“Girnar Unveiled Historic Sites, and Natural Wonders” गिरनार पर्वत सर का करावा ?
नमस्कार मंडळींना,
नुकताच माझ्या वाचनात आलेला हा लेख अतिशय आवडलेला लेख आहे या लेखांमध्ये सरळपणे आपल्याला हे कळून चुकते की कशाप्रकारे गुरुचे महत्व हे सर्व परी असते. गुरुचे महात्म्याचे, आपल्या जीवनातील गुरुचे स्थान का असावे याचे उत्तर जणू या लेखात आपल्याला मिळून जाते.
श्रद्धा आणि भक्ती कशी करावी आणि आपल्या जीवनाचं लक्ष आणि वळण कसे लावावे हे नक्कीच कळतं.
खरं तर हा कोणी लिहिला आहे याची मला कल्पना नाही, पण त्या लेखाचा संदर्भ घेऊन मी हा लेख तुमच्यासमोर माझ्या शब्दात मांडत आहे.
गिरनार म्हणजे काय ? What is Girnar? In Marathi
पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण
गिरनार चे दिव्यत्व Divinity of Girnar In Marathi
गिरनार पर्वत चढणे म्हणजे दहा हजार पायऱ्यांचा गड चढणे. यामध्येच विचार करा हा अनुभव किती भव्य आणि दिव्य असेल.
- गिरनार सर करायचा म्हणजे 10000 पायऱ्या चढणे होय. भौतिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.
- भगवान दत्त दिगंबर यांनी आपल्या निरंतर राहून अर्जित केलेले तसेच 12000 वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.
- भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या- मोठ्या पर्वत, शिखर यांचा समूह असलेला हा परिसर आहे.
- शिवपुराणात गिरनार चा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे.
- स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात.
- रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रिमूर्ती म्हणजेच क्रमशः ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी निगडीत आहेत.
- प्रभू श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात.
- पुराणां मध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो .
- गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो.
वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे.
गिरनार बद्दल थोडक्यात माहिती Brief information about Girnar In Marathi
- जुनागड या शहरापासून गिरनार पर्वताचा तळभाग ५ कि.मी. अंतरावर आहे या पर्वताचा विस्तार साधारणता 16 गाव म्हणजेच चार योजन पर्यंत विस्तारित आहे.
- गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत सुंदर, अद्भुत, वन्यप्राणी संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
- पूर्वीपासूनच असे आढळत आहे की अनेक वर्षांपासून बरेच सिद्धयोगी गिरणार पर्वतांच्या गुफांमध्ये तपस्या करत आहेत. त्यापैकी बऱ्याच साधुसंतांना दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मिळालेला आहे. एकंदरीत बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज या संतांनी दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर दत्तप्रभूंच्या दर्शनाच्या हेतू तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.
गिरनार परिसर आणि कुंड Girnar Area And Kund In Marathi
- गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन काळापासून असलेली पुरातन देवळे आहेत.
- महाशिवरात्रीला मृगी कुंड येथे पाच दिवसांची जत्रा भरते. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात.मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते.असे मानले जाते की, स्वयं भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
याच्यातील खास बात म्हणजे, अनेक साधू एकत्रितपणे मृगी कुंडामध्ये स्नानाला उतरतात. सर्व साधू वरती येतात मात्र एक साधू येत नाही. जो साधू येत नाही तोच स्वयं शिव असतो.
आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध आखाडे बघण्यात येतात. या आखाड्यांची नावे
- जुना आखाडा,
- निरंजन आखाडा,
- आव्हान आखाडा,
- अग्नी आखाडा
असे अनेक आखाडे आहेत . जेथे जेथे गुरुस्थान असते तेथे तेथे गुरु भक्तांना अन्नदान चालूच असते या रितीप्रमाणे येथील आश्रमांमध्ये देखील वर्षानुवर्ष अन्नदान चालू आहे. अशी ही गुरु शिष्य परंपरा येथे जोपासली जाते.
येथून समोरच्याच बाजूला असलेल्या एका अरुंद रस्ता किंवा पायवाटेने गेले असता आत जंगलाच्या दिशेने श्रीकाश्मीर बापूंचे आश्रम आहे. लंबे हनुमानांचं मंदिर दिसलं की समजायचं त्यासमोरूनच वाट आहे. 150 वय वर्ष श्री काश्मीर बापूंचे आहे अशी येथील स्थानिकांकडून माहिती मिळते.
पर्वतांच्या मधील जागा असल्यामुळे या आश्रमामध्ये चारही दिशे च वातावरण अतिशय निर्मळ आहे शेवटी श्री काश्मीर बापू यांच्या तपामुळे सिद्ध झालेली जागा आहे ही याचा अनुभव निश्चितच येतो
गिरनार पर्वत चढताना कोणत्या स्थानांना भेट द्यावी ? Which Places To Visit While Climbing Girnar Parvat?
- पायर्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात. डोली ची सुविधा येथून घेण्यात येऊ शकते .
- सुरुवातीलाच साधारणतः 200 पायऱ्या चढून गेल्यावर श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते.
- नंतर थेट 2000 पायऱ्या चढून गेल्यावर श्री वेलनाथ बाबा यांची समाधी लागते.
- 2250 पायऱ्या चढल्यानंतर राजा पूर आणि गोपीचंद यांची गुफा लागते. याचा उल्लेख श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथांमध्ये आढळतो.
- येथूनच थोडं बाजूला गेलं तर परब घाट येतो. येथे प्रभू श्रीरामांचे मंदिर आणि मंदिराच्या शेजारीच गोड पाण्याचे थंडगार कुंड आहे.
- 2600 पायऱ्या चढून गेल्यावर राणक देवीमातेची शिळ आहे. या शाळेवर हातांच्या दोन पंज्यांचे निशाण आहे.
- पुढे 3500 पायऱ्या चढून गेल्यावर प्रसुती बाई देवीचे स्थान आहे. प्रसूती या शब्दावरूनच आपल्याला येथील महात्म्य कळते. प्रसूती झालेली स्त्री म्हणजेच जिने नवजात शिशुला जनम दिला आहे अशी स्त्री आपल्या बाळासकट येथे देवीच्या दर्शनाला येते .
- थोडंच पुढे गेल्यावर काही महत्त्वाची स्थाने आहेत त्यामध्ये संतोषी माता, वरुडी माता, खोदियार माता आणि काली माता तसेच दत्त गुफा यांची छोटी छोटी देवळे आहेत असा उल्लेख आहे.
- जैन समुदायाचे 22 व तीर्थकार नेमिनाथ यांचा राजवाडा या ठिकाणी बघण्यात येतो. त्यामध्ये नेमिनाथांची काळापासून बनवलेली मूर्ती अतिशय सुबक व मोहक आहे. अशी मान्यता आहे की नेहमी नात्यांनी या ठिकाणी सातशे वर्ष साधना केली आहे व हेच त्यांचे समाधी स्थान सुद्धा आहे.
- येथून थोडेच पुढे जाऊन पायऱ्या उतरल्यावर जैन समुदायातील पहिले तीर्थकार आदिनाथ यांची खूप भव्य आणि उंच प्रतिमा दिसते.
- थोडे पुढे गेल्यावर, पाषाणमय गाईच्या मुखातून गंगेचं पाणी येतं अशी ही गो मुखी गंगा बघण्याचा व त्या पाण्याला स्पर्श करण्याचा आनंद वेगळाच!! जेथे गंगा तेथे शिव याप्रमाणेच शेजारीच गंगेश्वर महादेव देऊळ व बटूभैरवाचे देऊळ आहे.
- या गोमुखी मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग व डाव्या बाजूने खाली उतरण्याचा मार्ग आहे. या मार्गांचा वापर जास्त होत नसल्याने याबद्दल माहिती खूप कमी लोकांना आहे.
- गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूला जर आपण पर्वत चढायला लागलो तर 4800 पायऱ्या चढून गेल्यावर अंबाजी टुंक नावाचे स्थान येते. अंबाजी म्हणजेच व प्रभू श्रीकृष्ण यांची कुलदेवी. तसेच हे स्थान 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. अशी मान्यता आहे की देवी पार्वतीने येथे अंबामाता च्या रूपात वास केलेला आहे. मात्र या देवळाचे मुख्य द्वार नेहमीच बंद असते. हे द्वार फक्त होळी पौर्णिमा व नवरात्रीलाच उघडतात,
- येथील देवीची मूर्ती भक्तांचे लक्ष अगदी वेधून घेते. जणू प्रत्यक्ष शक्तीचाच अनुभव येऊन जातो.
- साधारणतः 5500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक या स्थानावर आपण जाऊन पोहोचतो. या स्थानाची प्रचिती गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर अशी आह
- .श्री गोरक्षनाथ यांनी दत्त महाराजांना , “आपल्या चरणांचे दर्शन मला सातत्याने होत राहावे” अशी प्रार्थना केली होती . आपल्या भक्ताच्या या विनंतीला दत्त महाराज नाकारू शकले नाही म्हणून गोरख शिखर सर्वात उंचावर आहे.
- बाजूलाच एक छोटासा बोगदा आहे याला पाप पुण्याची खिडकी असे संबोधले जाते. गंमत म्हणजे या बोगद्यातून एका बाजूने आत शिरायचे व सरपटत दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. असे केल्यास मोक्षाचा मार्ग मिळतो अशी येथील मान्यता आहे.
गोरक्ष टुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी १,००० ते १,५०० पायऱ्या उतरायला लागतात.
साधारणतः 1000-1500 पायऱ्या उतरल्यावर श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे साष्टांग नमस्कार करतात त्यांना श्री गिरनारी बापू “प्रसाद” म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात
या सगळ्या देवळांचे व मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या अतिशय सुबक व कोरीव आहेत. यावरून आपल्या प्राचीन संस्कृतीचे ज्ञान किती अग्रेसर होतं हे कळून चुकतं.
थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे.
दत्तटुंक किंवा गुरूशिखर Dattatunka or Gurushikhar In Marathi
डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १,००० पायऱ्या चढल्यावर दत्तटुंक किंवा गुरूशिखर आहे. श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो यांचा स्थानवर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तां मध्ये आहे.
१० X १२ चौ फूट जागे मध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे.
बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा ३ वेळा आपल्या पूर्वजांची नांवे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे . ईथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते.
गुरु दत्तात्रय यांच्या चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. हे स्थान उंचावर असल्यामुळे दत्त साधकांच्या उपासनेचा एक भाग म्हणून भक्त येथे आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्या हलक्या उजेडात आकाशाचे दृश्य विलोभनीय . गिरनार पर्वताचे पावसाळ्यातील अनुभव वर्णन करणे शक्यच नाही. असे जाणवते जणू ढगही शिखरावर येऊन बसले आहेत.
उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात
अखंड धुनी Akhand Dhuni Of Girnar In Marathi
इथे ५,००० वर्षे पासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रकट होते… स्वयंभूपणे… कोणत्याही प्रकारे अग्नी न पुरवता… त्या अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलकुंड स्थानी असलेले साधू सुमारे येथे पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते.
ज्याची श्रद्धा अतूट असते त्यांना येथे दत्तात्रयांचे साक्षात दर्शन घडते.
ज्याची श्रद्धा अतूट असते त्यांना येथे दत्तात्रयांचे साक्षात दर्शन घडते.
स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास असला व दत्त यांच्या साक्षात दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी मध्यरात्री दोन किंवा अडीच च्या दरम्यान पर्वत चढण्यास सुरुवात केली तर सकाळी सहा साडेसहा पर्यंत याचा अनुभव घेता येतो
तसेच अग्निकोंडातील भस्माचे वाटप प्रसाद म्हणून केले जाते
कमांडलू स्थान Kamandalu Sthan Girnar In Marathi
अशी मान्यता आहे की, गुरु दत्तात्रय यांनी दत्तटुंकवर हजारो वर्ष ध्यान केले आहे. ते ध्यानात असताना राज्यावर दुष्काळ आला. दुष्काळामुळे प्रजा हैराण झाली, त्यावेळी माता अनुसया यांनी दत्तात्रय यांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली, मायेची हाक ऐकून दत्तात्रयांच्या हातातील कमांडलू खाली पडले. त्यामुळे येथे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी म्हणजेच अखंड ध्वनी प्रकटली तर दुसऱ्या भागे गंगा मातेचे अवतरण होऊन जलकुंडाचे निर्माण झाले. या जलकुंडाच्या स्थानाचे नाव कमांडलू स्थान असे पडले. येथील आश्रमामध्ये अन्नछत्रही आहे.
दत्तमहाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात . या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे जाता येते.गुंफेमध्ये मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे. येथे महाकाली ची पूजा बसून करावी लागते.
शेजारच्याच दोन डोंगरावर रेणुकामाता अन् अनुसूयामाता विराजमान आहेत.
दातार पर्वताच्या समोरच असलेला डोंगर जोगीणीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर जाण्यास आजही कोणी धजावत नाही. या डोंगरावरील एका गुंफेमध्ये शिवलिंग असून, ही अरूंद गुंफा आत प्रशस्त होत गेली आहे.एक वृद्ध बापू तेथे सेवा करतात. याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे.
निष्कर्ष Conclusion of Girnaar In Marathi
माणसाच्या शरीरात काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर अजूनही बरेच अवगुण माणसाने स्वतःमध्ये रुजवले आहेत. जोपर्यंत आपल्यातील अवघड नाहीशी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कधीच दत्त भेटू शकत नाहीत.
म्हणूनच दत्त म्हणतात जोपर्यंत तुझ्यातील “ मी” मरत नाही. तोपर्यंत तुझे मन कधीच सर्वार्थाने पवित्र होत नाही.
गिरनारच्या 9999 पायऱ्या चढताना प्रत्येक वेळी हा अनुभव निश्चितच येतो. स्वतःमधील “ मी” ला मारणे किती आवश्यक आहे , त्याचप्रमाणे त्यालाही महत्त्व किती आहे हे सांगून जाते.
एकंदरीत बघायला गेलं तर ही यात्रा भक्ताच्या मनापासून ते शरीरापर्यंत सगळ्यांनाच पवित्र करणारी तसेच अविस्मरणीय यात्रा नक्कीच ठरेल. म्हणून जीवनात एकदा तरी गिरणार पर्वत सर केलाच पाहिजे.
धन्यवाद