Guru Purnima 2023 गुरुपौर्णिमेचे महत्व

अनुक्रमणिका

||अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज,

परब्रम्ह सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय||

नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,

गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,

गुरुपौर्णिमेचा इतिहास History Of Guru Purnima in Marathi

माझे सद्गुरू श्री साईनाथ महाराज यांना नमन करून मी आज हा गुरुपौर्णिमा विशेष लेख आपल्या समोर माझ्या भाषेत मांडत आहे. गुरुपौर्णिमेविषयी आपण या लेखात बघूयात.भारतात गुरूपौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. मानवी जीवनात गुरूचे स्थान सर्वप्रथम आहे.शाळा महाविद्यालय तसेच गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा ही मोठ्याने साजरी होते. व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा एकच आहे. गुरु व्यास यांच्या विषयी आपण  सर्वांनाच माहित आहे,की त्यांनी महाभारत सारख्या पवित्र ग्रंथाची रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या ज्ञानाच्या भंडार असलेल्या वेदांची रचना सुद्धा केली आहे. वेदांची व महाभारत सारख्या पवित्र ग्रंथाची रचना करून महर्षी व्यास यांनी समाजाला धर्मशास्त्र, व्यवहार शास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आदी शास्त्रांची ओळख करून दिली आहे.संत ज्ञानेश्वर यांनीदेखील ज्ञानेश्वरी लिहिताना गुरु व्यास यांचा उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त केली आहे हे आपण सगळ्यांना माहीतच आहे. गुरु व्यास यांचा जन्म तिथीप्रमाणे आषाढ महिन्यातील शुद्ध  पौर्णिमेस येतो.म्हणूनही गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात आणि गुरू व्यास यांचे पुजन या दिवशी करण्‍याची प्रथा आहे. 

गुरुपौर्णिमा कधी आहे? गुरुपौर्णिमा 2023 When is Guru Purnima 2023 in Marathi?

यावर्षी गुरुपौर्णिमा दिनांक 3 जुलै, सोमवार या दिवशी आहे. पौर्णिमा 2 जुलै रोजी ८:४१ मि सुरु होत आहे. तसेच ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजून ०८ मि. समाप्त होत आहे . मूळ हे नक्षत्र असून ब्रम्हा हा योग आहे. 

गुरु शिष्य परंपरा Culture of Guru – Pupil in Marathi

||गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, 

 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||

 म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे साक्षात परब्रह्म प्रमाणे आहेत. गुरूंचे  स्थान मनुष्य जीवनात सर्वप्रथम आहे. अंधारात ज्याप्रमाणे छोटासा दिवा  मनुष्याला मार्ग  दाखवून पार पाडतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या अंधारमय जीवनात गुरु प्रकाश बनून मार्ग दाखवतो. गुरु व शिष्य ही परंपरा खूप जुनी आहे. पूर्वी राजा व त्यांचे मंत्री यांची मुले सर्व गुणांनी संपन्न होण्यासाठी गुरुकुलात जाऊन राहायचे हे आपण खूप पुराणात बघितले आहे. स्वयम् विष्णू अवतार प्रभु श्री राम व श्रीकृष्ण यांनी सुद्धा  भूतलावर ज्ञानप्राप्तीसाठी गुरु केले होते. वाल्मिकी  व सांदिपनी  यांच्या आश्रमात पूर्ण बालपण घालवून व या गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मनुष्य रूपात गुरु- शिष्य या परंपरेचा मान ठेवला.

प्रचलित असलेल्या गुरु-शिष्यांच्या जोड्या Famous pair of Guru and Shishya in Marathi

  • महर्षी व्यास  आणि गणेश
  • गुरु वशिष्ठ आणि राम
  • सांदिपनी आणि कृष्ण
  • द्रोणाचार्य एकलव्य
  • द्रोणाचार्य अर्जुन 
  • गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ
  • ज्ञानदेव निवृत्ती 
  • जनार्दन स्वामी एकनाथ
  • समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज 
  • दिनानाथ मंगेशकर लता मंगेशकर 
  • सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर

गुरुपौर्णिमेचे महत्व Importance of Guru Purnima in Marathi

प्रथम गुरूंचा मान आदियोगी भगवान शिव यांना देण्यात आलेला आहे आहे असे आपण खूप पौराणिक कथांमध्ये वाचलेले आहे.

श्री कृष्ण यांची चक्रवर्ती सेना कौरवांजवळ असूनहि कौरवांना पराभव स्वीकारावा लागला .त्याच ठिकाणी स्वयम् प्रभू श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली  पांडवांनी महाभारत जिंकली.हे शक्य झाले गुरु च्या  मार्गदर्शनामुळे तसेच साधक अर्जुन यांच्या नम्रपणा, गुरूंवर असलेला विश्वास ,गुरूंनी केलेल्या आदेशाचा पालन करण्याची सर्वस्व इच्छा यामुळे. कोणताही गुरु हा कल्पवृक्षाप्रमाणे असतो,जीवनातील प्रत्येक घडामोडींवर स्व अनुभवांवरून आलेल्या प्रत्येक गोष्टींचा मार्गदर्शन करतो. शिष्याचे खडतर  जीवनाला उद्देश्य तसेच योग्य त्या मार्गदर्शनाने घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गुरु असे म्हणतात. 

प्रत्येक व्यक्ती मातीच्या गोळ्याप्रमाणे असते त्याला घडवण्याचा, आकार देण्याचा व उपयुक्त बनवण्याचा काम गुरु करतात .जर व्यक्तीच्या जीवनात गुरु नसते तर कदाचित मनुष्याचे जीवन वाया गेलं असतं. त्याला त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट मिळणं शक्य झालं नसतं. जीवनाचे उद्दिष्ट  शोधून त्याकडे  योग्य दिशेने वाटचाल करणं हे मार्गदर्शन गुरु करतात. 

पालक Role of Parents as a Guru in Marathi

आई वडील हे प्रथम गुरु. हसणे, बोलणे,चालणे इथपासून ते दुनियादारी मध्ये वावरणे यांचे योग्य ते मार्गदर्शन व्यक्तीला त्याच्या आई-वडिलांकडूनच मिळत असते. आई-वडील हे आपले हितैषी असतात.व्यक्तीचे देह त्याला त्याच्या पालकांकडून मिळतो. त्यांना सातत्याने आपली काळजी असते म्हणून ते आपल्या जीवनाच्या वाटेवर आपल्याला मार्गदर्शन  करत असतात. एवढेच नाही तर सांस्कृतिक,मानसिक तसेच सामाजिक स्तरावर आपल्याला निपूण करतात.

शिक्षक कसा असावा Shikshak kasa asava in Marathi

अ पासून अननस ते विज्ञान, कला, साहित्य, भूगोल इतिहास, गणित इत्यादीं पुस्तकांमधील माहिती समजावून देऊन त्याचे ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण शिक्षक म्हणतो.शालेय जीवनात पुस्तकांचे माध्यमातून आपण जगातील सर्वच गोष्टींचे ज्ञान  घेतो. हे ज्ञान पूर्णपणे अर्जित करण्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करतात.जगामध्ये व्यवहार ज्ञान सामाजिक ज्ञान तसेच शैक्षणिक ज्ञानाचा वापर करून  विद्यार्थी स्वतःचे जीवन सुलभ व सोपे करतो.जेवढं लक्षपूर्वक व नम्रपणे विद्यार्थी शिकण्याचा प्रयत्न करतो तेवढं जास्तीत जास्त शिकून तो जीवनातील सर्व लहान मोठ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.आर्थिक दृष्ट्या स्वताला बळकट करू शकतो.

गुरूंचे महत्त्व Importance of Guru in Marathi

स्वतःमधील कलागुणांची जाण ही व्यक्तीला नसते, ती जाणून त्यामध्ये निपूण करण्याचे काम गुरु करत असतात.योग्ययोग्य दिशेने  जाण्याचे मार्गदर्शन व सामर्थ्य देण्याचे कार्य गुरु करतात. मनुष्याच्या जीवनात गुरूचे स्थान सर्वात वरती असते. रात्रीच्या अंधारा प्रमाणे, अंधकारमय असलेल्या मनुष्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हा गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच येतो.गुरु म्हणजे शाश्‍वत, गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे कीर्ती गुरु,म्हणजे भक्ती, गुरु एक विश्वास,गुरु ज्ञानाचा प्रकाश, गुरु म्हणजे प्रगती ,गुरु म्हणजे कर्तव्याची साक्षात मूर्ती अशा कितीही उपमा गुरूंना दिल्या तरी त्या कमीच आहेत.मोठमोठ्या प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या गुरूंची नाव घेताना कानाची पाळी ओढताना आपण आजही बघतो. अशा व्यक्तींना घडवणं त्यांना प्रसिद्धी पर्यंत पोहोचवणं, मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना दूरकरण्यासाठी मदत करणं व साहस देणे हे काम गुरु उत्तम रित्या पार पडतात. म्हणूनच व्यक्ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचते.

सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यजीवन हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण मनुष्याकडे विचार करण्याची क्षमता तसेच बुद्धी आहे. जगात खूप ज्ञान आहे. अष्टपैलू असणारी व्यक्ती सुद्धा पूर्णपणे ज्ञान अर्जित करू शकत नाही.जगातील सर्व क्षेत्रांमध्ये शंभर टक्के माहिती असणे कठीणच.जगात एवढे ज्ञान आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही. पण गुरूच्या मार्गदर्शनामुळे स्वतःचे जीवन 

सुलभ व आनंददायी करू शकतो., जर गुरूंनी मार्गदर्शन केले नाही तर मनुष्याचे हे  जीवन वायाला जाऊ शकते . व त्याचे जीवन बिन पाण्याच्या माशासारखे तडफडत राहील. त्याला त्याची दिशा  शोधेपर्यंत बहुतेक त्याची अंतिम वेळ येईल.जर गुरूंनी  मनुष्याचा हात धरला नाही तर ज्ञानाचा सागर असलेल्या या सृष्टीत मनुष्य जीवन बुडून जाईन.

श्रद्धा आणि संयम याद्वारे अध्यात्मिकतेचे ज्ञान  देऊन तसेच भक्तीची दिशा दाखवून परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्गदेखील शोधण्यास गुरु आपली मदत करतो.कदाचित म्हणूनच परमेश्वरापर्यंत जाण्याच्या मार्ग दाखवणाऱ्या गुरूंना सद्गुरु असे म्हणत असावे.

गुरुपौर्णिमेची कविता Poem on Guru Purnima in Marathi

मासाच्या या गोळ्याला, जन्म दिला आई

प्रथम झाली तू गुरु, जन्म झाला माझा सुरु

ममतेचे हे वात्सल्य देऊनी, प्रेमाची भाषा शिकवली ||1 ||

देहाला माझ्या आकार देऊनी, मोठं केलं बाबा तुम्ही

द्वितीय झाले तुम्ही गुरु, घडामोडी झाल्या सुरू

माझे सर्व बालहट्ट पुरवूनी,त्यागाची भाषा शिकवली || 2||

बालपणीचे धडे घेऊनी, तृतीय गुरु झाले शिक्षक

बाल हटा ला शिस्त लावूनी,जागतिक ज्ञान दिले तुम्ही

व्यवहाराचे ज्ञान देऊनी, जगाची भाषा शिकवली ||3||

जीवनाला माझ्या अर्थ देऊनी, दिशेची मार्गदर्शन केले तुम्ही 

कसे फेडेन हे ऋण मी तुमचे, तुम्ही दिलेल्या या ज्ञानाला 

न्याय देण्याचा प्रयत्न करीन,माझ्या या जीवनाला मी नक्कीच एक अर्थ देईन.||4||

आज गुरुपौर्णिमेच्या या सणाला माझे आभार स्वीकार करा, स्वीकार करा

गुरु कसा असावा? Guru Kasa asava in Marathi

  • गुरु अनुभवी व मार्गदर्शक असावा.
  • शिष्याला जशी गरज गुरुची असते तशीच गुरूला देखील शिष्या ची गरज असते म्हणून गुरुला देखील शिष्याची जाण असावी.
  • शिष्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याजवळील पूर्ण ज्ञान व मार्गदर्शन शिष्याला देणारा असावा.
  • गुरु प्रामाणिक असावा त्याला शिष्याची चूक ओळखून ती दाखवता आली पाहिजे.
  • शिष्याचे कल्याण होवो ही भावना गुरु मध्ये प्रबळ असावी.
  • शिष्याच्या अडचणी संयम तेने ऐकून त्यावर योग्य पर्याय देणारा असावा.
Guru Purnima 2022 sairam

गुरु म्हणजे कोण? Who can be a Guru?

मनुष्य रुपी जीवनात सजीव तसेच निर्जीव वस्तूदेखील आपले गुरु असू शकतात.आई,वडील,शिक्षक,भावंड,नातेवाईक,मित्रपरिवार या सगळ्यांकडून आपण काही ना काही शिकत असतो. तसेच अहंकार रुपी राक्षसाला जर मारले तर प्रत्येक मनुष्यात काहीना काही वेगळंअसतं जे शिकण्यासारखंअसतं.म्हणून आयुष्यात  येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवते.मनुष्य म्हटलं की चुका होतातच पण या अनुभवातून जर आपण काही शिकलो तर आपल्या चुका देखील आपल्या गुरुच असतात.आयुष्यात येणारे चढ-उतार, वेळ हे सर्वात मोठे गुरु. अर्थातच मनुष्य मनाने, स्व-इच्छेने,नम्रपणे ज्या ज्या गोष्टींना स्वीकारेल ते सर्वच गुरु. 

शिष्य कसा असावा? साधक कसा असावा? शिष्य कोण असावा? Who is Shishya? Who can become a successful Shishya?

  • जी व्यक्ती नम्र असते.
  • ज्या व्यक्तींमध्ये अहंकार नसतो.
  • ज्या व्यक्तीमध्ये गुरूंबद्दल आदर, विश्वास व प्रेम असते.
  • गुरूंचा आदेश स्वीकारून त्या दिशेने वाटचाल जी व्यक्ती करू शकते.
  • गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता असलेली व्यक्ती.
  • जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याची लालसा असणारी व्यक्ती. 
  • प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही सन्मान देणे, हे न विसरणारी व्यक्ती
  • लक्ष्याकडे ध्येय केंद्रित करून वाटचाल करणारी व्यक्ती. 
  • जीवनाच्या सत्याला स्वीकारणारी व्यक्ती.

अशी प्रत्येक व्यक्ती साधक असू शकत ते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय करावे? What to do on Guru Purnima 2022 

  1. आई-वडील मोठे भाऊ बहीण यांचे पाया पडून आशीर्वाद घ्यावा.
  2.  जागतिक स्तरावरील गुरूंना फुल, बुके, फळ, ग्रीटिंग कार्ड, यातील जमेल ते देऊन, प्रेमाचे दोन शब्द बोलून, आभार व्यक्त करावा.
  3. शक्य असल्यास व्यासांच्या ग्रंथांचे वाचन करावे.
  4. पुढील वर्षासाठी काही लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्धार करावे.

गुरु पौर्णिमेचे व्रत कसे कराल? गुरु पौर्णिमेची पूजा कशी कराल? How to Perform Pooja and Fast on Guru Purnima?

  • सकाळी लवकर उठून घर साफ करावे.
  •  स्वच्छ आंघोळ करावी.
  •  एखाद्या स्वच्छ ठिकाणी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरूण गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करावे.
  •  दाही दिशांना अक्षता टाकावी.
  •  गणरायांचे नामस्मरण करावे.
  •  आपल्या गुरूंचे नामस्मरण  करावे.

“गुरुपरंपरासिद्धयर्थ व्यासपूजा करिष्ये” या मंत्राचा जप करावा.

9 thoughts on “Guru Purnima 2023 गुरुपौर्णिमेचे महत्व”

    • तुम्ही दिलेल्या कमेंट्स मुळे लिहायला उत्साह येतो. हा लेख वाचून स्वतःचा वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.

      Reply

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri