Mantra Pushpanjali – Know Meaning in 4 Steps

Mantra Pushpanjali मंत्रपुष्पांजली

देवाची भक्ती भावाने पूजा करून आपण मनोभावे आरती करतो. परंतु, आरती झाल्यानंतर आपण नेहमीच मंत्रपुष्पांजली म्हणतो. तुम्हाला माहित आहे मंत्रपुष्पांजली म्हणजे काय ?आज आपण त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत

नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,

देवांना फुलवाताना वाहताना ज्या मंत्रांचे उच्चारण केले जाते, त्या मंत्रांना मंत्रपुष्पांजली असे संबोधले जाते.

मंत्रपुष्पांजली म्हणजेच मंत्र+ पुष्प +अंजली

हातांच्या अंजली(ओंजळी) मध्ये पुष्प ठेवून मंत्रबद्धत पद्धतीने देवांना वाहतो म्हणजेच मंत्रपुष्पांजली म्हणतो.

या पद्धतीलाच मंत्रपुष्पांजली म्हणतात. ज्यावेळी पूजा- प्रार्थना होते ,आरती म्हणतो शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवांना धन्यवादच देत असतो.

कोणत्याही मंत्राचा अर्थ तसेच भाव समजून घेतल्यावर निश्चितच मनोकामना लवकर पूर्ण होतात.

मंत्रपुष्पांजली | मंत्रपुष्पांजली अर्थ | संपूर्ण मंत्र पुष्पांजली | वैदिक मंत्रपुष्पांजली Mantra Pushpanjali Lyrics In Marathi

 

ॐ यज्ञेन

यज्ञमयजन्तदेवास्तानिधर्माणिप्रथमान्यासन

तेह- नाकंमहिमान: संचतयत्र:पूर्वे साध्या:संती देवा: ||

ॐ राजाधिराजाय

प्रसह्यसाहिने नमोवयंवैष्णवणाय कुर्महे समेकामान्

साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयंराज्यं

महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात

सार्वभौम: सार्वायुष अंतदापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंतया एकराळीती ||

तदष्येष श्लोको भिगीतो मरुत: परिवेष्टरो मरूतस्यावसन गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा: सभासद इति ||

मंत्रपुष्पांजली म्हणताना प्रत्येक देवता ची पूजा करताना शेवटची ओळ ज्या देवासाठी आपण प्रार्थना करतोय त्या देवासाठी करण्यासाठी वेगळी असते याची नोंद घ्यावी

हरीॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात् ||

हरीॐ नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू: प्रचोदयात् ||

हरीॐ महालक्ष्मीच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ||

हरीॐ नंदनंदाय धीमही विद्महे यशोदानंदाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात् ||

हरीॐ भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य: प्रचोदयात् ||

हरीॐ अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि, तन्नो हनुमत प्रचोदयात ||

हरीॐ चर्तुमुखाय विद्महे हंसरुढाय धीमही तन्नो ब्रह्मl प्रचोदयात ||

हरीॐ श्री तुलस्यै विद्महे कृष्णप्रियायै धीमही | तन्नो वृंदा प्रचोदयात ||

हरीॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात ||

Mantra Pushpanjali

मंत्रपुष्पांजली अर्थ Mantra Pushpanjali Meaning in Marathi

ॐ यज्ञेन

यज्ञमयजन्तदेवास्तानिधर्माणिप्रथमान्यासन

तेह- नाकंमहिमान: संचतयत्र:पूर्वे साध्या:संती देवा: ||

अर्थ : 1 Mantra Pushpanjali Meaning 1

ॐ यज्ञ करून

यज्ञात यज्ञदेवता प्रथम या धर्मांना स्थान देतात

हा यज्ञ व त्याची उपासना धार्मिक विधी ही राज्याच्या कल्याणासाठी असत

आधीच्या काळी अशी मान्यता होती की, देव स्वर्गलोकात राहतात आणि यज्ञ करणाऱ्याला पुण्याचं संचय होऊन स्वर्गलोकात जाण्याचं सौभाग्य मिळत असत आशि श्रद्धा.

Know About Atharvashirsha !!

ॐ राजाधिराजाय

प्रसह्यसाहिने नमोवयंवैष्णवणाय कुर्महे समेकामान्

कामकामायमह्यं कामेश्वरो वैश्रवणोददातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ||

अर्थ : 2 Mantra Pushpanjali Meaning 2

आमच्यासाठी सगळ्या मूलभूत गरजा यांचं यांना अनुकूल करून देणाऱ्या धनसंपत्तीचा राजा भगवान कुबेर यांना आम्ही नमन करतो मनोकामनांची पूर्ण करणाऱ्या कुबेर देवताला देव आम्हा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करेल अशी श्रद्धा

चांगल्या विचारांनीच गृहस्थ आश्रम चालत नाही तर त्यासाठी व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आजच्या तारखेत पैसा ही तितकाच महत्त्वाचा आहे. माता लक्ष्मी अस्थिर आहेत त्यासाठी धनसंपत्तीचं वाटप हे देव कुबेर यांच्यावर आहे.  गृहस्थ जीवनात  स्थिरता यावी  अन्न पाणी,  घरदार, कपडे,  पशुपक्षी औषध पाणी इत्यादी मूलभूत गरजा मनुष्याच्या जीवनातील पूर्ण व्हाव्यात. ज्यामुळे आपल्या जीवनात शांतता यावी अशी विनंती आपण यक्ष पुत्र कुबेर देवाला करतो.

ॐ स्वस्ती

साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयंराज्यं

महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात

सार्वभौम: सार्वायुष अंतदापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंतया एकराळीती ||

अर्थ : 3 Mantra Pushpanjali Meaning 3

आमच्या राज्यात सुख समृद्धी संपन्नता यावी.  आमचे राज्य सदैव कल्याणकारी असावे.लोभ व आसक्ती रहित राज्यावर आमचे लोक तंत्र रहावे.

राजकारण, सत्ता, मालमत्ता यामागे पळणारे नेता वर्ग आमच्या राज्यात नसावे. समाजात पसरणाऱ्या आरजगतेमुळे श्रीमंत  अधिकच श्रीमंत होत चालला आहे,  तर अन्याय खेळणारा मध्यमवर्गीय गरिबी कडे वळतोय. भोग वस्तू व पैसा संचय करण्याच्या वृत्तीमुळे समाजात माणुसकीचा नाश होत चालला आहे.  त्यासाठी  ही मंत्रपुष्पांजली म्हणणे अतिशय आवश्यक आहे.

सार्वभौम: सार्वायुष अंतदापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंतया एकराळीती ||

तदष्येष श्लोको भिगीतो मरुत: परिवेष्टरो मरूतस्यावसन गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा: सभासद इति ||

अर्थ : 4 Mantra Pushpanjali Meaning 4

आमच्या राज्यामध्ये एकत्रीकरण व्हावे. क्षितिज व समुद्र पर्यंत पसरलेल्या पृथ्वीचे एकसंघ व्हावे. पृथ्वीच्या शेवटपर्यंत मानवी जीवन सुरक्षित रहावे. अशा राज्याच्या कीर्तीस्तवनासाठी आपण हा श्लोक म्हणतो.  राजा मरुत व त्याच्या राज्यसभेचे कौतुक करून त्याप्रमाणे राज्य आम्हाला लाभावे ही विनंती करतो. राजा मरुत हे अविक्षित राजाचे पुत्र आहेत .

एका धार्मिक कथेनुसार, राजा मरुत यांनी उच्च कोटीचे महायज्ञ आयोजित केले होते. या यज्ञामध्ये त्यांनी इंद्राला प्रिय असणारे सोमरस,  ब्राह्मणांना दक्षिणा तर प्रजेला अन्न, वस्त्र, निवारा ,वाहन म्हणजेच हत्ती घोडे दान दिले होते.  ज्याला ज्या गोष्टीची गरज होती त्याला ती गोष्ट देण्यात आली होती. देवांपासून प्रजेपर्यंत सर्वांनाच तृप्त संतुष्ट केले होते. सुख-समृद्धी व समाधानाचा पाया प्रत्येकाच्या जीवनात ठेवला होता. याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखाचा मार्ग मोकळा केला होता. भगवान शिव यांना प्रसन्न करून धनप्राप्ती करून प्रजेला सुखी ठेवण्याचे आशीर्वाद घेतले होते. 

निष्कर्ष Mantra Pushpanjali Conclusion

संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीआपण एकत्रित येऊन प्रयत्न व प्रार्थना केली पाहिजे. 

एक पृथ्वी,एकच राजा, एक कुटुंब ,“वसुधैव कुटुंबकम” या G20 च्या ध्येयाप्रमाणेच पूर्वीपासूनच हिंदूधर्म प्रार्थना करत आला आहे. 

निपुण राजा, प्रामाणिक मंत्रिमंडळ आणि लोकराज्य या समीकरणांमध्ये आमचे जीवन शांततेत समाधानात जावे. अशी प्रार्थना आपण देवाकडे करूयात.

सहनशील, तालबद्ध, सुसंवाद एकात्मतेची भावना असेल तेव्हाच सर्व हितकारी राज्य घडून येईल.

धन्यवाद

2 thoughts on “Mantra Pushpanjali – Know Meaning in 4 Steps”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri