Republic Day प्रजासत्ताक दिवस

Republic Day

प्रजासत्ताक दिवस Republic Day in Marathi

माझा नमस्कार मित्र व मैत्रिणींना,

तुम्हां सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा आपला विषय प्रजासत्ताक दिवस आहे.

“हे राष्ट्र देवतांचे ,हे राष्ट्र प्रेषितांचे

आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”

“सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा

 हम बुलबुले है इसके ये गुलसीता हमारा”

“जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा

वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा”

खरंच वरील ओळींचा अर्थ किती परिपूर्ण आहे.  खरच आपला भारत देश खूप ज्ञान, योग, एकता, ग्रंथ,  मौल्यवान वस्तू, समभाव, विज्ञान, साक्षरताइत्यादी गोष्टींमुळे समृद्ध होता.  त्यावेळेस ब्रिटिशांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून आपल्या देशावर 200 वर्ष राज्य केलं. 

स्वातंत्र्याचा लढा खूप कठीण होता, त्यासाठी असंख्य वीर पुत्रांना व महिलांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले. 

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.  परंतु  स्वातंत्र्याची लढाई अजून संपली नव्हती. नवीन स्वतंत्र  देश गरिबी, अशिक्षित आणि भेदभाव यासारखी आव्हाने समोर होती. या मध्ये  मोठं आव्हान म्हणजे लोकशाही स्थापन करण्याचे होते. 

ही लोकशाही घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस (Republic Day) म्हणून ओळखला जातो.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस  Republic Day 26 January in Marathi

Republic Day Images

प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो Why is Republic Day Celebrated in Marathi

लोकशाही स्थापन करण्यासाठी एक संविधान (Constitution ) सभा भरवली गेली. विविध संस्कृती, विविध जाती आणि विविध भाषा बोलणाऱ्या 400 मिलियन पेक्षा अधिक लोकसंख्या असलेलं देशाचे संविधान म्हणजेच कागदपत्र/कायदा बनवण्याचे खूप मोठे आव्हान या सभेसमोर होतं. जवळपास तीन वर्ष चर्चा केल्यानंतर  भारताच्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजुरी मिळाली. हा कायदा 26 जानेवारी, 1950 रोजी पासून लागू झाला, तेव्हापासून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवसाच्या रूपाने साजरा करू लागले.

लोकशाही म्हणजे काय What is Democracy in Marathi

भारत हे एक मोठं लोकशाही राज्य आहे.  लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य असा आहे.  भारताच्या संविधानात जनतेला (Public) हा अधिकार मिळाला.

राष्ट्रीय सण National festival in Marathi

“प्रजासत्ताक दिवस” म्हणजेच (राजकीय) सत्ता ही प्रजेजवळ येण्याचा दिवस होय.

भारतीय संविधान 

Republic Day Constitution of India in Marathi

संविधानामुळे भारतीय जनतेकडे सत्ता आली. आणि प्रजा शक्तिशाली घटक झाली. यामुळे आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो.

संविधानामध्ये 448 लेख, 12 अनुसूची आणि 97 संशोधन शामील आहेत. भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

भारताचे संविधान एक मजबूत, समृद्ध व एकजूट नवभारताच्या निर्मितीसाठी मंजूर केलेला कायदा होय.

काय असतं संविधानामध्ये What is in the constitution in Marathi Republic Day

संविधानामध्ये केंद्र व राज्य यांच्यामधील अधिकारांचे विभाजन असते. ही सरकारची एक संसदीय प्रणाली आहे.  ज्यामध्ये राष्ट्रपती राज्याच्या प्रमुख रूपात तर प्रधानमंत्री सरकारच्या प्रमुख रूपात असतात. 

संविधान ही एक स्वतंत्र न्याय प्रणाली आहे. सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च अदालत असते. 

  • भारतवासीयांच्या भविष्यासाठी केलेला एक निर्धार आहे म्हणजेच संविधान.
  • लोकांच्या बदलत्या गरजा, आवश्यकता यांच्यासाठी हा कायदा विकसित केला जातो .
  • नागरिकांच्या मौलिक अधिकार व कर्तव्याची स्थापना केलेली आहे.
  • देशातील विविध राज्य, प्रभाग यांचे अधिकार व जबाबदारी निर्धारित केली जाते.
  • समानता, स्वतंत्रता आणि न्याय यांची हमी दिली जाते.
  • धर्म, जाती, लिंग, भाषा यांच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित केला जातो.
  • अल्पसंख्या असलेल्या लोकांसाठी सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांची नोंद असते.
  • न्यायपालिका नागरिकांचे स्वातंत्र्य व अधिकार यांची रक्षा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवतात.

संविधानाची पहिली बैठक

Republic Day First Meeting Of The Constitution in Marathi

संविधानाची स्थापना करण्यासाठी पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी बसवण्यात आली होती. या बैठकीमध्ये 210 सदस्य शामिल झाले होते.  डॉक्टर राजेंद्र प्रसाद  यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी हे पद शेवटपर्यंत सांभाळले.

13 डिसेंबर, 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विधानसभेत संविधानाची उद्दिष्ट मांडले, जे 22 जानेवारी, 1947 रोजी प्रसारित झाले.

 त्याचे मुख्य मुद्दे खालील प्रमाणे होते.

  1. भारत एक पूर्णपणे सार्वभौम प्रजासत्ताक असेल, जे स्वतःचे संविधान तयार करेल.
  2. भारतीय संघराज्यात सर्व राजकीय शक्तींचा मूळ स्त्रोत जनताच असेल.
  3. भारतातील नागरिकांना कायदा आणि सार्वजनिक नैतिकतेच्या आधीन राहून खाली नमूद केलेल्या गोष्टी मिळतील
  • सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, 
  • कोणत्याही पदावर येण्याचा अधिकार 
  • संधी, कायद्याची समानता, 
  • विचार  मांडण्याचा अधिकार,  
  • भाषण देण्याचा अधिकार,  
  • श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार, 
  • स्वतंत्र व्यवसाय करण्याचा अधिकार
  •  संघटना व कृती यांचे स्वातंत्र्य

4. अल्पसंख्यांक, अविकसित किंवा मागासलेल्या जाती व आदिवासी यांच्या  हितसंबंधी रक्षणासाठी योग्य व्यवस्था केली जाईल.

5. जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामी नंतर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून भारतीय प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक घोषणा केली.

प्रजासत्ताक दिवस कसा साजरा केला जातो How is Republic Day Celebrated in Marathi

इंग्रजांच्या अधिपत्यातून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 894 दिवसांनी भारतीय संविधान लागू झाले.  तेव्हापासून दरवर्षी संपूर्ण देशाभरात आनंदाने व अभिमानाने हा राष्ट्र दिवस साजरा केला जातो .

भारताची राजधानी दिल्ली येथे सकाळी ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर माननीय पंतप्रधान देशाच्या हितसंबंधी भाषण देतात. या भाषणाचे  थेट प्रसारण सगळ्या न्यूज चैनल वर केले जाते. या समारंभात भारतातील सर्व घटक राज्य सम्मिलित होतात. या दिवशी भारताच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवणारे मिरवणूक  काढतात. आर्मीतील शूरवीरांना सन्मानित केले जाते. देशातील विविध क्षेत्रांमध्ये अव्वल असणाऱ्यांना आमंत्रित करून सन्मान दिला जातो. 

सरकारी कार्यालय, शाळा, व इतर सर्व क्षेत्रांमध्ये ध्वजारोहण केले जाते.  ठीक ठिकाणी भाषणे, प्रदर्शन, प्रभात फेरी, ड्रॉईंग कॉम्पिटिशन,  इतर मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेतील मुलांना खाऊ वाटप केला जातो.

 

26 जानेवारी 2024 ला कितवा प्रजासत्ताक दिवस आहे Since How Many Years Is India Celebrating Republic Day in Marathi

26 जानेवारी 2024 ला 75th  प्रजासत्ताक दिवस आहे.

प्रजासत्ताक दिवस कविता Republic Day Poem in Marathi

शुरविरांच्या बलिदानाने घडविले हे आमुचे भारत राज्य,

सत्ता आली प्रजेच्या हाती,

मतदानाने निवडून दयावा योग्य आपला साथी,

हि जबाबदारी प्रत्येक भारतीयाची,

निभवण्याची शपथ घेउया आज प्रजासत्ताक दिना दिवशी

Republic Day Images

निष्कर्ष Conclusion In Marathi Republic Day

प्रत्येक भारतीय नागरिकाची जीवनातील सिद्धांत व मूल्य यांची जाणीव राखून राष्ट्राची पायाभरणी मजबूत केली पाहिजे.  दुसऱ्यांचे अधिकार व स्वातंत्र्य यांचा सन्मान केला पाहिजे. समानतेच्या समाजाची निर्मिती  करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

मतदान केलेच पाहिजे.  निवडून आलेल्या  प्रतिनिधीची सहायता करून लोकतंत्र मध्ये जोडले पाहिजे. जी व्यक्ती लोकतंत्र मध्ये सक्रिय असते त्यांनी लोकांच्या हितासाठी आवाज उठवला पाहिजे.

 एक मजबूत, समृद्ध, आणि एकजूट भारताची निर्मिती करणे ही आपली जबाबदारी आहे. हे समजून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे या दिशेने प्रत्येकाने पाऊल उचलले पाहिजे.

स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी खूप संघर्ष व बलिदान दिलेले आहेत. त्यांच्या सन्मानासाठी  भारतवासीयांनी समानता, स्वतंत्रता, न्याय व बंधुत्व या मूल्यांना दैनिक जीवनामध्ये महत्त्व दिले पाहिजे.

जय हिन्द ! जय भारत !

धन्यवाद

1 thought on “Republic Day प्रजासत्ताक दिवस”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri