Raksha Bandhan Date 2023 रक्षाबंधन 2023 तारीख

Raksha Bandhan Date 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित असलेल्या राखीपोर्णिमा या सणाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

राखी पौर्णिमा / रक्षाबंधन 2023 Raksha Bandhan 2023

आजचा आपला विषय आहे राखीपौर्णिमा. श्रावण या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन Raksha Bandhan असे म्हणतात. श्रावण हा महिना खूप सार्‍या सणांनी नटलेला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. 

भाऊ बहिणी यांचं अतूट असं नातं असतं. या अतूट अश्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन व भाऊबीज. वर्षातून दोनदा भाऊ व बहिणी आवर्जून एकमेकांना भेटतात. ते दोन दिवस म्हणजे राखी पौर्णिमा आणि भाऊबीज. 

राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही संबोधले जाते. महाराष्ट्रातील व कोकणातील काही भागांमध्ये या दिवशी आवर्जून नारळी भात केला जातो. नारळीभात करण्याची विधी लेखाच्या शेवटी देत आहे. 

राखी पौर्णिमा कधी आहे? When is Rakhi Pournima in Marathi

यावर्षी राखी पौर्णिमा बुधवार दिनांक, 30 ऑगस्ट 2023 रोजी आहे. पौर्णिमाआरंभ: बुधवार दिनांक, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरू होत आहे. 

पौर्णिमा समाप्ती: गुरुवार दिनांक, 31 ऑगस्ट रोजी सकाळी ०७ वाजून 05 मिनिटांनी समाप्त होत आहे. 

त्यादिवशी बुधपूजन योग व अतिगंड योग आहे. 

रक

हिंदी कॅलेंडर प्रमाणे According to Hindi Calendar

उत्तर  भारतातील हिंदी कॅलेंडर नुसार  पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पासून महिना बदलतो म्हणजेच भाद्रपद लागणार आहे.

हिंदी कॅलेंडर प्रमाणे भद्रा योग सुरू होत आहे. भद्रा ही शनिदेवाची बहिण . शनिदेवाप्रमाणे भद्राही स्वभावाने कडक आहे . परंतु यावर्षी काहि ज्योतिषां प्रमाणे 30 ऑगस्ट पोर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस भद्रा योग आहे . परंतु यंदाच्या वर्षी श्रवण नक्षत्रात चंद्रमा चे स्थान असल्यामुळे हा योग पृथ्वी लोक वासियांसाठी फलदायी आहे . यामध्ये काहिही अनिष्ट होत नाही .

भाऊ बहिण यांना समर्पित कविता/ रक्षाबंधन कविता

  • ||भाऊ लहान असो वा मोठा

तो असतो जिव्हाळ्याचा.

आंबट गोड आठवणीने,

सजतय अतुट नातं,

भाऊ – बहिणीचं.

त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी

जरूर भेटावे भावाला

राखी पोर्णिमा या सणाच्या दिवशी ||

रक्षाबंधन म्हणजे काय? What does Raksha Bandhan mean in Marathi?

Raksha Bandhan रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर एक धागा बांधते. या धाग्याला “राखी” असे संबोधतात. बहिण भावाला राखी बांधतांना त्याच्या दीर्घायुष्यासाठी व मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे भाऊ तिला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो.

याव्यतिरिक्त भाऊ बहिणीच्या घरी जातो. तिचं आनंदी आयुष्य आपल्या डोळ्याने बघतो. तिला आहेर देतो. तिच्या आवडीच्या वस्तू तिच्यासाठी नेतो. मिठाई, फळ, तिखटमिठाचे पदार्थ, फराळ, भाचा- भाची यांच्यासाठी चॉकलेट जे जसं जमेल तसं तो आपल्या परिनं घेऊन जातो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा सणासुदीला बायका माहेरी राहायला जातात. आई व वहिनी सोबत वेळ घालवतात. पण भाऊ सकाळी स्वतःच्या कामाला जातो तो थेट संध्याकाळी येतो. त्याच्या दिनचर्या मध्ये असं काही विशेष बदल होत नाही. पण सणाच्या निमित्ताने खरेदी , प्रवास, मेजवानी या सगळ्या गोष्टींमुळे उत्साह निर्माण होतो.

प्रत्येक स्त्रीच्या जीवनात भावाचं एक वेगळं स्थान असतं.

|| नाही म्हणत म्हणत मॅगी बनवून देणारी बहिण,

वर्षभर पॉकेटमनी मधून बहिणीसाठी पैसे जमा करणारा भाऊ.

टॉम अँड जेरी सारखे भांडणारे,

तरिही एकमेंका शिवाय राहू न शकणारे,

अश्या सर्व बहिण भावांना राखी पोर्णिमेच्या शुभेच्छा ||

Raksha Bandhan quotes - Raksha Bandhan

रक्षाबंधन कशी साजरी करावी? How to celebrate Raksha Bandhan in Marathi?

भारतीय सैनेतील जवान देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे राहतात . उन, पाऊस ,थंडी, सण कशाचीही पर्वा करत नाहीत .त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो . त्यांना थोडासा आनंद मिळावा म्हणून प्रत्येक मुलींनी, बायकांनी त्यांच्यासाठी एक रक्षा धागा म्हणजेच राखी पाठवावी . त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करावी .

राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला, वहिनींना, भाचा – भाची यांना आवर्जून घरी बोलवावे. दुपारच्या जेवणाला जर माहेरची मंडळी जेवायला असली की संध्याकाळी आपणही आवर्जून नणंदेच्याघरी जावे. गोडाधोडाचे जेवण, गप्पाटप्पा, लहानपणीच्या आठवणी असा मस्त आनंदमय दिवस घालवावा.

  • सकाळी उठून घर आवरावे.
  • घरातील देवांची पूजा करावी.
  • कुलदेवी ला स्मरण करावे.
  • गणपती बाप्पा व बाळकृष्णाला राखी बांधावी.
  • खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात. 
  • भावाच्या आवडतीचा स्वयंपाक करावा.
  • पूजेच्या ताटामध्ये कुंकू, अक्षता, राखी, औक्षण करण्यासाठी दिवा व काहीतरी  गोड ठेवावे. 
  • प्रथम भावाला माथ्यावर अंगठ्याने वरील बाजूला जाईल असा कुंकवाने टिळक करावा.
  • टिळ्यावर अक्षता लावाव्यात.थोडा डोक्यावर टाकाव्यात. 
  • भावाच्या मनगटावर राखी बांधावी. त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी कामना करावे.
  • दिव्याने भावाचे औक्षण करावे.
  • भावाने बहिणीचे पाया पडावे.
  • बहिणीला आहेर द्यावा. 
  • भावाच्या ताटाभोवती रांगोळी काढावे.
  • भाऊ भावजय भाचा-भाची या सर्वांना एकत्र बसवून प्रेमाने जेवू घालावे.
  • काही ठिकाणी भावजय व भाच्याला ही राखी बांधण्याची प्रथा आहे.

डोक्याला टीळा लावल्यावर तांदूळ का लावतात? Why Rice is Applied After Tilak on Forehead

सण म्हणजे काय? Festival means what in Marathi

सण म्हणजे कोणत्याही देवाला, नात्याला, नाते-संबंधी यांना समर्पित केलेला दिवस. जीवनाच्या धावपळीत माणूस एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. पण सण म्हटला की तो आवर्जून वेळ काढतो. व कामाच्या व्यापातून विश्रांती घेऊन थोडा आनंद घेतो. असाच भाऊ बहिणीला समर्पित असा सण म्हणजे रक्षाबंधन. 

भाऊ जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरीही तो बहिणीला भेटण्यासाठी प्रयत्न करतो.काही कारणास्तव जर तो येऊ शकला नाही तर फोन करून बोलतो. लहानपणीच्या आठवणींना जगतो. त्यातूनच आनंदाच्या चैतन्य लहरी जाग्या होतात. रोजच्या धावपळीच्या जीवना व्यतिरिक्त नवीन विचारांना चालना मिळते. पुन्हा उत्साहाने तो कामाला लागतो.

बहीण सुद्धा भावाच्या स्वागतासाठी आतुर असते. नवनवीन पकवान बनवते. भावाच्या आवडीचं जेवण तयार करते. घर सजवते. यातून तिला देखील उत्साह येतो. ती रोजच्या घरच्या कामातून थकलेली असते. तिचे विचारांना नवीन चालना मिळते. जेणेकरून ती पण पुन्हा संसाराचा गाडा ओढण्यासाठी सज्ज होते.

बहिणी सुद्धा आपल्या परराज्यातील किंवा परदेशातील भावांसाठी राखी पाठवतात. राखी पोस्टाने, कुरियरने, स्पीड पोस्ट ने अशा कोणत्याही माध्यमातून पाठवल्या जातात.

प्रत्येक स्त्रीच्या जीवनात भावाचं एक वेगळं स्थान असतं. हे दर्शवण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. लहानपणीच्या आंबट गोड आठवणी, स्मृति या सगळ्या या गोष्टींना उजाळा देण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. एकत्र भेटून सण साजरा करून नवीन गोड आठवणी निर्माण करण्याचा दिवस म्हणजे सण होय. 

भाऊ फक्त रक्ताचाच असतो असे नाहिये . आपसांत ऋणानुबंध जुळले कि नाती जमुन येतात . म्हणूनच आपल्या पाहण्यात मानलेले भाऊ बहिण असतात . तसेच एकाच गुरुंचे शिष्य असलेले लोक सुद्धा एकमेंकांना गुरुभाई, गुरु बहिण म्हणून बघतात . अशी अनेक बंधू भगिनींच्या जोड्यादेखील प्रचलित आहेत .

बाजारात आपण  राखी शॉपिंग फेस्टिवल, राखी धमाका, राखी सेल अशा विविध शीर्षकाखाली जाहिराती बघतो. खरंतर मुलींची/ बायकांची खरीदारी राखी या सणा पासून सुरू होते. या खरेदी 1ला दिवाळीनंतरच विराम लागतो. म्हणूनच राखी हा खरेदीचा सण म्हणूनही ओळखला जातो. 

बाजारात राखी या फक्त एक धागा नसून विविध प्रकारच्या आकर्षित राख्या भेटतात

विविध प्रकारच्या राख्या Different types of Rakhi available in Market in Marathi

  • अनेक रंग संगती च्या राख्या
  • मेटल च्या डिझायनर राख्या.
  • चमकणाऱ्या खड्यांच्या राख्या.मोतीचे राखी. 
  • देवी-देवता यांचे चित्र चिन्ह असलेल्या राख्या.
  • सोन्या चांदीच्या राख्या.
  • भावजया साठी लुंबा.
  • लहान मुलांसाठी छोटा भीम,युनिकॉन,डोरेमॉन इत्यादी कार्टूनच्या राख्या. 
  • पिझ्झा, पास्ता ,बर्गर, नूडल्स, फ्राईजअशा विविध तुमच्या लहान मुलांना आवडणार्‍या खाद्यपदार्थांच्या राख्या सुद्धा बाजारात मिळतात. 
Rakhi image - Raksha Bandhan

पौराणिक कथा Traditional Story of Raksha Bandhan in Marathi

कथा – 1 Raksha Bandhan Story – 1

ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण यांनी शिशुपाल ची हत्या सुदर्शन चक्राने केली होती, त्यावेळेस त्यांच्या बोटाला चक्र लागून दुखापत झाली होती. त्या सभेमध्ये द्रोपदी उपस्थित होती. तिने धावत येउन श्रीकृष्णाच्या हाताला आपल्या साडीचा एक तुकडा फाडून लावला. त्यावेळेस भगवंतांनी तिला रक्षण करण्याचं वचन दिलं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्ण यांनी तिचं रक्षण केलं होतं.

हा दिवस होता श्रावणातील पौर्णिमेचा. म्हणून या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. व तो तिच्या रक्षण करण्याचं वचन देतो. 

कथा – 2 Raksha Bandhan Story – 2

भगवान श्रीहरी विष्णू यांनी राजा बळी यांना वामन अवतारात एक वचन दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे श्रीहरी विष्णू हे पातळ लोकांचे द्वारपाल होतात. पातळ लोकात जाऊन राहायला लागतात. माता लक्ष्मी प्रभुंना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी राजा बळी यांना एक धागा बांधतात. राजा बळी माता लक्ष्मीला बहीण मानतात. माता लक्ष्मीला रक्षणाचे वचन देतात.त्या वेळेस लक्ष्मी माता बळीराजा यांना श्रीहरी विष्णू यांना वचनातून मुक्त करण्याची मागणी करते. राजा बळी भगवान श्रीहरी विष्णू यांना वचनातून मुक्त करतात. माता लक्ष्मी यांनी राजा बळी यांना धागा बांधण्याचा दिवस श्रावणातील पौर्णिमेचा होता. म्हणून देखील हा दिवस राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून ओळखला जातो.

नारळी भात करण्याची विधी How to make Narali Bhaat in Marathi

पावसाळ्यात गरम गरम भात खाण्याची मज्जाच न्यारी.

नारळीभात करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • एक वाटी तांदूळ 
  • दोन वाटी नारळाचं दूध( बाजारातील)
  • एक वाटी पाणी
  • एक वाटी किसलेला गूळ
  •  एक चमचा तूप व इलायची व जायफळ पूड

तांदूळ धुऊन घ्या. पातेल्यामध्ये एक चमचा तूप घ्या. त्यावर धुतलेले तांदूळ घालून थोडावेळ परतावा. इलायची पूड घालावी. जायफळाची पूड घालावी. नारळाचे दूध व पाणी घालावे. भात शिजत आला की त्यामध्ये किसलेला गूळ टाकावा. थोडावेळ शिजून पाणी आटलं की गॅस बंद करावा. गरम गरम भात देवाला नैवेद्य दाखवून खाऊन घ्यावा.

Shravan Rudra-abhishek image - Raksha Bandhan

4 thoughts on “Raksha Bandhan Date 2023 रक्षाबंधन 2023 तारीख”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri