गटारी / दिप अमावस्या 2023 Gatahari / Deep Amavasya 2023 Date

|| शुंभ करोती कल्याणम

आरोग्यम धनसंपदाय शत्रू बुद्धि विनाशाय

दिपक ज्योती नमोस्तुते

दिव्या दिव्या साक्षात्कार कानन कुंडल मोतीहार

दिवा लावला देवापाशी

माझा नमस्कार 33 कोटी देवी देवता तुमच्या चरणांपाशी ||

नमस्कार मित्र मंडळी,

आजचा आपला विषय खूप मस्त आहे . आषाढ महिन्या मधील अमावस्येला काय म्हणायचे ? सांगा पाहू

पवित्र असा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी दिवस म्हणजेच आषाढी अमावस्या /दीप अमावस्या/ गतहरी अमावस्या.

पवित्र असा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी चा दिवस म्हणजेच आषाढी अमावस्या दीप अमावस्या.

आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला दिप अमवस्या तसेच गटारी अमवस्या असे म्हटले जाते . किती आश्चर्याची गोष्ट आहे कि आपण एखाद्या सणाला गटारी सारख्या शब्दाने बोलवतो हे नाव योग्य आहे का ?

नाही ,कोणात्याही सणाचं नाव हे असं असू शकत नाही हे खरं आहे हि गटारी अमवस्या नसून दिप अमावस्या तसेच  गतहरी अमावस्या असे म्हटले जाते.

खूप लोकांना असं वाटतं की गटारी अमावस्या व गटार यांचा आपसात काही संबंध आहे पण तसे नसून ही अमावस्या गटारी नसून गत हरी अशी आहे. खूप लोकांनी गत हरी या शब्दाचा अर्थ बदलून गटारी असा केला. कालांतराने ही अमावस्या देखील गटारी अशी  प्रचलित झाली. 

 गतहरी अमावस्या हा शब्द गत आणि आहार अशा दोन शब्दापासून बनलेला आहे. म्हणजे गेलेला असतो. म्हणजेच गत हरी म्हणजे गेलेला किंवा त्या लागलेला आहार. दुसऱ्या दिवशी पासून होणाऱ्या श्रावणात लोक जे आहार संपूर्ण एका महिन्यासाठी त्यागतात त्या सर्व आहाराचे सेवन करतात.

दिप / गटारी अमावस्या 2023 Deep / Gatari Amavasya 2022 in Marathi

यावर्षी आषाढ अमवस्या हि १६ जूलै २०२३ ला रात्री १० वाजून 0७ मिनिटांनी सुरु होत आहे. अमावस्येची समाप्ती १७ जूलै 2023 ला रात्री १२ वाजता होत आहे . दिपोत्सव हा १७ जुलैला साजरा केला जाणार आहे. आर्द्रा हे नक्षत्र आहे . तसेच या दिवशी सोमवार असून ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते .

दिप / गटारी अमावस्या का साजरी केली जाते? Why is Deep / Gatari Amavasya celebrated?

आषाढ महिना म्हणाला तर भरपूर पाऊस असतो. पूर्वीच्या काळी विजपुरवठा ही आवश्यकते नुसार नसायचा. म्हणून कादाचित या महिन्यातील अमावस्येला दिपपूजन करून सर्व घरादारात दिवे लावण्याची पद्धत रूढ झाली असावी.

हि अमावस्या खास करून महाराष्ट्र येथील बहुतेक घरात जोरात साजरी केली जाते.

काही ठिकाणी तर कणिकमध्ये हळदी टाकून त्याचे दिवे बनवले जाते. व या कणकेच्या दिव्याचं आज विशेष महत्व असतं. घराघरात दीप पूजन करून घरातील देवांची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य व कणकेच्या मुठी चा नैवेद्य दाखवला जातो. कणकेच्या मुठी म्हणजेच कणकेमध्ये पुरण भरून केलेल्या या मुठी.

मुठी हा शब्द आज कुणी वापरत नाही आजच्या काळात यालाच आपण मोमोज या नावाने ओळखतो.

पूर्वीच्या काळी गांवांत , खेडेगांवात पावसाळ्यात अंधार लवकर पडत होता. रस्त्यावर देखील विज नसायची. या अमावस्येनंतर दिवस कमी कमी होत जातात. संध्याकाळी चहू बाजूला अंधार पसरून जायचा . येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काळोखात काही दिसत नसे . म्हणून आजपासून रोज संध्याकाळी घरादारात दिवे लावून उजेड करण्याचा उद्देश्य असायचा. जेणेकरून वाटेकरूंची सोय होत असे. त्यावेळी सकाळीच घरातील सर्व कामे संपवून शेतात जात असत. शेतातून यायला जर कोणाला उशीर झाला तर या घराघरात प्रज्वलित केलेल्या दिव्यांमुळे तो सुखरूप पणे आपल्या घरी पोहचत असे. काही ठिकाणी दिप अमवास्येपासून ते पाडव्यापर्यंत संध्याकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.

  • घरातील सर्व लहानमोठे दिवे, समई, बाहेर काढतात.
  • स्वच्छ धुवून ठेवतात.
  • घरातील सर्व कानेकोपरे स्वच्छ करतात.
  • घराबाहेर रांगोळी काढतात.
  • संध्याकाळी हे सर्व दिवे तेलाने / तुपाने भरून घरात लावतात . देवाजवळ लावतात.
  • दिपपूजन हे अमावस्ये दिवशी करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करतात. ( लक्ष्मीपूजन /दिवाळी देखील अमवस्येला येते )
Names of Different types of diyas - Gatahari / Deep Amavasya

विविध प्रकारचे दिवे Different types of Diyas

मातीची पणती

मेणाचे दिवे

समई

पितळी दिवे / चांदिचे दिवे / पंचधातू चे दिवे

1. अखंड दिवा
2. कुबेर दिवा
3. पंचवाती दिवा
4. अष्टलक्ष्मी दिवा
5. कामाक्षी दिवा
6. पितृतर्पण
7. गजक लक्ष्मी दिवा इत्यादि

एका वर्षात येणाऱ्या अमावस्ये मध्ये आषाढ/ दिप अमावस्या हि देखील एक मोठी अमावस्या मानली जाते . या दिवशी पितरांचा घास देखील काढण्याची पद्धत आहे . खूप ठिकाणी पितृतर्पण करण्याची पद्धत देखील आहे .

Gatari Amavasya quote - Gatahari / Deep Amavasya

गटारी/गत अमावस्या का म्हणतात? Why is it known as Gatari Amavasya in Marathi?

भारातातील दक्षिणेकडील भागात तसेच महाराष्ट्रात आषाढ अमावस्येचा पुढील दिवस म्हणजेच श्रावण . ‘श्रावण कसा पाळावा ‘ हे आपण मागच्या लेखामध्ये बघितले आहेच .त्याप्रमाणे श्रावण या महिन्यात मांसाहर, व्यसन करत नाहित. म्हणून आषाढी अमावस्येला काहीजण घरी जंगी मेजवानी ठेवतात . त्यामध्ये अखंड दिवस दारु व मांसाहार यांचं सेवन केल जात . संपूर्ण दिवस दारूचं सेवन करून लोकं इथे तिकडे पडून राहत असल्यामुळे कादाचित या अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हणून हिणवलं जात असू शकत .

भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी आषाढी अमावस्या चे नाव वेगवेगळे आहे. उत्तर भारतात व गुजरात मध्ये या अमावस्या ‘हरियाली अमावस्या‘ असे म्हटले जाते. दक्षिणेकडील काही राज्यात “चुक्कल आमावस्या “म्हटले जाते. तर ओडिसा येथे” चितलगी “अमावस्या असे म्हटले जाते.

प्रचलित कथा A well-known story on Gatari Amavasya in Marathi

एका प्रचलित कथेनुसार,

एक ब्राम्हण होता . त्याला सहा मुली होत्या . तो खुप गरिबीचं व कष्टाचं जीवन जगत असतो . पण त्याची एक सवय होती तो नित्यनियमित पणे एका पिंपळाच्या झाडाला पाणी घालत होता.

एके दिवशी तो पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असताना झाडामधून एका लहान मुलीचा आवाज आला ,” बाबा मलाहि तुमच्यासोबत घेऊन जा ” . पण ते ब्राम्हण तिकडून निघून जातात . सहा सात दिवस हि घटना परत परत घडत असते. पण ब्राम्हणाला पहिल्या पासून सहा मूली असतात . त्याचच पालन पोषण करण्यात ते असमर्थ असतात.

पण पिंपळाच्या झाडा मधून येणाऱ्या लहान मुलीचा आवाजामुळे बाम्हण देवांना अस्वस्थ वाटू लागते . त्यांची तब्येत खालवत जाते . त्यांची पत्नी तब्येत का खालवत आहे? असा प्रश्न विचारते . बाम्हण पिंपळाच्या झाडातील लहान मूली बदद्ल पत्नीला सांगतात . त्यांची पत्नी त्या मुलीला घरी आणावयास सांगते .

बाम्हणदेव त्या मुलीला घरी घेऊन येतात . मुलगी घरी आल्या आल्या घरात जेवढे धान्य होते त्यापेक्षा दुप्पटीने वाढून जाते . घरात आनंदाचं वातावरण निर्माण होत . त्या रात्री ती मुलगी हट्टाने बाम्हणाला सांगते की,” कोठी मध्ये एक दिवा लावा आज रात्री मी तिकडे झोपेन .” मुलीची इच्छा बाम्हण पूर्ण करतात . रात्री ती मुलगी ज्या खोली मध्ये झोपते ती खोली धन व रत्न इत्यादि वस्तूंनी भरून जाते . रातोरात ब्राम्हणाच . दरिद्रता निघून जाते .ती रात्र अमावस्येची रात्र असते . व ती मुलगी देवी लक्ष्मी असते . म्हणूनच आषाढ अमावस्येला दिपपूजन करण्याची मान्यता आहे .

महत्व Importance of Gatari Amavasya in Marathi

१. दिपपूजन देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी करण्याची प्रथा आहे .

२. या दिवशी पित्रतर्पण चं हि विशेष महत्व आहे.

वरती सांगितल्या प्रमाणे दिपपूजन व पित्रतर्पण केल्याने घरात धनधान्य येते . जीवनात सुख समृद्धी येते . घरादारात लक्ष्मी नांदते.

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri