Tarak Mantra – Lyrics, Meaning, and Benefits

Tarak Mantra – Lyrics, Meaning, and Benefits

स्वामी तारक मंत्र Swami Tarak Mantra

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रभावशाली व चमत्कारिक मंत्र तारक मंत्र बद्दल जाणून घेणार आहोत.

श्री स्वामी समर्थ यांची महिमा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. स्वामींचा  “भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे”  हे एकच वाक्य ऐकून जणू आपल्या  मनात प्रचंड शक्तीचा प्रसार होतो.

स्वामींचे तारक मंत्र म्हणजे,  व्यक्तीच्या आतील शक्तींना जागृत करणे. tarak mantra

स्वामींचे तारक मंत्र हे स्वतः स्वामींनी स्व मुखाने भक्तांना दिलेली शाश्वती होय.

तारक = तारक म्हणजे तारुन नेणारा  किंवा तारणारा.  

मंत्र = मंत्र म्हणजे मनन केल्याने प्राप्त होणारी गोष्ट.

आजकाल आपण बघतोच कोणतीही गोष्ट सकारात्मक दृष्ट्या सतत मनात ज्या येतात त्या पूर्ण होतात.  म्हणून तारक  मंत्रांचा अनुभव खूप भक्तांना आलेला आहे.  तारक मंत्राचा अर्थ त्याच्या शब्दातच दडलेला आहे,  प्रत्येक संकटातून यशस्वीरित्या काढणारा तसेच प्रत्येक दुःखातून तारणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र  स्वामींनी भक्तांना दिलेला हा एक चमत्कारिक मंत्र आहे.

माहिती Introduction Of Tarak Mantra In Marathi

मनुष्य जीवन हे नाना  प्रकारच्या चिंता,आजार,संकट, विचार या सगळ्यांनी बांधलेले असते. पण 

मनाला चिंता /आजार /संकट नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र होय

म्हणूनच तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त करणारा मंत्र देखील संबोधले जाते.  श्री स्वामींच्या या तारकमंत्र्यांमध्ये प्रचंड शक्ती आहे.  म्हणूनच दररोज लाखो भावीक मनोभावे स्वामींच्या तारक मंत्रांचे नामस्मरण करतात. tarak mantra

श्री स्वामींचे तारक मंत्र Shree Swami Tarak Mantra

निशंक होई रे मना |  निर्भय होई रे मना |

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे,

आतर्क अवधूत हे स्मरणगामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||1|

जिथे स्वामी चरण तिथे न्यून  काय !

स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय,

आज्ञेविना काळही ना नेई त्याला|

परलोकही ना भीती तयाला ,

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||2||

उगाची भितोसी,  भय हे पळू दे,

जवळी उभा स्वामी शक्ती कळू दे|

जगी जन्म- मृत्यू असे खेळ ज्यांचा ,

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||3||

खरा होई जागा श्रद्धेसहित,

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त ?

आठव कितीदा दिली त्यांनी साथ

नको डगमगू स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||4 ||

विभूती नमन नाम ध्यानादि  तीर्थ

स्वामीच या पंच प्राणामृतांत

हे तीर्थ घेई,  आठवी रे प्रचिती 

न सोडवी तया,  जया स्वामी घेती हाती 

अशक्य ही शक्य करतील स्वामी…||5||

Tarak Mantra

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी अर्थासहित Shree Swami Tarak Mantra With Meaning In Marathi

निशंक होई रे मना |  निर्भय होई रे मना |

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे,

आतर्क अवधूत हे स्मरणगामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||1|

अर्थात

स्वामी स्व मुखाने भक्तांच्या मनाला ही शाश्वती देत आहे की रे मना, तू कसलीही भीती किंवा संशय बाळगू नकोस. कारण प्रचंड स्वामी बळ हे तुझ्या पाठीशी  तुझ्यासोबत आहे.  आतर्क म्हणजेच तर्क नसलेला.  तर्क म्हणजे लॉजिक कोणत्याही प्रकारचं लॉजिक  मनात येऊ नको देऊ.

संपूर्ण विश्वासाने कोणताही तर्क किंवा लॉजिक न लावता भक्तांना स्वामींची अनुभूती आलेली आहे.  अवधूत म्हणजे अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती. म्हणूनच स्वामींना अवधूत असे संबोधले जाते.  स्मरणगामी म्हणजे मनामध्ये भक्ती भावी स्मरण करता क्षणी जर तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी लगेच भक्ताच्या मदतीला धावून येतात tarak mantra

जिथे स्वामी चरण तिथे न्यून  काय !

स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय,

आज्ञेविना काळही ना नेई त्याला|

परलोकही ना भीती तयाला ,

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||2||

अर्थात

ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टींची कमी नाही.  स्वामी स्वतः भक्तांचे  भाग्य लिहितात.  ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते.स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही.

उगाची भितोसी,  भय हे पळू दे,

जवळी उभा स्वामी शक्ती कळू दे|

जगी जन्म- मृत्यू असे खेळ ज्यांचा ,

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||3||

अर्थात

अरे  मना!  तू उगाच घाबरू नकोस,  कितीही मोठे संकट आले तरीही खचून जाऊ नकोस,  त्या संकटाला सामोरे जायचे त्याला कसा सामना करायचा याचे सामर्थ्य स्वामी देतील.  स्वामींची शक्ती व पाठबळ हे कायम आपल्या पाठीशी आहे.

ज्यावेळी स्वामी अक्कलकोट मध्ये वास्तव्य करत होते त्यावेळेस अनेक भक्तांना स्वामींनी मोठ मोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे.  जणू जन्ममृत्यू हा स्वामींच्या हातातील खेळ आहे.  आणि तू तर त्यांचा बाळ आहेस  त्यामुळे स्वामी असताना तू घाबरू नको रे मना ! 

खरा होई जागा श्रद्धेसहित

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त ?

आठव कितीदा दिली त्यांनी साथ

नको डगमगू स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी….||4 ||

अर्थात

स्वामीं बद्दल दृढ विश्वास तसेच श्रद्धा असावी.  निसंकोच पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केल्याने आपण स्वामी भक्त  बनवू शकाल.  आयुष्यात आलेल्या संकटांना वाईट  काळाला  सामोरे  जाण्यासाठी आपण भक्ती भावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी देखील भक्ताच्या हाकेला मदतीला धावून येतात. 

ज्या ज्या वेळी आपल्या प्रसंगाला धावून आलेल्या स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती सातत्याने आठवण ठेवली पाहिजे. त्यामुळे घाबरू नका यापुढेही स्वामी सदैव तुमचा साथ देतील

विभूती नमन नाम ध्यानादि  तीर्थ

स्वामीच या पंच प्राणामृतांत

हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचिती 

न सोडवी तया,  जया स्वामी घेती हाती 

अशक्य ही शक्य करतील स्वामी…||5||

अर्थात

विभूती,  नमन,  नाम , ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृत असे संबोधले आहे.  पंचामृत म्हणजे जीवनातील पाच अमृत.  

विभूती म्हणजे भस्म 

नमन /नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण

ध्यान- सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे.

तीर्थ-  म्हणजे सर्वकाही पवित्र करणार.

अर्थात,  दत्त संप्रदायात विभूतीला अनन्य महत्त्व आहे.  याची महिमा साधारणता सर्वांनीच अनुभवली आहे.  स्वामींचे नामस्मरण हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच ध्यान.  तीर्थाने सर्वकाही पवित्र होऊन जाते.  म्हणून विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत.  तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून  प्राशन करावे.

स्वामीभक्त स्वामींना विसरले तरी स्वामी त्यांना सोडत नाहीत.  कारण स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याणच करतात.

तारक मंत्र कधी म्हणावा? When Can You Recite Tarak Mantra in Marathi

वेळ काळ अशा गोष्टींनी तारक मंत्र बांधला गेला नाही.  ज्यावेळी मनाला भीती वाटते त्यावेळी मंत्राचे उच्चारण केल्याने मनाला  मनशांती तसेच सकारात्मकता   जाणवू लागते.

  • स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणती ठराविक वेळ नसते.
  • अगदी कुठेही कधीही आपण तारक मंत्र म्हणू शकतो.  आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्या पद्धतीने आता तारक मंत्र कधीही म्हणू शकतो.

तारक मंत्र कसा म्हणावा? How To Recite Tarak Mantra in Marathi

दोन-तीन वेळा वाचन केल्याने तारक मंत्र कंठस्थ होतो. कंठस्थ झालेला मंत्र तुम्ही कुठेही कधीही कसाही म्हणू शकता.

परंतु,  जर कोणत्या विशिष्ट साध्य करायचे असल्यास, 

  • तारक मंत्र म्हणताना स्वामींचा फोटो  समोर ठेवावा.  फोटोजवळ पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवावा.  तारक मंत्र म्हणताना स्पष्ट उच्चार तसेच त्याचा अर्थ समजून घेऊन मनोभावे म्हणावा.
  • तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्यावे,  कारण त्या पाण्यात  तारक मंत्राची शक्ती तसेच सकारात्मक्ताची ऊर्जा आलेली असते.  त्यामुळे हे पाणी प्राशन केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात.
  •  तारक मंत्राचे नामस्मरण  किंवा उच्चारण 1, 5, 11, 21, 108 पद्धतीने स्वतःच्या इच्छेनुसार करावे.

Tarak Mantra

तारक मंत्र म्हणण्यानेकाय फायदे होतात? Benefits Of Tarak Mantra in Marathi

  • स्वामींचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित आहे.  जी व्यक्ती स्वामी समर्थ यांचे नामस्मरण भक्ती भावाने तसेच श्रद्धेने करते त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
  • स्वामींचा तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामे ही शक्य होतात ही अनुभूती स्वयम लाखो भक्तांनी घेतलेली आहे.  असे मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्र मध्ये इतकी शक्ती आहे की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक ऊर्जेकडे संचार करतो. जणू व्यक्तीच्या आतील शक्ती जागृत होतात. 
  • तारक मंत्र्यांचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते.
  • मनातील चिंता व भय यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तारक मंत्राचे वाचन केले जाते.
  • तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल,  कोणती समस्या चे उत्तर मिळत नसेल,  कोणत्याही कार्याला सहजरित्या पूर्ण करण्यासाठी,  जीवनात यश मिळवण्यासाठी,  स्वतःला ठाम व कठोर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या तारक  मंत्राचा जप करावा.
  • स्वामींच्या तारक मंत्र मध्ये खूप ताकद आहे.  यामुळे भक्ताला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही,  सातत्याने स्वामी बळ पाठीशी असल्याची जाणीव असते म्हणूनच कदाचित मनातील भीती नाहीशी होते .

निष्कर्ष Conclusion Of Tarak Mantra in Marathi

मनाला भय,  चिंता यांपासून दूर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्रांचा वाचन आवश्य करावे.  कोणतीही गोष्ट मनापासून केल्याने त्याच्यात नक्कीच यश मिळते.  त्यातच भक्तीने आणि विश्वासाने सातत्याने म्हणाला सकारात्मकताकडे वळवल्याने नक्कीच जीवनात फायदे मिळतात.  स्वामी नेहमीच म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे  या एकाच वाक्याने जणू एकट्या पडलेल्या मनाला सांत्वना मिळते.  म्हणूनच हा मंत्र देखील फायदा करून जातो.

पटतंय ना?

धन्यवाद

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.

2 thoughts on “Tarak Mantra – Lyrics, Meaning, and Benefits”

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri