Kumkumarchana
कुंकुमार्चन Kumkumarchana in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आज आपण देवीची कुंकुमार्चन पूजा विधि व त्यामागील कारण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता,
नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः ||
कुंकुमार्चन म्हणजे काय? Meaning of Kumkumarchana in Marathi
कोणत्याही देवी किंवा देवता यांचा नामजप करत, त्यांच्या मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू होण्याची विधी म्हणजेच कुंकुमार्चन होय. अर्थात देवी/ देवतांचे कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन.
कुंकवाचे महत्व Kumkumarchana Importance in Marathi
कुंकूवात “ शक्तीतत्त्व” आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणून कुंकवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवीतत्त्व जागृत होते. शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे समर्थक देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकूमध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रम्हांडातील शक्ती तत्वाच्या लहरी आकर्षित होतात. मूर्ती मधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी उपयोगी येतात. म्हणूनच कुंकवाला देवी पूजेत प्रथम स्थान दिले जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मानले जाते.
कुंकुमार्चन का करावे? Why to do Kumkumarchana in Marathi
देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते. हे कुंकू आपण लावल्यावर आपल्यालाही देवी शक्ती मिळते. घरामध्ये मंत्र उच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते.
कुंकुमार्चन कधी करावे? When to Perform Kumkumarchana in Marathi
कुंकुमार्चन नवरात्री, गुरुपुष्यामृत योग, पौर्णिमा, अमावस्या, लक्ष्मीपूजन मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करून केले जाते.
अथवा घरात नवीन देवीची मूर्ती आणले असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते.
कुंकुमार्चन पूजा विधि Kumkumarchana Puja Vidhi in Marathi
- ताम्हण मध्ये देवीची मूर्ती, चांदीचा देवीचा कॉइन घ्यावा
- देवी अन्नपूर्णा, दुर्गा देवी, लक्ष्मी देवी,श्रीयंत्र, अथवा सुपारी अशी कोणती ही देवीची मूर्ती कुमकुम अर्चन करताना चालून जाते.
- पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे.
- देवीचे आव्हान करून पूजन सुरू करावे.
- लाल किंवा गुलाबी रंगाची फुले व्हावे
- धूप दीप लावावा. (गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)
- देवीचा नाम जप करत मूर्तीवर चिमूटभर कुंकू अर्पण करत जावे. “ मृगी मुद्रा” म्हणजे केवळ अंगठा,अनामिका आणि मधील बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तकापर्यंत अर्पण करावे.
- मंत्र जप, नामजप, नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी.
- हे व्रत केल्याने मनोवंचित फळाची प्राप्ती होते ‘अशी मान्यता आहे.
- दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानी स्थापित करावे.
- कुंकू एका डबी मध्ये भरून रोज आपल्या मस्तकावर लावावे.
- हे कुंकू पुन्हा पूजेमध्ये वापरू नये.
- कुंकुमार्चन पूजा करताना कुंकू हळदी युक्त शुद्ध असावे
कुंकुमार्चन 5,7 ,11 सुहासिनी एकत्र येऊन केल्याने वातावरणात प्रसन्नता येते.
8 देवीची स्तुती कुंकुमार्चन 8 Devi Stuti in Marathi
आदिलक्ष्मी स्तुती 1 Aadilaxmi Stuti
सुमनस वंदित सुंदरी माधवी, चंद्र सहोदरी हेममये ,
मुनिगण वंदित मोक्षप्रदायनि,मंजुल भाषिणि वेदनुते |
पंकजवासिनी देव सुपुजित, सद्गुण वर्षिणि शांतियुते ,
जय जय हे मधुसूदन कामिनी, आदिलक्ष्मी परिपालय माम् || 1 ||
धान्यलक्ष्मी स्तुती 2 Dhanyalaxmi Stuti
आयकलि कल्मष नाशिनी कामिनी, वैदिक रूपिणी वेदमये ,
क्षीर समुद्भव मंगल रूपिणि , मंत्र निवासिनी मंत्रनुते |
मंगलदायिनि अंबुजवासिनि, देवगणणाश्रित पादयूते ,
जय जय हे मधुसूदन कामिनी, धान्यलक्ष्मी परिपालय माम् || 2 ||
धैर्यलक्ष्मी स्तुती 3 Dhairyalaxmi Stuti
जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि ,मंत्र स्वरूपिणि मंत्रमये,
सुरगण पूजित शीघ्र फलप्रद, ज्ञान विकासिनि शास्त्रनुते |
भवभयहारिणि पाप विमोचनि, साधू जनाश्रित पादयूते,
जय जय हे मधुसूदन कामिनी, धैर्यलक्ष्मी परिपालय माम् || 3 ||
गजलक्ष्मी स्तुती 4 Gajlaxmi Stuti
जय जय दुर्गति नाशिनी कामिनी, सर्व फलप्रद शास्त्रमये
रधगज तुरगपदाती समावृत्, परिजन मंडित लोकनुते |
हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित, ताप निवारिणी पादयूते,
जय जय हे मधुसूदन कामिनी, गजलक्ष्मी परिपालय माम् || 4 ||
संतान लक्ष्मी स्तुती 5 Santan Laxmi Stuti
आयिखग वाहिनी मोहिनी चक्रिणि ,रागविवर्धिनि ज्ञानमये ,
गुणगणवारधी लोकहितैषिणि ,सप्तस्वर भूषित गाननुते |
सकल सुरासुर देव मुनीश्वर ,मानव वंदित पादयूते,
जय जय हे मधुसूदन कामिनी, संतानलक्ष्मी परिपालय माम् || 5 ||
विजयलक्ष्मी स्तुती 6 Vijaylaxmi Stuti
जय कमलासिनी सद्गती दायिनि ज्ञानविकासिनी गानमये ,
अनुदिन मर्चित कुंकुम धूसर, भूषित वासीत वाद्यनुते |
कनकधरास्तुति वैभव वंदित, शंकरदेशिक मान्यपदे ,
जय जय हे मधुसूदन कामिनी, विजयलक्ष्मी परिपालय माम् || 6 ||
विद्यालक्ष्मी स्तुती 7 Vidyalaxmi Stuti
प्रणत सुरेश्वरी भारति भार्गवि , शोकविनाशिनी रत्नमये ,
मणिमय भूषित कर्ण विभूषण, शांतिसमावृत् हास्यमुखे |
नवनिधी दायिनि कलीमलहारिणी, कामित फलप्रद हस्तयूते,
जय जय हे मधुसूदन कामिनी, विद्यालक्ष्मी परिपालय माम् || 7 ||
धनलक्ष्मी स्तुती 8 Dhanlaxmi Stuti
धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि- दिंधिमि, दुंधुमि नाद सुपुर्णमये ,
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम, शंख निनाद सुवाद्यनुते |
वेद पुराण इतिहास सुपूजित, वैदिक मार्ग प्रदर्शयूते,
जय जय हे मधुसूदन कामिनी, धनलक्ष्मी परिपालय माम् || 8 ||
महालक्ष्मी अष्टकम Mahalaxmi Ashtakam in Marathi
नमस्तेSस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तेSस्तु || 1 ||
नमस्ते गरुडारुढे कोलासुरभयङ्करि |
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमस्तेSस्तु || 2 ||
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयङ्करि |
सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते || 3 ||
सिद्धीबुद्धीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनि |
मंत्रमुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तेSस्तु || 4 ||
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि |
योगजे योग सम्भूते महालक्ष्मी नमोस्तुते || 5 ||
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ती महोदरे |
महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते || 6 ||
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी |
परमेशि जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते || 7 ||
श्वेतांबरधरे देवी नानालङ्कारभूषिते |
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोस्तुते || 8 ||
फलश्रुती
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः |
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ||
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम |
द्विकाल यं पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ||
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम |
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्न वरदा शुभा ||
महालक्ष्मी नमोस्तुते |
कुंकुमार्चन देवीची 108 नामावली Kumkumarchana Devichi 108 Namavali
खालील प्रत्येक मंत्रा पुढे ॐ वापर करावा
- प्रकृत्यै नमः
- विकृत्यै नमः
- विद्यायै नमः
- सर्वभूतहितप्रदायै नमः
- श्रद्धायै नमः
- विभुत्यै नमः
- सुरभ्यै नमः
- परमात्मिकायै नमः
- वाचे नमः
- पद्मालययै नमः (10)
- पद्मायै नमः
- शुच्यै नमः
- स्वाहायै नमः
- स्वधायै नमः
- सुधायै नमः
- धन्यायै नमः
- हिरण्मयै नमः
- लक्ष्मीयै नमः
- नित्यपुष्टायै नमः
- विभावर्ये नमः (20)
- आदित्यै नमः
- दित्यै नमः
- दिप्तायै नमः
- वसुधायै नमः
- वसुधारिण्यै नमः
- कमलायै नमः
- कांतायै नमः
- कामाक्ष्यै नमः
- क्रोधसंभवायै नमः
- अनुग्रहपरायै नमः (30)
- ऋद्धाये नमः
- अनघायै नमः
- हरीवल्लभायै नमः
- अशोकायै नमः
- अमृतायै नमः
- दीप्तायै नमः
- लोकशोक विनाशिन्यै नमः
- धर्मनिलयायै नमः
- करुणायै नमः
- लोकमात्रे नमः (40)
- पद्मप्रियायै नमः
- पद्महस्तायै नमः
- पद्माक्ष्यै नमः
- पद्मसुंदर्यै नमः
- पद्मोद्भवायै नमः
- पद्ममुख्यै नमः
- पद्मनाभाप्रियायै नमः
- रमायै नमः
- पद्ममालाधरायै नमः
- देव्यै नमः (50)
- पद्मिन्यै नमः
- पद्मगंथीन्यै नमः
- पुण्यगंधायै नमः
- सुप्रसन्नायै नमः
- प्रसादाभिमुख्यै नमः
- प्रभायै नमः
- चंद्रवदनयै नमः
- चंद्रायै नमः
- चंद्रसहोदर्यै नमः
- चतुर्भुजायै नमः (60)
- चंद्ररूपायै नमः
- इंदिरायै नमः
- इंदूशीतुलायै नमः
- आल्होदजनन्यै नमः
- पुष्ट्यै नमः
- शिवायै नमः
- शिवकर्यै नमः
- सत्यै नमः
- विमलायै नमः
- विश्वजनन्यै नमः (70)
- तूष्ट्यै नमः
- दारिद्र्य नाशिन्यै नमः
- प्रीतिपुष्करिण्यै नमः
- शांतायै नमः
- शुक्लमाल्यांबरायै नमः
- श्रियै नमः
- भास्कर्यै नमः
- बिल्वनिलयायै नमः
- वरारोहायै नमः
- यशस्विन्यै नमः (80)
- वसुंधरायै नमः
- उदारांगायै नमः
- हरिण्यै नमः
- हेममालिन्यै नमः
- धनधान्यकर्यै नमः
- सिद्धये नमः
- स्त्रेण सौम्यायै नमः
- शुभप्रदायै नमः
- नृपवेश्म गतानंदायै नमः
- वरलक्ष्मै नमः (90)
- वसुप्रदायै नमः
- शुभायै नमः
- हिरण्यप्राकारायै नमः
- समुद्र तनयायै नमः
- जयायै नमः
- मंगलायै नमः
- देव्यै नमः
- विष्णू वक्ष:स्थल स्थितायै नमः
- विष्णूपत्नेयै नमः
- प्रसन्नाक्ष्यै नमः (100)
- नारायण समाश्रितायै नमः
- दारिद्र्य ध्वंसिन्यै नमः
- सर्वोपद्रव वारिण्यै नमः
- नवदुर्गायै नमः
- महाकाल्यै नमः
- ब्रम्हा विष्णू शिवात्मिकायै नमः
- त्रिकाल ज्ञान संपंन्नायै नमः
- भुवनेश्वर्यै नमः (108)
धन्यवाद
Very nice information.
खूप छान माहिती दिली. धन्यवाद!