Agnishodh अग्निशोध
काय शिकाल- Agnishodh अग्निशोध 4
इच्छित हेतू , कल्पना आणि माहिती आयोजित करण्यासाठी धोरणे वापरावी सामाजिक अनुभव समालोचनात्मकपणे ऐकणे आणि बद्दल चौकशी करणारे प्रश्न उपस्थित करते.
वर्णन: Agnishodh अग्निशोध 4
इतिहास पूर्वीच्या काळी आपले पूर्वज हे शरीराने माकडासारखे होते. माकडांसारखेच रानावनात फिरून पान,फळ, कंदमुळे, कच्चे मास असे मिळेल ते खात असत. अरण्यात लागलेल्या वणव्यामुळे भाजलेले अन्न प्रिय वाटू लागले तसेच थंडीपासून वाचण्यासाठी अग्नीचा शोध लागला)
इतिहास पूर्वकाळी युरोपची व आशियाची हवा आजच्या पेक्षा बरीच उष्ण होती; अधिक उबदार होती. आपले केसाळ पूर्वज रानावनातून भटकत; कंदमुळांवर, पानाफळांवर राहत. मिळालेच तर कधी कच्चे मांस देखील खात. त्यांची हाडं बळकट होती. परंतु पाय जरा वाकलेले होते. त्यांना हवे तसे नीट ताट उभे राहता येत नसे. जरा बूट बैंगणच ते होते. आजच्या स्त्री–पुरुषांपेक्षा ते आकाराने बरेच लहान होते. विस्तावाचा शोध अध्याप त्यांना लागला नव्हता. त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते. बोल भाषेत प्रगती नव्हती. निरनिराळे आवाज व आरोळ्या यांच्यात मार्फत ते आपल्या मनातील भाव एकमेकास दाखवीत. भूक लागली म्हणजे ते कधी कधी एकटे किंवा कधी दोघे तिघे असे भक्षाच्या शोधार्थ निघत. भूक शांत झाली म्हणजे एखाद्या वृक्षाच्या किंवा दगडाच्या छायेत पाय पोटात घेऊन ते बसत.पुन्हा भूक लागली किंवा शत्रूचा आला, तरच ते उठत.
एकदा डोंगरातून, पहाडातून विचित्र असे आवाज येऊ लागले, जणू कोणी अपरिचित प्राणी धावत येत आहे. लांब काहीतरी भुरभुरे दिसत होते. एखाद्या प्रचंड अक्राळ – विक्राळ जिवंत प्राण्याप्रमाणे ती वस्तू हळूहळू पुढे येत होती. हवा अति गार गार वाटू लागली. सर्वांना अस्वस्थ वाटू लागले. आकाश काळे काळे झाले.आकाशातून पृथ्वीवर बारीक बारीक तुकड्यांची प्रचंडवृष्टी होऊ लागली. आकाशातून हिम शलाका उघड्या शरीरावर पडू लागल्यावर काय दुर्दशा झाली असेल तिची कल्पना करा! अशा रीतीने दहा लक्ष पिढ्या गेल्या आणि एके दिवशी आपल्या या आलस्यमय जीवनातून ते खडबडून जागे झाले.
आपल्या पूर्वजांचे शरीर जसे बधीर झाले. दातखिळ्या बसल्या. एक प्रकारचे तीव्र दुःख होऊ लागले. ती होती पहिल्या हिम तापाची वेळ.
ते सैरावैरा इकडे तिकडे धावू लागले. कितीतरी जणांना पळता येईना. पुष्कळजण थंडीने गाठून मेले. तर काहीजणांनी दूर खोल गुहांमध्ये आश्रय घेतला. उब मिळावी म्हणून व संरक्षण व्हावे म्हणून सारे एकमेकास खेटून बसले. अशा या वानर सदृश्य पूर्वजांना सामाजिक जाणवेची पहिली वेळ होती. मानवतेच्या उंबरठ्यावर प्रथमच ते चढत होते.
थंडीपासून बचावासाठी मारलेल्या प्राण्यांची कातडी सोलून काढून त्यांनी ती स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळली.
(गरज पडली की माणूस आपल्या आपच मार्ग काढू लागतो)
कालांतराने हे आदिमानव जंगलात गुहेमध्ये एकत्रित राहू लागले. जंगलामध्ये वणवे लागत असत. या वणव्यांमध्ये झाडे जळून खाक होत असत. तसेच यामध्ये मानवाचे अन्नघटकही मोठ्या प्रमाणावर नष्ट होऊन क्वचित प्रसंगी त्यांना उपासमार झेलावी लागत असे. मात्र ही आपत्ती त्यांच्यासाठी फळदायी ठरली. वणव्यांमध्ये जळालेल्या प्राण्यांचे मास, कंदमुळे आणि वनस्पती अधिक रूचकर लागतात याचा साक्षात्कार त्याला झाला.
.मग ही आग कशी लागते, याचा विचार तो करू लागला. एके दिवशी त्याला आग पेटवण्याची युक्ती सापडली. दोन दगडांच्या घर्षणातून आग निर्माण करण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले आणि प्रगतीची कवाडे त्याच्यासाठी खुली झाली. Agnishodh
रानटी ते सुसंस्कृत असा बदल झाला तो याच आगीमुळे Agnishodh असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
पूर्वजांपासून शिकण्यासारख्या गोष्टी Agnishodh अग्निशोध
जगातील पहिला शोध यावरूनच माणूस किती विचारशील असू शकतो आणि आपल्या सकारात्मक विचारामुळे तो काहीही करू शकतो हा विचार आपल्याला करायला पाहिज.रडत बसल्यामुळे केवळ वेळ वाया जातो.
- गरज पडली की माणूस आपल्या आपच मार्ग शोधू लागतो
- कदाचित भारतीय संस्कृतीमध्ये सामूहिक पद्धतीने परिवाराने राहण्याची पद्धत या कारणामुळेच अमलात येऊ लागली
- परिस्थिती समोर माणूस कोणत्याही अडचणींना सामोरा जाऊ शकतो फक्त स्वतःवर व स्वतःच्या शक्तीवर सकारात्मकपणे बघण्याची गरज आहे
आपल्याला काय वाटते विचार नक्की कळवावा.
धन्यवाद
शब्दार्थ: Agnishodh अग्निशोध 4
प्रचंडवृष्टी- अति पाऊस; हिम शलाका- बर्फांचा वर्षाव; वणवा- जंगलामधील आग; कवाड दरवाजा