Gudi Padwa Date गुढी पाडवा तारीख महत्व 2024

Gudi Padwa Date गुढी पाडवा तारीख महत्व

नमस्कार  मंडळींना,

आज आपण गुढीपाडवा Gudi Padwa या सणाबद्दल तसेच त्याचे महत्त्व,  तारीख, मुहूर्त तिथी व पारंपारिक कथा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. 

 

सुरुवात होत आहे नववर्षाला

  नवीन दिशा मिळू प्रत्येकाच्या जीवनाला

घराघरात बनवूया पुरणपोळी व श्रीखंडाचा बेत

आयुष्यात विरघळू दे सुखाचा गोडवा

प्रत्येकाच्या जीवनात आहे सुखदुःखांची रेत

पण सगळं विसरून पहिला सण साजरा करूया गुढीपाडवा

 तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

गुढीपाडवा 2024 शुभ मुहूर्त Gudi Padwa 2024 is Auspicious Time Mahurat In Marathi

गुढीपाडवा पासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते . हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीची सुरुवात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 ला सकाळी 11.51 मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8.31 मिनिटापर्यंत असणार आहे. शक्यतो आपण उदय किती धरतो त्यानुसार गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल 2024 मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. 

याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते.

गुढी कशी उभारावी Gudi Kashi Ubharavi In Marathi

गुढीची उंच काठी किंवा बांबू पासून तयार केली जाते.

  • या काठीला वेळू काठी असे संबोधले जाते.  वेळूची काठी सामर्थ्याचे प्रतिनिधीत्व करते.
  • काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. रेशमी वस्त्र किंवा साडी ( शक्यतो साडी जरीची वापरतात)  वैभवाचे प्रतिनिधित्व करतात.
  • काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. कडुलिंबाची डहाळी आरोग्याचे प्रतिनिधित्व करते,  तर त्यावरील तांबा म्हणजेच मंगल कलश यशाचे प्रतिनिधित्व करतात.  गुढीवर चढवलेले पुष्पहार मांगल्याचे प्रतीक आहे तर साखरगाठी माधुर्य याचे प्रतीक आहे.
  • ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. 
  • तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. 
  • गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात. 
  • पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. गोड भातही बनवला जातो. याला साखर भात असेही म्हणतात.

Gudi Padwa

 

गुढीपाडवा म्हणजे काय ? What is Gudi Padwa? In Marathi

गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राचा पहिला दिवस.  चैत्र महिन्यापासून नववर्षाची सुरुवात होते म्हणून हा चंद्राचा पहिला दिवस असं मानला गेला आहे.  म्हणूनच चंद्रकाल गणनेनुसार  गुढीपाडव्याला Gudi Padwa नववर्षाची सुरुवात असे मानले गेले आहे. तसेच धार्मिक मान्यता अनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आहे..

 

गुढीपाडवा पौराणिक कथा Gudi Padwa Traditional Story In Marathi

वानर राज बालीचा अंत End of Vanar Raj Bali In Marathi

दक्षिण भारतातील सुग्रीव व बाली हे दोघे भाऊ होते.  बालीने  सुग्रीव च्या पत्नीला  महलात  कैद करून ठेवले होते.  व सुग्रीवला राज्यातून निष्काशीत केले होते.  बाली अतिशय शक्तिशाली होता.  व त्याला शत्रू कडील पन्नास टक्के ताकद स्वतःकडे घेण्यासाठी वरदानही होते.

माता सीता चा शोध घेत असताना जेव्हा प्रभू श्रीराम सुग्रीवला भेटले. त्यावेळेस  सुग्रीवने प्रभू श्रीरामांना  बालीच्या अत्याचाराची माहिती दिली.  त्यानंतर प्रभू श्रीरामांनी बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या गैरशासनातून मुक्त केले.  हा दिवस चैत्र प्रतिपदेचा दिवस होता. म्हणूनच या दिवशी गुढी रुपी विजय पताका आकाशात फडकवली जाते.

धन्यवाद.

Gudi Padwa

“Girnar Unveiled Historic Sites, and Natural Wonders” गिरनार पर्वत सर का करावा ?

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri