Makar Sankranti – Unveiling the Significance of Traditions

Makar Sankranti – Unveiling the Significance of Traditions

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण 2024 च्या मकर संक्रांति बद्दल जाणून घेणार आहोत.

यावर्षीची मकर संक्रांत फारच विशिष्ट आहे.  कारण तब्बल 77 वर्षानंतर वरियन नावाचा योग आलेला आहे.  यावर्षी मकर संक्रांति नेहमीप्रमाणेच 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे.  तब्बल पाच वर्षानंतर मकर संक्रांति सोमवारी येत आहे.

देश एक, सण एक तरि ही साजरा करण्याची पद्दत निराळी गुजरातमध्ये मकर संक्रांतीचा सण पतंग उडवून, महाराष्ट्रात हळद आणि कुंकू आणि पंजाबमध्ये नवीन पिकांची लागवड करून साजरा केला जातो.

वैज्ञानिक दृष्ट्या, पारंपारिक दृष्ट्या, ज्योतिष शास्त्र नुसार, तसेच स्वतःच्या चांगल्या कर्मासाठी दान करून पुण्य कमवावे असा संदेश वर्षातील पहिला सण मकर संक्रांत आपल्याला देऊन जातो. 

कसे हे आपण या ब्लॉग मध्ये बघू. तुमचा अभिप्राय कळवावा.

वरियान योग Varian Yog In Makar Sankranti

यावर्षी मकर संक्रांति वर दोन विशेष योग देखील येत आहेत.  मकर संक्रांति वर रवी आणि वरियन योग आले आहेत.  दुर्लभ योगामुळे मकर संक्रांतीचे महत्व अधिकच वाढले आहे. रवी आणि वरियन योग समृद्धीदायक व यशदायक आहेत.

14 जानेवारीला सूर्य रात्री 2:44  मिनिटांनी धनु राशीतून मकर राशि मध्ये प्रवेश करत आहे. 15 जानेवारीला वरियन योग  सूर्योदयापासून रात्री 11:11  वाजेपर्यंत आहे.

रवी योग सकाळी  7 वाजून 15 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या दरम्यान पूजा आणि दान केल्याने आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूजा अर्चना व दान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण दिवसच योग्य आहे.

मकर संक्रांति Makar Sankranti

धार्मिक मान्यताप्रमाणे मकर संक्रांति वेळी गंगा स्नान, दान व पूजापाठ यांचे विशेष महत्त्व असते. गंगा स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने माणसाच्या जीवनातील समस्या दूर होण्यास मदत मिळते  तसेच जीवनात सुख सौभाग्य यांची प्राप्ती होते.

जवळपास भारतातील संपूर्ण राज्यात मकर संक्रांति साजरी केली जाते.  पण प्रत्येक ठिकाणातील नावे तसेच साजरी करण्याची पद्धत थोडीफार निराळी आहे.  उत्तर भारतात ‘खिचडी’ चे दान देऊन साजरी केली जाते,  तर गुजरात महाराष्ट्र मध्ये याला ‘उत्तरायण’ या नावाने ओळखले जाते. दक्षिण भारतात पोंगल तर पंजाब मध्ये लोहडी  आणि आसाम मध्ये माघ या नावाने ओळखले जाते.

नववर्षातील पहिला सण संपूर्ण भारतात उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो.

मकर संक्रांति का साजरी करतात Why do we celebrate Makar Sankranti

मुळात हा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जायचा.  याच दिवशी सूर्य उत्तरायण म्हणजेच उत्तरेकडे प्रस्थान करायचा.  वैदिक ज्योतिष शास्त्र प्रमाणे मकर  संक्रांति वर सूर्य धनु राशि तील आपली यात्रा संपवून मकर राशीत प्रवेश करतो.

आपल्या हिंदू धर्मामध्ये  उपवास आणि सणसूद हे तिथी तसेच चंद्रमा यांच्यावर आधारित पंचांग प्रमाणे साजरे केले जातात.  पण मकर संक्रांति हा एकमेव सण असा आहे जो सूर्याच्या आधारित पंचांगाप्रमाणे साजरा केला जातो .

संपूर्ण वर्षात एकूण 12 संक्रांत येतात.  ज्यामध्ये चार संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे.  यामध्ये मेष, कर्क, तुला आणि मकर या विशेष महत्त्व ठेवतात.

पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ती म्हणजे मकर संक्रांति होय.

अर्थात सूर्य मकर रेखा पार करून कर्क रेखा कडे जातो म्हणजेच उत्तरेकडे जातो म्हणून  मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणण्यात येते.

Makar Sankranti

मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व Religious Significance Of Makar Sankranti

पौराणिक मान्यतांप्रमाणे सूर्यदेव हे शनिदेवांचे पिता आहेत.  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव पुत्र शनी यांच्या घरात म्हणजेच ग्रहात प्रवेश करतात. सूर्यदेव आपल्या पुत्राच्या घरात संपूर्ण एक महिना राहतात.  शनिदेव हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत.   याप्रमाणे शनिदेव आपल्या स्वतःच्या घरात असतात.  म्हणून मकर संक्रांति ही पिता व पुत्र यांच्या भेटीच्या दृष्टिकोनातून बघितला जातो.

अजून एका पौराणिक कथेनुसार, 

भगवान विष्णू यांनी दानवांच्या आतंक पासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी दानवांचा नाश  केला. असुरांचे मुंडके कापून मंदरापर्वतावर पुरून टाकले. तेव्हापासून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे.

मकर संक्रांति वर  नव्या ऋतूचे आगमन होते.  शरद ऋतू जाऊन वसंत ऋतुचे आगमन होते.

उत्तरायण व दक्षिणायण Uttarayan and Dakshinayan

मकर संक्रांति नंतर दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते.  सूर्य  एका वर्षात सहा महिने उत्तरायण तर सहा महिने दक्षिणायण  मध्ये असतात

शास्त्राप्रमाणे उत्तरायण म्हणजे देवी देवतांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवी देवतांची रात्र असते.  सूर्य जेव्हा दक्षिणायन मध्ये असतात.

शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत . आणि वडील सूर्य यांच्या घरातील आगमनामुळे शनिदेवांचा प्रभाव क्षीण होतो.  म्हणून मकर संक्रांति वर  सूर्यदेव यांची उपासना,  दान,  गंगा स्नान व शनिदेव यांची पूजा केल्याने सूर्य आणि शनि संबंधित तक्रारींपासून सुटका प्राप्त होते.

मकर संक्रांति इतिहास History Of Makar Sankranti

  • महाभारतातील युद्ध समाप्तीनंतर भीष्म पितामह यांनी सूर्याच्या उत्तरायण होईपर्यंत प्रतीक्षा केली होती.  त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी आपले प्राण त्यागले होते.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी माता यशोदा यांनी श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी  व्रत केले होते.
  • गंगा नदी  ऋषीमुनींच्या आश्रमातून  समुद्रामध्ये विलीन झाली होती.  आणि भगीरथ च्या पूर्वज  महाराज सागर के पुत यांच्या पुत्रांना मुक्ती मिळाली होती.

मकर संक्रांतीचे उपाय Makar Sankranti Celebration

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी असे केल्याने दहा हजार गाई चं दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं.

या दिवशी उबदार कपडे,  ब्लॅंकेट,  तीळ,  गुळ आणि खिचडी दान केल्याने सूर्य व शनिदेव यांची विशेष कृपा प्राप्त होते.

मकर संक्रांति वर प्रयाग येथील तटावर आंघोळ केल्याने पुण्याची प्राप्ती होते.

निष्कर्ष Conclusion Of Makar Sankranti

तीळ आणि गुळ यांचे दान का केले जाते?  हा प्रश्न उद्भवतो आहे ना?

आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा एका विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो.  त्याचप्रमाणे त्यादिवशी विशिष्ट अशा पाककृती बनवल्या जातात.  या  शृंखलेनुसार मकर संक्रांति वर तीळ आणि गुड व त्यापासून बनलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व दिले जाते.  काही ठिकाणी तीळ आणि गुळाचे स्वादिष्ट लाडू बनवले जातात तर काही ठिकाणी चिक्की बनवली जाते.  तीळ व गुड यापासून बनलेली गजक या सर्वांमध्ये विशेष महत्त्व ठेवते.

पण हे दान देण्यापासून ते  खाण्यापर्यंत याचे एक विशेष वैज्ञानिक कारण आहे.  ते म्हणजे  मकर संक्रांति भर गारठ्यात थंडीच्या दिवसात येते.  तीळ आणि गुळाचे गुणधर्मानुसार शरीरातील गर्मी कायम ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला तिळगुळांच्या  पदार्थांचे विशेष महत्त्व असते.  कारण तिळामध्ये प्रचूर मात्रांमध्ये असलेल्या तेलामुळे तसेच वातावरणातील गारठ्यामुळे  शरीरात येणारा कोरडेपणा दूर होतो.  आणि गुळाचा गुणधर्म गरम आहे.  गुळामुळे रक्तातील गुणधर्म वाढतो व प्रतिकारशक्ती वाढते.  म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळाचे पदार्थ खाल्ले जातात

तसेच गारठ्यामुळे गारठलेल्या लोकांना किंवा गरज असलेल्या लोकांना ब्लॅंकेट उबदार कपडे यांचे दान दिले जाते.

मग वैज्ञानिक दृष्ट्या, पारंपारिक दृष्ट्या, ज्योतिष शास्त्र नुसार, तसेच स्वतःच्या चांगल्या कर्मासाठी दान करून पुण्य कमवावे असा संदेश वर्षातील पहिला सण मकर संक्रांत आपल्याला देऊन जातो.

धन्यवाद

Makar Sankranti

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri