जरे जीवन्तीके देवी बालयुक्ते प्रमोदिनी|
रक्षा व्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते ||
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
जिवती पूजा 2023 About Jivati Pooja in Marathi
जिवती पूजा श्रावणात येणाऱ्या दर शुक्रवारी केली जाते.यंदाच्या वर्षी पहिला श्रावणी शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी येत आहे. या वर्षी एकूण ५ श्रावण शुक्रवार येत आहेत.श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांचे जीवन सुखी ठेवण्यासाठी आई कडून केल्या जाणाऱ्या पूजेला जिवती पूजा असे म्हटले जाते. जीवनदान देणारी देवी म्हणजे जिवती . आज आपण या लेखात जिवती पूजा, प्रार्थना, ही पूजा का करतात व कशी करतात हे सर्व पाहणार आहोत.
जिवती पूजा कशी करावी? How to perform Jivati Pooja in Marathi
खूप ठिकाणी ही पूजा श्रावणात दररोज केली जाते. तर काही ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी जिवती देवीचा फोटो देवघरात किंवा घरात इतर कुठल्याही ठिकाणी भिंतीवर लावला जातो.
- सकाळी ब्रह्म मुहूर्त मध्ये उठून सकाळची सर्व कामे उरकून नित्य नियमाने देव पूजा केली जाते.
- जिवती देवीचा फोटो किंवा कागद भिंतीवर लावतात.
- गणपती बाप्पांच्या नावाची सुपारी ठेवली जाते.
- देवी लक्ष्मी चा ही फोटो ठेवला जातो.
- धूप दीप लावून देवांना आव्हान केले जाते.
- कलश पूजन करतात.
- फुल, दूर्वा, आघाडा,विड्याची पानं यांची माळा बनवून जीवती देवी च्या फोटोला घालतात.
- कापसाचे वस्त्र वाहिले जाते.
- गणपती बाप्पांची व देवी लक्ष्मीची आरती म्हणतात.
- दूध, फुटाणे, गुळ यांचा प्रसाद ठेवतात.
- जिवती देवीला मुलांच्या सुखी दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात.
- संध्याकाळी घरातील सर्व मुलांचे औक्षण करतात.
शेवटच्या शुक्रवारी पुरणाचा नैवेद्य करतात. 1,2,5 सवाष्ण जेवू घालतात.ब्लाऊज व तांदळाने त्यांची ओटी भरतात. फुटाणे गुळ यांचा प्रसाद देतात. असे या व्रताचे उद्यापन करतात.
आपल्याला तर हे माहीतच आहे गूळ-फुटाणे एकत्र खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते.पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे कमी होणाऱ्या प्रतिकारशक्ती ला वाढवण्यासाठी गुळ फुटाणे हे नैवेद्याच्या निमित्ताने घरात येतात. व त्यांचा समावेश खाण्यात येतो.
श्रावण महिन्यात येणार्या दुर्वा,आघाडा या छोट्या-छोट्या वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. त्यामुळे श्रावणातील बहुतेक सणांना मध्ये या वनस्पतींचा वापर होतो. ही कदाचित मानवजातीला आठवणच आहे, की पावसाळा सुरू झाला आहे तरी या वनस्पतींचा समावेश आहारात करावा.
जिवतीची पूजा करण्यामागचं कारण Reason behind performing Jivati Pooja in Marathi
वरती असलेल्या फोटोमध्ये आपण बघत आहोत चार चार वेगवेगळी चित्रे. फोटो कडे बघून यांचा आपसात काहीच संबंध नाही असं वाटतंय. पण तसं नसून यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न आपण पुढे करू यात.
1. पहिल्या चित्र श्रीहरी विष्णू यांनी नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध.
2. दुसऱ्या चित्र भगवान श्रीकृष्ण यांनी कालिया नागाला दिलेला समज.
3. तिसऱ्या चित्र जरासंधाच्या जन्माचं.
4. चौथ्या चित्रात बुध ग्रह व बृहस्पति ग्रह यांचा.
चला तर मग बघुयात या चित्रामागील रहस्य
1. पहिल्या चित्र श्रीहरी विष्णू यांनी नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपू वध.
असुरांचा राजा हिरण्यकश्यपू हा खूप अहंकारी होता. त्याच्या अहंकारामुळे त्याने आपल्या स्वतःच्या मुलगा प्रल्हाद चे खूप हाल केले होते. पण प्रल्हाद अखंड श्रीहरी विष्णू यांचा जप करत असे. हिरण्यकश्यपूचा अहंकाराचा अंत व बाल प्रल्हाद याचे रक्षण हे या अवताराचे कार्य. म्हणूनच ज्योती पूजा मध्ये पहिले चित्र हे आहे. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी केलेल्या या अन्यायाचा अंत आहे.परमेश्वरासमोर आपण सर्वच बालक आहोत. म्हणुनच त्याच्याजवळ हे मागणे आहे, की तू अन्यायाचा अहंकाराचा नाश करून आम्हा सगळ्यांचे रक्षण कर.
2. दुसऱ्या चित्र भगवान श्रीकृष्ण यांनी कालिया नागाला दिलेला समज.
श्रीहरी विष्णू यांचे पूर्ण रूप अवतार श्रीकृष्ण यांचे बालपण गोकुळ येथे गेले.बाळ गोपाळ यांच्याबरोबर ते यमुने किनारी खेळत असत. पण नदी यमुना मध्ये कालिया नावाच्या सर्प आला. त्याने गोकुळ मध्ये राहणाऱ्या लोकांना, बालकांना, गाय गुरांना त्रास द्यायला सुरुवात केली. नदीकिनारी खेळत असणाऱ्या बालकांचे रक्षण व अहंकारी सर्पाला समज ही श्रीकृष्ण यांनी या चित्रात दिली आहे. यातून आपल्याला हेच शिकायला मिळते, की योग्य वेळी अयोग्य व्यक्तीला, कृत्याला योग्य ती समज देणे खूप गरजेचे असते. प्रत्येक वेळेस सहन करणे हा पर्याय नसतो. यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की,” एकमेका साथ देऊ अवघे धरू सुपंथ” म्हणजेच योग्य मार्गात एकमेकांची साथ देऊन संकटाचा नाश केला पाहिजे.
3. तिसऱ्या चित्र जरासंधाच्या जन्माचं.
मगध राजाला दोन राण्या होत्या. पण पुत्र सुख नव्हतं. पुत्रप्राप्तीसाठी ब्राह्मणाने दिलेला आंबा त्याने आपल्या दोन्ही राण्यांना अर्धा अर्धा दिला. याचा परिणाम दोन्ही राण्यांना अर्धे-अर्धे पुत्र झाले. मात्र जरा नावाच्या यक्षिणी ने तिच्या जवळ असलेल्या या अवयव सांधण्याच्या कलेने ते दोन्ही सांधे जोडते.व जिवती देवीच्या मदतीने प्राणदान देते. म्हणूनच या राजकुमाराचे नाव जरासंध असं पडलं. म्हणून देवी जिवंतिका/ जिवती ही प्राणदान देणारी, दीर्घायुष्य देणारी, मुलांचे रक्षण करणारी देवी आहे.
4. चौथ्या चित्रात बुध ग्रह व बृहस्पति ग्रह दिसत आहेत.
चित्रामध्ये बुध ग्रह हे हत्तीवर बसलेले आहेत व त्यांच्या हातात
‘अंकुश” नावाचं शस्त्र आहे. बृहस्पति ग्रह वाघावर बसलेले व हातात चाबूक आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाने मुलांची तीक्ष्ण बुद्धि, प्रभावकारी व्यक्तिमत्व व वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याची शैली असे गुण येतात. व बृहस्पती ग्रहाच्या प्रभावाने मुलांना अध्यात्मिकतेकडे वाटचाल,शैक्षणिक उन्नती, विवेक बुद्धी इत्यादी गुण मिळतात.
हत्ती उन्मतपणा च प्रतीक तर वाघ अहंकाराचा प्रतीक आहे. व्यक्तीला\ बालकांना स्वभावातील उन्मतपणा व अहंकार यांच्यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. तसेच गरज पडली तर मनाला चाबूक दाखवून योग्य त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे हा संदेश मिळतो.
निश्चय Determination of Jivati Pooja in Marathi
वरील माहिती प्रमाणे आपण सर्वांनी जीवती देवी ची पूजा करताना हा निश्चय केला पाहिजे. मुलांना दीर्घायुष्य देऊन त्यांचे रक्षण करण्याबरोबरच त्यांना सद्बुद्धी द्यावी ही विनंती देवीला केली पाहिजे. तसेच खाली दिल्याप्रमाणे काही निश्चय केले पाहिजे.
- अहंकार मनात येऊ द्यायचा नाही. विवेकने काम करायचं
- मनात श्रद्धा ठेवायची.
- संयमतेने काम करायची.
- अन्यायाला सहन करायचे नाही.
- इतरांना मदत करावी.
- न्याय शील रहावे.
- योग्य वेळी, योग्य शब्दात समोरच्याला/मनाला समज द्यावा.
- मनाचा ऐकून आयोग्य गोष्टीला समर्थन न देता मनाला अंकुश लावावा.
- उन्नत पणाने वागू नये
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.
- गरज भासल्यास स्वतःच्या मनाला चाबकाने मारून (कठोर शब्दाने) दुर्बुद्धी चा नाश करावा.
Very informative
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला, या साठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद
अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची माहिती दिलीस. खूप छान वाटले वाचून आज्जीची आठवण झाली ती मला लहानपणी अशा सर्व गोष्टी व कहाण्या वाचून दाखवायची.
धन्यवाद?
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला, या साठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद
Very nice ?
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला, या साठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान लिहिलंय माहिती पण खूप छान आहे????
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला, या साठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद
Very nice and detailed information. Actually from our childhood we saw our grandparents and parents did these things but still today I really not aware of the meaning of the photo. Just because part of our retuals we continued it.
But thank you for this beautiful information.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला, या साठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद
Chaan..:)
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा ब्लॉग वाचून त्यावर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद
Very useful and good information and don’t know anything about jivti puja before that and after reading this blog I think I know everything thank you so much
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल तुमचा धन्यवाद.
Very much informative knowledge about our sanskuti
Amachya lahanpanichi aatvan zali. Tumchya mahitimule aai Ani baba chi aatav aali. Tumcha lekh khoop Sundar aahe.