात 2 ऑगस्ट, 2022 पासून सुरू झाली. 2 ऑगस्ट, 2022 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली.ही मोहीम 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवली जाणार आहे.या मोहिमेला “आजादी का अमृत महोत्सव” असे नाव देण्यात आले आहे.
निश्चय
भारतीय नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर आपला राष्ट्रीय ध्वज “ तिरंगा” फडकवावा. गेली 75 वर्षे प्रत्येक भारतीय नागरिक स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे. पण ज्या शूरविरांनी दिलेल्या प्राण्यांच्या आहुतीमुळे हे स्वातंत्र्य मिळाले त्यांना नमन करावे. आपापल्या घरी तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना दृढ व्हावी हा हेतू असावा.प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्य टिकवून चारी बाजूंनी प्रगती व्हावी हा निश्चय मनोमनी करावा.
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान भारतातील प्रत्येक नागरिकाने मोबाईल वरील डीपी म्हणजेच “डिस्प्ले फोटो” हा भारतीय तिरंग्याचा असावा असे आव्हान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. भारतातील प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ध्वज तिरंगा स्वतंत्र भारताचे एकतेचे प्रतिक आहे . स्वातंत्र्याची अखंडता व सार्वभौमत्व चा अभिमान असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वातंत्र्यदिन साजरा केला पाहिजे .75 व्या स्वांतत्र्य दिना निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या ‘ हर घर तिरंगा ‘(har ghar Tiranga campaign) या मोहिमेत सामिल होण्यासाठी खालील प्रक्रिया करावी .
हर घर तिरंगा भाग घेण्याची व प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया Har ghar Tiranga Ragistration and certificate in Marathi.
- 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट यादरम्यान प्रत्येक सोशल मिडीयावरिल प्रत्येक प्रोफाईल फोटो/ डिस्प्ले फोटो भारतीय तिरंग्याचा ठेवावा . टेम्पररी ऑप्शन वर क्लिक करावे .
- घरात , ऑफिसमध्ये कापडी भारतीय तिरंगा उंच ठिकाणी फडकवावा .
- मग ऑफिशियल वेबसाईट harghartiranga.com वर जावे .
- ऑफिशियल पेज उघडल्यानंतर होम पेज वर ‘ Pin a flag ‘ वर क्लिक करा .
- एक नविन पेज उघडेल . त्याठिकाणी तुमचं नाव, फोन नं/ इ-मेल आयडी टाकावे . आणि नेक्स्ट बटण वर क्लिक करावे .
- नेक्स्ट बटण दाबल्या नंतर एक नविन पेज ओपन होईल . म्हणजेच तुमचं नाव नोंदवलं गेलं आहे.
- खाली प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल . त्यावर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे .
तिरंगा About Indian Flag / Tirangaa in Marathi
भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा आपला राष्ट्रीय ध्वज “तिरंगा” या नावाने ओळखला जातो.तीन रंगाने बनणारा म्हणजेच तिरंगा. तिरंगा मधील प्रत्येक रंग आपल्याला एक संदेश देतो. आपला राष्ट्रीय ध्वज आयताकृती आहे. केशरी\ भगवा, पांढरा हिरवा अशा या तीन रंगांच्या आयताकृती ध्वजाला तिरंगा असे म्हणतात.मध्यभागी निळ्या रंगाचे गोलाकार चक्र म्हणजेच अशोकचक्र होय.
राष्ट्रीय ध्वज गीत तीन समान आडव्या पट्ट्या ची रचना करण्यात आलेली आहे.
- केशरी : सर्वात वरील पट्टा केशरी किंवा भगव्या रंगाचा असतो. या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याग, शौर्य, धैर्य आहे.
- पांढरा: मधला पट्टा पांढरा रंगाचा असतो.या रंगाचे वैशिष्ट शांती, सत्य आहे.पांढरा रंग प्रकाशाचा, सत्य मार्गाचा, पावित्र्याचा संदेश देतो.
- हिरवा;सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो. या रंगाचे वैशिष्ट्य समृद्धी व निष्ठा,सहनशीलता आहे. हिरवा रंग निसर्गाशी व भूमीचे नातं दर्शवितो
- निळा: निळा हा समुद्राचा रंग. त्याप्रमाणेच अतिशय विशाल न संपणारा त्याचा अंत न दिसणारा असा आहे. अशोक चक्र हे बौद्ध धर्माचे धम्मचक्र असून विश्व शांतीचा संदेश देतात. यामध्ये असणाऱ्या 24 काड्या कला तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती अशा विविध गुणांचा संगम आहे.
असा हा आपला भारताचा राष्ट्रध्वज आहे. त्यामध्ये आपल्याला बरेच संदेश आहेत. राष्ट्रीय ध्वज प्रत्येक भारतीय नागरिकाचे स्वातंत्र्याचे / Independence Day चे प्रतीक आहे राष्ट्रीय ध्वज हा तीन रंगांचा असून ठराविक मोजमाप व आकाराचा आहे.
स्वातंत्र्य दिन इतिहास History of Independence Day in Marathi
|| “जहाँ डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा|
यह भारत देश है मेरा भारत देश है मेरा” ||
ब्रिटिश साम्राज्य आणि भारत देशावर जवळपास 200 वर्ष राज्य केलं. वरती लिहिलेल्या हिंदी कविता तील काही शब्दां प्रमाणेच खरच आपला भारत देश खूप समृद्ध देश होता. सगळ्यांना हेवा वाटावा, असा आपला देश वैज्ञानिक ,सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक ,कलात्मक, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्तम होता.
“विविधतेत एकता” असं आपले चिन्ह होतं.पण ब्रिटिशांची आपल्यावर नजर पडली व त्यांनी “Divide and rule” म्हणजेच फुट पाडा आणि राज्य करा हे धोरण वापरून भारतावर जवळपास 200 वर्षे राज्य केलं. भारतातील लोकांना गुलाम बनवून ठेवलं. आपली धन, संपत्ती, ज्ञान, कला यांचा वापर करून स्वतःला समृद्ध केलं. मात्र भारताला गरीब करून ठेवलं.
अभिमान
मात्र अशा अव्यावहारिक साम्राज्याचा अंत होणे गरजेचं होतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश साम्राज्याचा अंत झाला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन / Independence Day म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच 15 ऑगस्ट या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला मनापासून अभिमान आहे.
भारताला स्वातंत्र्य असेच मिळाले नाही. त्यासाठी क्रांतिकारकांना रक्ताची होळी व गोळ्यांची दिवाळी खेळावी लागली. देशातील वीर भक्तांना प्राणांची आहुती द्यावी लागली.अन्यायाचा विरोध केला तर प्राण द्यावे लागले. अनेक चळवळी, अभियान, मोहीम राबवल्या गेल्या.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला अजून भारतावर राज्य करता येणे शक्य नाही. भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढतच चालला होता. “ देश छोडो अभियान” क्रांतिकारकांचा अभियान जोर पकडत होता. त्यावेळेस ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 1770 पासून बळकावलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित केले.
भारत + पाकिस्तान India + Pakistan in Marathi
इंग्रजांनी भारताचे दोन तुकडे केले. दुसऱ्या तुकड्याला “पाकिस्तान” हे नाव देऊन वेगळे केले.त्यावेळेस पाकिस्तान मधील हिंदू, पंजाबी, सिंधी इत्यादी लोकांना आपले घरदार, पैसा सोडून भारतात येऊन राहावे लागले. तसेच भारत विभागात राहणाऱ्या लोकांना पाकिस्तानात जावे लागले.या परिस्थिती मुळे अनेकांचे खूप नुकसान झाले.विनाकारण निष्पाप लोकांचे जीव गेले.
सर्वधर्मसमभाव असलेला आपला भारत देश भारत+ पाकिस्तान एवढा मोठा देश असला असता.भौगोलिक दृष्ट्या, लोकसंख्येच्या दृष्टीने, अतिशय प्रबळ अखंड राज्य असलं असतं. शक्तिशाली देशांमध्ये आपली गणना झाली असती.त्यामुळे भविष्यामध्ये ब्रिटनचे नुकसानच झाले असते.या गोष्टीचा अंदाज लावूनच त्यांनी आपल्याला दोन तुकड्यांमध्ये विभागले.असे मला प्रामाणिकपणे वाटते.
देशभक्तीवर कविता Poem on Patriotism in Marathi
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप शूरवीरांचे प्राण गेले. या अश्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांना आपण आज स्मरण करून वंदन करूयात.
|| स्वतःच्या जीवाची, सुखी जीवनाची,
परिवाराची काळजी न करता,
प्राणाची आहुती देणाऱ्या,
स्वतःच्याच रक्ताची होळी खेळणाऱ्या,
देशासाठी शहीद होणे म्हणजे,
जीवनाचे सार्थक समजणाऱ्या
स्वातंत्र्याचे स्वप्न बघुनी,
दिवाळी साजरी करणाऱ्या ,
अशा प्रत्येक ज्ञात-अज्ञात असणाऱ्या,
शूरवीर क्रांतिकारकांना / सैनिकांना
माझे शतशत नमन ||
स्वतंत्र भारताचे महत्त्व Significance of Independent India in Marathi
26 जानेवारी व 15 ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. या दोन दिवसांचे स्थान प्रत्येक भारतीयांच्या जीवनात विशेष आहे.स्वतंत्र म्हणजे कोणाच्याही नियंत्रणाखाली नसलेला. मुक्त असलेला.26जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लिहिण्यात आले. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. भारत हा लोक तंत्रावर चालणारा लोकशाही देश आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान झाले. राजेंद्र प्रसाद हे प्रथम राष्ट्रपती झाले.
स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय प्रतीक व घटना National symbols of independent India in Marathi
- बाबासाहेब आंबेडकर- भारतीय राज्य घटना
- जवाहरलाल नेहरू- पहिले पंतप्रधान
- राजेंद्र प्रसाद- पहिले राष्ट्रपती
- राष्ट्र गीत- रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे लिहिलेले “ जन गण मन”
- राष्ट्रीय गीत- बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेले “ वंदे मातरम”
- राष्ट्रीय प्रतिज्ञा- “ भारत माझा देश आहे”(26 भाषांमध्ये)
- राष्ट्रीय ध्वज- “ तिरंगा”
- राष्ट्रीय पक्षी- मोर
- राष्ट्रीय प्राणी- वाघ
- राष्ट्रीय फळ- आंबा
- राष्ट्रीय नदी- गंगा
- राष्ट्रीय फुल- कमळ
- राष्ट्रीय मुद्रा- रुपया
- राष्ट्रीय वृक्ष- वड
- राष्ट्रीय खेळ- हॉकी
राष्ट्रीय प्रतीक चिन्ह
राष्ट्रीय चिन्हांमध्ये आपणास वाघांचे तीन मुख तिनी दिशांकडे बघताना दिसतात. खालच्या बाजूला अशोक चक्र मागच्या बाजूला घोडा हत्ती व बैल हे प्राणी दिसतात. खालील बाजूला सत्यमेव जयते असे कोरलेले दिसते . हे चिन्ह देशाच्या प्रगतीचे उत्कर्षाचे व संपन्नतेचे प्रतीक मानले जातात.
देशावर असणाऱ्या चित्रपटांची नावे Patriotic movie names in Marathi
- दिवार Deewar
- प्रहार Prahar
- भाग मिल्खा भाग Bhaag Milkha Bhaag
- क्रांतिवीर Krantiveer
- LOC कारगिल LOC Kargil
- सरफरोश Sarfarosh
- द गाझी अटॅक The Ghazi Attack
- गांधी Gandhi
- द लिजंड ऑफ भगतसिंग The Legend Of Bhagat Singh
- उरी- द सर्जिकल स्ट्राइक Uri – The Surgical Strike
- लगान Lagaan
- मंगल पांडे Mangal Pandey
- स्वदेश Swadesh
- चक दे इंडिया Chak de India
- बॉर्डर Border
- रंग दे बसंती Rang de Basanti
देशभक्ती वरील गाणी Patriotic Song names in Marathi
- बलसागर भारत होवो
- जयोस्तुते जयोस्तुते
- प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
- मंगल देशा पवित्र देशा
- या भारतात बंधुभाव नित्य वसु दे
- झेंडा आमचा प्रिय देशाचा
- सैनिक हो तुमच्यासाठी
- आमचा भारत देश महान
- ध्वज विजयाचा उंच धरा रे
- वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम
- सागरा प्राण तळमळला
- हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
- जिंकू किंवा मरू
- उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला
- शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
- आता उठवू सारे रान
- खरा तो एकची धर्म
- उषःकाल होता होता
- गर्जा जय जयकार क्रांतीचा
- नवजवान सैनिका
निष्कर्ष – स्वतंत्र भारत Conclusion in Marathi
प्रत्येक भारतीय नागरिकाने, देशाच्या चिन्हांचा, गाण्यांचं सन्मान करावा.
स्वातंत्र्याच्या कथा, गाणी, सिनेमा बघून आपण स्वतंत्र होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी मनामध्ये काही गोष्टींचा निश्चय करण्याची आवश्यकता आहे.
- स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञ रहावे.
- स्वतंत्र व परतंत्र याच्या मधील फरक जाणून घेऊन, स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यावे.
- आपल्या देशाच्या प्रगतीसाठी व रक्षणासाठी झटावे.
- सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी उभ्या असणाऱ्या सैनिका प्रति कृतज्ञ राहावे.
- वैज्ञानिक, अभियंता, डॉक्टर, सामाजिक स्तरावरील लोकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.
- राजकारणामध्ये सुद्धा शिक्षणाला महत्त्व द्यावे. शैक्षणिक दृष्ट्या परिपक्व असलेल्या व्यक्तीने राजकारण सांभाळावे.
स्वतंत्र भारताचा आधुनिक निर्धार Modern determination of Independence Day in Marathi
- आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेल्या मोबाईलचा अतिरेक वापर कमी करावा.
- वेळेचा सदुपयोग करून, नवनवीन कला, पदवी ,प्रमाणपत्र,ज्ञान मिळविण्यात घालवावा.
- स्वदेशी वस्तूंचा वापर करावा.
- 3R’s वापर करावा. (RECYCLE,REUSE,REDUCE)
- वेळोवेळी कचऱ्याची विल्हेवाट लावावी. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करावा.
जय हिंद , जय भारत
जय जवान, जय किसान
Good info
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा ब्लॉग वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद
well written very detailed information given
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा ब्लॉग वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद
Very informative ??
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल तुमचा धन्यवाद.
Nice information 👍